भुभु आणि माऊ बाळांच्या गंमती जमती

Submitted by आशुचँप on 11 November, 2020 - 12:06

अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे.
इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.

हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे

या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे.
=====

माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे
तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका
आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही
लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव
एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो
त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता
पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली
तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने
ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला
तरी मी काही बोललो नाही
सॉरी म्हणून तिथून निघून आलो

======

आज सकाळपासून धोधो पडतोय
आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला
एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळतबसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर
इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे
तयामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता
ओड्या इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत
मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत
या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे

======

आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं
ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेच ना
मी कसातरी जाऊन त्याला धरलं
म्हणलं असं का करतोय ??
मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर
आधी काही बोलला नाही मग हळूच खिशातून बिस्किटे काढली
तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे
आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकली
मी म्हणलं ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता

========

ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय
लपाछपी चा
पूर्वी एकाने ओडीन ला पकडून ठेवायचं आणि पोरगा लपला की सोडायचं, तो वासावरून अर्ध्या मिनिटात शोधून काढायचा
मग पोराला लक्षात आले की वासावरून शोधतो मग आता तो पळत वरच्या खोलीत जातो आणि मग परत खाली येऊन वेगळीकडे लपतो
हा वेडा वास घेत घेत आधी वरच्या खोलीत जातो मग खाली येतो तोवर याने जागा बदललेली असते
असला तासन्तास खेळ चालतो
मग आता तो शेजारच्या कॉलनीत जातो मुलांसोबत खेळायला
सगळे लपतात इकडे तिकडे आणि हा एकेक करून शोधून काढतो
आणि येड्या वर सारखंच राज्य असतं तरी कळत नाही
उलट आपल्याला खेळायला घेतात, सगळे हाक मारतात एवढं अटेंशन मिळतंय याने तुडुंब खुश असतो
चेहऱ्यावरचे भाव तेव्हा बघण्यासारखे असतात
निरागस समाधान तोंडभर पसरलेलं असत

======

मी काम करत असेन तर येतो
चुळबुळत बसून राहतो समोर
मग त्याला मानेवर, गळ्याला थोडं खाजवलं, काय म्हणतोस, कंटाळा आलाय का तुला, माझं काम झालं की खेळू काय आपण एवढं म्हणलं की समाधान होतं मग जाऊन लोळत पडतो
अर्थात नेहमीच नाही, अगदी बोर झाला असेल तर मग पंजा हातावर ठेऊन आता बास चा इशारा देतो, तरीही नाही ऐकलं तर मग मांडीवर चढून गाल चाट, हात चाट
ढकललं तरी परत येतो
मग थोडा वेळ काम बाजूला ठेऊन अटेंशन द्यावं लागतं, बॉल खेळणे, बेली रब असलं केलं की परत कामाला जायची परवानगी मिळते

