प्रभात रोड, भांडार कर रोड गल्ल्यांचे रुंदीकरणः खरंच गरज आहे का?

Submitted by अश्विनीमामी on 14 January, 2021 - 00:14

पुण्यातील रम्य अश्या प्रभात रोड व भांडारकर रोड भागाचे वैशि ष्ट्य म्हणजे ह्या भागातील जुनी टुमदार घरे, सोसायट्या व शांत गल्ल्या. काही टू वे आहेत तर काही डेड एंड. ह्या भागात वर्दळ व वाहनांची गर्दी वाढल्याचे कारण देत पुणे महापालिकेने ह्या गल्ल्या रुंद करायचा घाट घातला आहे.

प्रभात रस्ता परिसरातील दहा गल्ल्यांमधील ६ मीटर रुंदीचे रस्ते ९ मीटर करण्यात येणार आहेत. तसेच भांडारकर रस्ता परिसरातील गल्ल्यांमधील रस्त्यांचे रुंदीकरणही प्रस्तावित आहे. याविरोधात नागरिकांनी महापालिकेकडे हरकती-सूचना दिल्या आहेत. गल्लीबोळातील रस्त्यांवर हरित कवच आहे. हा भाग शांत असून गल्लीबोळातील रस्त्यांवर वाहतुकीचा ताण नाही. रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षराजी नष्ट करावी लागणार आहे. काही सोसायटय़ांमधून रस्ते जाण्याची भीती आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरण नको, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली आहे. मात्र हा विरोध डावलून रस्ता रुंदीकरणाचा घाट महापालिकेने घातला आहे. प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक ३, ४, ५, ६, ७, ८, ९, १०, ११, १२, १४ या गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरण नियोजित आहे. तसेच भांडारकर रस्त्यावरील काही गल्ल्यांमधील रस्ता रुंदीकरणासंदर्भातही महापालिकेने संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली आहे. प्रभात रस्ता आणि भांडारकर रस्ता परिसरात मिळून जवळपास तीस गल्ल्या आहेत.

शहरातील ६ मीटर रुंदीचे ३३५ रस्ते ९ मीटर करण्याची कार्यवाही महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्याबाबत जाहीर प्रकटन देण्यात आले असून हरकती-सूचना मागविण्यात आल्या आहेत. अस्तित्वातील मोठे रस्ते रुंद करण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. रस्ता रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा दावाही करण्यात आला होता. प्रत्यक्षात मोठे रस्ते सोडून गल्लीबोळातील रस्त्यांवर घाला घातला जात आहे. नागरिकांचा विरोध असताना आणि त्याबाबत हरकती नोंदविण्यात आल्यानंतरही रस्ता रुंदीकरणासंदर्भातील नोटिसा महापालिकेने दिल्या असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा घाट नक्की कोणासाठी घातला जात आहे, असा प्रश्न रहिवाशांकडून उपस्थित केला जात असून रस्ता रुंदीकरणाची ही प्रक्रिया वादग्रस्त ठरणार आहे. मुळातच वाहतूक नसलेल्या गल्लीबोळातील रस्त्यांचे रुंदीकरण का केले जात आहे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

सहा मिटर रुंदीची गल्ली ९ मीटर रुंद करण्यात अनेक घरा सोसायट्यांचे पुढचे गार्डन नाहिसे होईल. व धूळ व प्रदुषण वाढेल. महत्वाचे
म्हणजे त्या भागातली रम्य शांतता नाहिशीच होईल. माझे पुण्यातले बालपण व किशोर वय ह्या गल्ल्यांमधे बाग ड ण्यातच गेले आहे. घर,
शाळा, क्लास मित्र मैत्रीणींची घरे, बागा ह्या सर्व ह्याच भागात आहेत. विकासाचा रेटा मला कळतो पण ते खास वातावरण आता एकदम नाहिसे होईल म्हणून वाइट वाटले. कालाय तस्मै: नमः रुंदीकरण होण्या आधी एक व्हिडीओ घेउन ठेवावा.

