मैं भी आयर्न मॅन (IM गोवा 70.3 चा वृतांत)

Submitted by सिम्बा on 25 October, 2019 - 05:47
mi ironman

20 oct ला आयर्न मॅन 70.3 इव्हेंट होती, (ट्रायथेलोन स्पर्धेच्या विविध अंतराची आणि प्रकारांची माहिती इकडे मिळेल
https://www.maayboli.com/node/49864

images (1).jpeg

20 oct ला इव्हेंट होती,
आम्ही,( म्हणजे मी आणि आमच्या रनिंग ग्रुप मधली अजून 2 मुले, आदित्य जो धावणार होता आणि किरण जो फक्त सपोर्ट करण्यासाठी आमच्या बरोबर आलेला) 17 संध्याकाळीच पणजी डेरेदाखल झालो,
17 संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.तसाही त्या दिवशीसाठी काही प्रोग्रॅम नव्हता, त्यामुळे carb लोडिंग च्या नावाखाली फिश ओरपुन आम्ही झोपलो.

गेला आठवाडाभर झोप जास्त जास्त डिस्टरब होत चालली होती, त्यामुळे 18 ला पहाटे 3 पासून थोड्या थोड्या वेळाने उठत होतो.

18 ऑक्टोबर
आज आणि उद्या Ironman च्या काही ना काही ऍक्टिव्हिटीज होत्या,
18 -19 ला सकाळी त्यांनी प्रॅक्टिस सी स्वीम सेशन ठेवले होते. समुद्रातील पोहोणे हा वेगळा अनुभव असतो, ट्रेनिंग मध्ये तुम्ही स्विमिंगपूल आणि धरण/तलावात कितीही प्रयत्न केले असले तरी sea स्वीम चा अनुभव हवाच,
तो पर्यंत त्यांनी तरंगत्याखुणा लावून त्यांनी कोर्स आखायला सुरवात केली होती.
टोटल स्विमिंग 1.9km होते.पाहिलटकर बरेच असल्याने आयोजकांनी इन- आउट असा साधा कोर्स ठेवण्या ऐवजी (ज्यात खूप आत पर्यंत जावे लागले असते) साधारण आयताकृती कोर्स आखला होता 950 mt चा एक लूप असे 2 लूप करायचे होते.
प्रॅक्टिस स्वीम ला बीच वर पोहोचलो तर पूर्ण बीच अथलिट्स नि फुलून गेला होता, यात आधी IM केलेले त्यामुळे निवांत, स्वीम ची खात्री असणारे पण समुद्राची भिती असणारे शंकित, आणि समुद्र दर्शनाने गाळण उडालेले असे सगळे स्पेसिमन दिसत होते,
त्यांची शिट्टी वाजल्यावर सगळ्यांनी अक्षरश चाल केली,
आणि गंमत सुरू झाली

तरण तलावात आपण पहिल्या पावलापासून पुरेश्या खोलीत असतो, पण समुद्रात 100 150 mt चालत गेल्या शिवाय पुरेशी खोली मिळत नाही , विशेषतः उथळ किनाऱ्यावर इतके आत जाऊन सुद्धा मांड्यांपर्यंतच पाणी पोहोचत होते, लाट येते तेव्हा पाणी अचानक वाढते, म्हणून आपण अंग टाकावे तर लाट ओसरता हात जमिनीस टेकतात अशी सारी फजिती,

किनाऱ्यालगत लाटांचा जोर जास्त असतो, त्यामुळे त्या पहिल्या 100 मीटर मध्ये लाटांचा विरोध सहन करत शक्ती वाया घालवण्यापेक्षा शांतपणे चालणे श्रेयस्कर, एखादे मिनिटं जास्त लागेल फारतर पण अमूल्य शक्ती वाचते. हे ज्ञान पहिला 10 मिनिटात मिळाले Wink

