हक्क सांगू....

Submitted by महेश मोरे स्वच्छंदी on 28 February, 2021 - 00:31

हक्क सांगू..............

पावसावर हक्क सांगू की ढगावर हक्क सांगू ?
की उन्हाने जाळलेल्या वावरावर हक्क सांगू ?

ती मला बस् दे म्हणाली आणि मी देऊन बसलो
मी कसा आता स्वतःच्या काळजावर हक्क सांगू ?

पाहिजे आहेत तितके मोगरे आहेत भवती
मी कशाला रातराणीच्या फुलावर हक्क सांगू ?

धर्म, जाती, पंथ, भाषा यातल्या मिटवू दऱ्या अन्
शक्य झाले तर नव्याने माणसावर हक्क सांगू

लागली शर्यत कधी तर प्रश्न पडतो एक हा की
कासवावर हक्क सांगू की सशावर हक्क सांगू ?

देह नावाच्या घराचा एकटा भाडेकरू मी
एवढी औकात नाही की घरावर हक्क सांगू

©®- महेश मोरे (स्वच्छंदी), सातारा
9579081342

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users