बर्तन घिसींग.. ॲंड घिसींग..ॲंड घिसींग

Submitted by म्हाळसा on 6 October, 2020 - 11:23

तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..
पण आता भानूप्रतापचा पूर्ण हिरा ठाकूर झालायहो.. पूर्वी, सकाळी उठून फक्त माठभर प्यायचं पाणी भरत एकीकडे चहा टाकायचे बिचारे.. आता सासू उठण्यापूर्वी एकीकडे माठ, चहा आणि लगेहात रात्री घासलेली भांडीही जागच्या जागी ठेऊन देतात..बरं, ती भांडी रात्री त्यांनीच घासलेली असतात हे सांगायची गरज आहे का?..नुसता म्हणजे नुसता छळ चाललाय त्यांचा आणि ह्या सगळ्या कामाच्या मोबदल्यात त्यांची नाश्त्याची साधीसुधी मागणीही सहजासहजी पूर्ण होत नाही.. मागणी पण काय तर चमचाभर तूप सोडून बनवलेले फक्त ४-५ क्रिस्पी डोसे, त्याच्या सोबत फोडणी घालून बनवलेली दोनच वाट्या नारळाची चटणी.. बास..इतकं मिळाले तर सोबतीला असलेले इतर पदार्थ, जसं की लुसलूशीत ४-५ इडल्या आणि गरमागरम सांबार, ते अगदी कसलीही कुरकूर न करता खातात.. आता सांबार म्हटल्यावर एखाद-दुसऱ्या मेदू वड्याची मागणी केली तर कुठे काय बिघडतंय.. पण सासू मात्र ह्या माफक मागण्या तीच्या कपाटातल्या दोन सोन्याच्या पाटल्या मागितल्या सारखे भाव आणत पूर्ण करते.. आता बघा, एकीकडे वडे तळले जात असताना एखादीने न सांगता दुसऱ्या गॅसवर काॅफी चढवली असती..पण नाही..ते ही सासऱ्यांनाच सांगावं लागतं..आणि त्यावर काॅफी आवडल्यास “अर्धा कप अजून मिळेल का?” असं विचारायचीही सोय नाही.. जीथे घरी राहून लोकांची वजने ८-१० किलोने वाढलीएत तीथे सासऱ्यांच्या वजनात जेमतेम ५ चीच भर पडली आहे.. असो ..म्हणतात ना.. भगवान के घर देर है अंधेर नही ..
मी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.. सून ३ वर्षांनी आली म्हणून सुरवातीचे काही दिवस सासूने माझे जोरदार लाड पुरवले आणि सासऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले..माझ्याकडूनही छान भरलेल्या ताटाचे फोटो खाऊगल्लीच्या धाग्यावर टाकण्यात आले.. आणि शेवटी व्हायचं तेच झालं .. गाववालो, ये जो मायबोली है ना, मायबोली ..यहाके एक बुढ्ढे मामाने बिचमे भांजी मारके नजर लगादी..ॲंड तबसे मै किचन मे बर्तन घिसींग, ॲंड घिसींग ॲंड घिसींग.. (मानव आता तरी तुमचं वयं सांगा)

आता कालचीच गोष्ट घ्या.. तब्बल तीन वर्षांनी आम्ही बाप-लेक तंगड्या पसरून तारे जमीन पे बघत होतो .. आमचा आराम बघून लगेचच कुठूनतरी जळका वास येऊ लागला.. सासूने टेबलावर लाडू-चिवडा तर सोडा पण साधी चहा-काॅफी न ठेवता, ४ खोबऱ्याच्या वाट्या किसायला आणि किलोभर कांदे कापायला आणून दिले.. आम्हीही नाराजी व्यक्त न करता रात्री जेवायला कोंबडी असणार म्हणून कापायची कामगिरी झटपट पार पाडली .. पण एवढ्यावरंच समाधान मानेल ती सासू कसली.. एऱ्हवी तीचे जेवण बनवण्याची प्रोसेस फारच पद्धतशीर.. पद्धतशीर बोले तो.. उगाच एखादं जास्तीचं पातेलं, वाटी, चमचा ..काही म्हणजे काहीच धुवायला निघणार नाही.. वापरलेली भांडी तेव्हाच्या तेव्हा विसळून एक तर पुन्हा वापरली जातात किंवा जागच्या जागी ठेवली जातात..पण आता सून भांडी घासणार म्हणून कोरोनाच्या काळात धूळ खाऊन जाडजूड झालेले कपाटातले राखिव टोपही मैदानात उतरवले.. नाही नाही म्हणता दिवाळीची साफसफाई आत्तापासूनच सुरू झाल्याचा फील आला.. आमटीचा टोप, कुकरचे डबे, कणिक मळलेली परात, कोशिंबीरीचे भांडं, किसणी, चाकू, चमचे,कलथे .. हे सगळं जणू कमीच म्हणून शिजवलेलं जेवण डायनिंग टेबलावर मांडण्यासाठीची वेगळी भांडी आणि हे ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले..”आदमी पाच और बर्तन पचास..बहोत नाईंसाफी है” असं अगदी ओरडून बोलावसं वाटत होतं.. पण शेवटी “सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन” म्हणत सगळी भांडी खळखळून घासली,धुतली आणि पुसून ठेवली..
एनीवेज, वो सेर तो हम सवासेर.. उद्या माझा आणि सासऱ्यांचा एस्केप प्लॅन ठरलाय.. सासूची आणि कुंभकर्णाची रास एकच..म्हणून उद्या दुपारी ती झोपली रे झोपली की मुलींना नवऱ्यावर ढकलायचं, मास्क लावायचा, ग्लव्ह्ज चढवायचे, गाडीची चावी घ्यायची आणि भुर्र उडून जायचं.. थेट राम मारूती रोड गाठायचा, राजमाता वडापाव खायचा..तीथून उपवनला चक्कर टाकून वाटेत सासूसाठी थोडीशी चाफ्याची फुलं उचलून घरी आलं की सासू पण खिशात..त्यानंतर “आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही” असं टिळकांच्या शैलीत ठणकावून सांगायचं आणि सरळ खाली वाॅकसाठी निघून जायचं.. एवढा साधा सोप्पा प्लॅन आहे.. तो सक्सेसफुल होईल एवढीच आशा.

आजच्या साठी एवढंच .. तर मंडळी घासताय ना? असेच घासत रहा.. उप्स हसत रहा.. चला हवा येऊ द्या
.
.
.
लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला Happy

Group content visibility: 
Use group defaults

तुमच्याकडे कोणीतरी आजारी आहे ना? कसे आहेत ते?>> हो..सासरी आणि माहेरी..दोन्हीकडे एक एक पेशंट आहे. त्यामुळेच ही ट्रिप जरा हेक्टिकच आहे. दोघेही रिकव्हर होत आहेत. आणि आम्ही आल्यामुळे दोन्ही पेशंट्स फार खूष आहेत..विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद Happy

छान लिहीलेय.
जे कोणी पेशंट आहेत त्यांची व स्वतःचीही तितकीच काळजी घ्या.

छान लिहिता तुम्ही.
अवांतर :भारतात जाताना काही प्रॉब्लेम नाही ना आला. पूर्ण वेळ मास्क लावला होता काय? फ्लाइट मध्ये कसे मॅनेज केले, तुमच्याकडे छोटी पिल्लं दिसतायेत म्हणुन विचारतेय. आम्हीही जाण्याचा विचार करत होतो, पण हिम्मत होत नाहिये.

हो..सासरी आणि माहेरी..दोन्हीकडे एक एक पेशंट आहे. त्यामुळेच ही ट्रिप जरा हेक्टिकच आहे. दोघेही रिकव्हर होत आहेत. आणि आम्ही आल्यामुळे दोन्ही पेशंट्स फार खूष आहेत..विचारपूस केल्याबद्दल धन्यवाद Happy

Submitted by म्हाळसा on 7 October, 2020 - 06:45

तुझी विनोदबुद्धी कमाल आहे अशीच ठेव! Bw

खूप हसले. मस्त लिहिलं आहे.
डाएट रेसिपी, उपवासाचे पदार्थ असतात तशा कमी भांड्यांत होणार्या पाककृती अशी पाकशास्त्राची वेगळी शाखा विकसित झाली पाहिजे

अवांतर :भारतात जाताना काही प्रॉब्लेम नाही ना आला. पूर्ण वेळ मास्क लावला होता काय? फ्लाइट मध्ये कसे मॅनेज केले, तुमच्याकडे छोटी पिल्लं दिसतायेत म्हणुन विचारतेय. आम्हीही जाण्याचा विचार करत होतो, पण हिम्मत होत नाहिये. >>>
@ट्युलिप
खरं तर मी,नवरा आणि दोन्ही मुली असे सगळेच एकत्र भारतात येणार होतो पण तुम्ही म्हणालात तशी माझीही हिम्मत होत नव्हती आणि मग आयत्या वेळेस मुलींचं आणि माझं तिकीट रद्द करून नवऱयाला एकटंच पुढे पाठवलं. पण नंतर बाबांची तब्येत फारच बिघडली आणि मुलींसोबत एकटं ट्रॅव्हल करण्याशिवाय पर्याय नव्हता.. फ्लाईटचा माझा अनुभव चांगला होता. रिकामी फ्लाईट असल्यामुळे मुली छान झोपून आल्या..त्यांना घरीच दोन दिवस मास्क घालायची सवय केली होती तरी २,४ अशी त्यांची वये म्हणून मास्क ठेवतीलच ह्याची गॅरेंटी कमी होती.. मग त्याच्या सगळ्या आवडीच्याच वस्तू आणि खाणं त्यांना लालूच दाखवण्याचे सगळे पर्याय ओपन ठेवले.. त्यांनी जवळजवळ २१ तास मास्क घालून ठेवलं फक्त खाताना मास्क काढला पण त्यासाठी माझा पूर्ण कस लागला.
माझा “भारतात ट्रॅव्हल करण्याविषयीचा“ धागा बघा.. मी डिटेंल्स टाकलेत.
https://www.maayboli.com/node/76778

काहीही हं.. ते पुडींग करायचं अजून राहीलंय बघा. >> आहे, आहे, माझ्या लक्षात आहे. थोडा वेळ द्या मला . आमच्या तज्ञ बायला बाय इन करण्यासाठी. रिसोर्सेस त्यांच्या ताब्यात असतात ना. Happy

लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला Happy

नाही, कुंजविहारचा वडापाव जास्त छान असतो.
पण खरेतर दोघांचे तुलना नाही होऊ शकत. पण चटकदार तर कुंजचाच आहे , मग गजानन अन मग राजमाता.
पण अर्थात आवड आपली आपली

<<हो, पण आमंत्रण हॉटेलची मिसळ पण भारी लागते, सेम चव>>

VB, आमंत्रण हाॅटेल हे मामलेदार वाल्या लक्ष्मण शेठचंच आहे.
मामलेदार मिसळ हा ब्रँड म्हणून mouth to mouth publicity ने उच्चभ्रू वर्गात एस्टॅब्लिश व्हायला लागला आणि त्यांना तहसिलदार ऑफिसमधे रांग लावून खाणं अवघड वाटत होतं, त्यासाठी जवळच आमंत्रण हाॅटेलची सोय केली गेली.

मी मामलेदारांची मिसळ बऱयाचदा खाल्ली आहे.. मला आवडते ती.. पण डोंबिवलीची मूनमून मिसळ ॲाल टाईम फेवरेट
एनिवेज, माझ्या चेकलिस्ट मधे ही दोन्ही ठिकाणं आहेत Happy

निरु, आमंत्रण अन मामलेदार चव सारखीच आहे हे माहीत होते पण मालक एकच आहे हे माहीत नव्हते.

रच्याकने, डोंबिवलीत मूनमून मिसळ कुठे मिळते? मी ईस्टला थोडीफार फिरलीये अन मैत्रिणी पण आहेत तिथल्या

Ok

वेस्ट ला गेले नाहीये कधी, आता कधी गेले डोंबिवलीला तर बघते जमले तर

वेस्ट ला गेले नाहीये कधी, आता कधी गेले डोंबिवलीला तर बघते जमले तर>> डोंबिवली वेस्टला स्टेशनपासून अगदी दोन मिनीटांवरच आहे.. रविवारी बंद असतं, इतर दिवशी संध्याकाळी फक्त दोनच तास ओपन असतं, तीथे जाताना सुट्टे पैसेच न्हावे.मिसळ तिखट लागल्यास पाणी मागू नये .. एकंदरीत पुणे पण उणे पडेल असं वातावरण असतं तीथे.. आपण किती लाचारी आहोत हे बघायचं असेल तर तीथे जाऊन मिसळ खावी.. पण मिसळ एक नंबरची मिळते Happy

धन्यवाद म्हाळसा, वाचते तो धागा. बाकी तुम्ही pandemic मध्ये दोन्ही मुलींना घेऊन एकट्याने प्रवास केलात, ग्रेट आणि 21 तास मास्क घालणाऱ्या तुमच्या मुली अजून ग्रेट. मला स्वतःला 1 तासापेक्षा जास्त वेळ मास्क नको होतो.

कुंजविहारकडे सडक्या बटाट्याची पोती सापडली होती. तो सडके बटाटे वापरायचा म्हणून त्याला बंद केला होता पूर्वी. आताचे माहित नाही.

छान! डिशेश माझंच काम आहे रोजचं!
कुंजविहार चालू आहे ना!
राजमातापेक्षा गजानन किंवा श्रद्धाचा वडापाव चांगला असतो. सगळ्यात बेस्ट गडकरीचा!
डोंबिवली वेस्टला गेला नाहीत त्यात काहीच नवल नाही. कोणीच जात नाही तिकडे! Proud मुनमुन मिसळच्या त्या आजी वारल्या असं वाचलं. म्हणजे आता जरा बरी ट्रीटमेंट मिळायला वाव आहे तिकडे! Wink

Pages