प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस. 

Submitted by ताजे प्रेत on 6 November, 2020 - 06:14

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. 

आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !

Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात  कि   एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२  पटीने जास्त असतो. फटाका ०.३  ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!

मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज  लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्‍या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.

चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.

Group content visibility: 
Use group defaults

नंतर त्याची खिचडी करून टाकायचे Zero waste. >> अगदी Zero waste नाही म्हणता येणार. खिचडी खाऊन नंतर दुसर्‍या दिवशी .... Wink असो! मुद्दा कळला.

काही बाबतीत पर्यावरणाचा विचार करणे अवघड जाते हे अनुभवातून शिकलो आहे. तेल कमीत कमी वापरावे म्हणून मी कपाटाच्या बिजागर्‍यांना ऑयलिंग केले नाही बरीच वर्षे. त्यामुळे आंतर्राष्ट्रीय बाजारपेठेत तेलाची मागणी कमी होऊन दर नियंत्रणात राहिले, तेलाचे उत्पादन कमी झाले व पुढील पिढ्यांना जास्तीचे तेल उपलब्ध झाले. पण हे करताना माझ्या कपाटाच्या बिजागर्‍या गंजून एकदम खल्लास झाल्या आणि त्या बदलण्यासाठी नवीन बिजागर्‍यांचे उत्पादन करावे लागले. त्या बिजागर्‍या तयार करताना भट्टीत जादा कोळसा जाळला गेला, तिथून बाजारात आणण्यासाठी गाड्यांना जास्तीचे पेट्रोल जाळून जास्तीचा धूर करावा लागला. दुरुस्तीचे काम करणार्‍या सुकडू सुतारासाठी रोजगार निर्मिती झाली, परंतु ह्या सर्व भानगडीत मुळात जितके तेल वापरले गेले असते त्यापेक्षा जास्त पर्यावरणाचा र्‍हास झाला. तेव्हा लक्षात आलं, पर्यावरणाचा र्‍हास कमी करणे हे इतके काही स्ट्रेट-फॉरवर्ड नाही.

अति सर्वत्र वर्ज्ययेत्| कोणत्याही प्रकारची मेणबत्ती वापरा पण मर्यादेत. मेणाचा पुनर्वापर झाला तर उत्तम. किमान कंटेनर पुन्हा वापरता येईल.
रांगोळ्या काढल्यानंतर जेव्हा मिरवणूक पुढे जाते तेंव्हा रस्त्यावर पसरलेली रांगोळी लगेच उचलून घेता आली तर? संस्कार भारतीला एखाद्या vacuum cleaner company ने sponsor केलं तर. किंवा पटापट चार लोकांनी झाडून घेतली रांगोळी तरी बरंच damage control होईल. किंवा सरळ एक मोठं काळं जाड कापड अंथरायचं आणि कडांवर काही तरी वजनदार दगड वगैरे ठेवायचे. त्या कापडावर रांगोळी काढायची. मिरवणूक पुढे गेली की कापड काढून घ्यायचे. अनेक उपाय करता येतील.
आपला आनंद हा दुसऱ्याचे आणि स्वतःचे नुकसान करून येतो आहे आणि तो तरीही क्षणभंगुरच आहे याची जाणीव झाली की मग आपले वर्तन आणि आनंदाच्या कल्पना बदलतात.

आपला आनंद हा दुसऱ्याचे आणि स्वतःचे नुकसान करून येतो आहे आणि तो तरीही क्षणभंगुरच आहे याची जाणीव झाली की मग आपले वर्तन आणि आनंदाच्या कल्पना बदलतात.

नवीन Submitted by जिज्ञासा>> पटले

जिज्ञासा +११
शिवाय आनंद ही इतरांना जळवण्यासाठीची वस्तू नाही की बघा माझा आनंद तुमच्यापेक्षा किती मोठा आणि आकर्षक. मुळात आनंद हा बाह्य गोष्टींवर अवलंबून नसतो. तो आतूनच सतत झुळझुळत रहावा लागतो. ती एक अंत:प्रवृत्ती असते. पण आपल्याकडे दिसते ती स्पर्धा आणि ईर्षा. माझ्या फटाक्यांचा आवाज सगळ्यात मोठा असला पाहिजे वगैरे सारखी.

फटाके सर्वार्थाने वाइटच आहेत. पण मग फटाके बंदीची चर्चा दिवाळीच्या वेळीच का सुरु होते? नव वर्षाचे स्वागत करतांना, धनदांडग्याच्या लग्नांमध्ये, निवडणुकांमध्ये उमेदवार विजयी झाल्यावर निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये, एखाद्या पक्षाला बहुमत मिळाल्यावर पक्ष कार्यालयांसमोर जे फटाके वाजवले जातात त्यावर का आक्षेप घेतला जात नाही. ते फटाके पर्यावरणस्नेही असतात का?
दिवाळीत फटाकेबंदीवर तावातावाने चर्चा करणाऱ्यांपैकी कोणी वर उल्लेख केलेल्या ठिकाणी जाऊन फटाके वाजवु नका असं सांगुन पाहिलं आहे का कधी?