आत गेलेला प्रत्येक जण मधोमध जी लाईन आखली होती तिच्या जवळ पोहायचा प्रयत्न करत होता, प्रत्यक्षात त्या तरत्या खुणा दोन्ही साईड ने ताणवे देऊन फिक्स केल्या होत्या, म्हणजेच दिसणाऱ्या लाईन च्या 5 5 फूट दोन्ही बाजूने या दोरांचे अडथळे होते.
उत्साहात आत घुसणारी लोक या दोऱ्यात अडकू लागले, मागून येणारा लोंढा त्यांच्यावर अडखळू लागला आणि अक्षरशः हातघाई ची लढाई सुरू झाली.

आयोजकांचे सेफ्टी राफ्ट्स आसपास होते ,त्यांनी येऊन 5 6 जणांना रेस्क्यू केले.

20 25 मिनितांनी लोकांना एकंदर परिस्थितीचे भान आले आणि परिस्थिती आटोक्यात आली, लोक समजून उमजून लाईन पासून दूर पोहू लागले.

आता दुसरा अडथळा आला तो जेली फिश चा, काही लोकांना जेलिफिश ने दंश केला, याच्यावर तसा थेट उपचार काही नाही, लाल झालेल्या भागावर व्हिनेगर लावणे आणि दुःख कमी होण्याची वाट पहात शक्य असल्यास पुढच्या ऍक्टिव्हिटी करणे इतकेच आपल्या हातात,
त्यामुळे ऐन इव्हेंट मध्ये जेली फिश ने प्रसाद दिलाच तर काय? हा unknown फॅक्टर डोक्यात ठेऊन स्वीम संपवून बाहेर आलो.

ओव्हर ऑल माझ्यासाठी तरी हा अनुभव चांगला आणि moral बूस्टर ठरला. मी जरी उरण ला जाऊन समुद्रात पोहून आलो असलो तरी त्या तुलनेत मिरामार चा समुद्र बराच choppy होता आणि 5 मित्रांबरोबर वेळ न लावता पोहोणे vs 900+ लोकांबरोबर timed frenzy मध्ये पोहोणे हा मोठ्ठा फरक होता.
18 ची उरलेली कामे म्हणजे
सायकलिंग कोर्स पहाणे
रन कोर्स पाहणे (हा आम्ही शेवटपर्यंत पहिलाच नाही, हे 7km चे 3 लुप्स टोटल 21 km)
अथलिट्स चेक इन
अथलिट्स ब्रिफिंग

पैकी सायकलिंग कोर्स मिरामार च्या दोन्ही बाजूस पसरलेला, 30km चा एक लूप असे 3 लूप करायचे होते.

मिरामार सर्कल वरून मांडावी नदी शेजारून ,जुन्या गोव्याकडे साधारण 7 km, त्या कॉज वे वर u टर्न, (हा सगळा सपाट भाग) परत मिरामार, मग दोनापाऊला चा खडा चढ आणि वर पठारावर थोडेसे चढ उतार , परत यु टर्न तोच डोनापाऊला चा तीव्र उतार आणि मिरामार सर्कल.

आम्ही फक्त चढाचा भाग सायकल ने पाहू म्हणून निघालो.
निघताना किरण ने बजावून सांगितले होते, ही रेस नाही, एकमेकांशी आणि इतरांशी अजिबात कॉम्पिट करू नका, रूट कसा आहे हे पहा, प्रत्येक खड्डा, स्पीड ब्रेकर आजूबाजूच्या लँडमार्कशी असोशिअट करा आणि स्वतः ला अजिबात स्ट्रेन करू नका.

