व्हिसल ब्लोअर-७

Submitted by मोहिनी१२३ on 15 January, 2021 - 12:33

भाग १- https://www.maayboli.com/node/77210
भाग २-https://www.maayboli.com/node/77219
भाग ३-https://www.maayboli.com/node/77224
भाग ४-https://www.maayboli.com/node/77249
भाग ५-https://www.maayboli.com/node/77256
भाग ६-https://www.maayboli.com/node/77292

तिच्या एका दुसर्या टिममधील सहकारी कम मित्राचा मेसेज आला होता. अमोल त्याचे नाव. तो तिच्या पहिल्या कंपनीतला सहकारी. तिथेच त्यांची चांगली मैत्री जमली होती.वैयक्तिक व व्यवसायिक बाबतीत एकामेकांचा सल्ला ते आवर्जून घेत. आत्ताच्या कंपनीत योगायोगाने त्यांची गाठ परत पडली होती.

त्याने लिहीले होते. “अग, मी सकाळपासून बघतोय. तू खूप अस्वस्थ दिसतेयस. मला काही कुणकुण लागलीय पण खात्री नाहीये. आपण आज संध्याकाळी खालच्या सीसीडीमध्ये ५ वाजता तासभर भेटायचं का? बोलू व्यवस्थित. तू काही काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल.”

तिने ओके म्हणून एकाक्षरी उत्तर दिले आणि शांतपणे डोळे मिटून खुर्चीवर मागे टेकली.तेवढ्यात तिचा वैशिष्ट्यपूर्ण मेलटोन वाजला. हा मेलटोन तिने आदितीकडून येणार्या मेल्स करिता ठेवला होता. तिच्याकडून आलेले मेल्स प्राधान्यक्रमाने हाताळले जावेत म्हणून तिने हे सेटिंग केलं होतं. तिने त्वरेने मेल वाचला. त्यात नेहाला पुढच्या दोन दिवसासांठी कल्पनाच्या चौकशीकरिता ॲाफिसकामातून पूर्ण रजा दिली आहे.तिने एचआरला सर्वतोपरी सहकार्य करावं अशी विनंती त्यात केली होती. तसेच या रजेमुळे कस्टमर अफेक्ट होणार नाही ही खबरदारी तुझ्यासारखी वरिष्ठ सहकारी घेईलचं अशी खात्री कम ताकीद त्यात होती.

आता हे सगळं इतक्या वेगानं घडायला लागलं होतं की नेहा पुरती भंजाळली होती.हे अधिकृत प्रकरण म्हणून त्याचा न्यायनिवाडा होणार म्हणून बरंही वाटत होतं. जाऊ दे आता पुढचं पुढे म्हणून ती कामाला भिडली. ५ पर्यंत अक्षरश: तहान-भूक विसरून ती काम करत होती.

५ च्या मिटींग्स,कॅाल्सची तिने काहीतरी सोय लावली. आणि ती अमोलला भेटायला सीसीडीमध्ये गेली.तिच्या मनातील क्षोभ,राग, गोंधळ शांतपणे ऐकून घेऊन योग्य तो सल्ला द्यायला अमोलइतकी योग्य व्यक्ती दुसरी नव्हती.

अमोल शांतपणे तिच्यासमोर बसला . आणि तिने सगळं सुरवातीपासून सांगायला सुरूवात केली. सुमारे १५ मिनीटे ती अखंड बोलत होती.हे बोलताना तिचा चेहरा राग,हतबलता,सात्विक संताप, काळजी अशा भावनांनी क्षणोक्षणी बदलत होता.अमोल हे बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता. त्याच्या मुठी संतापाने वळत होत्या.

नेहाचं बोलणं संपलं आणि दम लागल्यामुळे तिने पाण्याचा ग्लास एका क्षणात रिकामा केला.आता नेहा मन मोकळं केल्यामुळे थोडी शांत झाली होती आणि अमोल मात्र गंभीर झाला होता.
तो पटकन त्यांनी ॲार्डर केलेली दोन कॅपॅचिनो विथ व्हिप क्रिम घेऊन आला आणि त्याने बोलायला सुरूवात केली.

“नेहा, मी जेव्हा या कंपनीत रुजू झालो तेव्हा मला पण कल्पनाच्या या वागणूकीचा सामना करावा लागला होता.केवळ मी सिनीअर होतो म्हणून लगेचच मी माझं प्रोजेक्ट बदलू शकलो आणि माझी तिच्यापासून सुटका झाली.तू केलेल्या आरोपाला पुरावा म्हणून मदत व्हावी म्हणून मी याची आता तक्रार करणार आहे.कदाचित काही वर्षांपूर्वी घडलेली घटना म्हणून ह्याचा पुरावा म्हणून वापर करणारही नाही. पण त्या मुलांना न्याय मिळावा म्हणून मी इतकं तर नक्कीच करू शकतो.दुसरं म्हणजे कल्पना कंपनीसाठी अतिशय महत्वाची व्यक्ती आहे.तिने कंपनीला काही पुरस्कार,पेटटंस् मिळून दिले आहेत.त्यामुळे कंपनीला तिला जाऊन द्यायचं नसेल.”

नेहाला ही सगळीच महिती नवीन होती. या महितीने तिला काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर काही वेगळेच प्रश्न तिच्या मनात उभे केले.

ती विचारात गढून गेली असताना अमोलचा एक प्रश्न तिच्या मेंदूवर आदळला.

“अग, तू या प्रकरणाचा एवढा का पाठपुरावा करतीयसं. मी जसं तूला ओळखतो तशी तू आपण बरं आणि आपलं काम बरं या पठडीतली.मग तू यावेळी एवढी जिद्दीने का बरं पेटलीयसं?”

हाच प्रश्न ती स्वत:लाही अनेक दिवस विचारीत होती.ती उत्तराची जुळवाजुळव करायला शब्द शोधू लागली.

https://www.maayboli.com/node/77874

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा भाग आला
भाग छोटे आहेत जरा.पुढचा येऊदे.

धन्यवाद Qween Piyu, आसा.
हो मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न करेन.