ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

Submitted by अदित्य श्रीपद on 17 October, 2020 - 11:12
oskar groening

ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली.
ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हणून थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतल्या नाझी राजवटीने जर्मनी तसेच त्यानी पादाक्रांत केलेल्या प्रदेशातील ज्यू धर्मीयांची ‘विल्हेवाट’ लावण्यासाठी अनेक छळछावण्या उभारल्या होत्या.जर्मनीतील तसेच सर्व जगातील ज्यू धर्मियांचे भवितव्य त्यानी ठरवून टाकले होते त्याला त्यांनी अंतिम तोडगा (Final solution) असे वरकरणी निरुपद्रवी वाटणारे नाव दिले होते. ह्या छळछावण्यात सर्व युरोपातून पकडलेले (मुख्यत्वे करून) ज्यू तसेच विरोधक, युद्धकैदी सैनिक आणले जात. त्यांच्या कडून मरेस्तो(शब्दशः) काम करून घेतले जात असे आणि जे आजारी,अशक्त, वृद्ध किंवा लहान असतील त्यांना मारून टाकले जाई. १९४० ते १९४५ ह्या कालावधीत नाझी राजवटीने अशा छळछावण्यातून सुमारे ६० लाख ज्यू मारले. ह्या हत्याक्न्डत जवळ जवळ युरोपातील दोन तृतीयांश ज्यूंची आहुती पडली. ह्या छळछावण्यापैकी सगळ्यात कुप्रसिद्ध म्हणजे ऑश्वित्झ-पोलंड इथली छळ छावणी. इथे साधारण ११ लाख ज्यु लोकाना मारून टाकले गेले. ऑश्वित्झ-पोलंड इथली छळ छावणी हा खरेतर ४० लहान मोठ्या छळ छावण्यांचा समूह होता. आय जी फार्बेन सारख्या कंपन्याकरता गुलाम म्हणून काम करणाऱ्या ज्यू लोकांचे इथे खास वेगळे तळ उभारले गेले होते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तर उपरोल्लेखित ऑस्कर ग्रोएनिन्ग ह्या ऑश्वित्झ छळ छावणीत साधा शिपाईगडी होता. त्याचे मुख्य काम, छळछावणीत आणलेल्या कैद्यांचे कपडे पैसे दागिने इतर मौल्यवान चीज वस्तू जे काढून घेतले जात असे त्याची वर्गवारी करून नोंद करणे हे होते. क्वचित प्रसंगी तो मुख्य प्रवेशद्वाराशी जे कैदी आणले जात, त्यांची कामाकरता आणि लगेच मारून टाकण्याकरता, वैद्यकीय प्रयोग करण्याकरता अशी विभागणी केली जात असे तेथे रखवालीचे कामही करत असे. ऑस्कर ग्रोएनिन्गने ऑश्वित्झ छळ छावणीत १९४२ ते १९४४ अशी नोकरी केली. ह्या काळात ऑश्वित्झ छळ छावणीत साधारण ११ लाख ज्यू आणि इतर कैदी मारले गेले. साधारण ३ लाख लोकांच्या मृत्यू वेळी तो मुख्य प्रवेशद्वाराशी ड्युटीवर तैनात होता. पुढे त्याला ह्या सगळ्याचा उबग आल्याने( त्याच्या म्हणण्याप्रमाणे) त्याने अर्ज विनंत्या करून बदली मागून घेतली आणि त्याचे रवानगी फ्रांस बेल्जियन सीमेवरील आर्देन्स आघाडीवर झाली. त्याने जर्मनांची शेवटची निकराची चढाई Battle of the Bulge मध्ये भाग घेतला.लढाईत तो जखमी झाला आणि आघाडीवरील इस्पितळात उपचार घेत असतानाच त्याला ब्रिटीशानी कैद केले.युद्ध संपल्यावर १९४७ साली त्याची मुक्तता झाली. आणि तो आपल्या सासुरवाडीला म्हणजे ल्युनेन्बर्ग इथे आला. पुढची ७० वर्षे तो तेथेच राहिला. येथील एका काच काखान्यात त्याने नोकरी केली आणि बढत्या घेत घेत निवृत्तीवेळी तो त्या कंपनीत मानव संसाधन विभागाचा प्रमुख होता. निवृत्तीनंतर त्याने काही काळ औद्योगिक लवाद विभागात न्यायाधीश म्हणून काम पहिले. हि सत्तर वर्षे त्याने एक सर्वसाधारण कुटुंबवत्सल जर्मन म्हणून काढली.त्याने स्वत:ची ओळख लपवण्याचा किंवा बदलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि हे साहजिकही होते त्याने स्वत: कधी कुणा ज्यूला गोळी किंवा विष घातले नाही कि ग्यास चेंबर मध्ये कोंडले नाही की तसे करण्याच्या आदेशावर सही केली नाही , त्याला तसे आणि तेवढे अधिकारच नव्हते. अर्थात तो आपल्या ऑश्वित्झ छळ छावणीतल्या दिवसाबद्दल फारसे बोलत नसे.