====

मांजर आणि भुभु चे काय वैर असते कळत नही
ओडीन ला मांजर दिसले की तो कंट्रोल होतच नाही
त्यात आमच्या घराच्या कंपाउंड च्या भिंतीवर एक मांजर येऊन बसत
हा जाऊन तारस्वरात भुंकत बसतो आणि ती पण असली डॅम्बिस की इतक्या वर तो येऊ शकणार नाही हे माहिती असल्याने निवांत कायमहिती कोणावर भुंकतोय असा चेहरा करून अंग चाटत बसते
इकडे ओड्या चा संतापाने जळून पापड झालेला असतो
एकदाच ती मांजर अवघड प्रसंगात सापडली
पुणेकर असल्याने ओड्या दुपारी मस्त तंगड्या वर करून झोपलेला असतो
ही वेळ साधून ती दबक्या पावलाने किचन मध्ये घुसली
किंचित भांड्याचा आवाज झाला आणि ओड्या तिरासारखा धावला
तिने त्याला झुकांडी दिली आणि हॉल मध्ये आली आणि गडबडली
एरवी जे मागच्या अंगणाचे दार उघड असायचं ते मी जस्ट बंद केलं होतं आणि ओड्या भुंकत आत का गेलो ते बघायला जात होतो
मांजर आम्हाला दोघांना ओलांडून हॉल मध्ये आली पण बाहेर पडायला मार्ग नव्हता
तिथेच सोफ्यावर बाबा झोपले होते ती त्यांना ओलांडून खिडकीकडे झेपावली आणि ओड्या तिच्यापाठोपाठ पण तो वजन राखून असल्याने त्याला झेप जमलीच नाही आणि तो बदकन बाबांच्या पोटावर पडला
ते दचकून जागे झाले
तोवर मांजर घरभर वेड्यासारखं पळत होत आणि ओड्या मागोमाग
अक्षरशः टॉम आणि ते बुलडॉग चा सिन
नशिबाने पटकन सुचलं आणि मी मागचा दरवाजा उघडला
मांजर सुसाट पळालं बाहेर
आणि ओड्या मी कसा शूरबीर असल्याच्या अविर्भावात शेपटी हलवत आला
धिंगाणा नुसता
मी तर नंतर गडाबडा लोळलो हसून हसून त्या प्रसंगानंतर
आणि बाबा एकदम सिरीयस, म्हणे मांजराला पळायला जागा मिळाली नसती तर उलटून हल्ला केला असता त्याने नेमकं माझ्यावर.
म्हणलं त्याला तुम्ही दिसलाच नव्हता, त्याचं पूर्ण लक्ष ओड्या वर होतं
त्यालाच फिस्करून चावला असतं किंवा ओरबाडल असतं
त्यालाही एक धडा मिळाला असता चांगला
त्याचा तर इतका राग आहे मांजरावर की दिवसा रात्री कधीही म्हणलं, ओड्या मांजर आलं
की जातो मागच्या अंगणात आणि भुंकून येतो
म्हणलं दर वेळी कसं याला मांजर दिसतं म्हणून पाठोपाठ गेलो एकदा तर मांजर कुठंही नव्हतं पण हा हिरो ते नेहमी जिथं बसतं तिथे बघून भुंकून आला
म्हणलं की कुठली पद्धत लेका निषेध व्यक्त करायची

====

टीव्ही सुद्धा बघत नाही
त्याच्यासाठी म्हणून डॉग चे व्हीडिओ लावले तरी ढिम्म
आवाज आला तर बाहेर जाऊन बघून येतो कोण भुंकतोय
त्याला किती वेळा दाखवलं टीव्ही वर चे भुभु भुंकतंय तरी तो मान्यच करत नाही
एकदा तर तो टीव्हीच्या मागे जाऊन बघत होता भुभु कुठं लपलंय ते

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

घ्या म्हणजे मदत करतोय ते कुठेच गेलं
अवघड आहे

इथे ओड्याने खांदे उडवुन नी भुवया वक्र करुन ओठ पिरगाळले असणार ( च्यॅक करताना करतो तसे) हे इमॅजिन करुन हसु आले.

>>>मी त्या रात्री आईला जास्तच बिलगून झोपलो
Happy Sad
>>>>>ओड्या आवाजाने कान किटले माझे, प्रत्येक गोष्टीवर भुंकल पाहिजे का?
हाहाहा

धन्यवाद सर्वांना

जेम्स बॉण्ड Happy अगदी अगदी

वेगळा धागा काढावा असे मलाही वाटत आहे
कारण बाकी पोस्टमध्ये या डायरी च्या पोस्ट हरवून जातील

मस्त आयडिया..ओडीन डायरी वाचायला नक्कि आवडणार आहे.
तुमची लेखनशैली छन नर्मविनोदी आहे. Happy

नवीन धागा काढला आहे

सर्वांना खूप धन्यवाद

मैत्रेयी - हो बरा आहे, आता मस्त टूनटूणीत उड्या मारून खेळतोय. ते मुका मार लागला असावा बहुदा. दोन दिवस सक्तीची विश्रांती दिल्याने रिकव्हर झाला लगेच

काय योगायोग आहे! निलुदांनी उल्लेखिलेल्या सुधा मूर्तींच्या पुस्तकाविषयी खरंच माहीत नव्हतं! ओडीन डायरी वाचतेय.

