बिहार विधानसभा निवडणूक/ इतर पोटनिवडणूक २०२० निकाल

Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53

२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.

निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्वात जास्त जागा मिळवून BJP ni कुमार ह्यांना मुख्यमंत्री पद दिले तरी सरकार bjp च चालवणार.
आणि नितीश कुमार ह्यांना अडचणीत आणणारे निर्णय नक्कीच घेणार.

मोटाभाईने केलेली गेम आहे ही. जसे महाराष्ट्रात शिवसेनेला संपवायचा डाव होता तसाच नितीश सोबत केला आहे. चिराग पासवानला हाताशी धरुन (जसे इथे मनसेला धरले होते Proud ) जेडीएस ची प्रचंड गोची करुन ठेवली आहे. नितीशकुमारांनी मनात आणलं तर ते भाजप शिवाय सत्ता स्थापन करु शकतात. जे महाराष्ट्रात १०५ लोकांचं झालं तेच तिकडे बिहारात ७४ जणांचं होऊ शकतं Wink

आपल्या कोष्यारीला तिथला भाज्यपाल बनवला तर बरं होईल. त्यांना एका आठवड्यात शेकडो भेटीगाठि घेण्याचा दांडगा अनुभव आहे... तसेच मध्यरात्री घटनेनुसार कामकाज चालवण्याचा अन पहाटे पहाटे घाईघाईत शपथविधी समारंभ उरकण्याचा हातखंडा आहे.

{{{ चिराग पासवानला हाताशी धरुन (जसे इथे मनसेला धरले होते }}}

२०१९ हे वर्षं होतं ज्या वर्षात राज ठाकरे यांनी मोदी + शाह यांच्यावर सर्वाधिक विखारी टीका केली होती. लावरे तो व्हिडीओ फेमस झालं होतं. त्यामुळे भाजपने मनसेला हाताशी धरलं हे काही पटत नाही. २०१९ च्या शेवटी जेव्हा भाजप विरोधात बसला आणि इतर तीन पक्ष सत्तेवर आले त्यानंतर राज ठाकरे यांचा भाजपविरोध काहीसा मंदावला तरी तो पूर्णपणे संपलेला नाहीये. अधूनमधून भाजपवर टीका करणारी वक्तव्ये प्रसिद्ध होतच असतात.

>>त्यामुळे भाजपने मनसेला हाताशी धरलं हे काही पटत नाही. <<

अहो सोडून द्या!
भैसाटलेत हे लोक.... इतक्या निवडणुकात इतक्या वेळा तोंडावर पडून पण दरवेळी परत आशा लावून बसतात Wink

यांच्या पक्षाने तिथे राजदला खड्ड्यात घातलेय आणि नितिशकुमारला फोडण्याच्या भुरट्या गोष्टी करतायत !
लैच मनोरंजन Proud

बिजेपीला बिहारात सत्ता हवी होती की नितीशकुमारांना संपवायचे होते असा प्रश्न पडतो. खरेतर बरीच उत्तरं मिळतात देखील. मात्र हाच कोतेपणा स्वतःच्या नाशाला कारणीभूत होणार एवढं कळत नाही की जगातल्या एवढ्या मोठ्या पार्टीचे देखील प्रत्यक्ष देव अवतारा पुढे काही चालत नाही? पार्टी विथ डिफ्रन्स की पार्टी विथ नो होप? Wink

राष्ट्रीय जोकर पप्पू ने ७० जागा साठी ७ रॅली केल्या !
त्यातील ५० जण निवडणूक हारले .
महाराष्ट्रातील निवडणुकात देखील पूर्वीच अशीच परिस्थिती झालेली होती .
इथून पुढे " माझ्या मतदारसंघात पप्पु रॅली करणार नसेल तरच निवडणुकीला उभा राहील " अशी काँग्रेस चे उमेदवार अटी घालायला कमी करणार नाहीत !
Happy

बिहारमध्ये कुणीही निवडून आले तरी तिथे कसलाच विकास होत नाही कारण बाहुबली राज आणि प्रशासन.

अनुभवी मुख्यमंत्री नितीशकुमार ही परिस्थिती बदलतील अशी अपेक्षा आहे.

आणि बिहारला येणाऱ्या विकासासाठी शुभेच्छा.

नवीन Submitted by swwapnil on 11 November, 2020 - 18:13 >>>> सहमत . कोणतेही सरकार असो, बिहारचा विकास करावा त्यांनी
मुंबईत लोंढे तरी कमी होतील

बिहार निवडणूक वोट शेअर..

Screenshot_2020-11-11-18-08-07-599_com.android.chrome.png

समोर १५ वर्षे मुख्यमंत्री असलेले नितीशकुमार आणि लोकप्रिय पंतप्रधान असताना चांगलीच टक्कर दिली तेजस्वी यादवने.

15 वर्षे सत्तेत असणाऱ्या पक्षाविरुद्ध "Anti-incumbency" चा फायदा विरोधी पक्षाला उठवता आला नाही असेही म्हणता येईल.... किंवा Anti-incumbency नव्हतीच असाही अर्थ काढता येईल!
कॉंग्रेससारखा दिग्गज पक्ष सोबत असताना पण राजदचा पराभव झाला ही फारशी काही कौतुक करण्याजोगी गोष्ट नाही असेही म्हणता येईल.

थोडक्यात तुम्ही कुठे उभे आहात त्यावरुन सोयीचे निष्कर्ष काढता येतात Happy

बाय द वे strike rate काय आहे प्रत्येक पक्षाचा?