पण एकदा सायकलवर बसल्यावर ने सगळे सांगणे माझ्या डोक्यातून निघून गेले आमच्या सारखेच बरेच अथलिट्स रेकी करायला बाहेर पडलेले.दुसऱ्या सायकलिस्ट बरोबर पॅडल to पॅडल जाताना मीच फास्ट दाखवायची उर्मी उसळ्या मारून वर यायला लागली आणि मी वाहवत गेलो.
आदित्य सिझन्ड फुटबॉलर आणि ट्रेकर वगैरे असल्याने त्याचा या माईंड गेम वर चांगलाच ताबा आहे, त्याने अजिबात घीसडघाई न करता तब्येतीत रेकी पूर्ण केली, आणि मी परत यायची वाट पहात थांबला, आणि मी परत आल्यावर कानउघाडणी केली Sad
त्याच्या समोरच एक फिरंग सायकलिस्ट फुल्ल स्पीड ने येऊन क्रॅश होता होता वाचला होता. त्या राइड मध्ये काही झाले असते तर इतके महिन्यांचे ट्रेनिंग आणि कष्ट शेवटच्या 2 दिवसात मातीत गेले असते.
त्याचे म्हणणे खरेच होते म्हणा.
मग हॉटेल वर परत.

अथलिट्स चेक इन आणि ब्रिफिंग या दोन्ही गोष्टी एक कन्व्हेन्शन सेंटर मध्ये थोडया दूर होत्या, आम्ही हॉटेल मधून निघालो आणि धुव्वाधार पाऊस सुरू झाला, अगदी 10 15 मिनिटात रस्त्यावर पाऊलभर पाणी भरले.
कन्व्हेन्शन सेंटर जवळ पूर्ण रस्ते जाम, पार्किंग फुल्ल, बाहेरून येणारे अथलिट्स कार् वर सायकली लावून, सायकली सकट कार्स रस्त्यावर उभ्याकरून आत गेलेले .ही भयंकर रिस्की गोष्ट आहे,
एक तर मागे रॅक वर लावलेल्या सायकली ना काही लॉक नसते, कोणीही थोडेफार खाटखुट करून सहज सायकल काढू शकते.
पार्किंग मध्ये मागच्या गाडीने चेपले आणि सायकल डॅमेज झाली हे अगदी सहज होणारे आहे.
तिसरी गोष्ट अगदी चोरी आणि अपघात नाही तरी केवळ उत्सुकतेपोटी कोणी छेडछाड केली तरी सेटिंगस बिघडू शकतात.

पण लोकांकडे इतर पर्याय नसावा कारण पार्क केलेल्या कार वर सायकली हे चित्र सगळीकडेच दिसत होते.

आमच्याबरोबर किरण असल्याने आम्हाला अगदी शोफर ड्रीवन कार ची ऐश होती.

चेक इन म्हणजे त्यांनी आमच्या अथलिट् नम्बर चा बँड आम्हाला बांधला आणि बिब, हेल्मेट स्टिकर्स वगैरे असणारी एक बॅग आम्हाला दिली, झाले चेक इन

मग त्या अरिना मध्ये असणाऱ्या IM च्या पोस्टर समोर आणि सगळ्या पार्टीसिपन्ट्स ची नावे लिहिलेल्या बोर्ड वर आपले नाव शोधून त्याकडे बोट दाखवून असे 2 मॅनडेटरी फोटो काढून झाले #शास्त्र_असतंय_ते Happy

InShot_20191025_215412593.jpg20191026_140936.jpg

इकडेच बाजूला एक्स्पो होता. इव्हेंट्स चे स्पॉन्सरर्स, स्पोर्ट्स गुडस चे इतर वेंडर्स वगैरे इकडे स्टोल्स लावून असतात. पण एकंदर IM इंटरनॅशनल इव्हेंट च्या मानाने हा एक्स्पो एकदम पाणीकम वाटला.

