लॉकडाऊन इफेक्ट्स

Submitted by abhishruti on 18 December, 2020 - 05:00

जवळपास पस्तीस वर्षांनी पेन्सिल हातात धरली.... सुरुवात घरातील लोकांवर प्रयोग करून मग सेल्फ पोर्ट्रेटनी केली. मी याविषयातील प्रोफेशनल किंवा ट्रेनिंग घेतलेली व्यक्ती नाही. केवळ छंद होता जो परत गवसला.... ज्यामुळे माझा वेळ छान गेला आणि मनाला उभारी आली. नाहीतर घरात बसून काय करायचं हा प्रश्नच होता. मायबोलीवरील मित्रमंडळींना सुचविल्यामुळे हा धागा काढून मी काढलेली चित्र शेअर करतेय. ब-याच वर्षांनी इथे लिहितेय. चुकभूल द्यावीघ्यावी

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेखच!!
मैत्रिण घार्‍या डोळ्याची आहे काय???? नसली तरी मस्त जमलं चित्र. बघूनच एसपी मधली वाटली Wink Happy !!

सीमंतिनी, हो ....घा-या डोळ्याचेच एक पोर्ट्रेट काढायचे होते. धन्यवाद!
अजय, खरंय खूप वर्षांनी येतेय मायबोलीवर, पण मजा येतेयै
सर्वांना खूप खूप धन्यवाद!!

सुरेख ! नितांत सुंदर चित्रे! अशीच काढत रहा.

सगळी चित्रे वर लेखातच देऊच शकता. एका खाली एक द्यायची असल्यास त्यांना अनुक्रमांक द्या म्हणजे दिसताना व्यवस्थित दिसतील.

Thanks friends....Ur appreciation n encouragement means a lot to me !

मस्त आहेत एकेक चित्रे.
चित्रकलेचे मी काही एक्स्पर्ट कॉमेंट देत मूल्यमापन करू शकत नाही. तितके त्यातले काही कळत नाही. पण तरी मला पर्सनली हा सर्वात कठीण प्रकार वाटतो. कारण चेहरा हुबेहूब तसा दिसला नाही तर बघणारा सरळ काट मारतो.

बाकी ईतके वर्षे पेन्सिल हातात न घेण्याची जी काही कारणे असतील ती, आता खाली ठेऊ नका. पेन, कलर पेन्सिल वगैरे आता विविध प्रकार ट्राय करा. शुभेच्छा Happy

Thanks सगळ्यांना !! हो आणि आता पेन्सिल खाली नाही ठेवणार प्रॉमिस! इतकी वर्ष चित्र न काढण्याची कारणं नेहमीचीच शिक्षण, करीयर, घरसंसार, मुलःबाळं!! आणि या सगळ्या धावपळीत विसरूनच गेले होते.... अचानक साक्षात्कार झाल्यासारखं परत सुरु केलं.... जरा भीतभीतच पण जमलं..... यात काही वर्कशॉप/ट्रेनिंग अटेंड करावं का असा विचार चालू आहे.... पण मला ऑनलाइन नाही करायचय... बघू कधी जमतय ते.... तुमच्या शुभेच्छा आणि प्रोत्साहन नक्कीच कामी येईल. धन्यवाद परत एकदा!!

वा श्रुती दमदार कमबॅक... वाटतच नाहि काहि शिकली नाहिस असं . छान बारकाव्यांसहित चित्ररेखाटन Happy

Thanks Bhavana, ऋन्मेष,अंजली,धनुडी,जाई,लावण्या,भाऊ, फारएन्ड, वर्षा, नँक्स, राखी, वैशाली,हर्पेन.... And all my dear maaybolifriends !!
Here is one more to wish u a very Happy New year 2021

Pages