पुणेकर ह्या बद्दल निषेध नोंदव त आहेतच पण आपले काय मत?

मूळ बातमीची लिंक

https://www.loksatta.com/pune-news/notice-to-residents-of-bhandarkar-roa...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या अश्या उंटावरुन शेळ्या हाकू नकोस.... एकदा पाहणी दौरा कर बघू पुण्याचा Wink
>>>>>>>
मी लहानपणी पुण्याला गेलेलो. माझे मित्र वा नातेवाईक जे पुण्याचे होते ते शांत शहर म्हणून कौतुक करायचे. मला मात्र ती शांतता प्रचंड कंटाळवाणी वाटली. अर्थात वैयक्तिक आवड. आणि नंतर मग कानावर यायचे की पुणे बदलतेय, गर्दी वाढतेय, वेग पकडतेय, मुंबईच्या मार्गावर जातेय, वगैरे वगैरे, पण मी आधीच मुंबईचाच असल्याने त्याचेही काही कौतुक वाटायचा प्रश्न नव्हता. त्यातही आपल्याकडे मुंबई-पुणे नाते हे साप-मुंगुसासारखे करून ठेवलेय. त्यामुळे एकमेकांना चिडवण्यातच धन्यता मानायचो. पण पुणे खरेच बदलत असेल तर मात्र जे होतेय ते होणारच. आणि त्याला आता पर्यायही नाही. ते तुम्ही वाचवू शकत नाही हे मान्य करा. आमच्याईथेही माझगावला आमच्या घराजवळच एक ख्रिश्चन मोहल्ला होता, गल्ल्यागल्यांमध्ये वसलेली टुमदार घरे, त्यात राहणार्‍या आणि स्कर्टमधील ख्रिस्ती मुली, आपल्या औकातीत राहात फक्त क्रश म्हणूनच त्याना बघावे आणि त्यांना बघायला म्हणून रोज स्टेशनला त्याच गल्यातून जावे, काय छान होते ते दिवस.... पण आमच्या नंतरच्या पिढीला नाहीये ते सुख. तिथला सारा बाजारच उठलाय. अध्येमध्ये जशी जागा मिळेल तसे आता टॉवर उभे होत आहेत. काय करणार, जे होतेय त्याचेही कौतुकच आहे.

रानी चा नेकलेस म्हणून जो भाग आहे चर्नी रोड पासून मरीन drive पर्यंत.
एकाच आकाराच्या बिल्डिंग, एकाच आकाराचे फ्लॅट,एकच रंग.
ह्याला म्हणतात नियोजन .
कोणी लाडका नाही ...
पैसे आहेत म्हणून रंग पण बदलू शकत नाहीत किंवा फ्लॅट चा आकार पण बदलू शकत नाही.
ना बिल्डिंग ची उंची वाढवता येत.
फालतू लाड कोणाचेच नाहीत .
शाहर नियाजन असेल तर असेच नियम सर्व लोकांना हवेत.
पुण्याची चर्चा करायची झाली तर .
मुख्य शहर म्हणजे फक्त गल्या बोळे आहेत.
मध्ये आळंदी ते स्वारगेट प्रवास केला .
Horrible.
भयंकर ट्रॅफिक.
कसलेच नियोजन नसलेला भाग.
अतिशय अस्ताव्यस्त असलेली बांधकामे.
खरेच खूप अस्ताव्यस्त आहे.
त्या पेक्षा मूळ मुंबई खूप नियोजित आहे.
आणि
नवी मुंबई जी सर्व विचार करून वसवली आहे.
ती खूप नियोजित आहे,सुंदर आहे.
पण तशीच राहील ह्याची खात्री नाही.
देशात एक पण शहर .
योग्य नियोजन केलेले नाही
सर्व शहर बकाल,अस्ताव्यस्त वाढलेली आहेत.
मूळ मुंबई सोडून.

मी भाजपचा कट्टर विरोधी आहे. पण त्यांना याबाबतीत पाठिंबा.
हे फोटो बघा. काय करायचं हाडामाणसाच्या माणसांनी या गर्दीत ? दुसरा रस्ता नाही पर्यायी.

Law college roads.jpgthebridgechronicle_import_s3fs-public_news-story_cover-images_3flyover_0.jpg

कर्वे रस्त्यावरचा हा पूल जसजसा पुढे जातोय तसतसे पुढे पुढे ट्रॅफिक जाम होत जाते. त्याचा ताण लॉ कॉलेज रस्त्यावर येतो. इथे वाहतूक खोळंबून राहते. ती आधीही तशीच होती. पण आता चक्राकार वाहतुकीने कॅनॉल रोडवरून लॉ कॉलेजला यावं लागतं.
या माणसांना नाही का त्रास होत ?
त्यांना नाही प्रदूषणाचा त्रास ?
की चिन्मय तन्मयच्या बाबांना त्रास होतो म्हणून त्यांनी अमेरिकेतून ऊसासे सोडले की तेव्हढंच खरं ? हीच तेव्हढी माणसं. बाकीच्जी जनावरं.
त्यांचा सर्वनाश झाला तर होऊ द्या, इथे का करायचा हे तर लॉजिक.

हिप्पोक्रसी की भी कोई सीमा होती है !

त्यांचा सर्वनाश झाला तर होऊ द्या, इथे का करायचा हे तर लॉजिक.

हिप्पोक्रसी की भी कोई सीमा होती है !
एकदम बरोबर बोलत आहात.
शहर नियोजन हवे पण फक्त त्यांच्या पुरतेच.
आणि ह्याच लोकांच्या सोयी सुविधा साठी बाकी शहराची वाट लागली तरी चालेल.
हीच वृत्ती आहे

निदान मुंबईत तरी आय टी उद्योग हा रोजगाराचा मुख्य पुरवठादार नाही. बँक्स, अन्य आर्थिक व्यवहार, मनोरंजन, आदरातिथ्य, वैद्यकीय सेवा, जीवनशैली, जीवनावश्यक सेवासुविधा, वाहतूक, बांधकाम हे सर्व लेबर इंटेनसिव (अर्थ सोडले तर) उद्योग मुख्य आहेत. साधा असा वाहने पुसून स्वच्छ करण्यासारखा व्यवसायही पुष्कळ रोजगारनिर्मिती करतो. शिवाय फुटकळ रद्दीवाले, इस्त्रीवाले, दूधवाले असे लाखो सेवादारही आहेत. सर्वांचे विकेंद्रीकरण करता येण्यासारखे नाही. कारण हे सर्व उद्योग स्थानिक रहिवाशांच्याच गरजेचे उद्योग आहेत. (मनोरंजन सोडले तर.) आणि एक प्रकारे स्थानिक गरजा शक्यतोवर स्थानिकरीत्या भागलेल्या बऱ्या. आणखी एक कारण म्हणजे ह्यातली workmanship आणि वर्क कल्चर. मोठ्या शहरांमध्ये ह्या गरजा आणि संस्कृती शहराच्या आतूनच अंतर्गतच निर्माण होत असतात. त्यामुळेही शहर विस्तारत जाते. शहर मोठे असणे आणि वैयक्तिक सेवांची गरज असलेले असणे हाच रोजगाराचा स्रोत बनून जातो.

की चिन्मय तन्मयच्या बाबांना त्रास होतो म्हणून त्यांनी अमेरिकेतून ऊसासे सोडले की तेव्हढंच खरं ? हीच तेव्हढी माणसं. बाकीच्जी जनावरं.
Lol Lol Lol
अगदी बरोब्बर

