मानसिक आरोग्य — क्रिएटीव्ह व्हिझ्युअलायझेशन — भाग ९

Submitted by कविता१९७८ on 10 February, 2021 - 00:57

"निंदकाचे घर असावे शेजारी" अशी आपल्याकडे जरी सर्वश्रृत म्हण असली तरीही स्वत:ची निंदा ही कुणालाच आवडत नाही. आपल्या वागण्या बोलण्यात काही चुक आहे हे कुणालाच पटत नाही. पण बर्‍याचदा असे होते की एखादया कुटुंबात किंवा मित्रमंडळी मधे कुणा एकावरच निशाणा साधला जातो. नावडतीचे मीठ अळणी या म्हणीला जागुन सतत त्या व्यक्तिची त्याच्यासमोरच निंदा केली जाते. त्या व्यक्तिच्या दिसण्यावरुन , बोलण्यावरुन , वागण्यावरुन , राहण्यावरुन तिला नको नको ते सतत ऐकावं लागतं. © Copy Right by Kavita Patil समोरचा व्यक्ति आपला राग , चिडचिड , संताप , अपयश , कमीपणा , दुर्बलता , असहायता त्या व्यक्तिवर काढत असतो पण एकाचे पाहुन हळुहळु दुसरेही असेच वागु लागतात. आणि परीणामी टार्गेटेड व्यक्तिवर मानसिक परीणाम व्हायला लागतो. त्या व्यक्तिला भासवलं जातं की ती व्यक्ति काहीही कामाची नाही आणि समाजात राहण्याच्या , वावरण्याच्या लायकीची नाही. बर्‍याचदा त्या व्यक्तिच्या आणि बाकीच्यांच्या विचारांमधे तफावत असते पण आपणच बरोबर हे सिद्ध करण्यासाठी हेकेखोर अशा व्यक्तींचा भावनिक बळी देत असतात म्हणजेच त्या व्यक्तिला बळीचा बकरा बनवत असतात. © Copy Right by Kavita Patil बर्‍याचदा घरातल्यांच्या तिच्याकडुन शैक्षणिक अपेक्षा पुर्ण न झाल्याने , बर्‍याचदा ती व्यक्ति नकोशी झाल्याने तर बर्‍याचदा खोट्या अहंकारापायी तिचे मानसिक खच्चीकरण केले जाते.

टार्गेटेड व्यक्ती हळु हळु कुटुंबाशी किंवा मित्रपरीवाराशी तुटत जाते. मानसिक दृष्ट्या खचत जाते, बर्‍याचदा आत्मविश्वास , प्रेम , आदर गमावते तर बर्‍याचदा ती स्वत:च्या अस्तित्वासाठी पलटवार करते. अशावेळी तिची वागणुक बदलते , ती ही दुसर्‍यावर संतापु , ओरडु लागते. © Copy Right by Kavita Patil सततच्या मानसिक आणि भावनिक अपमान / अवहेलना आणि कुचंबणा यामुळे परीणामी मानसिक खच्चीकरण करणार्‍यांचा हेतु साध्य होतो आणि टार्गेटेड व्यक्ति स्वत:ची वाईट इमेज बनवुन घेते. बर्‍याचदा नको असलेली टोकाची भुमिकाही त्या व्यक्तिकडुन घेतली जाते. अशावेळी सावरणे खुप कठीण असते. परंतु सतत आपल्याला आपल्या वागणुकीवर आपल्या प्रत्युतरावर लक्ष द्यावे. आणि आपण सतत शांत , आनंदी आहोत आणि बाकीचे आपल्याशी चांगले वागत आहेत हे डोळ्यासमोर पाहत राहावे. © Copy Right by Kavita Patil दिवसातुन कधीतरी थोडा वेळ डोळे मिटुन सतत सगळे आपल्याशी प्रेमाने वागत आहेत आणि आपणही सर्वांशी प्रेमाने वागत आहोत अशी कल्पन करावी. यासाठी पुढील सकारात्मक विधान फायदेशीर ठरेल.

"मी सतत आनंदी असुन सर्वांशी प्रेमाने वागत असुन सर्व माझ्याशी प्रेमाने वागत आहेत व मला मान — सन्मान देत आहेत"

ही नक्कीच तारेवरची कसरत असणारे कारण कुठल्याही अॅक्शन वर रीएॅक्शन ही ठरलेली असतेच या नियमाप्रमाणे समोरच्या व्यक्तिच्या वागणुकीवर आपली वागणुक ठरलेली असते.© Copy Right by Kavita Patil पण आपली चुक लक्षात आल्यावर त्यात बदल करुन स्वत:ला उन्नतीकडे नेणे महत्वाचे.

(क्रमश:)

पेज लिंक

https://www.facebook.com/Kavita-M-Patil-342749063467349/

भाग — ८

https://www.maayboli.com/node/78068

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults