पुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 29 December, 2020 - 06:58

सर्वांना नमस्कार.

आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही‌ करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.

अशी ही खडतर एसआरटी आपल्या लाडक्या हर्पेन ह्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च अभिनंदन. त्यांच्या असंख्य अचिव्हमेंटसमध्ये आणखी एक नवीन भर.

त्यासंदर्भात त्यांनी त्यांचे अनुभव लिहावेत अशी‌ विनंती त्यांना अनेकदा केली. त्यांना माझ्या मनात त्या अनुभवाबद्दल असलेले प्रश्न- क्वेरीजही विचारल्या. मुद्देही काढून दिले. निदान तीन किल्ल्यांसाठी ३ लेख आणि एक प्राक्कथन लिहावं अशी विनंती केली.

पण अनेक दिवस होऊनही त्यांचा पहिला लेख आलेला नाही. त्यामुळे आपण सर्वांना- हर्पेनच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही विनंती की आपणही त्यांना लिहिण्यास सांगावं! Happy आणि त्यांचा अनुभव, तयारी ही खूप विशेष असणार. तेव्हा त्यांनी ती नक्की शेअर करावी.

इतकी मोठी अचिव्हमेंट झाल्यावर पार्टी तर पाहिजेच ना. तर अशी ही निदान वाचन- मेजवानी त्यांनी सर्वांना द्यावी अशी त्यांना विनंती आहे. आपणही दुजोरा दिल्यास त्यांना ती मेजवानी द्यावीच लागेल! Happy तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो.

हर्पेन ह्यांच्याव्यतिरिक्त माबोवरील इतर कोणी हे अल्ट्रा रन्स केले असतील तर त्यांचंही अभिनंदन! धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनापासून धन्यवाद मंडळी.

पुणे अल्ट्रा मॅरॅथॉन मधे ५० किमी, ७५किमी, १००किमी आणि १६१ किमी अशा श्रेण्यांमधे स्पर्धा होती. मी आणि सिम्बा दोघांनी केवळ ५० किमी मधे भाग घेतला होता. २५ किमी चे अंतर दोन वेळा धावायचे होते. गंमत म्हणजे माझा बिब नंबर ५०५० असा होता.

https://puneultra.wordpress.com/results/?fbclid=IwAR0zpRq71dxE5366vGuiWO...
निकाल इथे पाहू शकता.

SRT Ultra मधे ११ किमी (फक्त सिंहगड), २५किमी (सिंहगड आणि राजगड पायथा) आणि ५३ किमी (सिंहगड राजगड तोरणा) असे तीन प्रकार होते त्यामधे मी ५३ किमी च्या प्रकारात भाग घेतला. सोबत आदित्य होता. ज्याने सिम्बा सोबत गोवा हाफ आयर्न स्पर्धा पुर्ण केली होती. https://www.maayboli.com/node/72101
आदित्यने SRT करायचे हे केवळ तीन दिवस आधी ठरवले होते आणि ही स्पर्धा त्याने माझ्यासोबतच पुर्ण केली.
https://alpharacingsolution.com/event/result/8ef3533b-a266-4918-adfb-cda...
इथे निकाल पाहू शकता. माझा बिब नंबर ५३८ होता.

ह्या स्पर्धेच्या वेळी तयार केलेला हा एक व्हिडिओ बघू शकता.
https://www.youtube.com/watch?v=PjqaXcvxLg8

परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार.

Pages