सॅमीचे नवीन शॉर्ट विडीओ टाकले आहेत. Happy

https://youtu.be/Lo159v1CyPU - खूप सिरिअसली अभ्यास चालु आहे Happy

https://youtu.be/e3KBl9wmQbw - मिशन इंपॉसिबल... हिलेरिअस Lol

https://youtube.com/shorts/F3Z1aIHeppI?feature=share - बुटाचा वास घेणं फार आवडतंय

https://youtube.com/shorts/dGaAZHPLK9o?feature=share - काय करतेय देव जाणे

भारी आहेत क्लिप
तो अभ्यास वाला तर लै भारी
पक्षी कसे उडतात यावर शिकारीची स्ट्रॅटेजी रचतोय असं वाटतंय

आपल्याला आईबाबा आणि शिक्षकांनी कितीही आपटलं, धोपटलं तरी फार तर मार दुखायचा पण मनावर व्रण किंवा मन दुखणं हे फार जास्त व्हायचं नाही. थोड्यावेळाने आपण परत नॉर्मल होऊन जायचो.
त्यामुळे हल्लीच्या मुलांना रागावलं, शिस्त लावली किंवा फटका मारला की लगेच त्यांचं बालपण झाकोळून जातं, मनावर दुरगामी परिणाम होतात आणि बरंच काही गंभीर असं होतं, हे मला फारच अद्भुत वाटायचं. पण आता त्याच्या पुढे एक गोष्ट कळली. आणि आता मीच मानसिक धक्क्यात आहे.
माझ्या मित्राकडे एक बेंगॉल कॅट आहे ( गुगल करून इमेज पहा. आकार मांजराएवढा पण दिसते वाघासारखी. रंग आणि चट्टेपट्टे तसेच) त्यामुळे किंमत 80 हजार ते एक लाख. स्वाभाविकच तिला नवसाच्या पोरासारखं जीवापाड सांभाळावं लागतं. तर या मांजरीचे केस अचानक भरपुर गायब झाले, अगदी त्वचा दिसायला लागली. घरभर केसांचे पुंजके सापडायला लागले. आधी स्किन डिसीज, फंगल इन्फेक्शन, ऍलर्जी असे बरेच उपचार करून झाले. नन्तर तिच्या उलटी मधुन केसांचे बोळे पडायला लागल्यावर रहस्य कळेना की केस पोटात कसे? अनेक व्हेट्स उपचार करून थकले, अनेक शॅम्पू, क्रीम्स, औषधं यांनी racks भरली.

नन्तर एका ब्रीडरने सांगितलं म्हणुन दुरवर शहराच्या एका टोकाला असणाऱ्या व्हेट कडे नेलं आणि त्यांनी सांगितलेली सगळी symptoms जुळली. त्यांनी जी observations सांगितली ती 2 आठवडे मॉनिटर केली तर तीही 100% जुळली. कुत्र्यांसारखी या बयेला सेपरेशन anxiety आहे. या तिच्या 100% मानसिक रोगाला 'सायकोजेनिक अलोपेशीया' म्हणतात. माझा मित्र / तिचा वडिल सकाळी जिमला गेला की, ती अस्वस्थ होऊन स्वतःचे केस तोंडात घेऊन उपटते. चार तास दररोज या रेटने ती भयंकर केसहीन झाली आहे. ( तरी बरं घर माणसांनी भरलेलं आहे, पण हा गेला की ती डिप्रेस होते म्हणे).
आता तिचं डिप्रेशन दूर करण्यासाठी तिला सतत व्यग्र ठेवायला सांगितलं आहे. घरातली माणसं आलटूनपालटुन तिच्याशी खेळणी खेळत रहातात. गुड नाईटचं असतं तसं एक इलेक्ट्रॉनिक युनिट तिच्या रूममध्ये लावुन ठेवलेलं असतं, त्या (तिच्यासाठी सुदिंग असणाऱ्या) वासामुळे म्हणे तिचा स्ट्रेस कमी होतो. शिवाय दिवसातून 3-4 वेळा एक म्यांम्यां म्यांम्यां म्यांम्यां अशा आवाजाची कॅट म्युझिकची cd दिली आहे, ती पण वाजवायची. त्याने तिचं डिप्रेशन कमी होत जाणार आहे.
मला स्वतःचं मुल झाल्यावर बालमानसशास्त्र शिकुन दमलेलं माझं मन आता घरातल्या डॉगला तर काही मानसिक त्रास होत नसेल ना हा विचार करून डिप्रेशन जायला लागलं आहे.

