बिहार विधानसभा निवडणूक/ इतर पोटनिवडणूक २०२० निकाल

Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53

२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.

निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यांचीही 28 सीटची मध्यावधी निवडणूक आहे , जे काँग्रेस सोडून गेले , त्यांना राजीनामा द्यावा लागतो व तिथे पुन्हा इलेक्शन होते, तिथे भाजपाचा डाव सोपा आहे , कारण 28 मधले 5-10 आले तरी त्यांची मेजोरीटी होते , काँग्रेसला मुश्किल आहे , 20-25 यावे लागतील
Sad

कुणी पक्ष सोडून गेले , कुणी मेले तर अशा इतरही रिक्त जागांच्या निवडनका ह्या निमित्ताने एकत्रच घेतात
गेल्या आठवड्यात अनेक राज्यात अशा लहान निवडणुका झाल्या आहेत , पण बिहार आणि एम पी मेन आहेत

Bypolls across 10 states in 54 assembly seats were held on 7 November along with the third and final phase of Bihar state assembly elections.

These include eight in Gujarat, seven in Uttar Pradesh, two in Odisha and Nagaland each and one in Haryana, Chhattisgarh and Telangana each, but the bulk of the seats were in Madhya Pradesh where 28 seats were left vacant due to the defection of former Congress MLAs to BJP.

असो... उद्या बिहार मधे अपशकुन होणार याची कल्पना आल्यानेच फडणविसांनी बिहारचे मैदान सोडुन पळ काढला म्हणे (निमित्त कोरोनाचे केले..!).

हम्म... नितीश कुमारच मु म होणार असे आधी सांगितले होते का ? आता नेटवर बातम्या बघितल्या त्यात काही बातम्या प्रश्नचिन्ह दाखवताहेत…

पूर्ण बातमी पाहिली नाही, कारण प्रश्नचिन्ह वाल्या बातम्या फुकट trp खेचणार्या असतात Happy

रात्री उशीरा पर्यंत..? कशासाठी..? हे काय नवीन गौड-बंगाल..?? बिहारातले एव्हिएम सुद्धा चालढकल पद्धतीने निकाल देणार का आता.. Proud

रात्री उशिरापर्यंत मोजणी सुरू रहाणार आहे

आता फक्त 20 % मते मोजली आहेत

असे तिथले अधिकारी बोलले आहेत

असे व्हाट्सपवर आले

गुगलवर चेक केले , हे दिसले

https://www.firstpost.com/politics/bihar-election-result-2020-live-updat...

यंदा कोविडमुळे केंद्रे वाढली म्हणून उशीर होणार.

मला वाटले होते evm चे कौंटिंग एका फटक्यात होते. पण तिथेही एका मशीनवर किती मतदार असणार याची मर्यादा असते. त्यामुळे वेळ लागू शकणे शक्य आहे.

इतकी कमी मोजणी झाली तर कोण पुढे हे जाहीर करण्याची घाई कशाला? चित्र पालटूही शकते.

मतदान यंत्रांची संख्या कोवीडमुळे वाढवलीय. मतदानाला गर्दी होऊ नये म्हणून एका यंत्रात जास्तीत जास्त १००० मतेच असणार आहेत.

पण कल पाहाता धीरज पासवानमुळे सगळीकडे टफ फाईट होतीय. तो जर वेगळा लढला नसता तर राजद 30 जागांवर आघाडीवर असती. तेजस्वीसुध्दा पिछाडीवर असता. भाजप व जेडीयू यांच्या जागांत फारसा फरक नसता.

धीरजचं भवितव्य उज्वल दिसतंय. ७% पेक्षा जास्त मतं मिळवतोय पठ्ठ्या!

नितीशकुमारांच्या कोलांटउड्यामुळे त्यांचीच वाट लागलीय. कारण नसता संपलेल्या लालूंना प्रथम रक्तदान केलं. त्याने धृवीकरणाला चालना मिळून भाजपाला मोठ केलं. इतिहासातून कोणि शिकतच नाहीये!!!

मतदान यंत्रांची संख्या यावेळेस 63% जास्त आहे.

थोडक्यात मुंबई मनपा निवडणुकीचे डावपेेच आखाायला आता सुुरवात होईल.

लोकं विचार कसा करताहेत ते कळले. माझा निवडणूकीतला रस संपला.
समाप्त
Wink

संध्याकाळी ९ वाजता एन डी टिव्ही वर ' डर का मोहल ' हा कार्यक्रम जोरात होईल असं दिसतंय !
सध्या तरी एक्झिट पोल च्या विरोधात निकाल दिसत असल्यामुळे काँग्रेस च्या पप्पू ला झोडपण्याचे काम चालू आहे .....

सन्जय राउत याना ८वी पर्यन्त शिकलेल्या तेजश्वी यादवच्या नेत्रुत्वाखाली बिहारमधे मन्गलराज येईल असे त्यानी एका मुलाखतीत सान्गितले आहे, तेजश्वी जर मुख्यमन्त्री झाला तर चाराचोर लालू तुरुन्गातून मुलाला उपदेश करतील व परत जन्गलराज आणतील. बघु या काय होते ते. या निवडणुकीत राहुल गान्धी मात्र यशस्वी झाला नाही असे दिसत आहे. कॉन्ग्रेसच्या महासचिव व मायबोलीवरील एकान्च्या favourite श्रीमती प्रियान्का वाड्रा बिहारमधे फिरकलेल्या नाहीत.

महासचिव व मायबोलीवरील एकान्च्या favourite श्रीमती प्रियान्का वाड्रा बिहारमधे फिरकलेल्या नाहीत >>>>> त्यांना भविष्य कळत , त्यामुळे काँग्रि च्या मानहानीकारक पराभव चा हार घालून घेण्यापेक्षा
फॉरेन मध्ये शॉपिंग ला गेल्या असतील !

बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला 'नोटा'पेक्षाही कमी मतं!
अरे...... मग २४४ सीटवर शिवसेना येणार होती त्याच काय झालं ?

Bihar Election Result 2020 | बिहारमध्ये 23 पैकी 21 जागांवर शिवसेनेला 'नोटा'पेक्षाही कमी मतं! >>>>>

तरी ही आमचे संपादक सुधारण्याची अपेक्षा करू नका !
शेंदूर चे तोबारे भरून भरून भाजपला शिव्या घालणार च !

लोकमतमधील बातमी वरून असे दिसते की शिवसेनेच्या २२ उमेदवाराना १११६ ते ४६ मते मिळाली आहेत. यावरून शिवसेनेची लायकी दिसून आली आहे व सन्जय राऊतान्चे मन्गलराज येण्याचे स्वप्न निदान ५ वर्शे तरी शक्य नाही. बिहारी लोक भाग्यवान आहेत नाहीतर जन्गलराज येण्याची शक्यता होती. ते असेच भाग्यवान राहून त्यान्चा जीवनमानात वाढ होवो ही प्रार्थना.

शिवसेना निवडून येण्यासाठी लढतच नव्हती. जे आपल्या तुपल्यासारख्या येरूंना कळते ते ह्या राजकारण्यांना कळत नसेल का?
चिराग पासवान नीतीशची मते कमी करणार असेच वाटत होते. पाहू.

25 टक्क्यांवरून आता बरीच पुढे मोजणी गेलीय. आता bjp व jdu मधला फरक कमी झालाय अशी एक हेडलाईन बघितली. सगळ्यात नवी बातमी काय आहे?

Pages