पुढचा पडाव ब्रिफिंग
अर्ध्या अर्ध्या तासाच्या सेशन मध्ये रेस डायरेक्टर, आयोजक टीम सगळ्यांना does अँड डोंट्स आणि इतर गोष्टींचे ब्रिफिंग करते, काही शंका असतील तर उत्तरे देते.
इकडे परत एका खेळाडू बरोबर एक कँपनिअन अशी लोकसंख्या वाढल्याने त्यांच्या बसण्याच्या व्यवस्थेचा अंदाज चुकलेला, लोक बायका, मुले घेऊन ब्रिफिंग ला बसत होती. मला तरी ती गोष्ट आवडली नाही.

पण ब्रिफिंग च्या सूचना अतिशय स्वच्छ आणि सोप्या भाषेत होत्या. भीती दाखवणारी एकच गोष्ट होती ती म्हणजे पेनल्टी.
तुमच्या चुकीच्या स्वरूपानुसार तुम्हाला येलो, ब्लु किंवा रेड कार्ड दाखवले जाईल,
3 वेळ ब्लु किंवा एकदा रेड म्हणजे disqualify.
नाहीतर 1 ब्लु= 5 मिनिटे जास्त
वेळ.

आंतरराष्ट्रीय सेफ्टी रुल्स भारतीय, विशेषतः पुणेरी दुचाकी स्वारांना पाळायला कठीण वाटावेत यात आश्चर्य नाही Wink
तसे नियम साधेच होते
सायकल डाव्या बाजूने चालवा.

ओव्हरटेक केवळ उजव्या बाजूने करा, डाव्या बाजूनं केल्यास पेनल्टी
आडव्या फाईल मध्ये , दोघा तिघांनी समांतर सायकली चालवत रस्ता अडवू नका. हा खास पुणेरी आवडता प्रकार.

एकदा ओव्हरटेक करायला सुरुवात केल्यावर 25 सेकंदात पूर्ण करा आणि परत डाव्या लेन मध्ये या.

पुढच्या सायकलिस्ट पासून कमीतकमी 12 मीटर चे अंतर ठेवा

आणि सगळ्यात महत्वाचे डोना पाऊला चा तीव्र उतार नो ओव्हरटेक झोन होता. म्हणजे त्या उतारावर गुंगाट येऊन मिळणार स्पीड अडवांटेज घेता येणार नव्हता.

तर या साध्याच नियमांवर हा हु करून ब्रिफिंग संपवून बाहेर आलो,
किरण गाडी लांबवर लावून कॅफे मध्ये बसला होता, त्याला शोधून सायकल चा उरलेला रूट पाहायला कार ने निघालो.
हा रूट माहितीचा होता. आणि सपाट आहे हे पण माहिती होते त्यामुळे टेन्शन नव्हते.
वाटेत एक ठिकाणी छोटी शेड बनवलेली दिसली

दाटून आलेले आभाळ, कुंद हवा आणि समोर मांडवी चे भरून वाहणारे रुंद पात्र, त्या पलीकडे टेकड्या आणि मनात पुढच्या रेस ची हुरहूर, उत्सुकता, भीती आशा विचित्र मनोवस्थेत त्या कट्ट्यावर बसलो.
एकही शब्द बोलावासा वाटत नव्हता. नदीकडे नुसतेच पहात बसलो, थोड्यावेळाने परत हॉटेल वर आलो
परत फिश ओरपुन झोपायच्या मागे,
आता मात्र झोप चांगलीच डिस्टरब व्हायला लागली होती,
ब्रिफिंग मध्ये त्यांनी आवर्जून सांगितले जे काही झोपायचे आहे ते 18 ला रात्री झोपून घ्या, 19 ला रात्री तुमची झोप होणार नाही,

19 उजाडली, pre race डे

आत्ता पर्यंत मिरामार च्या 3 4 km त्रिज्येच्या टापुचे खेलग्राम मध्ये रूपांतर झाले होते, बहुतेक रस्त्यांवर दिसणाऱ्या सायकल सहित गाड्या, वेळी यावेळी धावणारे उत्साही अथलिट्स, यांनी सगळे वातावरण चार्ज अप व्हायला लागले होते.
आयोजकांची रस्त्यावर बॅरिकेड्स टाकून वेगळी लेन करणे, रस्त्यावरचे विशेष मोठे खड्डे बुजवणे, मिरामार बीच वर पूर्ण संसार थाटने अशी लगीनघाई उडाली होती.