ह्या ऑस्करला पोस्टाची तिकीटं गोळा करायचा छंद होता आणि त्यानिमित्ताने फिलेटली ह्या हौशी तिकीट संग्रहाकाच्या संस्थेच्या वार्षिक मेळाव्यात त्याची ओळख एका अशाच हौशी तिकीट संग्रहाकाशी झाली जो ज्यूंचे हत्याकांड झालेच नाही असे मानणाऱ्या एका जर्मन लोकांच्या संघटनेचा- Holocaust denier group सदस्य होता. त्याची मुक्ताफळे ऐकून ओ बराच व्यथित झाला आणि त्याने Holocaust denier groupच्या प्रमुख नेत्याला म्हणजे थ्रिस ख्रिस्तोफर्सनला त्यांचेच एक पत्रक पाठवले आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले
I saw everything,The gas chambers, the cremations, the selection process. One and a half million Jews were murdered in Auschwitz. I was there.”
मी ते सगळे (स्वत:)) पहिले आहे, विषारी वायूच्या खोल्या, प्रेते जाळण्याच्या भट्ट्या, (मुख्य प्रवेशद्वाराशी) ज्युना मारून टाकण्यासाठी वेगळे केले जात असे तो प्रकार, ऑश्वित्झ छळ छावणीत पंधरा लाख ज्यू अशा प्रकार मारून टाकले गेले आणि मी त्यावेळी तिथे होतो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तो नक्की कोण होता हे नीट माहित नसल्यानेअसेल पण संघटनेच्या अनेक सदस्यांनी त्याला पत्र लिहून फोन करून तो चूक कसा आहे हे समजावण्याचा सपाटा लावला ह्यामुळे तो अजूनच बिथरला. त्याने आपल्या ऑश्वित्झ छळ छावणीतल्या आठवणी सांगणारे ८०-८५ पानांचे एक छोटेखानी पुस्तकच लिहून काढले.२००९ साली त्याने BBC ला एक मुलाखत देखिल दिली. एकंदरीत युद्धोत्तर जर्मनीत ऑस्कर ग्रोएनिन्ग हा नाझी राजवटीने ज्यु लोकांवर केलेल्या अनन्वित छळ आणि कात्तलीन्बद्दल खुलेआम पणे बोलणारा पहिला माजी-नाझी एसेस सदस्य असावा.
ऑस्कर ग्रोएनिन्ग ह्या मुलाखतीत आणि त्याच्या छोटेखानी पुस्तिकेत बोलताना लिहिताना जे घडले जसे घडले (अर्थात त्याने जेवढे पहिले) त्याबद्दल त्याबद्दल कुठलाही आड पडदा न ठेवता बोलतो क्वचित त्याबद्दल खेद देखिल व्यक्त करतो. पण एक जाणवते कि तो स्वत: ह्य सगळ्या घटनांकडे एक त्रयस्थ म्हणून केवळ मूक दर्शक बनून पाहत होता अशी काहीशी त्याची भूमिका असावी. कदाचित झाल्या अपराधांची जबाबदारी मनावरून झटकण्याची त्याची हि पद्धत असावी किंवा ऑश्वित्झ छळ छावणीतला ऑस्कर हा कुणी वेगळाच माणूस होता, आता मात्र आपण अंतर्बाह्य बदललेलो आहे असे त्याने आपल्या मनाला समजावले असावे, शिवाय स्वत:ची ओळख लपवली नसली तरी तो २००९ सालापर्यंत म्हणजे ६०-६२ वर्षे ह्या विषयी गप्पच होता. कदाचित आता इतक्या वर्षानंतर आपण तोंड उघडले तरी वयाच्या ८८-८९व्या वर्षी कोण काय करणार? इतकी वर्षे मनावर बाळगलेले ओझे काही प्रमाणात ह्या निमित्ताने कमी होईल असेही त्याला वाटत असावे खरे काय ते कळायला मार्ग नाही.
पण २०१४ साली जर्मनीत त्याच्यावर सरकार तर्फे खटला भरला गेला. ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला.त्यावेळी तो ९३ वर्षे वयाचा झाला होता.साहजिकच जर्मनीत ह्याचा मोठा गवगवा झाला. लोकांचे दोन गट पडले. ९३ वर्षे वयाच्या जर्जर म्हाताऱ्याला काय शिक्षा करणार? त्यातून तो तर एक साधा एसेस शिपाई गडी कुणी मोठा तालेवार आणि क्क्रूर नाझी अधिकारी, नेता नाही त्याने कधीही ज्यू वरच्या झालेल्या अत्याचारांचे समर्थन केले नाही. उलट उघडपणे जे घडले ते सांगणारा, मान्य करणारा पहिला नाझी ( माजी ) असे एका गटाचे म्हणणे होते तर दुसर्या गटाचे म्हणणे न्यायाचा वयाशी काय संबंध? लहान मुलं, गरोदर बायका, जख्ख गलित गात्र म्हातारे ज्यू मारताना नाझी लोकांना कुठे दया येत होती कि ते वय बघत होते. ९३ ९४व्या वर्षी आपल्याला काही होत नाही असे वाटून कोणी मानभावी पणे खेद व्यक्त करत असेल तर त्याला त्याने तरुणपणात केलेल्या गुन्ह्यांबद्दल सरळ सरळ माफी द्यायची? हे चूक आहे त्यातून आम्ही त्याचा बदला घेण्यासाठी सूड उगवण्यासाठी काही बेकायदेशीर कृत्य करत नाही आहोत. रीतसर खटला चालवून कायद्याच्या, न्यायाधीशाच्या हाती निर्णय सोपवत आहोत.”
असो कोर्टात खटला सुरु झाला १४ एप्रिल २०१४ साली आणि त्याने सुरुवातीलाच झाल्या कत्तलीची नैतिक जबाबदारी स्वीकारत ज्यू लोकांची बिनशर्त माफी मागितली. त्याने मान्य केले कि ऑश्वित्झ छळ छावणीत जे काय चालू होते ते सगळे त्याला माहिती होते, दिसत, कळत होते. पण ते थांबवण्यासाठी काही करण्याची इच्छाशक्ती त्याच्याकडे नव्हती आणि त्याने तसा काही प्रयत्नही केला नाही.नाझी राजवटीने उभ्या केलेल्या एका मोठ्या यंत्रणेचा/ मशीनचा तो एक छोटासा भाग होता.त्याकाळातील जर्मनीतल्या द्वेष-प्रचार यंत्रणेला बळी पडलेल्या अनेक तरुणांपैकी तो एक होता आणि म्हणूनच जरी त्याने स्वत: कुणा ज्यूचा जीव घेतला नसली तरी नैतिक दृष्ट्या तो इतर कत्तल करणाऱ्या नाझीइतकाच दोषी आहे आणि कायद्याने त्याला काय शिक्षा द्यायची हे कोर्टाने ठरवावे.
ह्या खटल्यात ऑश्वित्झ छळ छावणीत राहिलेल्या आणि वाचलेल्या पैकी ६० ज्यू साक्षीदारानी साक्षी दिल्या पण कुणीही ऑस्करने इतर कुणा ज्यूला मारल्याचे किंवा त्यांना छळल्याचे सांगितले नाही.
खटला एकूण १६ महिने चालला आणि १५ जुलै२०१५ रोजी ऑस्कर ग्रोएनिन्गला ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याबद्दल दोषी धरत ४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याची पुनर्विचाराची आणि दयेची याचिका जर्मनीच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पण तो इतका वृद्ध आणि जर्जर होता कि त्याला तुरुंगात भरती करणे शक्य नव्हते त्यामुळे तुरुंगाच्या इस्पितळात त्याला ठेवले गेले आणि तेथेच तो वयाच्या ९६ व्या वर्षी झालेल्या शिक्षेपैकी एक हि दिवस शिक्षा न भोगता गेला.
२००५ साली लॉरेन्स रीस नावाच्या ब्रिटीश इतिहास संशोधकाने लिहिलेल्या Auschwitz: The Nazis and 'The Final Solution (ऑश्वित्झ- नाझी लोकांचा अखेरचा तोडगा) ह्या पुस्तकात ऑस्कर ग्रोएनिन्गचा उल्लेख आणि सविस्तर भाष्य आहे. त्याद्वारे ऑस्करच्या मनोवृत्तीवर काहीसा प्रकाश पडतो.
ऑस्करने अर्ज विनंत्या करून ऑस्करने ऑश्वित्झमधून बदली मागून घेतली असली तरी त्यामागे (त्याने अर्जात म्हटल्याप्रमाणे)खरे कारण ज्यूंच्या कत्तली/ अन्याय पाहत राहणे त्याला अशक्य झाल्याने हे कारण नव्हते तर ज्या यातना सहन करत ते मरत होते ते त्याला अमानुष वाटत होते. त्यांना अधिक चांगल्याप्रकारे, कमी त्रास देत मारले जायला हवे होते, छळ सहन करणाऱ्या,तडफडणाऱ्या किंकाळ्या फोडट मरणाऱ्या ज्युना सतत पाहून सैनिकांच्या आणि इतर कर्मचार्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो असे त्याचे म्हणणे होते. थोडक्यात ज्युना मारायला त्याचा विरोध नव्हता. पद्धत अधिक परिष्कृत असायला हवी होती.
ह्या पार्श्वभूमीवर खटल्यात ऑस्करनेच सांगितलेली आठवण मोठी उद्बोधक आहे.रेल्वेने नुकत्याच आणलेल्या ज्युंपैकी एका ज्यू बाईने आपले बाळ एका चामडीच्या पेटीत-(सुटकेसमध्ये) लपवले होते. शिरस्त्याप्रमाणे नवीन आलेल्या ज्यूंचे सामान सगळे वेगळे केल्या मुळे ती पेटी देखिल तिच्याकडून काढून घेतली गेली आणि धक्के लागल्याने आतले बाळ रडू लागले. सामानाच्या ढिगाऱ्यात शोधल्यावर थोड्या वेळाने ती पेटी नाझी अधिकाऱ्याला सापडली. त्याने पायाला धरून ते रडणारे बाळ बाहेर काढले आणि रेल्वेच्या डब्यावर डोके आपटून ते बाळ मारून टाकले. त्यावर पुढे ऑस्कर म्हणतो ते बाळ त्याने अशा प्रकारे मारायला नको होते, अधिक माणुसकीने त्याचा जीव घ्यायला हवा होता. ही आठवण सांगताना ऑस्कर चे वय ९४ वर्षे होते.
एकंदरीत त्याचा होरा (जर तसा तो असेल तर) कि वयाच्या ९३-९४ व्या वर्षी आपल्याला कोण काय शिक्षा करणार! कशी करणार! हा खरा ठरला. एरवी जसा गेली ६५-७० वर्षे शांत राहिला तसा शांतच राहिला असता तर ऑस्कर ग्रोएनिन्गबद्दल कुणाला काही कळले हि नसते. पण अखेरच्या काळात झालेल्या उपरतीमुळे(!) त्याला प्रसिद्धी मिळाली आणि इतिहासाला त्याची दखल घेणे भाग पडले.

-आदित्य

वर दिलेल्या फोटोंमध्ये ऑश्वित्झ छळछावणीच्या प्रवेशद्वाराचा फोटो आहे ज्याच्या कमानीवर Arbeit macht frei (Work sets you free-कामातच खरी मुक्ती आहे!) अशे अक्षरे आहेत तर त्यासंबंधाने एक आठवण

Arbeit macht frei (Work sets you free-कामातच खरी मुक्ती आहे!)

साधारण २००७-८ च्या सुमारास आमची कंपनी Tata motors एक नवी गाडी indica vista बाजारात आणणार होती. त्यावेळी तिच्या वेल्डिंग फिक्स्चर्सचे काम कुका नावाच्या एका जर्मन कंपनीला दिलेले होते. त्यामुळे त्यांची १०-१५ लोकांची एक टीम वेल्डिंग फिक्स्चर्सच्या सेटअप आणि कमिशनिंग करता आली होती. त्यातल्या अनेकांशी माझी खूप दोस्ती झाली होती.त्यापैकी हुईम्हणून एक होता त्याची आणि माझी खास गट्टी जमली होती. त्या सगळ्याच जर्मनांना तोडके मोडके इंग्रजी येई पण त्यातला एक लेन्झ म्हणून होता त्याचे इंग्लिश उत्तम होते आणि तो आमच्यात दुभाषा म्हणून काम करे. तर ह्या हुई च्या laptop एक व्यंग चित्र backgroundला होतं. एका अगदी गरीब गाढवाच्या पाठीवर सामानाचे खूप ओझे आहे अन त्या ओझ्यामुळे ते गाढव अगदी मेटाकुटीला आलय.त्यावर जर्मन भाषेत काहीतरी लिहील होत ते काय आहे असं मी लेन्झ ला विचारलं तर तो म्हणाला ते वाक्य असे आहे कि Work is the best gift that you can give to some one. आता मला जर्मन नीट येत नाही. म्हणजे कॉलेज मध्ये ११ वीत अगदी थोडे शिकलो तेवढेच.पण माझे दुसऱ्या महायुद्धावर थोडेफार वाचलेले असल्याने त्यातल्या एका फोटोत वाचलेले वाक्य Arbeit macht frei हे उच्चारले. त्याचा अर्थ “कामाने तुम्हाला खरी मुक्ती मिळते.” असा आहे . अर्थ जरी सरळ असला तरी ह्या वाक्याचा इतिहास अत्यंत काळा आहे. हे वाक्य जर्मन छळ छावण्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले असे जिथून अनेक अभागी ज्यू लोकांना मरेस्तो काम करवून घेत, तसेच गोळ्या घालून विषारी वायच्या खोल्यात कोंडून मारून टाकले गेले. त्यामुळे हे वाक्य मी उच्चारताच हुई एकदम भडकला आणि माझ्यावर ओरडायला लागला तो का चिडला आणि तो(जर्मन भाषेत) काय म्हणतोय मला कळेना. तेवढ्यात लेन्झ तिथे आला आणि मग त्याला काय घडले हे सांगितल्यावर त्याने समजावून हुई ला शांत केले. नंतर मला तो म्हणाला ते वाक्य तू म्हणायला नको होतेस . आम्ही सगळे जर्मन लोक त्याकाळी जे घडले त्या बाबत खूप शरमिंदा आणि हळवे असतो त्यामुळे तू ते वाक्य म्हणाल्यावर त्याला वाटले कि तू त्याला त्या जर्मनांसारखा वंशवादी समजतोस.
ह्याच indica vistaचे काही चेकिंग फिक्स्चर्स आम्ही एका इंग्लिश कंपनीकडून बनवून घेतले होते आणि ते cmm मशीनवर ठेवून पृविंग करायचे काम चालू होते. त्याकामाकरता इंग्लंड मध्येच जन्माला आलेला हरप्रीत सिंग नावाचा एक पंजाबी आणि स्मिथ नावचा त्याचा सहकारी असे दोघे लोक इंग्लंड वरून आले होते. त्यांच्याशी बोलताना जाणवले कि इंग्लिश मुलांना शाळेत इतिहास शिकवताना वसाहतवादी इंग्लंड बद्दल त्यानी आपल्या वसाहतीत केलेल्या बऱ्या वाईट गोष्टी बद्दल फार सांगत नाहीत. इंग्लंड एक महान वसाहत वादी शक्ती होते आणि भारतासारखे काही देश त्यांच्या वसाहती होत्या तेथे आपण सभ्य,उच्च(!) संस्कृती घेऊन गेलो आणि त्यांना रानटी अवस्थेतून माणसात आणले असे काहीसे सांगतात.
तर मुद्दा असा आहे कि तुमचा इतिहास कसा आहे , त्यात तुमच्या पूर्वजांनी काय चूक किंवा बरोबर केले ह्याबद्दल वास्तविक माहिती नव्या पिढीला सांगितली गेलीच पाहिजे अन्यथा इतिहासापासून धडे कसे घेणार?
मुद्दा साधा आहे पण वाटतो तितका सरळ नाही, सोप्पा तर अजिबातच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे!

आशुचँपशी सहमत. चेक करून बघायचे ठरवले तर भरपूर माहिती आहे. सध्या प्रत्येकाने पूर्ण विरोधी मते असलेले पेपर्स, चॅनेल्स आवर्जून बघायची गरज आहे. टोटल एको चेम्बर्स झालेले आहेत सोशल मीडिया. आणि १००% दोन्ही बाजूनी आहे.

तेव्हा तिथले श्रीमंत व्यापारी ज्यू त्यांना अजून पिळून स्वतःची श्रीमंती वाढवत होते >>> साधना, ज्यू व्यापारीच काय, पण जर्मन वंशाचे व्यापारीही तेच करत होते. जे अन्याय करत होते त्यात सर्व होते. फक्त ज्यू लोकांच्या रूपाने एक बकरा सापडला. लोकांच्या पुढे एकदा असले बकरे उभे केले आणि तो धर्म/जात्/गट स्वतःपेक्षा वेगळा असला, की त्यांना त्याबद्दल खात्री करून घेण्यात इण्टरेस्ट नसतो.

जर्मन साम्राज्य आणि त्यांची राष्ट्रभावना जाणून घेण्यासाठी किमान चार शतके मागे जावे लागेल. आणि ज्यूंचे समाजातले स्थान आणि त्यांच्याविषयीची द्वेष भावना शोधण्यासाठी दोन हजार वर्षे.
शिवाय वंशवाद, दूषित रक्त वगैरेचा सुद्धा विचार करावा लागेल.

फा, तू हा दुसर्या बाजूविषयी सजगता दाखवण्याचा आणी फॅक्ट फाईंडिंग चा मुद्दा इतक्यात बर्याच ठिकाणी मांडला आहेस. तुझ्याशी सहमत आहे. आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडणारी व्यक्ती एकदम शत्रूच वाटू लागणे हे स्वतःसाठीसुद्धा धोक्याची घंटा आहे.

" आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडणारी व्यक्ती एकदम शत्रूच वाटू लागणे हे स्वतःसाठीसुद्धा धोक्याची घंटा आहे"
अगदी अगदी . मर्मवाक्य.

साधना, ज्यू व्यापारीच काय, पण जर्मन वंशाचे व्यापारीही तेच करत होते. जे अन्याय करत होते त्यात सर्व होते. फक्त ज्यू लोकांच्या रूपाने एक बकरा सापडला>>>

हो, असणार.. मी नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचले, त्यात पहिल्यांदा थोडी माहिती मिळाली. ज्यू लोकांना जगभर त्रास का सहन करावा लागला ह्याबद्दल शोध घेण्याचा थोडा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या कर्मठतेबद्दल माहिती मिळाली. आजचे ज्यू असे आहेत का माहिती नाही.

अर्थात ते कसेही असले तरी ज्या प्रकारे त्यांचे शिरकाण केले गेले त्यावरून हे ठरवणारा हिटलर/हिमलर वगैरे लोक किती भयंकर असतील असे वाटत राहते.

गेल्या शतकाच्या पूर्वार्धात सुप्रसिध्द ब्रिटिश लेखक G. K.Chesterton ह्याच्या मतांविषयीचे एक भाष्य:
"The insistence that Chesterton's anti-Semitism needs to be understood "in the context of his time" defines the problem, because his time-from the end of the Great War to the mid-thirties-was the time that led to the extermination of the European Jews. In that context, his jocose stuff is even more sinister than his serious stuff. He claims that he can tolerate Jews in England, but only if they are compelled to wear "Arab" clothing, to show that they are an alien nation. Hitler made a simpler demand for Jewish dress, but the idea was the same. Of course, there were, tragically and ironically, points of contact between Chesterton and Zionism. He went to Jerusalem in 1920 and reported back on what he found among the nascent Zionists, whom he liked: he wanted them out of Europe and so did they; he wanted Jews to be turned from rootless cosmopolitans into rooted yeomen, and so did they.

Chesterton wasn't a fascist, and he certainly wasn't in favor of genocide, but that is about the best that can be said for him-and is surely less of a moral accomplishment than his admirers would like. He did speak out, toward the end of his life, against the persecution in Nazi Germany, writing that he was "appalled by the Hitlerite atrocities," that "they have absolutely no reason or logic behind them," that "I am quite ready to believe now that Belloc and I will die defending the last Jew in Europe." Yet he insisted, "I still think there is a Jewish problem," and he denounced Hitler in the context of a wacky argument that Nazism is really a form of "Prussianism," which is really a form of Judaism; that is, a belief in a chosen, specially exalted people."
इथे प्रशिअनिझ्म चा अर्थ समजून घेण्यासाठी जर्मन, प्रशिअन, ऑस्ट्रियन हंगेरियन इत्यादि साम्राज्ये आणि त्यातला वरचढतेचा भाव समजून घेणे आवश्यक आहे.

आजचे ज्यू असे आहेत का माहिती नाही.>> सर्व धर्मात जसे कर्मठ माणसे असतात तसे ज्यु धर्मात पण आहेत. हासिडिक ज्यु . मला करेक्ट उच्चार माहीत नाही.

नाझी भस्मासुराचा उद यास्त मधील १९३४- १९३५ हे वाचले तर ती टेंप्लेट अगदीच राबवली जाते आहे हे लक्षात येते. द्वीतीय महायुद्धावर मी सांगोपां ग अभ्यास केला आहे. पण ते सर्व एका प्रतिसादात किंवा लेखात लि हिणे केवळ अशक्य. युद्धाची सुरुवात व कारणे प्रथम महायुद्धात
झालेला परा जय वर्साय ट्रीटी पासून सुरू होतात. माझे काही रिसोर्स इथे देते.

नाझी भस्मा सुराचा उदयास्त चे मूळ पुस्तक जास्त चांगले आहे द राइज अँड फॉल ऑफ द थर्ड राइस्ख. ह्याचे ऑडिओ बुक जब रदस्त आहे.
वर्ल्ड वॉर टू इन कलर नेटफ्लिक्स वर आहे.

वर्ल्ड वॉर टू स्पेशल इवेंट्स नेट फ्लिक्स
विकिपीडिआ. अजूनही आहेत ती पुस्तके फोन वर आहेत बघुन लिहीते. हा अगदी महान सब्जेक्ट आहे. त्यातले ज्युंवरचे अत्याचार मात्र वाचवत नाहीत. आपल्या पेक्षा वेगळे म्हणजे वाइट. व त्याचा समूळ नाश केला पाहिजे ही चुकीची विचार सरणी पद्धतशीर पण व यशस्वीरीत्या राबवली जाउ शकते ह्याचे वाइट उदाहरण डोळ्यासमोर आहे.

अमा +11
आपण खरोखर लेख लिहिण्याचे मनावर घ्यावे.

The movies/ documentary always says what world wants to listen. The history told within family may not be same......I am living in Germany for last 8 years and will say that, new Germans also have many questions for jews, allied forces and the way history is written. It does not mean they support Hollocost, but at the same time they want world to talk about the other side. At that time holocaust was always supported by east european non Jews and the real reason behind it.>>>>>

ही बाजूही वाचायला आवडेल. शक्य असेल तर लिहा.

नाझी भस्मासूर एकेकाळी प्रचंड आवडलं होतं
पारायणे केली होती
पण नंतर लक्षात आले कि ते भाषांतर आहे आणि मग तो शिरर चा ठोकळा वाचायला घेतला
पूर्ण नाही वाचू शकलो पण
कानिटकर यांनी त्यांचा अजेंडा व्यवस्थित वापरला आहे आणि अधे मध्ये सूचक वाक्ये टाकून ते दाखवूनही देतात
माझ्याकडे पण दुसरे महायुद्धवरील अनेक डॉक्युमेंटरी आणि पुस्तके आहेत
अमा नक्कीच लिहा या विषयावर

मी काही खूप अभ्यास नाहीये केला, पण new generation ला वाटते कि जगाला फक्त होलोकॉस्ट बद्दलच बोलायचे असते. तेंव्हा बांधलेलं Autobahns आणि city planners किंवा बाकीही चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्षच केलं जात. किंवा मी माझ्झ्या मुलांना हिटलर वाईट आणि नेपोलिअन बेस्ट असे का शिकवायचे( हे एका पोलिश-जर्मन चा अर्ग्युमेण्ट होत), कारण दोघंही equally वाईट आहेत.
आजही अँटी-सेमिटीसम अजूनही आख्या युरोप भर आहे. ईस्ट युरोप ला कायमच जास्ती होता, इव्हन फ्रान्स ने पण ya लोकांनी मदत keliye, त्यामुळे यांनाही kind ऑफ validation मिळालं. कायम Jews म्हणून राहणे हा कॉमन मन साठी ट्रिगर फॅक्टर आहे.
US सारखा Melting pot कन्सेप्ट युरोप ला नाहीये. प्रत्येकजण स्वतःच्या ट्रॅडीशन्स follow करत असतो - जर्मन्स, फ्रेंच, पोर्तोगीसेस, स्पॅनिश लोकानमंध्ये आपल्यासारख्या variations आहेत. मी तर भारत हा मिनी युरोप सारखा आहे, असेच इथल्या लोकांना सांगते जेंव्हा खूप भाषा का आहेत असा प्रश्न yeto, बेसिक ढाचा सारखा पण ट्रॅडीशन्स थोड्या वेगळ्य्या. ......पण तरीही ईंटेग्रेशन महत्वाचं असतंच इथे.
Heinrich Himmler चा एक नातू अर्धा Jew आहे, आणि त्याचे दुसऱ्या sideche आजोबा होलोकॉस्ट survivor आहेत. आज तो मुलगा बर्लिन ला राहतो. Hansedic jews ची भाषा Yeddish खूप जर्मन च्या जवळ जाते. Superiority complex हा तर मुद्दा आहेच.

आपल्यापेक्षा वेगळा विचार मांडणारी व्यक्ती एकदम शत्रूच वाटू लागणे हे स्वतःसाठीसुद्धा धोक्याची घंटा आहे. >> टोटली! आजकाल विरोधक वगैरे नसतात. ते डायरेक्ट देशद्रोहीच असतात. अमेरिका, भारत दोन्हीकडे तेच चालू आहे.

नाझी भस्मासुराचा उद यास्त मधील १९३४- १९३५ हे वाचले तर ती टेंप्लेट अगदीच राबवली जाते आहे हे लक्षात येते >>. सहमत. शाळेत सनावळ्या घोकण्यापेक्षा हे पॅटर्न्स शिकवणे सक्तीचे हवे. उच्चशिक्षित लोकही असल्या प्रचाराला सहज बळी पडतात.

jollyjui - लिहा अजून जमेल तसे. जरी त्याकाळी काही दुसरी बाजू असेल तरी नंतर नाझी जर्मनांनी केलेले हत्याकांड इतके भयानक होते की त्यापुढे रस्ते बांधले वगैरे दुर्लक्षित होईल यात काहीच आश्चर्य नाही.

खरे तर हे चकाचक auto bahn वगैरे सगळी किती फसवी प्रगती होती आणि त्या मागे कशी एक राक्षसी महत्त्वाकांक्षा, एक राक्षसी उन्माद, वंशश्रेष्ठत्ववाचा राक्षसी दर्प दडला होता हे जर्मन राष्ट्राला फार उशीरा कळले. ती प्रगती खूप महागात पडली जगाला आणि खुद्द जर्मनीला.
ह्यावर खूप लिहिता येईल. अगदी सलग दोनशे वर्षे चाललेली अंतर्गत भांडणे, आक्रमणे, त्या दरम्यान कुठल्या कुठे पुढे निघून गेलेली शेजारी राष्ट्रे, त्यांना त्यांच्या वसाहतीतून मिळालेली डोळे दिपवणारी संपत्ती, मग द्वेष, ईर्ष्या अशा अगदी नाट्यपूर्ण घटना आहेत पण सलग वेळ मिळत नाही.

त्यांना त्यांच्या वसाहतीतून मिळालेली डोळे दिपवणारी संपत्ती>>>>

यावर एक वाक्य वाचले होते की हिटलर किंवा जर्मनी जास्त बदनाम का झाले तर त्यांचे बळी हे युरोपातले होते. ते अफ्रिकन किंवा आशियाई असते तर इतका गदारोळ झाला नसता.

खूप बोलकं वाक्य आहे. स्पॅनिश लोकांनी अॅझटेक संस्कृतीची केलेली धूळधाण आणि प्रचंड क्रौर्य, ब्रिटीश आणि फ्रान्स च्या अफ्रिकेतील आणि भारतातील वसाहती, जपानचे मांचुरिया, चीन आणि अन्य राष्ट्रांवरचे अत्याचार हे फार धिक्कारले गेले नाहीत आणि त्यांना वंशवादी असल्याचा शिक्काही बसला नाही

यावर एक वाक्य वाचले होते की हिटलर किंवा जर्मनी जास्त बदनाम का झाले तर त्यांचे बळी हे युरोपातले होते. ते अफ्रिकन किंवा आशियाई असते तर इतका गदारोळ झाला नसता.
>>>
होलोकॉस्टच्या संदर्भात प्रामुख्याने ज्यु लोकांचाच उल्लेख होतो. याचे एक कारण म्हणजे ज्यु इतर अनेक देशात सधन/प्रभाव करू शकणार्‍या स्थानी आहेत तसेच इस्राएल हा त्यांचा देश एक सबळ देश आहे.
युरोपातील रोमा लोकांची तितक्याच संख्येने होलोकॉस्टमध्ये कत्तल झाली. त्यांच्याबद्दल क्वचितच कोणी बोलताना दिसतो. खुद्द युरोपात रोमा लोकांना पशुसमान वागणूक दिली जाते.

रोमा लोकांबद्दल मी एका लेखावर हे लिहिले होते.

https://www.maayboli.com/node/53820

थोडेसे विषयांतर (किंवा वरती इब्लिसने लिहिल्याप्रमाणे): युरोपात ज्यांना जिप्सी वा रोमा म्हणतात (जे प्रामुख्याने हंगेरी-रोमेनिया इथे वसले आहेत व आता सर्व युरोपभर आढळतात) हे लोक मुळचे भारतातील राजस्थान वगैरे भागातील भटक्या लोकांपैकी असे सर्वमान्य आहे. हे साधारण ११-१२-१३व्या शतका त स्थलांतरीत होत होत (मध्य आशिया मार्गे) हंगेरी-ट्रान्ससिल्वेनिया खोर्‍यात स्थायिक झाले असा प्रवाद आहे. काही जेनेटिक अ‍ॅनालिसिसनुसार हे सिद्धदेखील झालेले आहे. दुर्दैवाने या लोकांना युरोपात कोणीच वाली नाही. गेली ५-७ शतके मुख्य समाजापासून दूर ठेवल्यामुळे ना शिक्षण आहे ना नोकर्‍या ना समाजात स्थान. त्यामुळे हे मुख्यतः चोर्‍या, गुन्हे करणारे म्हणुन प्रसिद्ध आहेत. या आरोपात तथ्य आहे मात्र त्यामागची कारणीमिमांसा कोणीच करण्याच्या मनस्थितीत नाही. हंगेरीत तर सध्या फार राइट सरकार असल्याने ते या लोकांना कस्पटासमान वागणूक देतात.
या रोमा भाषांमध्ये पाच, देव असे शब्द आढळतात असे मी एका हंगेरियन प्रवासवर्णनात वाचले होते (१९२५-३५च्या दरम्यानचे हे प्रवासवर्णन आहे).
हंगेरीच्या पूर्व भागात रोमांची संख्या जास्त आहे. अर्थात टोकाची गरिबी, समाजिक अवहेलना खूप आहे. एका लेखात वाचले होते की संपूर्ण हंगेरीत केवळ ७ रोमा विद्यार्थी युनिवर्सिटीत आहेत. इथे रोमांसाठी काम करणार्‍या एन.जी.ओ.च्या शाळा आहेत. त्यापैकी एका शाळेचे नाव आहे भीमराव आंबेडकर तर दुसर्‍या एका शाळेचे नाव आहे महात्मा गांधी!

नाझी जर्मनांनी केलेले हत्याकांड इतके भयानक होते की त्यापुढे रस्ते बांधले वगैरे दुर्लक्षित होईल यात काहीच आश्चर्य नाही. - हो हे मात्र खर आहे. New generation मोस्टली होलोकॉस्ट denial ला नाहीये, आणि हे परत होऊ नये यासाठी काहीही करायला हवे, पण we are not the only one Ase काहीसे.
असं mhautat के १९४२ पर्यंत काही jews ला slave करायचे आणि बाकीचे बाहेर कुठेतरी हाकलून द्यायचे यावर बोलणे होत होते, आणि जनतेत तेच सांगितले जात होते, पण तेंव्हाचे वर्ल्ड jews लीडर्स खूप शांत राहिले. (मला खरे खोटे details माहित नाही, मिळाले तर लिहीन.).

खरे तर हे चकाचक auto bahn वगैरे सगळी किती फसवी प्रगती होती - हे इथल्या बहुसंखयांना वाटत नाही कारण फसवी असती तर जर्मनी परत उभा राहू शकला नसता. मी स्वतः १९३० सालातला water pipe बघितला आहे घरातला, ८५ वर्ष झाली म्हणून बदलला. वॉररेंटी पिरियड संपला होता.

त्या मागे कशी एक राक्षसी महत्त्वाकांक्षा, एक राक्षसी उन्माद, वंशश्रेष्ठत्ववाचा राक्षसी दर्प दडला होता हे जर्मन राष्ट्राला फार उशीरा कळले. - हिटलर काय किंवा Churchil वर स्टालिन....यामंध्ये तत्वतः काहीच फरक नाहीये. सगळेच तसेच होते.
तितक्याच दिवसांमंध्ये आपण churchil ने Bengal famine - 2sd वर्ल्ड वॉर च्या solders साठी rice नेऊन ( भुकेने २-३ मिलिअन्स ला मारले हे विसरतो.

अगदी सलग दोनशे वर्षे चाललेली अंतर्गत भांडणे, आक्रमणे, त्या दरम्यान कुठल्या कुठे पुढे निघून गेलेली शेजारी राष्ट्रे, त्यांना त्यांच्या वसाहतीतून मिळालेली डोळे दिपवणारी संपत्ती, मग द्वेष, ईर्ष्या अशा अगदी नाट्यपूर्ण घटना आहेत. - हे मी first world war साठी वाचलं होत, त्यानंतर between first & second world war ते बरेच पुढे गेले. खर तर तेंव्हाच त्यांना एक नॅशनॅलिसम मिळाला, जो अजूनही आहे. आजही इथे socialism आहे, ( Capitalism & communism च्या मंध्ये). May be I am wrong but it made them the Europe's leader today. Though I am not sure what will happen in next 10 year due to immigrant policy.

Totally agree about the roma. Slav and polish populations destroyed in this war. In fact the cold blooded plan to use Poland and slave land as lebensraum or living space is spine chilling. Many times I am working and listening to the first part of the new order chapter in rise and fall ... I stop and listen again just to confirm the callusness. Cruelty of this so called pure race thinking. First they destroyed polish intellectual class and the entire plan was to use entire population as a free farm and factory labour force for the master race. Then starve them . Education denied to them as it provokes thinking and revolt. Also all big corporations and Deutsch bank were party to this heinous crime against humanity. A healthy lively diverse population is essential I can live with ordinary roads.

हे इथल्या बहुसंखयांना वाटत नाही कारण फसवी असती तर जर्मनी परत उभा राहू शकला नसता.

@जॉलीजुई: तुम्ही लिहिलेल्या बर्‍याच भागाला अनुमोदन. या वरच्या वाक्याला मात्र नाही. जर्मनी पुन्हा उभा राहण्यात जर्मनांच्या मेहनतीबरोबरच युएसच्या मार्शल प्लॅनचा तितकाच हातभार आहे. मार्शल प्लॅन लागू झाला नसता व दुसरे महायुद्ध काळामागे झटकून युरोप एकत्र प्रगती करण्यासाठी उभा राहिला नसता तर पुन्हा वायमार रिपब्लिकच आले असते.

अजून एक म्हणजे, नाझी पार्टीचा मोठा बेस हा आजच्या ऑस्ट्रियात होता. पण हिटलरने ऑस्ट्रिया-जर्मनीचे एकत्रीकरण केल्यामुळे दुसर्‍या महायुद्धात केवळ जर्मनी हेच नाव राहिले.
ऑस्ट्रियन लोकांनी ६०च्या दशकातच माजी नाझी उच्चपदस्थांना पुन्हा राजकारणात निवडून वगैरे आणले.
पण आज जगात हिटलर/होलोकॉस्ट वगैरे म्हटले की सगळ्यांना जर्मनी आठवते, पण ऑस्ट्रिया कोणालाच नाही.

छान चर्चा.

कानिटकर यांनी त्यांचा अजेंडा व्यवस्थित वापरला आहे आणि अधे मध्ये सूचक वाक्ये टाकून ते दाखवूनही देतात >>>> मला नाझीभस्मासुराचा उदयास्त वाचून बरेच दिवस झाले. कसला अजेंडा आणि काय सुचवणारी वाक्ये?

Pages