पुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 29 December, 2020 - 06:58

सर्वांना नमस्कार.

आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही‌ करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.

अशी ही खडतर एसआरटी आपल्या लाडक्या हर्पेन ह्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च अभिनंदन. त्यांच्या असंख्य अचिव्हमेंटसमध्ये आणखी एक नवीन भर.

त्यासंदर्भात त्यांनी त्यांचे अनुभव लिहावेत अशी‌ विनंती त्यांना अनेकदा केली. त्यांना माझ्या मनात त्या अनुभवाबद्दल असलेले प्रश्न- क्वेरीजही विचारल्या. मुद्देही काढून दिले. निदान तीन किल्ल्यांसाठी ३ लेख आणि एक प्राक्कथन लिहावं अशी विनंती केली.

पण अनेक दिवस होऊनही त्यांचा पहिला लेख आलेला नाही. त्यामुळे आपण सर्वांना- हर्पेनच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही विनंती की आपणही त्यांना लिहिण्यास सांगावं! Happy आणि त्यांचा अनुभव, तयारी ही खूप विशेष असणार. तेव्हा त्यांनी ती नक्की शेअर करावी.

इतकी मोठी अचिव्हमेंट झाल्यावर पार्टी तर पाहिजेच ना. तर अशी ही निदान वाचन- मेजवानी त्यांनी सर्वांना द्यावी अशी त्यांना विनंती आहे. आपणही दुजोरा दिल्यास त्यांना ती मेजवानी द्यावीच लागेल! Happy तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो.

हर्पेन ह्यांच्याव्यतिरिक्त माबोवरील इतर कोणी हे अल्ट्रा रन्स केले असतील तर त्यांचंही अभिनंदन! धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हर्पेन व सिम्बा मनापासून अभिनंदन! वाचून फार आनंद झाला. खडतर कामगिरी बजावली याबद्दल खूप कौतुक वाटतयं.
आता लेख लवकर येऊदे.

वाह मेरे मायबोली के मिलिंद सोमन... अभिनंदन
सिंबा आपलेही अभिनंदन
पण हा काय पराक्रम असतो हे डिट्टेलवार लिहा तरी.. म्हणजे आम्हालाही थोडी स्फुर्ती मिळेल

हर्पेन आणि सिंबा चे हार्दिक अभिनंदन!!

धावेचे स्वरूप आराखडा काय होता कळले असते तर काही फोटोग्राफर्स ठिकठिकाणी क्याम्रे लावून सज्ज राहिले असते. ते फोटोफीचर झकास झाले असते. न धावलेल्यांनीही लेख टाकावा. (मार्गी?)

(हर्पेन/ सिंबा बहुतेक पुस्तक लिहीत असावेत), पुस्तकास शुभेच्छा.

हर्पेन आणि सिंबा यांचे हार्दिक अभिनंदन.
लेख लिहाच.
इथे सांगीतल्याबद्दल मार्गी यांचे आभार.

Mast harpen.
Congrats.
Navaryala sangate. He too had completed 60 km last year and did his pb of 3;51 last week (his first sub 4)

Asech palat raha.

हर्पेन आणि सिम्बा यांचे अभिनंदन. बहुपेडी, बहुपैलू व्यक्तिमत्त्व असलेले हे लोक इथे वावरतात हे आमचे भाग्य. ह्या दोघांनीही सविस्तर लिहावे. पूर्वतयारी, तंदुरुस्ती, प्रत्यक्ष धाव, नंतरच्या भावना आणि परिणाम हे सर्व अगदी शब्द न शब्द वाचण्यास आम्ही उत्सुक/ उतावीळ आहोत.
मार्गी यांनी ही माहिती इथे दिल्याबद्दल त्यांचेही आभार.

ओहहह!!!! इतक्या जणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद आणि दुजोरा!!!!!! सर्वांना खूप खूप धन्यवाद!!!!!!

आता हर्पेन नक्कीच लिहीतील! Happy

आणि सिम्बाजींचे हार्दिक अभिनंदन!!! आणि हो, त्यांच्यावरही लेखच नव्हे तर पुस्तकही लिहीण्याचं प्रेशर येण्यास (चुकून) कारणीभूत ठरल्याबद्दल मी त्यांची माफी मागतो! Happy

नानबाजींचेही अभिनंदन!

@ भरत जी, मी तसं खेळावर प्रत्यक्ष ह्यत लिहीलं नाहीय, सो इथेच ठीक वाटतो धागा.

आणि हो, हर्पेन = माबोचे मिसो!! Happy भारीच! पण मी म्हणेन मिसोचं फुल मॅरेथॉन टाईमिंग हर्पेनजींइतकं चांगलं नव्हतं एका वेळी तरी! Happy सो हर्पेन ते हर्पेनच!

हर्पेन आणि सिम्बा, हार्दिक अभिनंदन !!!
दोघांनीही लेख लिहुन माबोकरांना मेजवानी द्यावी ही विनंती

मार्गी, तुमच्या या लेखात ललित लेखन असं काही नाही. इतर कशात बसत नाही ते ललितलेखन असा अनेकांचा समज आहे. ललितलेखन हा स्वतंत्र आणि महत्त्वाचा साहित्यप्रकार आहे.

हर्पेन, सिम्बा तुम्हा दोघांचेही हार्दीक अभिनंदन. Happy . खूपच अवघड स्पर्धा पार केल्याबद्दल.

Pages