BJP ची एक पॉलिसी आहे मित्र पक्षाची च वाट लावायची.
म्हणजे निवडणुकीत मित्र पक्षाचे जे मतदार असतात त्या मतदार मध्ये फूट पाडायची.
सेना आणि मनसे ह्यांचे मतदार एकच आहेत .
मग सेनेला हरवण्यादाठी मनसे चे उमेदवार उभे करायचे.
तेच त्यांनी बिहार मध्ये पण केले jdu ल नुकसान पोचवण्यासाठी lgp ला ताकत दिली.

कम्युनिस्ट पक्षा कडे विचारवंत आहेत. भूमिका समजून सांगण्याची त्यांच्या कडे कुवत आहे.
कम्युनिस्ट तिथे निवडून आले ही चांगली सुरवात आहे.

{{{ सेना आणि मनसे ह्यांचे मतदार एकच आहेत मग सेनेला हरवण्यादाठी मनसे चे उमेदवार उभे करायचे. }}}

राज ठाकरेंनी मनसे स्थापन करावी आणि भविष्यात लावरे तो व्हिडीओ म्हणत मोदी शाह यांच्यावर दुगाण्या झाडाव्यात याकरिता त्यांना भाजपने त्यांना प्रोत्साहन दिले होते काय?

हरल्यानंतरच्या सबबी आहेत हो ह्या!
तेजस्वी यादव ला मॅन ऑफ द मॅच म्हणा.... वोट शेअरचे पाय चार्ट दाखवा.... पण आत्मपरीक्षण करणार नाहीत!

तुम्हाला जे वाटते तेच इतर सामान्य लोकांना वाटत नाही.... तुमच्या मनात जितका टोकाचा भाजपाबद्दल राग आहे तितका आम मतदाराला नाहीये हे इतक्या निवडणूकांनंतरही कळत नसेल तर काय बोलावे!

आता मुंबई महापालिकेच्या निवडणूकीपर्यंत अश्याच पुड्या सोडत रहा.... भाजपासाठी चांगलेच आहे ते!

कम्युनिस्ट पक्षा कडे विचारवंत आहेत. भूमिका समजून सांगण्याची त्यांच्या कडे कुवत आहे.
कम्युनिस्ट तिथे निवडून आले ही चांगली सुरवात आहे.>>>>>

अगदी बरोबर. पण हल्ली कोण विचारतोय हो कॉमि विचारवंतांना? जिथे त्यांचा उगम झाला त्या देशांनीही या विचारवंतांना झुरळाप्रमाणे झटकून टाकले. भारतात उरलीसुरली दोनचार झुरळे आहेत अजून....

साधना
चीन कम्युनिस्ट च आहे . रशिया कम्युनिस्ट च आहे.
पुषापाम प्रिया नी योग्य प्रतिक्रिया दिली आहे बिहार निवडणुकीच्या निकालावर.
अंधाराचा जल्लोष करा.
बिहारी जनतेला अजुन त्यांचे हित कशात आहे ते समजत नाही.

बिहारी जनतेला अजुन त्यांचे हित कशात आहे ते समजत नाही.>>>>>

कधी समजले होते?? आणि तिथे सगळे पक्ष कधी न कधी सत्तेत होते. कोणी काय भले केले? असो.

कधी समजले होते?? आणि तिथे सगळे पक्ष कधी न कधी सत्तेत होते. कोणी काय भले केले? असो.>>> सहमत. एकंदरीतच गायपट्ट्यातील लोकांची मानसिकता न समजण्यापलीकडे आहे. इतकी वर्षे झाली तरीही तिथे प्रचंड प्रमाणात जातीयवाद आहे . लोकांनाही तेच आवडते असे दिसतेय. मग ह्यात कोणत्याही राजकीय पक्षाला जबाबदार धरू नये असे वाटते.

समजेल जेव्हा बाकी राज्य ह्याचा विरोध करतील.
नरेंद्र मोदी जेव्हा गुजरात चे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी असे वक्तव्य केले होते .
टॅक्स गुजरात भरणार आणि तो टॅक्स बाकी राज्यांवर खर्च होणार असे असेल तर गुजरात नी केंद्र सरकार ला टॅक्स का द्यावा.
अशीच भूमिका बाकी राज्यांनी घेतली.
स्थलांतरित मंडळी ना आश्रय नाही दिला तरच ही बिहार आणि तर उत्तर प्रदेशी लोक तिथल्या नेत्यांच्या उरावर बसतील.

नितीश व भाजप ने खूप काम केले आहे आणि त्यांच्या पक्षालाच लोकांनी मत दिले पाहिजे होते अशातला भाग नाही , परंतु बिहार च्या हाला खीस जबाबदार असणाऱ्या आर जे डी पार्टीचे ७५ आमदार निवडून आले यातच बिहारिंची मानसिकता दिसते ....

हा नितीशकुमार एकदम संधीसाधू आहे. 15 वर्ष आहे मुख्यमंत्री आणि राज्य बिमारु ते बिमारुच. लालूच्या मुलाने कमाल केली असेच म्हणावे लागेल मोदी आणि नितीश असताना एवढे यश मिळवले म्हणजे खरेच कमाल आहे. काँग्रेस ही सर्व सहकारी पक्षांसाठी लायबिलिटी झाली आहे खरेतर.. त्या अमरिंदर सिंग सारख्या एखाद्या मुरब्बीला पक्षाध्यक्ष केले तर फरक पडेल अन्यथा अवघड आहे काँग्रेसचे.

Pages