19 ला सकाळी परत प्रॅक्टिस स्वीम सेशन झाले, आज जवळपास सगळं रूट आखून झाला होता, आदल्या दिवशीच्या अनुभवाने शहाणे होऊन आयोजक 5 5 लोकांना दर 5 सेकंदांनी सोडत होते, आणि लोक सुद्धा थोडे शहण्यासारखे पोहत होते,
तरी आज जे पहिल्यांदा स्वीम करत होते त्यांच्या साठी दोरीत अडकणे , राफ्ट ने येऊन सोडवणे वगैरे प्रकार झालेच.
1 2 लोकांना जेली फिश ने धरले.

आपल्या प्रत्यक्ष समोर ज्या काही 1 2 घटना होतात त्याचे आपण लगेच सर्वत्रिकरण करतो आणि लौकरच समुद्रकिनारी जेली फिश अटॅक होत आहेत अशी एक सेंटिमेंट लोकांमध्ये पसरू लागली, त्यातच कोणीतरी ट्विट वगैरे केले.

मागे ओळखीचा एक मुलगा IM करत असताना त्या जलाशयात अचानक अलगी आली, त्यामुळे आयोजकांनी स्वीम सेक्शन रद्द केला होता.
लगेच त्या माहितीच्या बेसवर आता पण स्वीम रद्द होणार का वगैरे विचार डोके वर काढू लागले,
तेव्हा परत किरण चा औटसायडर व्ह्यू कामाला आला, 900+ एथिलीट मध्ये तुम्ही 10 घटना पाहिल्यात, तुम्ही न पाहिलेल्या अजून 10 समजा म्हणजे किती प्रमाण झाले??? स्पर्धा रद्द करण्याइतके हे प्रमाण मोठे आहे का? वगैरे गोष्टी सांगून त्याने डोक्यात चालणारे हे फालतूचे विचार बंद केले.

एकंदर दुसरे स्वीम सेशनपण कॉन्फिडन्स वाढवून, निर्धोक पार पडले.

आजचा अजेंडा आयटम होता
सायकल रॅकिंग आणि ट्रान्झिशन एरिया टूर.

इव्हेंट च्या आदल्या दिवशी सायकल वरच्या सर्व गोष्टी काढून (म्हणजे पाण्याच्या बाटल्या, पंक्चर किट वगैरे) सायकली त्यांच्या हवाली करायला लागतात, आपले नाव लिहिलेल्या ठिकाणी त्या उभ्या करायच्या,
दुसऱ्या दिवशी रेस सुरू होण्या अगोदर 1 तास आपल्याला त्या एरिया मध्ये सोडतात, तेव्हा परत या बाटल्या लावणे, हवा भरणे वगैरे कामे करता येतात,
आपल्या इतर गोष्टी, जसे रनिंग शूज, t शर्ट, गॉगल वगैरे सायकली शेजारी मांडून ठेवायचे असते.

या पूर्ण एरिया ला ट्रान्झिशन एरिया म्हणतात.

तर दुपारी आम्ही सायकली घेऊन गेलो, त्यांनी ब्रेक, हँडल वगैरे गोष्टी चेक केल्या , सायकली रॅक केल्या,
नंतर या ट्रान्झिशन एरिया मध्ये movement कशी असेल? स्विमिंग संपवून आम्ही कुठून येणार, सायकल आउट कुठून
सायकल इन कुठून आणि रन आउट कुठून हे त्यांनी नीट दाखवले. अशी ट्रान्झिशन टूर सुद्धा संपली.

