प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस. 

Submitted by ताजे प्रेत on 6 November, 2020 - 06:14

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. 

आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !

Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात  कि   एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२  पटीने जास्त असतो. फटाका ०.३  ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!

मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज  लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्‍या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.

चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.

Group content visibility: 
Use group defaults

पूर्वी, म्हणजे शंभर-दीडशे वर्षांपूर्वी मेण हे प्राणिज होते, पण आता ते कुठे मिळत नाही. आपण वापरतो ते मेण खनिज तेलापासून वेगळ्या केलेल्या एका घटकापासून बनते. अर्थात त्यानेही पर्यावरणाची हानी होतेच.

ते म्हणतयात ना 137.48 मधमाश्यांना मारावे लागते एका मेणबत्ती साठी मग का विरोध करताय
मला फक्त ही पॉईंट 48 ची भानगड कळली नाही
48 टक्के मरते का 138 वी मधमाशी?

बहुतेक मेणबत्त्यां पॅराफिन मेणापासून बनवतात. म्हणजे शेवटी त्या खनिज तेलापासून बनतात. तेव्हा पर्यावरण ऱ्हास हा आलाच.

सगळ्याच सणांंमध्ये कालानुरूप बदल करून पर्यावरण जपणे आणि प्रदूषण टाळणे / कमीतकमी करणे हे गरजेचे आहे.

यात "जाओ पहले उस आदमी की साइन ले के आओ" न करता सगळ्यांनी सहभाग द्यावा, तेच मानवजातीच्या हिताचे आहे.

छे छे असं कसं चालेल
आम्ही तर सुधारणार नाहीच
पण आम्हाला सुधारायला जाल तर आमच्या धर्मावर तो हल्ला आहे असे मानू
भले आजारी पडून मरू पण धर्म टिकला पाहिजे

प्रेताची प्रेरणा>>>>>>
कॉपी पेस्ट च करायचं होतं तर लेखकाचे नाव कॉपी करायला अडचण होती का प्रेतराव
का तुमच्या दुनियेत कॉपी राईट वगैरे गोष्टी नसतात?

सद्ध्या मेणबत्त्या खनीज तेलापासुनच मिळतात अगदी दिवाळी साठी सुद्धा ९०% लोक तेला ऐवजी मेणबत्ती (आकार वेगळा - दिव्यात बसणारा) वापरुनच दिवे लावतात. तेलाच्या दिव्यातुन फरशीवर डाग पडतात आणि त्यासाठी महागड्या पणत्या आणाव्या लागतात त्यापेक्षा या मेणबत्त्या वापरणे आर्थिक बाबीने परवडते. मग आता दिवाळीसाठी पण वापरायच्या नाहीत का...?

दिवाळी असो की ख्रिसमस सर्वांनी इलेक्ट्रिकल दिवे वापरावेत का..? कि सरळ प्रिंट आउट लावावी..?? या पर्यायांमुळेही प्रदुषण होणं थांबणार का..??

मला यावर एक धागा डोक्यात आलाय
गेले काही दिवस मी फेसबुकवर लोकांना विचारतोय पण कोणी उत्तर देईना
मायबोली वर बरेच माहितगार आहेत

ह्यांना ख्रिस्मसच्या मेणबत्त्यांआधी आधी येणार्‍या दिवाळीतल्या फटाकयांची आठवण झाली नाही का? का?
आजकाल सगळेच धागे क्लिकबेट असतात.

दिवाळी असो की ख्रिसमस सर्वांनी इलेक्ट्रिकल दिवे वापरावेत का..? >> ते देखील कशाला करायचं .. नाही तरी पूर्वी जेव्हा वीज नव्हती तेव्हा निदान सणाच्या दिवशी तरी अंधार नको याचं विचाराने दिवे,पणत्या लावणे सुरू झाले असावे.. आता तर घरात वीजदेखिल आहे.. फक्त रांगोळ्या काढलं तरी होतोय की सण साजरा Happy

ते काही महिन्यांपूर्वी करोनाशी युद्ध म्हणून मेणबत्त्या पेटवल्या होत्या तेव्हा हे मधमाश्या, प्रदूषण वगैरे मुद्द्यांचा सोईस्कर विसर पडला होता का?

मेणबत्त्या गरीब वाड्यांवर वाटल्या तर पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही का? तिथेही वीज पोचावी म्हणून प्रयत्न करायचे सोडून मेणबत्त्या वाटायच्या? कशासाठी ? आपलीच पाठ थोपटायला? मेणबत्ती जळून गेली की ते पुन्हा अंधारात , त्यापेक्षा त्यांना ते हाताने फिरवायचे कंदिल, सौर कंदिल असे काही वाटावे.

ह्यांना ख्रिस्मसच्या मेणबत्त्यांआधी आधी येणार्‍या दिवाळीतल्या फटाकयांची आठवण झाली नाही का? का?>>>>>
त्यावरच हा धागा आहे
फक्त नाव न घेता तीर मारण्याचा एक सुमार प्रयत्न

मेणबत्ती जळून गेली की ते पुन्हा अंधारात , त्यापेक्षा त्यांना ते हाताने फिरवायचे कंदिल, सौर कंदिल असे काही वाटावे >> हो आणि फक्त ते चायना मेड नसावेत Happy

अवांतर
मानव, हा स्माईली कसा टाकायचा?

वरची स्मायली डाऊनलोड करा पीसीवर. माबोवर खाजगी जागेत अपलोड करा. आणि ज्याप्रमाणे फोटो देतो इथे तशी ही स्मायली द्यायची.

ही एक पद्धत. अजूनही वेगळी पद्धत आहे डाउनलोड अपलोड न करता, मी अजून तसे करून नाही पाहिले.

मला वाटते भारतासारख्या कृषिप्रधान देशात आपण मेणबत्त्या ऐवजी इको फ्रेंडली शेणबत्त्या वापराव्यात. त्यातून ग्रामीण भागात अनेक माणसांना, आणि गायींना देखील, रोजगार मिळेल. शिवाय पर्यावरणाची हानी देखील होणार नाही Happy

ह्यांना ख्रिस्मसच्या मेणबत्त्यांआधी आधी येणार्‍या दिवाळीतल्या फटाकयांची आठवण झाली नाही का? का?
Submitted by हायझेनबर्ग on 6 November, 2020 - 20:29

>>>>>

फटाक्यांसंदर्भात माझा हा धागा होता.
फटाके वाजवण्याच्या वेळेसंदर्भात काही कायदा आहे का?
https://www.maayboli.com/node/51337

होळीला / रंगपचमीला होणार्‍या पाण्याच्या नासाडीबद्दलही धागा होता दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर होता
यंदा रंगपंचमी / धूलीवंदनला पाण्याची नासाडी करावी का?
https://www.maayboli.com/node/58107

त्यावर एक पोलही काढावा लागला होता
होळी / रंगपंचमी - पोल
https://www.maayboli.com/node/58123

आपण आपली मते ईथे नोंदवू शकता Happy

फटाके वाजवण्याच्या वेळेसंदर्भात काही कायदा आहे का? >> हा धागा फटाके वाजवण्याच्या वेळेसंदर्भात आहे. प्रदूषणाबद्दल काही लिहीलेलं दिसत नाहीए.

अलीकडच्या मोठमोठ्या रांगोळ्यांमुळे नक्कीच नुकसान होते. रस्त्यांवर शंभर दोनशे किलो दगडपूड ओतली तर काय होईल? ती पूड स्टॉर्म वॉटर ड्रेन मध्ये जाईल. त्यातले रंग हवेत पसरतील. ही पूड जड असते. पर्जन्य वाहिन्यांमध्ये तळाला साचून राहते. पटकन वाहून जात नाही. साध्या पिठाच्या रांगोळ्या काढाव्यात. रंगांचे अति जाड थर देऊ नयेत.

साध्या पिठाच्या रांगोळ्या काढाव्यात>> गेल्यावर्षी हा प्रयोग केला होता.. नाही जमली रांगोळी.. दूसरा काही ॲाप्शन आहे का?

IMG-20190823-WA0069.jpgIMG-20190823-WA0069.jpgIMG-20190823-WA0069.jpg

तुमचीच लिंक वापरून फक्त साईज कमी जास्त केली

Pages