ह्या गल्ल्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहेत, बी एम आणि आय एल एस लॉ मधून शिक्षण झालं त्यामुळं जवळजवळ 8 एक वर्षे रोज ह्या रस्त्यांवरन तंगडतोड झाली आहे. आघारकर रोड अजून बर्यापैकी शांत आहे कारण तिथं पलंगरावांची मोठी इमारत आहे. गोखले इन्स्टिट्यूटच्या पुढे पूल सुरू झाला की दोन तीन दुकाने झाली आहेत , तिथे दुकाने होतील असं अजिबात वाटलं नव्हतं. भांडारकर रस्ता कधीच फार शांत नव्हता. आता दोन आठवड्यापूर्वी गेलो होतों तिथुन, पण पूर्वीपेक्षा खूप जास्त रहदारी वाढली आहे. तिथे रुंदीकरणाची नक्कीच गरज आहे. हे फार पूर्वीच करायला हवे होते पूर्ण भांडारकरवर खंडीभर दुकाने आहेत , ब्यांका आहेत (ती यु एस व्हीसा फीवाली एच डी एफ सी पण इथेच आहे ना?) , दिलीप ओक ची ऐकेडमी आहे, बी एम आणि आय एल एसचा कमबाईन असा आमचा झेरॉक्सवाला आहे, नवीन नवीन वस्त्रदालन झाली आहेत, डेल्फि चं ऑफिस होतं, स्कोडा की कसलं शोरूम आहे, रविराज हाटेल, तो साने डेअरी वाला इ इ आता एवढं सगळं गबाळं असेल तर गर्दी होणार ना अन मग गल्ल्यांवर गदा येणारच. प्रभात रोडच्या गल्ल्या मात्र खरंच शांत होत्या (इथे काही फार दुकानं नव्हती). तिथून ख्याख्याखिखी करत मोठया आवाजात आम्ही जात असू आणि बंगलेवाल पब्लिक डोळे वटारून बघत असे. पण ह्या गल्ल्या सुद्धा आता अजिबात शांत नाहीत. तेंव्हा ईथले पब्लिक नक्की विरोध कशासाठी करत आहे? आणि प्रभातच्या काही ठराविक गल्ल्याच असतील ह्या प्रस्तावामध्ये कारण बऱ्याच गल्ल्या अगदीच बोळकांडी आहेत आणि तिथे काही रुंदीकरण होणार नाही असे वाटते. वाईट नक्कीच वाटतं पण ते तितकंच अपरिहार्य आहे, इलाज नाही, गर्दीच एवढी आहे.

All we must remember is that "what is good for all of us is good for each of us".

हे एखाद्या समूहाला लागू होत नसेल तर? दुसऱ्या कोणा समूहाचं काहीतरी काल्पनिक नुकसान होणं किंवा त्यांना काही त्रास/गैरसोय होण्याची नुसती कल्पना हेच त्यांच्यासाठी आयुष्याचं सार्थक असेल तर? आणि त्यासाठी स्वतःच्या भल्याची किंमतही द्यायची तयारी असेल तर?
अशा समूहापासून स्वतःला शक्य तितकं विलग/quarantine करणं इतकंच सामान्य माणूस करू शकेल.

असे प्रश्न गजबजलेल्या शहरात येतात तेव्हा दोन्ही बाजु पटतात. जे होईल त्याचे परिणाम योग्य होवोत हीच इच्छा.

हे एखाद्या समूहाला लागू होत नसेल तर?
नक्की कोणत्या समूहा बद्दल बोलत आहात?
आणि मराठी मध्येच पूर्ण प्रतिसाद लिहा की. ते मध्येच इंग्रजी आलं की पोहे खाता खाता एखादा खवट शेंगदाणा घासात आल्या सारखे वाटतं.

तीळगूळ घ्या. अजून शिल्लक आहेत.
आमची सोसायटी पुल देशपांडे बागेच्या आजूबाजूच्या परीसरात आहे (अंतर नाही दिलेले). तेव्हांचा नगरसेवक सोसायटीला अंतर्गत रस्ते बांधून देतो म्हणायचा. पण आमच्या सोसायटीने नकार दिला. स्वतःच रस्ते मेन्टेन केले. नाहीतर अंतर्गत रस्ते मनपाला हॅंडओव्हर करावे लागतात. त्यावर त्यांचा हक्क येतो. नंतर कधी तरी सोसायटीने मेन्टेनन्स कमी करायला असेल रस्ते मनपाला दिले. तेव्हांपासून चारही बाजूंचे गेट्स काढून टाकले आहेत. सगळीकडून मुख्य रस्याला ते जोडले. कंपाऊंड आत घ्यायला लावून रस्ते मोठे केले.
इथे असेच झाले का ?