या इव्हेंट ला पुण्या मुंबई ची भरपूर मंडळी असल्याने इकडे खूप सारे ओळखीचे चेहेरे दिसत होते, त्याने थोडासा धीर वाटत होता.पण वाढत जाणारा ताण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता.

आता ऑफिशिअली IM वाल्यांनी मागे लावलेली कामे संपली होती. रेस ची वाट पाहणे हेच एक काम आमच्या समोर होते.

रिकामे मन सैतानाचे घर म्हणतात ते अशावेळी अगदी प्रकर्षाने जाणवते.
प्रत्येकाचा हा ताणाचा निचरा करायचा मार्ग वेगळा असतो.
आमच्या हॉटेल मध्ये राहणारा एक मुलगा रनिंग शूज घालून गुंगाट वेगाने 5- 7 km धावून आला, काल सायकलिंग च्या बाबतीत माझे पण बहुदा तेच झाले असावे. किरण-आदित्य बरोबर नसते तर नक्की मी पण धावायला बाहेर पडलो असतो Happy

आता पूर्ण फॅसिलिटी पाहून आल्यावर आम्ही इमाजीनेशन एक्सरसाईज करायला लागलो, डोळे बंद करून ,आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी आहोत, धावत आलो, सायकलिंग चे कपडे घातले, सायकल घेऊन धावत बाहेर पडलो अशी पूर्ण साखळी व्हिज्युवलाईझ करायची.

नंतर ट्रान्झिशन एरिया मध्यें घेउम जायच्या गोष्टींची लिस्ट बनवणे हे काम, अशा अनंत लिस्ट आम्ही गेल्या 2 महिन्यात बनवल्या असतील.
हे तसे नाजूक काम, कमीत कमी समान हवे पण ऐनवेळी एखादी गोष्ट लागू शकते त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहू दे, असू दे च्या नावाखाली बॅगेत जाऊन बसत होत्या, शेवटी मी आणि आदित्यने गोष्टी विभागून घेतल्या, दोघांनी गोष्टी ले आउट करायच्या आणि कोणाला गरज पडेल त्यांनी दुसऱ्या कडे जाऊन वापरायच्या असे ठरले, मग सामान थोडे कमी झाले.

हे करण्यात दुपार टळली.

संध्याकाळी एक राउंड मारायला बाहेर पडलो आणि लक्षात आले की माझे घड्याळ बंद पडलेय. मी as usual पॅनिक मोड मध्ये परत एकदा किरण- पणजी मार्केट- घड्याळ दुरुस्ती- बॅटरी चेंज. घड्याळजी ने कदाचित सी वॉटर ने बॅटरी शॉर्ट होतेय, परत बंद पडू शकेल पण आपण ट्राय करू म्हणत बॅटरी बदलली.
व्हॉट इफ.... हा नवा टॉपिक किरण च्या कौनसेलिंग talk मध्ये ऍड झाला.

रात्री जेवायला बाहेर पडलो , रेस च्या आधीचे शेवटचे जेवण अगदी साधे करायचे म्हणून थेट डाळ खिचडीवर आलो.
मनस्थिती अगदी अस्थिर झाली होती. त्या दोघांना काजू वगैरे खरेदी करायची होती, मी दुकानाबाहेर बसलो.राहून राहून मला कासव मधली 2 गाणी आठवत होती, शेवटी भर रस्त्यात मोबाईलवर ती गाणी ऐकत बसलो. नाहीतरी या सगळ्या गोष्टींचा कासव बरोबर जवळचा संबंध होताच.

हॉटेलवर परत.

लिस्ट नुसार सामान भरणे सुरू,
परत एकदा आमच्या आठवणीप्रमाणे बनलेली लिस्ट आणि आउट सायडर च्या आठवणीप्रमाणे काय गोष्टी लागतील याचे क्रॉस चेकिंग झाले.

