व्हिसल ब्लोअर-४

Submitted by मोहिनी१२३ on 15 November, 2020 - 09:08

भाग १- https://www.maayboli.com/node/77210
भाग २-https://www.maayboli.com/node/77219
भाग ३-https://www.maayboli.com/node/77224

आता नेहाला थोडे बरं वाटलं आणि तिने तिच्या नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित करायला सुरूवात केली. तिचा कंपनी एचआर वर पूर्ण विश्वास होता. त्याला तसे सबळ कारणही होते.

३ महिन्यांपुर्वी त्यांच्या टिमची एचआर बरोबर मिटींग होती. त्यावेळी एचआर ने “तुम्हाला कंपनीत कोणत्या सुधारणा/कोणते बदल व्हावेत असं वाटतं?” हा प्रश्न प्रत्येक टिममेंबरला विचारला होता. त्यावेळी नेहाने “मॅटर्निटी लिव्ह सारखी ॲडॅाप्शन लिव्ह सुरू करता येवू शकेल का?” हा मुद्दा मांडला होता. तो मुद्दा एचआरने अतिशय गांभीर्याने घेतला. आई/वडील दोघांनाही ३ महिन्याची पुर्णपगारी रजा व कायदेशीर दत्तक प्रक्रियेच्या सर्व खर्चाची रक्कम योग्य त्या पावत्या तपासून कर्मचार्याला देणे अशा प्रकारची सर्वसमावेशक पॅालिसी एचआर ने नुकतीच राबवायला सुरूवात केली होती.ही पॅालिसी आणण्यापुर्वी त्यांनी दत्तक घेऊ इच्छिणारे पालक, दत्तक देणार्या संस्था अशा अनेकांशी चर्चा केल्या होत्या. [या संपूर्ण कथानकामधील केवळ हा परिच्छेद पूर्ण सत्य आहे. बाकी लिखाण हे बहुतांशी काल्पनिक आहे. सत्यघटनेशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. धन्यवाद.]

नेहाने निनावी तक्रार केल्यानंतर सुमारे आठवडाभर कल्पनाच्या क्युबिकलमध्ये शांतता होती. कल्पना मध्येच कुठेतरी जातेय आणि आल्यानंतर गंभीर चेहर्याने काम करतेय असं दिसत होतं. नेहाला हायसं वाटलं. त्या मुलांना आता त्रास होणार नाही या विचाराने तिचाच चेहरा फुलला.

पण येरे माझ्या मागल्या! एका आठवड्यानंतर पुन्हा कल्पना त्या मुलांशी असभ्य वर्तन करताना दिसू लागली. त्या मुलांना टिमबाहेर दुसरे प्रोजेक्ट मिळणार नाही अशी व्यवस्था कल्पनाने केली. ही बातमी उडतउडत तिच्या कानावर आली किंवा मुद्दामुन कानावर पडावी अशी व्यवस्था करण्यात आली.

नेहाच्या अंगाचा तिळपापड झाला. तिला एकीकडे खुप गुदमरल्यासारखेही होत होते. आपण कंपनीत फक्त पैशासाठी काम करत नाही. किमान माणुसकीची वागणूक प्रत्येकाला मिळाली पाहिजे. या तिच्या भावना होत्या. कंपनीत अवतीभोवतीचे वातावरण उच्च नैतिकवादी नसलं तरी इतकं अनैतिक , विषारी असू नये यावर आता ती ठाम झाली होती. या वातावरणात तसचं सहन करून काम करण्यात तिला षंढ वाटत होत. तिला कंपनीत हा सर्व ताण आता एकटीने सहन करवत ही नव्हता. तिने तिच्या लंचग्रूपमध्ये, तिच्या जवळच्या मित्रांमध्ये हा विषय काढायचं ठरवलं.

त्याआधी तिने परत एकदा कल्पना विरुध्द तक्रार नोंदवायची ठरवली.यावेळी मात्र तिने तिचे नाव उघड करायचे ठरवले. तिने तक्रारीत तिची तक्रार करण्यामागची भुमिका विशद केली. कल्पनाला कदाचित कोणतातरी मानसिक आजार/विकृती असू शकेल ही शक्यता ही नेहाने मांडली . अर्थात हा फक्त नेहाचा कयास नव्हता तर तिने आवड म्हणून केलेला/करत असलेला मानसशास्त्राचा अभ्यास या पाठीमागे होता. तिने कॅालेजमध्ये असताना समाजाच्या विविध स्तरांत मुख्यत्वे विविध प्रकारच्या व्यसनमुक्तीसाठी व्याख्याने, समुपदेशन, व्यसनी व्यक्ती व संस्था यामधील दुवा अशा प्रकारचे काम केले होते.अशा प्रकारची कोणतीही मदत आत्ता करण्याची तयारी तिने तक्रारीत दाखवली होती.मात्र अशा गोष्टींना कायमचा आळा बसला पाहिजे, व त्या मुलांचे शोषण पूर्ण थांबले पाहिजे अशी आग्रही मागणी तिने केली होती.

तिने तक्रार केली आणि ती घरी गेली. त्यादिवशी मानसिकरीत्या ती खूप थकली होती. त्यामुळे काही न खाता-पिता, नेहमीसारखे झोपताना मेल न बघता ती झोपी गेली.

https://www.maayboli.com/node/77256

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बापरे
लवकर लिहा पुढचा भाग
भीती वाटतेय ती मेल्स न बघता झोपल्याने.

धन्यवाद अनू. हो पुढचा भाग २ दिवसांत लिहीन.
छान वाटलं, तुम्ही आणि अनेकजण यात इतका रस घेत आहेत म्हणून.

धन्यवाद रूपाली. तुम्ही आणि काहीजण प्रत्येक भागावर प्रतिसाद देत आहेत त्यामुळे पहिलीवहिली दीर्घकथा पूर्ण करायला हुरूप येतोय.

धन्यवाद अज्ञातवासी, शिरीष.
सर्वजण: काही सुधारणा(शब्दप्रयोग, व्याकरण,इतर) असतील तर नक्की सांगा.धन्यवाद.

छान!
कर्मचार्याला - कर्मचार्‍याला
देणार्या - देणार्‍या
आठवडाभरानंतर - हा शब्दप्रयोग बरोबर आहे का हे जाणकार सांगू शकतील

धन्यवाद. हो आसा,बरोबर आहे .पण माझ्या मोबाईल कीपॅड वर तसं लिहीता येत नाहीयं.बघते काही करता आले तर.

एका आठवड्यानंतर असा बदल केला आहे.

अयो, कसलं खतरनाक आहे हे!
Corporate येव्हढं ब्येक्कार असेल याची पुसटशी कल्पना देखील नव्हती मला...
हां, ते Harman मध्ये काम करणारया एका मित्राकडून एवढेच समजले की पार्ट्या वगैरे जाम चालतात IT त.
बाकी बरेच नातेवाईक Cogni, TCS, Persistent मध्ये असूनही या विषयांवर चर्चा होतच नाही...
त्यांच आपलं एकच "नन्या अभ्यास कर, Campus MilaaylA हवा"