<<<आपल्याला आईबाबा आणि शिक्षकांनी कितीही आपटलं, धोपटलं तरी फार तर मार दुखायचा पण मनावर व्रण किंवा मन दुखणं हे फार जास्त व्हायचं नाही. थोड्यावेळाने आपण परत नॉर्मल होऊन जायचो.
त्यामुळे हल्लीच्या मुलांना रागावलं, शिस्त लावली किंवा फटका मारला की लगेच त्यांचं बालपण झाकोळून जातं, मनावर दुरगामी परिणाम होतात आणि बरंच काही गंभीर असं होतं, हे मला फारच अद्भुत वाटायचं >>>
मला पण... मला पण. .. एकदम सहमत

आमच्या बागेत फिरायला गेल्यावर तिथली एक दोन मांजरे आजूबाजूला घोटाळतात. चालताना समांतर अंतर ठेवून चालणे, बाकड्यावर बसल्यावर पायात येऊन पायाच्या नळीला आपली पाठ घासणे, कान घासणे, असले गोंडस उद्योग करतात. Happy
आज बर्‍याच कालावधीनंतर (महिन्यांनी) बागेत गेलो. खरेतर बागेत मांजर भेटेल हा विचारही माझ्या डोक्यातून पार विसरून गेलेला. पण खाली गेल्यावर चालायला सुरुवात केल्याबरोबर ही आकस्मिक समोर माझ्या वाटेवर अवतीर्ण झाली आणि शेपूट हवेत थेट वर धरून लगबगीने माझ्याकडे चालत आली. जवळ आल्यावर तिची चालायची दिशा बघून माझ्या बाजूने ती मला ओलांडून मागे जाईल असे वाटले पण ती एका बाजूने मागे गेली आणि मागच्या बाजूने मला एक फेरी मारून पुढ्यात एकदम पायात येऊन उभी राहिली. मी चालायला सुरुवात केली तर हिने अगदी पायातच चालणे सुरू केले. मला चालता चालता तिच्यावर पाय पडेल की काय असे वाटू लागले. शेवटी चालणेच अशक्य करू लागली. म्हणून मी खाली बसलो. तर अगदी समोर येऊन म्यांव म्यांव करू लागली. असे वाटले की ती मनातले खूप काही सांगू पाहतेय. करोना आल्यापासून बागेत लोकांची वर्दळही अगदी तुरळक झाली आहे. मला तिची भाषा कळत नाही याची प्रकर्षाने उणीव भासली. बरेच गोंजारून घेतले. घरी परत फिरताना अगदीच जड झाले. Happy

"अरे कसले तुमचे वर्क फ्रॉम होम! जरा बागेतही येत चला रे, तेवढेच भेटणे बोलणे होते.. कोणच आले नाही तर किती सुने वाटते."

yd_maau.jpg

अनु हो माझा पाय आहे Happy पायांचा वास आवडतो तिला नुकतेच बूट काढल्यावरचा ...कुणाचं काय तर कुणाचं काय Lol

मीरा ऐकावं ते नवलच!

गजानन किती गोड अनुभव!

गजानन किती गोड अनुभव!... +1.

मीरा, खूप वाईट आणि हताश वाटले तो किस्सा ऐकून.

अंजली, माऊ खूप गोड आहे.

<<<आपल्याला आईबाबा आणि शिक्षकांनी कितीही आपटलं, धोपटलं तरी फार तर मार दुखायचा पण मनावर व्रण किंवा मन दुखणं हे फार जास्त व्हायचं नाही. थोड्यावेळाने आपण परत नॉर्मल होऊन जायचो.
त्यामुळे हल्लीच्या मुलांना रागावलं, शिस्त लावली किंवा फटका मारला की लगेच त्यांचं बालपण झाकोळून जातं, मनावर दुरगामी परिणाम होतात आणि बरंच काही गंभीर असं होतं, हे मला फारच अद्भुत वाटायचं >>>
मला पण... मला पण. .. एकदम सहमत

आजकाल आमचा एलोन पण जरा शांत शांत असतो ... आजच मी आणि मुलगा बोलत होतो बहुतेक डिप्रेशन होतंय

Pages