तेव्हांपासून चारही बाजूंचे गेट्स काढून टाकले आहेत >> हो, तेव्हापासून मी नाना-नानी पार्ककडे जायला हा शॉर्टकट वापरतो Happy

हिरा, मुंबईचा शाश्वत विकास हा खरंतर मुंबईत जिथून जिथून लोकं येतात त्या त्या ठिकाणांचा शाश्वत विकास होण्यानेच होईल. मुंबईतले उद्योग मुंबईत असण्याचं महत्त्वाचं कारण मुंबईत होणारी मनुष्यबळाची आवक आहे. मुंबईकडे होणारं स्थलांतर थांबलं की अनेक उद्योग हे आपोआप दुसरीकडे जातील. विखुरले जातील.

हे एखाद्या समूहाला लागू होत नसेल तर? >> सनव, या पृथ्वीवर असा कुठलाही समूह नाही ज्याला हे विधान लागू पडत नाही.

शाश्वत विकास ही कल्पना एखाद्या राजकीय, भौगोलिदृष्ट्या सलग प्रदेशात समानपणे राबवली गेली नाही तर काय होते ह्याचे मुंबई हे उत्तम उदाहरण आहे. जगण्याचे प्रश्न आणि जमिनीचे, पर्यावरणाचे प्रश्न ह्यात समतोल साधणेही अवघड आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश, केरळ आणि राजस्थान ह्यात समान धोरणे असू शकत नाहीत.
वर मी एकेठिकाणी उल्लेख केलाय त्याप्रमाणे एखाद्या भूभागाची अथवा लोकसमूहाची अंगभूत कौशल्ये, कार्यसंस्कृती, (work culture) workmanship ही वेगळी असू शकते . सिक्कीमची वेगळी,केरळची वेगळी. राजस्थानचा स्किल सेट वेगळा. फार काय, मुंबईची कार्य संस्कृती वेगळी, पुण्याची वेगळी. त्यामुळे गरजा वेगळ्या, कर्मचारीदल लेबर फोर्स वेगळा. विकासमार्गावर असतानाच शाश्वत विकासाच्या योजना राबवणे हे आदर्शवत असले तरी त्या काटेकोरपणे, मानवी आशाआकांक्षांचा विचार न करता कठोरपणे आणि समतोलपणे राबवणे हे महाकठीण काम आहे.

लोकसमूहाची अंगभूत कौशल्ये, कार्यसंस्कृती, (work culture) workmanship ही वेगळी असू शकते
पण ही कौशल्ये लोकसमूहात विकसित करता येतात. जेथे नवीन उद्योग उभा राहतात त्या भागातील लोकांची गणना अकुशल कामगारांना( Unskilled Labour) मध्ये केली जाते. ह्याच अकुशल कामगारांमधले Open to Learn लोक शोधून त्यांना कुशल बनवले जाते. टाटानी सानंदमध्ये कारखाना उभा केला तेंव्हा तिथल्या स्थानिक लोकांना मध्ये काय कुशलता होती?
प्रत्येक वेळी लोकसमूहांची कुशलता हाच मापदंड लावला तर नवीन उद्योग कधीच उभा राहणार नाही.

पूर्ण देशाचा नियोजनबध्द विकास करणे भारताच्या कुवती च्या बाहेर आहे.
अनेक राज्य सरकार,प्रतेक राज्यातील सामाजिक जडणघडण वेगळी.
त्या मुळे ते शक्यच नाही.
फक्त आपली शहर नियोजन बद्ध विकसित करणे आपल्या हातात आहेत.
कठोर पने सर्व नियम राबवले तर ते अवघड नाही

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे हा शहर वरील बोजा कमी करायच शस्वत मार्ग आहे.
महाराष्ट्र मध्ये सहकार क्षेत्राने ते काम करून सिद्ध पण केले होते.
आता परत ग्रामीण भागातील अर्थ व्यवस्था कमजोर होत आहे.
सहकार क्षेत्र गैर कारभार आणि भ्रष्ट कारभार ह्या मुळे कमजोर झाले आहे.
वेळेतच उपाय योजना करायला हव्यात सरकार नी.

