मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.
आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !
Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात कि एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२ पटीने जास्त असतो. फटाका ०.३ ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!
मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.
चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.
दारासमोर छोटीशी रांगोळी
दारासमोर छोटीशी रांगोळी काढायची असेल तर तितकेसे प्रदूषण होणार नाही. पण अलीकडे इथे विक्रमी वजनाच्या रांगोळ्या काढण्याची लाट आली आहे. पाचशे किलो, हजार किलोंच्या रांगोळ्या काढतात. रस्ते सफाई कामगार इतकी रांगोळी उचलत नाहीत कचऱ्यात. मग ती लोकांच्या पायांनी इकडेतिकडे पसरते आणि शेवटी पर्जन्य वाहिन्यांमध्ये जाऊन बसते.
दारासमोर छोटीशी रांगोळी
दारासमोर छोटीशी रांगोळी काढायची असेल तर तितकेसे प्रदूषण होणार नाही. पण अलीकडे इथे विक्रमी वजनाच्या रांगोळ्या काढण्याची लाट आली आहे. पाचशे किलो, हजार किलोंच्या रांगोळ्या काढतात. रस्ते सफाई कामगार इतकी रांगोळी उचलत नाहीत कचऱ्यात. मग ती लोकांच्या पायांनी इकडेतिकडे पसरते आणि शेवटी पर्जन्य वाहिन्यांमध्ये जाऊन बसते.
पाचशे किलो, हजार किलोंच्या
पाचशे किलो, हजार किलोंच्या रांगोळ्या काढतात.
>>>>
किलोत काय मोजतात... चि बिर्याणीसारखे
स्क्वेअर फूटात मोजा ना
प्रेत सिंथेटिक आहे की ऋन्मेशी
प्रेत सिंथेटिक आहे की ऋन्मेशी? Wink
Submitted by Filmy on 6 November, 2020 - 22:33
>>>>
ये डायलॉग सिरीअसली है या फिल्मी
रांगोळीचे रंगही हानिकारक
रांगोळीचे रंगही हानिकारक असतात म्हणे.फक्त ते तोंडाला फासत नसल्याने त्यातल्या केमिकल्सचा फारसा गवगवा होत नाही.
पीठ रांगोळीसाठी फुकट घालवणे अन्नाची नासाडी नाही का? लोक तुम्हाला माजलेले समजतील
पीठ रांगोळीसाठी फुकट घालवणे
पीठ रांगोळीसाठी फुकट घालवणे अन्नाची नासाडी नाही का? >> ते पीठ मुंग्या खातात त्यामुळे नासाडी कसली
(दिखाऊ पर्यावरणप्रेमी) लोक
(दिखाऊ पर्यावरणप्रेमी) लोक त्यांच्या स्वत:च्या श्वासाला (रादर उस्श्वासाला) सोडलं तर सगळ्याला नावं ठेवतात. आपल्याला आनंद होईल आणि दुसर्याला त्रास होणार नाही इतपत मजा करावी.
थोडी नासाडी झाली की लगेच कुपोषित डोळ्यासमोर यायची काही गरज नाही. आनंदी राहण्याची ही किंमत असतेच.
रांगोळी फुलांची/पाकळ्यांची
रांगोळी फुलांची/पाकळ्यांची काढली असती पण चांगली शेतजमीन,पाणी इत्यादी अन्न उत्पादनाऐवजी फुलांसाठी वापरणे किंवा पडीक जमिनीवरची बायो डायव्हर्सिटी कमी करणे हेदेखील चूकच ना?
व्यत्यय (होप तुम्ही सैतानाचे
व्यत्यय
(होप तुम्ही सैतानाचे वकिलपत्र घेऊन लिहिताय)
(No subject)
थोडी नासाडी झाली की लगेच
थोडी नासाडी झाली की लगेच कुपोषित डोळ्यासमोर यायची काही गरज नाही. आनंदी राहण्याची ही किंमत असतेच. >>खरंय. खाजगी, बाजार समित्या, FCI, सरकारी आणि रेल्वेच्या गोदामात वर्षानुवर्षे, १०००-२००० रुपड्याच्या लाचेसाठी पोलिसांनी अडकवून ठेवलेल्या ट्रकमध्ये आठवडा आठावडा सडणारा माल - ह्या लाखो टन नासाडीचा हिशोब कोणी पाहिला आहे? ही नासाडी थांबवली तरी भारतभर लाखो परिवार पोसतील.
पुन्हा सडलेला माल, प्रदुषण, रोगराई पसरवतो ते वेगळेच.
जाओ पहले ऊस आदमी की साईन ले
जाओ पहले ऊस आदमी की साईन ले के आओ
असे करायची गरज नाही.
बरेचदा प्रामाणिकपणे आपल्या मनाला कळते काय नासाडी आहे आणि काय नाही.
आपण पोरांना बागेत घेऊन जातो. त्यांना फुले पाने तोडायचा मोह आवरत नाही. आपण त्यांना ओरडतो. योग्यच करतो.
पण मग आपणच फुले तोडतो आणि हारतुरे बनवत देवाच्या चरणी अर्पण करतो.
एखाद्या आस्तिकाला वाटेल, देवाच्या चरणी गेली पवित्र झाली.
एखाद्या नास्तिकाला तो फुलांचा बळी वाटेल.
शेवटी एखाद्या गोष्टीकडे बघण्याच्या आपल्या दृष्टीकोनावर आहे.
आपले आयुष्य आपल्या नजरेतून बघावे. लोकं जज करून बोलतात त्यांच्याकडे का लक्ष द्यावे.
दिवाळीला शेव, करंज्या
दिवाळीला शेव, करंज्या तळल्याने पण पर्यावरणाची हानी होऊ शकते का?
आपली लोकसंख्याच इतकी बेसुमार
आपली लोकसंख्याच इतकी बेसुमार वाढली आहे की काहीही केलं तरी प्रदूषण होणारच
एक गणपती मूर्ती प्रवाहात सोडली तर मेबी काही होणार नाही
पण जेव्हा हजारो लोकं टनावरी मुर्त्या पाण्यात सोडतात तेव्हा अपरिमित प्रदूषण होणारच
रोज ट्राफिक मध्ये जात येता गाड्यांचा धूर आपण फुफुसात घेतोच पण म्हणून विषारी धुराने भरलेल्या खोलीत बसून राहणार नाही
जेव्हा एकदम उद्रेक होतो कुठल्याही गोष्टीचा तेव्हा त्यावर टीका होणारच आणि हा उद्रेक आपल्या सो कोल्ड गोंडस परंपरा, संस्कृती च्या आवरणाखाली माथी मारायचा प्रयत्न झाला तर चिडचिड होणारच
दिवाळीला शेव, करंज्या
दिवाळीला शेव, करंज्या तळल्याने पण पर्यावरणाची हानी होऊ शकते का?
>>>
जोपर्यंत त्या करपत नाहीत तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. बस्स जाळू नका. खुशखुशीत करा, खा, आणि खाऊ घाला
समुद्राला भरती असते तेव्हा
समुद्राला भरती असते तेव्हा त्या चकल्या शेव करंजी तळल्या तर म्हणे तेल कमी लागते / प्रदूषण कमी होते
आशुचॅम्प +११११
आशुचॅम्प +११११
भरमसाठ शहरीकरणामुळे एकाच ठिकाणी आणि थोड्या जागेत मानवी व्यवहाराचे केंद्रीकरण झाले आहे. ह्या अजस्र व्यवहाराचे बाय प्रॉडक्टस आणि टाकाऊ उत्पादने रिचवून घेण्यास त्या थोडक्या अवकाशाचे पर्यावरण अक्षम, असमर्थ असते. म्हणून ते प्रदूषित होते. म्हणून शहरी नागरिकांनी सण उत्सव लग्न कार्ये, रांगोळ्या सजावट करताना पर्यावरण रक्षणासाठी वस्तू वापरावर स्वमर्यादा घालून घेतली पाहिजे.
मोठमोठ्या रांगोळ्यांचे अभिमान
मोठमोठ्या रांगोळ्यांचे अभिमान माप त्यात किती किलो रांगोळी वापरली गेली ह्यावर ठरते. आणि रांगोळी ही दगड पूड आहे. कुणी एखाद्याने अंगण सारवल्यावर रांगोळीची चार बोटे, गोपद्मे, चंद्रसूर्य, सांकेतिक विठ्ठल रखुमाई चितारणे वेगळे आणि अंगणभर एक सेंटिमीटर जाडीचा दगड पूड थर ओतणे वेगळे. सांकेतिक दशावतार फार छान वाटतात पाहायला. नुसते कासवसुद्धा आडव्या उभ्या ओळींनी दोन मिनिटांत रेखाटता येते.
शिवाय पीठ हे काही काळाने
शिवाय पीठ हे काही काळाने विघटित होऊ शकते. पण तरीही दोन तीनशे किलो पीठ रस्त्यावर ओतणे हे चुकीचेच आहे.
हौसेवर स्वमर्यादा असावी.
अगदी खरं आहे हीरा.
अगदी खरं आहे हीरा.