एकंदरीत लोकांनी गोव्याच्या ह्युमीडिटी बद्दल आणि होणाऱ्या सॉल्ट लॉस बद्दल घाबरवून सोडले होते, त्यामुळे बाटल्यांमध्ये 1 1 चमचा जास्त मीठ घातले,

2 ऍक्टिव्हिटी च्या मध्ये जे पाणी पिईन म्हणून ठेवलेले त्यात सुद्धा वाढीव मीठ घातले. त्याचा नंतर चिमटा बसला पण ते पुढे येईलच.

त्यानंतर किरणने आम्हाला समोर घेऊन " 70 मिन है तुम्हारे पास..." सारखा पेप talk दिला Wink

....... You didnt register because u wanted certain timing, that came later in your mind
You registered because u wanted to enjoy the process,....
.....प्रोसेस चा आनंद तुम्ही पुरेपूर घेतला आहात, आता प्रत्यक्ष इव्हेंट चा आनंद घ्या, एखादी गोष्ट केल्याने तुम्हाला छान वाटणार असेल तर गोष्ट लगेच करा (डोक्यावर थंड पाणी किंवा टॉयलेट ब्रेक ), तेव्हा काही मिनिटे वाढतील पण ओव्हर ऑल तुमची इव्हेंट जास्त आनंददायी होईल,....
..........ओव्हर ऑल टायमिंग 8.5 तासाचे आहे तुमच्या दोघांचे ट्रेनिंग बघता हा वेळ "य" म्हणता येण्यासारखा आहे, घड्याळ बंद पडले पंक्चर झाले वगैरे गोष्टि झाल्या तरी पॅनिक होऊ नका, वेळ कायम एक्सेस आहे हे डोक्यात ठेवा....
....Cramp येऊ नये म्हणून लक्ष ठेवा, .....
वगैरे बरेच काही.

शेवटी बॅग पॅक, कपडे तयार आणि रात्री 930 ला दिवे बंद करून आडवे झालो.

आडवे झालो खरे, पण झोप येईना, गेल्या 4 5 महिन्यातला ट्रेनिंग लॉग काढून वाचत बसलो. आपले व्यवस्थित ट्रेनिंग झाले आहे याचा अजून एक डोस स्वतःच स्वतः ला दिला,
संध्याकाळी IM च्या बोर्डस समोर काढलेले फोटो WA स्टेट्स वर टाकले होते , त्यांना लोकांनी पाठवलेल्या शुभेच्छाना उत्तर देत बसलो.
शेवटी किरण ने खाली उतरून हॉटेल चा राउटर बंद करायची धमकी दिली आणि माझा मोबाईल बंद केला.

शेवटी 19 तारीख आमच्यासाठी संपली.

भाग2 https://www.maayboli.com/node/72118

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थरारक अनुभव.. नुसतं वाचताना प्रत्यक्षात किती कसोटी लागली असेल ह्याची कल्पना येते.. कमाल आहे तुमची..

अभिनंदन, शुभेच्छा आणि share केल्याबद्दल धन्यवाद Happy

लिखाणाची शैली बहारदार आहे mr Ironman Happy

मस्तच.
मला तर हे स्वप्नवतच वाटतय.

भारीच !! ४ - ५ महिने तयारी म्हणजे बरीच चांगली तयारी केलेली होती की. पण तरिही रेसच्या आदल्या दिवशी येणारे टेन्शन बरोबर आहे. आदल्या रात्री नीट झोप होणार नाही जे म्हणतात ते अगदी खरं वाटतं. जरी एकदा केलेली रेस असेल तरी काही काही वेगळे होतच असते.

पुढचा भाग लवकर टाका!

सर्वांना धन्यवाद,
पुढचा भाग लिहायच्या मागे होतो, त्यामुळे इकडे यायला थोडा उशीर झाला.

