पुणे अल्ट्रा व एसआरटी ५३ किमी खडतर धाव पूर्ण केल्याबद्दल हर्पेन ह्यांचे अभिनंदन!!

Submitted by मार्गी on 29 December, 2020 - 06:58

सर्वांना नमस्कार.

आपले मित्र हर्पेन अर्थात् हर्षद पेंडसे ह्यांनी (ज्यांना त्यांचे चाहते पाप्पाजी वगैरे अनेक नावांनी बोलवतात) ह्यांनी नोव्हेंबरमध्ये पुणे अल्ट्रा केली आणि डिसेंबरमध्ये सिंहगड- राजगड- तोरणा ही एसआरटी ५३ किमी खडतर पर्वतीय धावही पूर्ण केली. खूप मोठं एलेव्हेशन, बिकट वाट, काही ठिकाणी रॉक पॅचेस आणि दुर्गम परिसर ह्यामुळे खूप मोठे एथलीटही ही खडतर ट्रेल रनची अल्ट्रा मॅरेथॉन जेमतेम पूर्ण करू शकतात. मी स्वत: एकदा ही‌ करणार होतो आणि काही कारणाने अटेम्प्ट करता आली नव्हती. आणि अटेम्प्ट केला असता तरी मला वेळ पुरला नसता हे उघड होतं.

अशी ही खडतर एसआरटी आपल्या लाडक्या हर्पेन ह्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल त्यांचं पुनश्च अभिनंदन. त्यांच्या असंख्य अचिव्हमेंटसमध्ये आणखी एक नवीन भर.

त्यासंदर्भात त्यांनी त्यांचे अनुभव लिहावेत अशी‌ विनंती त्यांना अनेकदा केली. त्यांना माझ्या मनात त्या अनुभवाबद्दल असलेले प्रश्न- क्वेरीजही विचारल्या. मुद्देही काढून दिले. निदान तीन किल्ल्यांसाठी ३ लेख आणि एक प्राक्कथन लिहावं अशी विनंती केली.

पण अनेक दिवस होऊनही त्यांचा पहिला लेख आलेला नाही. त्यामुळे आपण सर्वांना- हर्पेनच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही विनंती की आपणही त्यांना लिहिण्यास सांगावं! Happy आणि त्यांचा अनुभव, तयारी ही खूप विशेष असणार. तेव्हा त्यांनी ती नक्की शेअर करावी.

इतकी मोठी अचिव्हमेंट झाल्यावर पार्टी तर पाहिजेच ना. तर अशी ही निदान वाचन- मेजवानी त्यांनी सर्वांना द्यावी अशी त्यांना विनंती आहे. आपणही दुजोरा दिल्यास त्यांना ती मेजवानी द्यावीच लागेल! Happy तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो.

हर्पेन ह्यांच्याव्यतिरिक्त माबोवरील इतर कोणी हे अल्ट्रा रन्स केले असतील तर त्यांचंही अभिनंदन! धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्रेट! अभिनंदन!
अशी अचिव्हमेंट केल्यावर लिखना तो बनता है Happy

खूप छान!!
अभिनंदन हर्पेनजी....!

हर्पेनजी
तुमच्या धावत्या पायांना दंडवत असो !

आणि मार्गी- आभार हे सांगतिल्याबद्दल .

अभिनंदन. एव्हडं कोणी कसं धावू शकतं? किती तास सराव लागतो रोज? मी लहान असताना वाऱ्यासोबत स्पर्धा लावायचो, वारा पण दिशा बदलून मी पळत असेल त्या दिशेला वाहायला लागायचा. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.

कौतुकास्पद ! हर्पेन अभिनंदन. प्लीज लिहाच.
सिम्बा तुमचेदेखील अभिनंदन.

आणि मार्गी- आभार हे सांगतिल्याबद्दल . <<< +१००००

मार्गी, या अपडेटसाठी धन्यवाद !

हर्पेन, अभिनंदन ! खूपच मोठी अचिव्हमेंट आहे. आता नवीन वर्षाचे संकल्प सुरू होतील त्यापूर्वी तुमचं अनुभवकथन आणि पूर्वतयारी वाचायला आवडेल. माझी 7किमी पुढे धाव गेली नाही, तुमच्या लेखाने इनस्पायर होऊन 10 किमी सुरू करेन. Happy प्लिज नक्की लिहा.

अभिनंदन हर्पेन!
सिम्बा, तुमचेही अभिनंदन!
प्लीज दोघेही लेख लिहा.
मार्गी, इथे सांगितल्याबद्दल आभार.

हार्दिक अभिनंदन Happy

लेखाबद्दल आभार

(हे मी लहानपणी चालत केले होते, पण धावत???)

Pages