एकाच वेळी खूप लोकं फटाके वाजवू लागले की हवा जास्त प्रदूषित होते.
मोजकेच वाजले तर डायल्यूशन व्हायला स्कोप राहतो. तिथून पळ काढता येतो. दिवाळीत कुठे पळायचे हेच कळत नाही.

अगदीच सहमत
मिरवणूक, लग्न अक्षरशः गल्लोगल्ली घरोघरी नसतात
अगदी आपल्या घरावरून जात असेल तर गोष्ट वेगळी
पण निदान तुम्ही तो काळ मित्राकडे, नातेवाईकांकडे जाऊन थांबू शकता
दिवाळी ला कुठल्याही गावाला गेलं तरी जवळपास हीच परिस्थिती
अक्षरशः घुसमटून टाकणारी दिवाळी असते ही

आशुचँपच्या पोस्टवरून अनेक वर्षांपूर्वी गणपतीच्या १० दिवसांत संध्याकाळपासून गावाबाहेर हॉस्टेलवर रहाणार्या मित्राच्या रूमवर जाऊन पडीक असण्याचे दिवस आठवले.

आम्हीही जायचो, माझ्या लहानपणी आम्ही लक्ष्मी रोड वर राहायचो, कुंटे चौकात
मिरवणूक जाताना खिडक्या, भांडी हादरत असायची
त्या वेळी गुलालाला पण मर्यादा नव्हती
घरात लोट यायचे, खकणा येईपर्यंत
आणि मिरवणूक बघायला म्हणून लोकं ओळख काढून काढून घरी येऊन बसायची रात्रभर
आई वडील अक्षरशः टेकीला यायचे या सगळया प्रकारत
नंतर मग आम्ही गणपती आले की घराला कुलूप लावून कोल्हापूर ला पळायचो
थोडा वेळ मिरवणूक बघणे वेगळी गोष्ट आणि 20 25 तास ती सहन करणे ही वेगळी

आणि मिरवणूक बघायला म्हणून लोकं ओळख काढून काढून घरी येऊन बसायची रात्रभर
आई वडील अक्षरशः टेकीला यायचे या सगळया प्रकारत>> आमचे घर पण नदीच्या टोकावर त्यामुले हाच त्रास होता. नातेवाइक व लोक येउन राहात झोपायला जागा मिळायची नाही आपल्याच घरात. परत उगीच मॉरल पोलिसिन्ग. आईला सर्वांसाठी जेवण करावे लागे. आवाजाचा त्रास तर भयानकच.

माझी दिवाळी म्हणजे एक पणती एक रंगीत काड्यापेटी व एक फुलबाजेचा डब्बा. कडू तेलाच्या पणत्या वापरता येतात.

आता ही आयडी शिळे प्रेत किंवा कुजलेले प्रेत अशी हवी. टाइम हॅज पास्ड.

कानठळ्या बसणारे आवाज आणि कारखान्यात लहान मुलांना राबवून त्यांच्याकडून फटाके बनवून घेणे, या गोष्टी सोडल्या तर मला फटाके आवडतात. मग ते दिवाळीनिमित्त असोत, नवीन वर्षांसाठी असोत किंवा इतर कधी.

अमा कडू तेल म्हणजे???

लहानपणी या गोष्टींची मजा वाटायची पण हळूहळू ती मजा कमी होत गेली.. आमच्यावेळी शाळेत सर्व विद्यार्थ्याकडून प्रतिज्ञा बोलवून घेत जात असायची की पर्यावरणाला त्रास होईल असे फटाके वाजवणार नाही.
एक फीडर म्हणून या फटाक्यांचा त्रास जास्तच होतो
फटाक्यांच्या आवाजाला घाबरून प्राणी गाड्यांखाली किंवा इतर ठिकाणी लपून बसतात, त्यांना शोधून, शांत करून मग खायला द्यावे लागते.
काही उनाड मुले प्राण्यांच्या कानाजवळ तर कधी अंगावर सुध्दा फटाके उडवतात..
यावर्षी ठरवलं आहे अस कोण उपद्व्याप करणारं दिसलं की सरळ पोलीस तक्रार करणार.
(सॉरी विषयाला धरून ही कमेंट नाही पण राहवले नाही म्हणून लिहिले)

काय ठरलंय मग?
दिवे लावायचेत की नाही? (आजवर काय दिवे लावलेत ते सोडा)
फटाके वाजवायचेत की नाही?
अ‍ॅमेझॉन वरुन टी लाईट मेण कॅन्डल मागवल्यात. १००. त्या जाळायच्या का नाही?
चकल्या-करंज्या-शंपा तळायच्या की नाहीत?
रांगोळी काढायची की नाही?
व्हॉअ‍ॅ वर शुभ दिवाळीचे मेसेज न बघता डीलीट करायचे की नाही?
कंदील-लाइटींग लावुन वीज जाळायची की नाही?
नवीन कपडे घ्यायचे की नाहीत? (मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल स्वीकारलेल्यांसाठी)

Submitted by सस्मित on 9 November, 2020 - 15:49 >>थोडक्यात जगायचे का नाही? Happy तो मराठी शब्दाचा धागा पाहुन वाटले आता बोलायला पण बन्दी की काय? Happy

Pages