मस्त लिहलं आहेस रे
हेच ऐकायचं होतं तुझ्याकडून
किरण म्हणजे कोण? अधिक माहिती दे ना

आशु,
गमतीची गोष्ट म्हणजे, आदित्य आणि किरण दोघांना मी खूप ओळखत नव्हतो.
त्यातल्या त्यात आदित्य आणि मी 2 3 ट्रेनिंग सेशन एकत्र केलेली , पण 17 तारखेआधी किरणचे फक्त नाव ऐकले होते. तो आणि आदित्य जवळ जवळ राहतात आणि बऱ्याचदा एकत्र ट्रेन करतात.
He is a avid runner, mumbai marathon च्या अगदी सुरवातीच्या 1 2 वर्षांपासून धावतो आहे. तो एकदम कौसेलर टाइप व्यक्तिमत्वाचा शांत, प्रसन्न माणूस आहे.

And we were destined to meet.

गोव्याला किरण-आदी एकत्र जाणार होते, त्यांनी हॉटेल सुद्धा बुक केले होते, मी आमचा लवाजमा घेऊन जाणार होतो आणि मी थोडेसे दूर 4 बेड ची रूम बुक केली होती.
अगदी आठवडाभर आधी बायकोची पाठ दुखायला लागली, आणि लांब रोड ट्रॅव्हल नको म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन कॅन्सल केला, हॉटेल ने रूम रिफन्ड द्यायला नकार दिला, म्हणून मी तीच 4 बेड रूम कॉन्टिन्यू केली.

पुणे-गोआ प्रवास आदी च्या कार ने करायचा असे ठरवले.
इथपर्यंत सगळे ठीक होते

मला रूम वर सोडून ते त्यांच्या हॉटेल वर गेले. Oyo आणि हॉटेल च्या बेबनाव झाल्याने हॉटेल ने त्यांचे रिझर्वेशन कॅन्सल केलेले. माझ्याकडे एवीतेवी रिकामी जागा होतीच मग ते माझ्या खोलीवर शिफ्ट झाले.

आधी दुसरा भाग वाचला. आता हा वाचला.
एका दमात पूर्ण केलं सगळं. भारी लिहिलं आहेस. एकदम सगळं डोळ्यासमोर आलं. Happy

अगदीच डोळ्यासमोर घडतय अस वाटलं. फारच इन्स्पायरींग आहे. तुम्ही तयारी ( प्रॅक्टीस ) कशी केलीत ह्याबद्दलही लिहा ना.

यांच्या एका सराव सत्राला मी स्वयंसेवक म्हणून गेलो होतो
त्यावेळी याची देही याची डोळा पाहिलं होतं
आयर्नमन सारखाच पुण्यात सेट अप करून त्या नुसार सराव केला होता

धनश्री,
हो , ते लिहायचा प्रयत्न करतो आहे, पण कधीकधी ते खूप टेक्निकल होईल याची भीती वाटते.

या जगन्नाथाच्या गाड्याला काही मायबोलीकरांचे देखील हात लागले आहेत Happy
हर्पेन - सब फ़साद की जड
सई केसकर - मला 10 किलो हलके केले
आशुचॅम्प - माझ्या सायकलरूपी भीमथडी तट्टू ला अरबी घोडा बनवण्याच्या प्रयत्नांत मदत करत होता.
Happy
हे सगळे त्या भागात येईल असा आत्ता तरी प्लॅन आहे.

>>हो , ते लिहायचा प्रयत्न करतो आहे, पण कधीकधी ते खूप टेक्निकल होईल याची भीती वाटते

अरे वा! होऊ देत टेक्नीकल......आम्ही वाचू. लेखाच्या प्रतिक्षेत....

>>>सई केसकर - मला 10 किलो हलके केले

आता मला १० किलो हलके कोण करणार??

धन्यवाद मेन्शनबद्दल पण नुसतं सांगणं आणि ते करणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे.
तू करून दाखवलंस!!
मनःपूर्वक अभिनंदन. Happy