मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ८

Submitted by कविता१९७८ on 9 February, 2021 - 01:03

आपल्या वागण्या बोलण्यावर मुख्यत्वे करुन आपण ज्या वातावरणात वाढलो आहोत याचा सर्वात जास्त प्रभाव असतो. आपण आपल्या आई — वडीलांना / पालकांना पाहुन मोठे होत असतो. त्यांची वागणुकही आपण आत्मसात करत असतो. बर्‍याचदा व्यसना मुळे किंवा तापट उग्र स्वभावामुळे काही कुटुंबात सतत कलह , चिडचिड आणि अशांती असते. ©Copy Right by Kavita Patil विशेषत: दारुचे व्यसन असलेल्या घरात खुप जास्त अशांती नांदते. पुर्ण कुटुंबही उध्वस्त झाल्याची उदाहरणेही आपण पाहतो. अशावेळी लहान मुलांवर याचा विपरीत परीणाम होत असतो. सततची मारहाण , भांडण , पुरेसे अन्न न मिळणे , सततची कटकट , गरीबी यामुळे लहान मुलांची खुप घुसमट होते. बर्‍याचदा पालकांचा स्वभाव खुप हेकेखोर , विक्षिप्त , अहंकारी , तिरसट असतो. शिस्तीच्या नावाखाली पालक आपल्या मुलांवर प्रचंड बंधने लादतात. त्यामुळे बर्‍याचदा मुले बंडखोर बनतात. बर्‍याचदा अशा वातावरणातही काही मुले खुप कष्ट घेउन यशस्वी होतात खरी परंतु त्यांच्या मनात मिळालेल्या वागणुकीचा सल कायम असतो. कुंटुंब म्हणजे नेमकं काय , एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम , आदर याचा अभाव अशा ठीकाणी जाणवतो.

कीतीही यश , सुख समाधान मिळाले तरीही मिळालेल्या वागणुकीचे दु:ख सतत मनात सलत असतं , संताप खदखदत असतो परीणामी ती व्यक्तीही नकळत आपल्या कुटुंबाशी / मित्र परीवाराशी आणि सभोवतालच्या जगाशी तशीच वागु लागते आणि त्यात काही चुकीचे आहे असेही त्या व्यक्तिला वाटत नाही.©Copy Right by Kavita Patil यातुन नातेसंबंध तर खराब होतातच पण स्वत:च्या मनातही सतत खदखद / अस्वस्थता / नकारात्मकता निर्माण होते. यातुन जर बाहेर पडायचे असेल तर आपल्याला मागच्या गोष्टी सोडुन देणे / माफ करणे आणि पुढे जाणे हा उपाय
असतो पण तो इतका सहज नाही आणि माणुस पुन्हा त्याच चक्रात अडकत जातो. यासाठी योग्य त्या मेडीटेशन बरोबरच आपण सतत शांत , संयमी आहोत हे डोळ्यासमोर पाहत राहावे. यासाठी पुढील सकारात्मक विधान फायदेशीर ठरेल.

" मी सतत शांत , संयमी , सकारात्मक असुन दुसर्‍यांना समजुन घेत आहे आणि समोरचे ही मला समजुन घेत आहेत."

जो पर्यंत आपण आपल्यात बदल घडवुन समोरच्यांशी नीट वागत नाहीत तो पर्यंत आपल्याला समोरुन ही तसा प्रतिसाद येत नाही. बर्‍याचदा आपण शांत वागुनही समोरुन तोफेच्या फैरी झडतात पण त्यावेळी तो प्रसंग संयमाने हाताळायला हवा. ©Copy Right by Kavita Patil कदाचित समोरची व्यक्ति कुठल्यातरी कठीण मानसिक किंवा भावनिक प्रसंगातुन जात असेल आणि म्हणुन ती आपल्याशी अशी वागत आहे हे सतत स्वत:ला समजावणे गरजेचे आहे. असे नाही की आपण सुरुवात केली म्हणजे प्रत्येक वेळी आपण शांतपणानेच घेऊ बर्‍याचदा आपणही समोरच्या व्यक्तिशी त्याच्या प्रमाणेच वागु , भांडु पण नंतर आपल्याला आपली चुक उमगली की सकारात्मकतेचा मार्ग मोकळा होतो. आपल्याला आपल्या आत्मोन्नतीसाठी कुठेतरी सुरुवात करायची गरज आहे. कालांतराने आपल्यात बदल होत जातात आणि आपल्याला मानसिक शांती मिळते.©Copy Right by Kavita Patil यासाठी योग्य त्या मेडीटेशन्सचीही तितकी गरज असते.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ७

https://www.maayboli.com/node/78058

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

उपयुक्त माहिती.
आधीच्या भागाची लिंक द्या ना लेखाच्या सुरवातीला.