आता काही वर्षांपूर्वी ते चीन वाले आकाशदिवे आले होते.त्याच्या आता वाट पेटवून मग हवा गरम झाली की ते उडायचे.ते उडताना भारी वाटायचं पण नंतर सगळीकडे कागद दिसायचे फाटलेले.आता फटाके सिझन मध्ये पण असेच सगळीकडे लाल लवंगी फटाक्यांचे कागद, भुईचक्र आणि अनार चा कचरा असेल.भुईचक्र चालवून जमिनीवर पडलेले पांढरे डाग असतील.
सर्व सणांना (इरिस्पेक्टइव्ह ऑफ धर्म) हा कचऱ्याचा नंतरचा वारसा आहे.
एकंदरच सर्व लहान प्रमाणात, किंवा मोठ्या प्रमाणात व्हायचे असेल तर एका जागेवर साजरे व्हावे.स्वच्छ करायला नंतर सोपे पडावे.
फक्त पाने आणि फुले घेऊन
फक्त पाने आणि फुले घेऊन सजवावे
प्रत्येकाने पानाफुलांची सजावट
प्रत्येकाने पानाफुलांची सजावट केली तरी त्यातुन निसर्गाची हानी हानी होणारच आहे.
<< सर्व सणांना
<< सर्व सणांना (इरिस्पेक्टइव्ह ऑफ धर्म) हा कचऱ्याचा नंतरचा वारसा आहे. >>
कैच्या कै, भारतात कचरा व्हायला सणाची वाट बघावी लागत नाही.
सणासुदिनानिमित्त घरीदारी,
सणासुदिनानिमित्त घरीदारी, रस्त्यावर, आसपास साफसफाई करून परिसर स्वच्छ ठेवता आला तर इतर सजावटींची जरूरच उरणार नाही. पताका नकोत, रांगोळ्या नकोत आणि ते भलेमोठे वर्षभर लोंबकळत राहाणारे सदिच्छा दिवेही नकोत.
उबो, खरं आहे.पण सणवार लग्न
उबो, खरं आहे.पण सणवार लग्न सराई ही स्पेशल केस
स्वच्छता हाच खरा दागिना
स्वच्छता हाच खरा दागिना
धन्यवाद हीरा जी, आशुचँप जी,
धन्यवाद हीरा जी, आशुचँप जी, अनु ताई.
कशाला वाचवायच्यात मधमाश्या पण
कशाला वाचवायच्यात मधमाश्या पण ?
प्राण्यांना मारायचे नाही असे कोणाला वाटत नाही, मग ह्या कोण लागून गेल्यात ? चिकन मटण तशीच मधमाशी. मरो.
सध्या मेणबत्तीचे मेण हे
सध्या मेणबत्तीचे मेण हे मधमाशांपासून तयार होत नाही. ते क्रूड तेलापासून मिळते. खरे तर खनिज तेल हे मुख्यत: कार्यक्षम इंधनासाठी कच्चा माल म्हणून वापरले जाते. पण त्यावर प्रक्रिया करताना वेगवेगळी हायड्रोकार्बनस वेगवेगळ्या तापमानाला मिळविता येतात. ह्यांची इंधन म्हणून कार्यक्षमता कमी असली तरी ती वंगण वगैरे इतर उपयोगांसाठी वापरात आणली जातात. मेण, डांबर, प्लास्टिक ही द्रव्ये मुख्य इंधन मिळवून झाल्यावर किंवा ती मिळवताना निघालेली बाय प्रॉडक्टस आणि रेसिड्यू असतो. (काहींच्या बाबतीत थोडी जरा वेगळी प्रक्रिया करून.) जर टाकून देण्याऐवजी ह्यांचा वापर झाला उदा. डांबर तर पर्यावरणावरचा भार हलका होतो. मेणाचा वापर करणे हे ह्या प्रकारात मोडते. आज paraffin wax सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये , मेणबत्त्या मध्ये वापरले जाते ते एका अर्थी चांगलेच आहे.
मेण जाळून प्रदूषण होते तसे ते तेलातुपाचे दिवे जाळूनही होतेच.
गेल्यावर्षी हा प्रयोग केला
गेल्यावर्षी हा प्रयोग केला होता.. नाही जमली रांगोळी.. दूसरा काही ॲाप्शन आहे का?
>>
एखाद्या मोठ्या ताटलीमध्ये , तांदूळ विविध रंगांच्या डाळी किंवा कडधान्य याचा वापर करून छान रांगोळी काढता येऊ शकते .
नंतर त्याची खिचडी करून टाकायचे
Zero waste.
Hira हिरा सर्व पोस्ट उत्तम आहेत
Pages