मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ७

Submitted by कविता१९७८ on 8 February, 2021 - 00:39

आपलं आयुष्य सर्व सुखाने पुर्ण असावं , आपल्याकडे धनाची , धान्याची आणि या बरोबर बाकीच्या आवश्यक गोष्टींची भरभराट असावी असं कुणाला वाटत नाही. पण बर्‍याच ठीकाणी बर्‍याच गोष्टींची कमतरता असते तर काही ठीकाणी निवडक गोष्टींची कमतरता असते तर काही ठीकाणी अगदी न मोजण्या इतकी कमतरता असते. © Copy Right by Kavita Patil अशा वेळी ही कमतरता आहे हे लक्षातही येत नाही पण ज्या व्यक्तिकडे या गोष्टींची भरभराट असेल त्या व्यक्तिला अशा ठीकाणी त्या गोष्टींची कमतरता वाटु शकेल. भरभराट म्हणजे फक्त पैसे किंवा धनधान्य नाही तर आरोग्य , हवा , पाणी , पुरेसा प्रकाश , स्थैर्य , परीपुर्णता , मानसिक आनंद ,समाधान , मान—सन्मान , प्रेम , सतत व्यस्त असल्याने वेळेचा अभाव म्हणजे स्वत: साठी किंवा दुसर्‍यासाठी वेळ देऊ न शकणे ,सततचे कष्ट करुनही कीतीही केलं तरीही कमीच पडतंय अशी भावना , शारीरीक आणि मानसिक आराम यासारख्या अनेक गोष्टींची कमतरता ही भरभराटीमधे रुपांतरीत झाली की आयुष्य ही सुखकर होते.

मी बर्‍याच ठीकाणी पाण्याची कमतरता पाहते. © Copy Right by Kavita Patil देवकृपेने आजपर्यंत मला या गोष्टींची कमतरता भासली नाही परंतु काही सुखवस्तु घरातही खुपदा पाण्याची टंचाई पाहायला मिळते. काही घरात पुरेसा प्रकाश नसतो , कोंदट वातावरण असतं , बर्‍याचदा काहींच्या आयुष्यात सततची बदली , शिफ्टींग यामुळे स्थैर्य नसतं , बर्‍याचदा सर्व मिळुनही मन समाधानी , संतुष्ट नसतं , कीतीही मिळालं तरी मन दुसर्‍यांच्या सुखाशी तुलना करु लागतं , बर्‍याचदा बर्‍याच जणांच्या आयुष्यात प्रेम नसतं , इथे फक्त जोडीदाराचे प्रेम अपेक्षित नाही तर कुटुंबाचे , मित्रपरीवाराचेही प्रेम ग्राह्य धरले आहे , मान — सन्मान बर्‍याचदा घरात सर्व सुखसोयी असतात पण घरातले , कुटुंबातले , नातेवाईक , मित्रपरीवार तुसडेपणाने वागतात. © Copy Right by Kavita Patil अशा अनेक छोट्या मोठ्या लक्षात न घेतल्या जाणार्‍या कमतरता जर भरुन निघाल्या तर आयुष्य अधिक आनंदी , शांत आणि सुखी होऊ शकेल. या सर्व गोष्टी कदाचित सर्वांसाठी खुप गरजेच्या नसतीलही पण याची उणीव भरुन निघाली तर चांगलंच आहे. अशासाठी आधी आपल्या जीवनात सध्या काय सुरु आहे याकडे लक्ष द्यावे. कुठल्या गोष्टी आपल्याकडे मुबलक आहेत , कुठल्या गोष्टी पुरक आहेत आणि कुठल्या गोष्टींची आपल्याकडे कमतरता आहे हे लक्षात घ्यावे आणि त्या गोष्टींची आपल्या आयुष्यात भरभराट झाली आहे हे सतत आपल्या डोळ्यासमोर पाहत राहावे आणि मनात घोळवत राहावे. © Copy Right by Kavita Patil यासाठी खालील सकारात्मक विधान फायदेशीर ठरेल.

"माझ्याकडे धन—धान्य , संपत्ती , शारीरीक आणि मानसिक आरोग्य तसेच (तुमच्या कडे असलेली कमतरता) याची भरभराट झाली आहे."

लक्षात घ्या सकारात्मक विधाना मधे आपण कमतरता हा शब्द टाकणार नाही आहोत. कमतरता हा शब्द कमतरतेची उर्जा आकर्षित करेल तर भरभराट हा शब्द भरभराटीची उर्जा आकर्षित करेल.© Copy Right by Kavita Patil पहा थोड्या दिवसांना आपल्याला अचानक जाणवेल की आपले आयुष्य हळुहळु परीपुर्णतेच्या दिशेने पुढे सरकत आहे.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ६

https://www.maayboli.com/node/78039

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults