ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

Submitted by अदित्य श्रीपद on 17 October, 2020 - 11:12
oskar groening

ऑस्कर ग्रोएनिन्ग-ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

नुकतीच नेटफ्लिक्स वर The Accountant Of Auschwitz ऑश्वित्झ छळ छावणीचा अकाउंटंट(लेखनिक)हि डॉक्यूफिल्म पहिली.
ज्यांना दुसऱ्या महायुद्धाबद्दल थोडेफार तरी माहिती असते त्यांना ऑश्वित्झ छळ छावणीबद्दल वेगळे सांगायची गरज नसते पण ज्यांना काहीच कल्पना नाही त्यांच्या करता म्हणून थोडक्यात सांगायचे तर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जर्मनीतल्या नाझी राजवटीने जर्मनी तसेच त्यानी पादाक्रांत केलेल्या प्रदेशातील ज्यू धर्मीयांची ‘विल्हेवाट’ लावण्यासाठी अनेक छळछावण्या उभारल्या होत्या.जर्मनीतील तसेच सर्व जगातील ज्यू धर्मियांचे भवितव्य त्यानी ठरवून टाकले होते त्याला त्यांनी अंतिम तोडगा (Final solution) असे वरकरणी निरुपद्रवी वाटणारे नाव दिले होते. ह्या छळछावण्यात सर्व युरोपातून पकडलेले (मुख्यत्वे करून) ज्यू तसेच विरोधक, युद्धकैदी सैनिक आणले जात. त्यांच्या कडून मरेस्तो(शब्दशः) काम करून घेतले जात असे आणि जे आजारी,अशक्त, वृद्ध किंवा लहान असतील त्यांना मारून टाकले जाई. १९४० ते १९४५ ह्या कालावधीत नाझी राजवटीने अशा छळछावण्यातून सुमारे ६० लाख ज्यू मारले. ह्या हत्याक्न्डत जवळ जवळ युरोपातील दोन तृतीयांश ज्यूंची आहुती पडली. ह्या छळछावण्यापैकी सगळ्यात कुप्रसिद्ध म्हणजे ऑश्वित्झ-पोलंड इथली छळ छावणी. इथे साधारण ११ लाख ज्यु लोकाना मारून टाकले गेले. ऑश्वित्झ-पोलंड इथली छळ छावणी हा खरेतर ४० लहान मोठ्या छळ छावण्यांचा समूह होता. आय जी फार्बेन सारख्या कंपन्याकरता गुलाम म्हणून काम करणाऱ्या ज्यू लोकांचे इथे खास वेगळे तळ उभारले गेले होते.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तर उपरोल्लेखित ऑस्कर ग्रोएनिन्ग ह्या ऑश्वित्झ छळ छावणीत साधा शिपाईगडी होता. त्याचे मुख्य काम, छळछावणीत आणलेल्या कैद्यांचे कपडे पैसे दागिने इतर मौल्यवान चीज वस्तू जे काढून घेतले जात असे त्याची वर्गवारी करून नोंद करणे हे होते. क्वचित प्रसंगी तो मुख्य प्रवेशद्वाराशी जे कैदी आणले जात, त्यांची कामाकरता आणि लगेच मारून टाकण्याकरता, वैद्यकीय प्रयोग करण्याकरता अशी विभागणी केली जात असे तेथे रखवालीचे कामही करत असे. ऑस्कर ग्रोएनिन्गने ऑश्वित्झ छळ छावणीत १९४२ ते १९४४ अशी नोकरी केली. ह्या काळात ऑश्वित्झ छळ छावणीत साधारण ११ लाख ज्यू आणि इतर कैदी मारले गेले. साधारण ३ लाख लोकांच्या मृत्यू वेळी तो मुख्य प्रवेशद्वाराशी ड्युटीवर तैनात होता. पुढे त्याला ह्या सगळ्याचा उबग आल्याने( त्याच्या म्हणण्याप्रमाणे) त्याने अर्ज विनंत्या करून बदली मागून घेतली आणि त्याचे रवानगी फ्रांस बेल्जियन सीमेवरील आर्देन्स आघाडीवर झाली. त्याने जर्मनांची शेवटची निकराची चढाई Battle of the Bulge मध्ये भाग घेतला.लढाईत तो जखमी झाला आणि आघाडीवरील इस्पितळात उपचार घेत असतानाच त्याला ब्रिटीशानी कैद केले.युद्ध संपल्यावर १९४७ साली त्याची मुक्तता झाली. आणि तो आपल्या सासुरवाडीला म्हणजे ल्युनेन्बर्ग इथे आला. पुढची ७० वर्षे तो तेथेच राहिला. येथील एका काच काखान्यात त्याने नोकरी केली आणि बढत्या घेत घेत निवृत्तीवेळी तो त्या कंपनीत मानव संसाधन विभागाचा प्रमुख होता. निवृत्तीनंतर त्याने काही काळ औद्योगिक लवाद विभागात न्यायाधीश म्हणून काम पहिले. हि सत्तर वर्षे त्याने एक सर्वसाधारण कुटुंबवत्सल जर्मन म्हणून काढली.त्याने स्वत:ची ओळख लपवण्याचा किंवा बदलण्याचा कधी प्रयत्न केला नाही. आणि हे साहजिकही होते त्याने स्वत: कधी कुणा ज्यूला गोळी किंवा विष घातले नाही कि ग्यास चेंबर मध्ये कोंडले नाही की तसे करण्याच्या आदेशावर सही केली नाही , त्याला तसे आणि तेवढे अधिकारच नव्हते. अर्थात तो आपल्या ऑश्वित्झ छळ छावणीतल्या दिवसाबद्दल फारसे बोलत नसे.
ह्या ऑस्करला पोस्टाची तिकीटं गोळा करायचा छंद होता आणि त्यानिमित्ताने फिलेटली ह्या हौशी तिकीट संग्रहाकाच्या संस्थेच्या वार्षिक मेळाव्यात त्याची ओळख एका अशाच हौशी तिकीट संग्रहाकाशी झाली जो ज्यूंचे हत्याकांड झालेच नाही असे मानणाऱ्या एका जर्मन लोकांच्या संघटनेचा- Holocaust denier group सदस्य होता. त्याची मुक्ताफळे ऐकून ओ बराच व्यथित झाला आणि त्याने Holocaust denier groupच्या प्रमुख नेत्याला म्हणजे थ्रिस ख्रिस्तोफर्सनला त्यांचेच एक पत्रक पाठवले आणि त्यावर मोठ्या अक्षरात लिहिले
I saw everything,The gas chambers, the cremations, the selection process. One and a half million Jews were murdered in Auschwitz. I was there.”
मी ते सगळे (स्वत:)) पहिले आहे, विषारी वायूच्या खोल्या, प्रेते जाळण्याच्या भट्ट्या, (मुख्य प्रवेशद्वाराशी) ज्युना मारून टाकण्यासाठी वेगळे केले जात असे तो प्रकार, ऑश्वित्झ छळ छावणीत पंधरा लाख ज्यू अशा प्रकार मारून टाकले गेले आणि मी त्यावेळी तिथे होतो.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

तो नक्की कोण होता हे नीट माहित नसल्यानेअसेल पण संघटनेच्या अनेक सदस्यांनी त्याला पत्र लिहून फोन करून तो चूक कसा आहे हे समजावण्याचा सपाटा लावला ह्यामुळे तो अजूनच बिथरला. त्याने आपल्या ऑश्वित्झ छळ छावणीतल्या आठवणी सांगणारे ८०-८५ पानांचे एक छोटेखानी पुस्तकच लिहून काढले.२००९ साली त्याने BBC ला एक मुलाखत देखिल दिली. एकंदरीत युद्धोत्तर जर्मनीत ऑस्कर ग्रोएनिन्ग हा नाझी राजवटीने ज्यु लोकांवर केलेल्या अनन्वित छळ आणि कात्तलीन्बद्दल खुलेआम पणे बोलणारा पहिला माजी-नाझी एसेस सदस्य असावा.
ऑस्कर ग्रोएनिन्ग ह्या मुलाखतीत आणि त्याच्या छोटेखानी पुस्तिकेत बोलताना लिहिताना जे घडले जसे घडले (अर्थात त्याने जेवढे पहिले) त्याबद्दल त्याबद्दल कुठलाही आड पडदा न ठेवता बोलतो क्वचित त्याबद्दल खेद देखिल व्यक्त करतो. पण एक जाणवते कि तो स्वत: ह्य सगळ्या घटनांकडे एक त्रयस्थ म्हणून केवळ मूक दर्शक बनून पाहत होता अशी काहीशी त्याची भूमिका असावी. कदाचित झाल्या अपराधांची जबाबदारी मनावरून झटकण्याची त्याची हि पद्धत असावी किंवा ऑश्वित्झ छळ छावणीतला ऑस्कर हा कुणी वेगळाच माणूस होता, आता मात्र आपण अंतर्बाह्य बदललेलो आहे असे त्याने आपल्या मनाला समजावले असावे, शिवाय स्वत:ची ओळख लपवली नसली तरी तो २००९ सालापर्यंत म्हणजे ६०-६२ वर्षे ह्या विषयी गप्पच होता. कदाचित आता इतक्या वर्षानंतर आपण तोंड उघडले तरी वयाच्या ८८-८९व्या वर्षी कोण काय करणार? इतकी वर्षे मनावर बाळगलेले ओझे काही प्रमाणात ह्या निमित्ताने कमी होईल असेही त्याला वाटत असावे खरे काय ते कळायला मार्ग नाही.
पण २०१४ साली जर्मनीत त्याच्यावर सरकार तर्फे खटला भरला गेला. ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याचा ठपका त्याच्यावर ठेवला गेला.त्यावेळी तो ९३ वर्षे वयाचा झाला होता.साहजिकच जर्मनीत ह्याचा मोठा गवगवा झाला. लोकांचे दोन गट पडले. ९३ वर्षे वयाच्या जर्जर म्हाताऱ्याला काय शिक्षा करणार? त्यातून तो तर एक साधा एसेस शिपाई गडी कुणी मोठा तालेवार आणि क्क्रूर नाझी अधिकारी, नेता नाही त्याने कधीही ज्यू वरच्या झालेल्या अत्याचारांचे समर्थन केले नाही. उलट उघडपणे जे घडले ते सांगणारा, मान्य करणारा पहिला नाझी ( माजी ) असे एका गटाचे म्हणणे होते तर दुसर्या गटाचे म्हणणे न्यायाचा वयाशी काय संबंध? लहान मुलं, गरोदर बायका, जख्ख गलित गात्र म्हातारे ज्यू मारताना नाझी लोकांना कुठे दया येत होती कि ते वय बघत होते. ९३ ९४व्या वर्षी आपल्याला काही होत नाही असे वाटून कोणी मानभावी पणे खेद व्यक्त करत असेल तर त्याला त्याने तरुणपणात केलेल्या गुन्ह्यांबद्दल सरळ सरळ माफी द्यायची? हे चूक आहे त्यातून आम्ही त्याचा बदला घेण्यासाठी सूड उगवण्यासाठी काही बेकायदेशीर कृत्य करत नाही आहोत. रीतसर खटला चालवून कायद्याच्या, न्यायाधीशाच्या हाती निर्णय सोपवत आहोत.”
असो कोर्टात खटला सुरु झाला १४ एप्रिल २०१४ साली आणि त्याने सुरुवातीलाच झाल्या कत्तलीची नैतिक जबाबदारी स्वीकारत ज्यू लोकांची बिनशर्त माफी मागितली. त्याने मान्य केले कि ऑश्वित्झ छळ छावणीत जे काय चालू होते ते सगळे त्याला माहिती होते, दिसत, कळत होते. पण ते थांबवण्यासाठी काही करण्याची इच्छाशक्ती त्याच्याकडे नव्हती आणि त्याने तसा काही प्रयत्नही केला नाही.नाझी राजवटीने उभ्या केलेल्या एका मोठ्या यंत्रणेचा/ मशीनचा तो एक छोटासा भाग होता.त्याकाळातील जर्मनीतल्या द्वेष-प्रचार यंत्रणेला बळी पडलेल्या अनेक तरुणांपैकी तो एक होता आणि म्हणूनच जरी त्याने स्वत: कुणा ज्यूचा जीव घेतला नसली तरी नैतिक दृष्ट्या तो इतर कत्तल करणाऱ्या नाझीइतकाच दोषी आहे आणि कायद्याने त्याला काय शिक्षा द्यायची हे कोर्टाने ठरवावे.
ह्या खटल्यात ऑश्वित्झ छळ छावणीत राहिलेल्या आणि वाचलेल्या पैकी ६० ज्यू साक्षीदारानी साक्षी दिल्या पण कुणीही ऑस्करने इतर कुणा ज्यूला मारल्याचे किंवा त्यांना छळल्याचे सांगितले नाही.
खटला एकूण १६ महिने चालला आणि १५ जुलै२०१५ रोजी ऑस्कर ग्रोएनिन्गला ऑश्वित्झ छळ छावणीत झालेल्या ज्यू कत्तलीला सहाय्यभूत झाल्याबद्दल दोषी धरत ४ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याची पुनर्विचाराची आणि दयेची याचिका जर्मनीच्या उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली पण तो इतका वृद्ध आणि जर्जर होता कि त्याला तुरुंगात भरती करणे शक्य नव्हते त्यामुळे तुरुंगाच्या इस्पितळात त्याला ठेवले गेले आणि तेथेच तो वयाच्या ९६ व्या वर्षी झालेल्या शिक्षेपैकी एक हि दिवस शिक्षा न भोगता गेला.
२००५ साली लॉरेन्स रीस नावाच्या ब्रिटीश इतिहास संशोधकाने लिहिलेल्या Auschwitz: The Nazis and 'The Final Solution (ऑश्वित्झ- नाझी लोकांचा अखेरचा तोडगा) ह्या पुस्तकात ऑस्कर ग्रोएनिन्गचा उल्लेख आणि सविस्तर भाष्य आहे. त्याद्वारे ऑस्करच्या मनोवृत्तीवर काहीसा प्रकाश पडतो.
ऑस्करने अर्ज विनंत्या करून ऑस्करने ऑश्वित्झमधून बदली मागून घेतली असली तरी त्यामागे (त्याने अर्जात म्हटल्याप्रमाणे)खरे कारण ज्यूंच्या कत्तली/ अन्याय पाहत राहणे त्याला अशक्य झाल्याने हे कारण नव्हते तर ज्या यातना सहन करत ते मरत होते ते त्याला अमानुष वाटत होते. त्यांना अधिक चांगल्याप्रकारे, कमी त्रास देत मारले जायला हवे होते, छळ सहन करणाऱ्या,तडफडणाऱ्या किंकाळ्या फोडट मरणाऱ्या ज्युना सतत पाहून सैनिकांच्या आणि इतर कर्मचार्यांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम होतो असे त्याचे म्हणणे होते. थोडक्यात ज्युना मारायला त्याचा विरोध नव्हता. पद्धत अधिक परिष्कृत असायला हवी होती.
ह्या पार्श्वभूमीवर खटल्यात ऑस्करनेच सांगितलेली आठवण मोठी उद्बोधक आहे.रेल्वेने नुकत्याच आणलेल्या ज्युंपैकी एका ज्यू बाईने आपले बाळ एका चामडीच्या पेटीत-(सुटकेसमध्ये) लपवले होते. शिरस्त्याप्रमाणे नवीन आलेल्या ज्यूंचे सामान सगळे वेगळे केल्या मुळे ती पेटी देखिल तिच्याकडून काढून घेतली गेली आणि धक्के लागल्याने आतले बाळ रडू लागले. सामानाच्या ढिगाऱ्यात शोधल्यावर थोड्या वेळाने ती पेटी नाझी अधिकाऱ्याला सापडली. त्याने पायाला धरून ते रडणारे बाळ बाहेर काढले आणि रेल्वेच्या डब्यावर डोके आपटून ते बाळ मारून टाकले. त्यावर पुढे ऑस्कर म्हणतो ते बाळ त्याने अशा प्रकारे मारायला नको होते, अधिक माणुसकीने त्याचा जीव घ्यायला हवा होता. ही आठवण सांगताना ऑस्कर चे वय ९४ वर्षे होते.
एकंदरीत त्याचा होरा (जर तसा तो असेल तर) कि वयाच्या ९३-९४ व्या वर्षी आपल्याला कोण काय शिक्षा करणार! कशी करणार! हा खरा ठरला. एरवी जसा गेली ६५-७० वर्षे शांत राहिला तसा शांतच राहिला असता तर ऑस्कर ग्रोएनिन्गबद्दल कुणाला काही कळले हि नसते. पण अखेरच्या काळात झालेल्या उपरतीमुळे(!) त्याला प्रसिद्धी मिळाली आणि इतिहासाला त्याची दखल घेणे भाग पडले.

-आदित्य

वर दिलेल्या फोटोंमध्ये ऑश्वित्झ छळछावणीच्या प्रवेशद्वाराचा फोटो आहे ज्याच्या कमानीवर Arbeit macht frei (Work sets you free-कामातच खरी मुक्ती आहे!) अशे अक्षरे आहेत तर त्यासंबंधाने एक आठवण

Arbeit macht frei (Work sets you free-कामातच खरी मुक्ती आहे!)

साधारण २००७-८ च्या सुमारास आमची कंपनी Tata motors एक नवी गाडी indica vista बाजारात आणणार होती. त्यावेळी तिच्या वेल्डिंग फिक्स्चर्सचे काम कुका नावाच्या एका जर्मन कंपनीला दिलेले होते. त्यामुळे त्यांची १०-१५ लोकांची एक टीम वेल्डिंग फिक्स्चर्सच्या सेटअप आणि कमिशनिंग करता आली होती. त्यातल्या अनेकांशी माझी खूप दोस्ती झाली होती.त्यापैकी हुईम्हणून एक होता त्याची आणि माझी खास गट्टी जमली होती. त्या सगळ्याच जर्मनांना तोडके मोडके इंग्रजी येई पण त्यातला एक लेन्झ म्हणून होता त्याचे इंग्लिश उत्तम होते आणि तो आमच्यात दुभाषा म्हणून काम करे. तर ह्या हुई च्या laptop एक व्यंग चित्र backgroundला होतं. एका अगदी गरीब गाढवाच्या पाठीवर सामानाचे खूप ओझे आहे अन त्या ओझ्यामुळे ते गाढव अगदी मेटाकुटीला आलय.त्यावर जर्मन भाषेत काहीतरी लिहील होत ते काय आहे असं मी लेन्झ ला विचारलं तर तो म्हणाला ते वाक्य असे आहे कि Work is the best gift that you can give to some one. आता मला जर्मन नीट येत नाही. म्हणजे कॉलेज मध्ये ११ वीत अगदी थोडे शिकलो तेवढेच.पण माझे दुसऱ्या महायुद्धावर थोडेफार वाचलेले असल्याने त्यातल्या एका फोटोत वाचलेले वाक्य Arbeit macht frei हे उच्चारले. त्याचा अर्थ “कामाने तुम्हाला खरी मुक्ती मिळते.” असा आहे . अर्थ जरी सरळ असला तरी ह्या वाक्याचा इतिहास अत्यंत काळा आहे. हे वाक्य जर्मन छळ छावण्याच्या प्रवेशद्वारावर लिहिलेले असे जिथून अनेक अभागी ज्यू लोकांना मरेस्तो काम करवून घेत, तसेच गोळ्या घालून विषारी वायच्या खोल्यात कोंडून मारून टाकले गेले. त्यामुळे हे वाक्य मी उच्चारताच हुई एकदम भडकला आणि माझ्यावर ओरडायला लागला तो का चिडला आणि तो(जर्मन भाषेत) काय म्हणतोय मला कळेना. तेवढ्यात लेन्झ तिथे आला आणि मग त्याला काय घडले हे सांगितल्यावर त्याने समजावून हुई ला शांत केले. नंतर मला तो म्हणाला ते वाक्य तू म्हणायला नको होतेस . आम्ही सगळे जर्मन लोक त्याकाळी जे घडले त्या बाबत खूप शरमिंदा आणि हळवे असतो त्यामुळे तू ते वाक्य म्हणाल्यावर त्याला वाटले कि तू त्याला त्या जर्मनांसारखा वंशवादी समजतोस.
ह्याच indica vistaचे काही चेकिंग फिक्स्चर्स आम्ही एका इंग्लिश कंपनीकडून बनवून घेतले होते आणि ते cmm मशीनवर ठेवून पृविंग करायचे काम चालू होते. त्याकामाकरता इंग्लंड मध्येच जन्माला आलेला हरप्रीत सिंग नावाचा एक पंजाबी आणि स्मिथ नावचा त्याचा सहकारी असे दोघे लोक इंग्लंड वरून आले होते. त्यांच्याशी बोलताना जाणवले कि इंग्लिश मुलांना शाळेत इतिहास शिकवताना वसाहतवादी इंग्लंड बद्दल त्यानी आपल्या वसाहतीत केलेल्या बऱ्या वाईट गोष्टी बद्दल फार सांगत नाहीत. इंग्लंड एक महान वसाहत वादी शक्ती होते आणि भारतासारखे काही देश त्यांच्या वसाहती होत्या तेथे आपण सभ्य,उच्च(!) संस्कृती घेऊन गेलो आणि त्यांना रानटी अवस्थेतून माणसात आणले असे काहीसे सांगतात.
तर मुद्दा असा आहे कि तुमचा इतिहास कसा आहे , त्यात तुमच्या पूर्वजांनी काय चूक किंवा बरोबर केले ह्याबद्दल वास्तविक माहिती नव्या पिढीला सांगितली गेलीच पाहिजे अन्यथा इतिहासापासून धडे कसे घेणार?
मुद्दा साधा आहे पण वाटतो तितका सरळ नाही, सोप्पा तर अजिबातच नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसला अजेंडा आणि काय सुचवणारी वाक्ये? >> मलाही कुतूहल आहे. मी बहुधा पूर्वी वाचले आहे. लक्षात नाही. काहीतरी हिटलर गॅलरीत उभा असतो. त्याने नियतीशी करार केलेला असतो वगैरे सुरूवातीला होते, इतकेच आठवते.

हिटलर जरी तेव्हाच्या ऑस्ट्रोहंगेरियन साम्राज्यातल्या ऑस्ट्रिया मध्ये जन्मला होता तरी त्याने स्वप्न पाहिलं एक हाती, एक जिनसी, एक विचारी, एक वंशी अशा रेजिमेंटलायझेशन झालेल्या महा जर्मनीचे. त्याच्या पार्लमेंटला त्याने जर्मन राईश टाग च म्हटले. तो स्वतः: ला अशा महा जर्मनीचा नेता समजत असे. त्यामुळे त्याला जर्मन मानायला हवे. सध्याचा पूर्व आणि पश्चिम जर्मनी ही त्याची मुख्य कर्मभूमी होती. जसे की लालकृष्ण आडवाणी, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर, रवींद्रनाथ ठाकूर, मनोज कुमार, बी आर चोपडा हे सगळे सध्याच्या परदेशी जन्मूनही भारतीय, तसेच हे.

जसे की लालकृष्ण आडवाणी, दिलीप कुमार, पृथ्वीराज कपूर, रवींद्रनाथ ठाकूर, मनोज कुमार, बी आर चोपडा हे सगळे सध्याच्या परदेशी जन्मूनही भारतीय, तसेच हे.>>>

हे जन्मले तेव्हा सध्याचा परदेश तेव्हा भारतात होता ना? जेव्हा तो परदेश झाला तेव्हा यांनी सध्याच्या भारतात राहण्याचे ठरवले म्हणून ते भारतीय झाले ना? त्यांनी तेव्हा सध्याच्या त्या परदेशात राहायचे ठरवले असते तर ते सध्याही परदेशी झाले असते.

मुद्दा एवढाच की तुमची तुलना चुकलेली आहे.

आणि वर ऑस्ट्रीयाबद्दल उल्लेख आलाय तो हिटलर ऑस्त्रीयन आहे म्हणून नाही तर खूप काही घडामोडी तिथे घडल्या म्हणून. सगळ्यात मोठे गॅस चेंबर ज्याबद्दल धागा आहे तेही आज ऑस्ट्रियात आहे. टवणेसरांनी लिहिलेय की नंतरही नाझी पार्टीचे लोक सत्तेत आले होते. सध्या नसावेत. जर्मनीत आजही नाझी विचारांचे लोक, म्हणजे स्वतःला सुप्रीम रेस मानणारे लोक आजही आहेत असे वाचलंय.

हिटलर जन्मला ऑस्ट्रियात तरी ऑस्ट्रियातली राजेशाही त्याला आवडलेली नव्हतीच. तो तिथला नागरिक असला तरी तो पुढे जर्मनीला गेला व तिथला नागरिक झाला. सत्ता मिळाल्यावर त्याने ऑस्ट्रियावर कब्जा केला. हा कबजा दुसरे महायुद्ध संपेपर्यंत टिकला व नंतर ऑस्ट्रिया परत स्वतंत्र देश झाला.

@हिरा, मी जर्मनीला absolve करून केवळ ऑस्ट्रियाला जबाबदार धरले पाहिजे वगैरे म्हणत नाहीये. माझा मुद्दा इतकाच आहे की जर्मनी इतकेच जबाबदार असलेल्या ऑस्ट्रियाची जबाबदारी लोकांच्या विस्मरणात गेली आहे.

@आशुचाम्प, स्टॅलिन जॉर्जिअन असला तरी स्टॅलिनच्या कृष्णकृत्यामध्ये जॉर्जियन स्वतःहून मोठया संख्येने सहभागी होते असे माझ्या तरी वाचनात आलेले नाही.

जर्मनीत आजही नाझी विचारांचे लोक, म्हणजे स्वतःला सुप्रीम रेस मानणारे लोक आजही आहेत असे वाचलंय.>> तसेच holocaust मधले आकडे हे ज्यु लोकानी जागतिक सहानुभुती मिळवण्यासाठी फुगवलेले आहेत असे मानणारे पण भरपुर आहेत.

holocaust मधले आकडे हे ज्यु लोकानी जागतिक सहानुभुती मिळवण्यासाठी फुगवलेले आहेत असे मानणारे पण भरपुर आहेत.>>>

हे माहीत नव्हते.

मूळ लेख वाचला तेव्हाच पहिल्यांदा कळले की नृशंस संहार झाल्याच्या इतक्या खुणा त्या देशांमध्ये असतानाही हे काहीही झालेच नाही असे मानणारे लोकही तिथे आहेत. असे लोक ऑस्करच्या मित्रयादीत नसते तर तो निवांत स्वतःच्या घरात नैसर्गिकरित्या मृत्यू पावला असता. हे नाकारणारे लोक त्याच्या ओळखित होते, त्यांना हे खरेच आहे हे सांगण्यासाठी त्याने या विषयावरील मौन सोडले व त्यामुळे त्याचा शेवट तुरुंगातील इस्पितळात झाला.

आशुचाम्प, स्टॅलिन जॉर्जिअन असला तरी स्टॅलिनच्या कृष्णकृत्यामध्ये जॉर्जियन स्वतःहून मोठया संख्येने सहभागी होते असे माझ्या तरी वाचनात आलेले नाही.>>>>>
मला असं म्हणयाच नव्हत
फक्त परदेशात जन्मून कर्मभूमी वेगळी असणाऱ्या तत्कालीन लोकांमध्ये तो एक होता हे आठवलं म्हणून टाकलं होतं

तसेच holocaust मधले आकडे हे ज्यु लोकानी जागतिक सहानुभुती मिळवण्यासाठी फुगवलेले आहेत असे मानणारे पण भरपुर आहेत.>>>>>> भारतात पण आहेत असे
एक तर मराठीत ब्लॉग आहे
त्यात अचाट दावे केले आहेत की हिटलर कसा बदनाम केला गेला ते

https://truthseeker6145.wordpress.com/2016/01/

ही घ्या लिंक

Pages