टाटांनी हे केले पण ते त्यांना खूप महागात पडले. मूळ स्थलांतरच मुळात प्रकल्पाचा बोजवारा उडवणारे ठरले. सिंगूरची मानसिकता, धारणा, कार्यसंस्कृती, कसब बदलून त्यांना हा प्रकल्प अंतिमत: स्थानिकांच्या फायद्याचा आहे हे टाटांना पटवून देता आले नाही. टाटांनी तिथे अनेक शैक्षणिक योजना, प्रशिक्षण इत्यादींची तयारी ठेवली होती. काही योजना सुरूही केल्या होत्या. शिवाय टाटा ग्रुपची मानसिकता वेगळी आहे. त्यांनी सानंदला केले म्हणून इतर कंपन्या इतका खर्च करतील असे नाही. जर इतर ठिकाणांहून गरजू, काम करण्यास आणि नवीन कसब शिकण्यास उत्सुक किंवा तसे शिक्षण असलेला कर्मचारीसमूह आयता मिळत असेल तर ते भूमिपुत्रांना डावलतीलच.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे झालेले आहे. शिवाय येणारा उद्योग जर यंत्र तंत्रज्ञान प्रधान असेल तर भूमिपुत्रांच्या नशिबी सुरक्षारक्षक, छोटे पुरवठादार(कॅन्टीन सेवेत भाग, प्रकल्पकर्मचाऱ्यांची ने आण) अशी क्षुल्लक कामे येतात.

दुसरे म्हणजे अविकसित भागातच जमीन आणि इतर गरजा स्वस्त मिळू शकतात. मुख्य म्हणजे सलग जमीन. पण तिथे स्थानिक मनुष्यबळ आणि औद्योगिक कार्यसंस्कृती अगदी अविकसित असते.
अशा परिस्थितीत मजुरांची आयात अपरिहार्य ठरते. ही शृंगापत्ती आहे.

या धाग्याचा विषय आहे प्रभात रोड भागात रस्ते रूंद करावेत का ?
आत्ता शहर नियोजनाची चर्चा करण्यात काय अर्थ आहे ?
करावेत तर का ?
नाही तर का ?

वरचे दोन मुद्दे घेणारे एकमेकांशी कसे काय चर्चा करतात ? शहर नियोजन आत्ता होणार आहे का ?
नसेल होणार तर ते मुद्दे घेऊन रस्ते रूंद करावेत कि नाही हे सांगणा-यांना शहर नियोजनाबद्दल सांगून फायदा काय ?

हिरा ह्यांचे मत योग्य आहे.
विविध क्षेत्रात स्किल असलेली लोक स्वतः हून जिथे उद्योग आहे तिथे येत असतील तर अविकसित भागात ते उद्योग का स्थापन करतील.
आणि स्थानिक लोकांना रोजगार तरी का देतील.
त्या साठी जे उद्योग येणार आहेत त्या नुसार स्किल develop करणे हा एक मार्ग आहे.
दुसरा शक्यतो जो शक्य आहे तो कच्चा माल स्थानिक बाजारपेठ मध्येच खरेदी करणे अशी सक्ती करणे ..
जेणे करून indirectly रोजगार तरी मिळेल.
अमेरिकेत तेच झाले असावे .
आयटी क्षेत्र जेव्हा नवीन होते तेव्हा भारतात सॉफ्टवेअर इंजनिअर ची factory चालू होती.
त्यांना अमेरिकेत रोजगार मिळाले.
आयते मनुष्य बळ मिळाल्या वर स्थानिक अमेरिकन लोकांना रोजगार देण्याची जबाबदारी पण कमी झाली.

हे प्रतिसाद शाशवत विकास ह्या संकल्पनेच्या उल्लेखातून निघाले आहेत. आणि शहरातली गर्दी, वाहतूककोंडी विरुद्ध स्वच्छ, निवांत, वृक्षयुक्त परिसर ह्या समस्येशी संबंधित आहेत.

Pages