बर्तन घिसींग.. ॲंड घिसींग..ॲंड घिसींग

Submitted by म्हाळसा on 6 October, 2020 - 11:23

तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..
पण आता भानूप्रतापचा पूर्ण हिरा ठाकूर झालायहो.. पूर्वी, सकाळी उठून फक्त माठभर प्यायचं पाणी भरत एकीकडे चहा टाकायचे बिचारे.. आता सासू उठण्यापूर्वी एकीकडे माठ, चहा आणि लगेहात रात्री घासलेली भांडीही जागच्या जागी ठेऊन देतात..बरं, ती भांडी रात्री त्यांनीच घासलेली असतात हे सांगायची गरज आहे का?..नुसता म्हणजे नुसता छळ चाललाय त्यांचा आणि ह्या सगळ्या कामाच्या मोबदल्यात त्यांची नाश्त्याची साधीसुधी मागणीही सहजासहजी पूर्ण होत नाही.. मागणी पण काय तर चमचाभर तूप सोडून बनवलेले फक्त ४-५ क्रिस्पी डोसे, त्याच्या सोबत फोडणी घालून बनवलेली दोनच वाट्या नारळाची चटणी.. बास..इतकं मिळाले तर सोबतीला असलेले इतर पदार्थ, जसं की लुसलूशीत ४-५ इडल्या आणि गरमागरम सांबार, ते अगदी कसलीही कुरकूर न करता खातात.. आता सांबार म्हटल्यावर एखाद-दुसऱ्या मेदू वड्याची मागणी केली तर कुठे काय बिघडतंय.. पण सासू मात्र ह्या माफक मागण्या तीच्या कपाटातल्या दोन सोन्याच्या पाटल्या मागितल्या सारखे भाव आणत पूर्ण करते.. आता बघा, एकीकडे वडे तळले जात असताना एखादीने न सांगता दुसऱ्या गॅसवर काॅफी चढवली असती..पण नाही..ते ही सासऱ्यांनाच सांगावं लागतं..आणि त्यावर काॅफी आवडल्यास “अर्धा कप अजून मिळेल का?” असं विचारायचीही सोय नाही.. जीथे घरी राहून लोकांची वजने ८-१० किलोने वाढलीएत तीथे सासऱ्यांच्या वजनात जेमतेम ५ चीच भर पडली आहे.. असो ..म्हणतात ना.. भगवान के घर देर है अंधेर नही ..
मी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.. सून ३ वर्षांनी आली म्हणून सुरवातीचे काही दिवस सासूने माझे जोरदार लाड पुरवले आणि सासऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले..माझ्याकडूनही छान भरलेल्या ताटाचे फोटो खाऊगल्लीच्या धाग्यावर टाकण्यात आले.. आणि शेवटी व्हायचं तेच झालं .. गाववालो, ये जो मायबोली है ना, मायबोली ..यहाके एक बुढ्ढे मामाने बिचमे भांजी मारके नजर लगादी..ॲंड तबसे मै किचन मे बर्तन घिसींग, ॲंड घिसींग ॲंड घिसींग.. (मानव आता तरी तुमचं वयं सांगा)

आता कालचीच गोष्ट घ्या.. तब्बल तीन वर्षांनी आम्ही बाप-लेक तंगड्या पसरून तारे जमीन पे बघत होतो .. आमचा आराम बघून लगेचच कुठूनतरी जळका वास येऊ लागला.. सासूने टेबलावर लाडू-चिवडा तर सोडा पण साधी चहा-काॅफी न ठेवता, ४ खोबऱ्याच्या वाट्या किसायला आणि किलोभर कांदे कापायला आणून दिले.. आम्हीही नाराजी व्यक्त न करता रात्री जेवायला कोंबडी असणार म्हणून कापायची कामगिरी झटपट पार पाडली .. पण एवढ्यावरंच समाधान मानेल ती सासू कसली.. एऱ्हवी तीचे जेवण बनवण्याची प्रोसेस फारच पद्धतशीर.. पद्धतशीर बोले तो.. उगाच एखादं जास्तीचं पातेलं, वाटी, चमचा ..काही म्हणजे काहीच धुवायला निघणार नाही.. वापरलेली भांडी तेव्हाच्या तेव्हा विसळून एक तर पुन्हा वापरली जातात किंवा जागच्या जागी ठेवली जातात..पण आता सून भांडी घासणार म्हणून कोरोनाच्या काळात धूळ खाऊन जाडजूड झालेले कपाटातले राखिव टोपही मैदानात उतरवले.. नाही नाही म्हणता दिवाळीची साफसफाई आत्तापासूनच सुरू झाल्याचा फील आला.. आमटीचा टोप, कुकरचे डबे, कणिक मळलेली परात, कोशिंबीरीचे भांडं, किसणी, चाकू, चमचे,कलथे .. हे सगळं जणू कमीच म्हणून शिजवलेलं जेवण डायनिंग टेबलावर मांडण्यासाठीची वेगळी भांडी आणि हे ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले..”आदमी पाच और बर्तन पचास..बहोत नाईंसाफी है” असं अगदी ओरडून बोलावसं वाटत होतं.. पण शेवटी “सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन” म्हणत सगळी भांडी खळखळून घासली,धुतली आणि पुसून ठेवली..
एनीवेज, वो सेर तो हम सवासेर.. उद्या माझा आणि सासऱ्यांचा एस्केप प्लॅन ठरलाय.. सासूची आणि कुंभकर्णाची रास एकच..म्हणून उद्या दुपारी ती झोपली रे झोपली की मुलींना नवऱ्यावर ढकलायचं, मास्क लावायचा, ग्लव्ह्ज चढवायचे, गाडीची चावी घ्यायची आणि भुर्र उडून जायचं.. थेट राम मारूती रोड गाठायचा, राजमाता वडापाव खायचा..तीथून उपवनला चक्कर टाकून वाटेत सासूसाठी थोडीशी चाफ्याची फुलं उचलून घरी आलं की सासू पण खिशात..त्यानंतर “आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही” असं टिळकांच्या शैलीत ठणकावून सांगायचं आणि सरळ खाली वाॅकसाठी निघून जायचं.. एवढा साधा सोप्पा प्लॅन आहे.. तो सक्सेसफुल होईल एवढीच आशा.

आजच्या साठी एवढंच .. तर मंडळी घासताय ना? असेच घासत रहा.. उप्स हसत रहा.. चला हवा येऊ द्या
.
.
.
लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला Happy

Group content visibility: 
Use group defaults

मुनमुनपण मामलेदारकडून येते असं ऐकल आहे मी. त्या आज्जी तिथल्या नाहीत आता.

डोंबिवली वेस्टला गेला नाहीत त्यात काहीच नवल नाही. कोणीच जात नाही तिकडे! >>> खरं आहे Lol

वेस्टला मी स्टेशनजवळ टायपिंग क्लासमधे दोन वर्ष रोज जायचे आणि काकू, दोन चुलतबहिणी तेव्हा वेस्टला राहायच्या म्हणून जाणे व्हायचं. कधी रेशनिंग कामासाठी जाणे व्हायचं.

नाहीतर आमचा डोंबिवली पूर्व म्हणजे इस्ट एरिया झिंदाबाद Lol

पुण्यात आलात तर आमचा सारंग सोसायटीतला श्रीकृष्ण वडापाव खा. ते काका गर्दीत सुट्टे द्यायला लागू नये म्हणून राउंड ऑफ करुन एखादा वडा आणि पाव जास्त घ्यायला लावतात Happy अर्थात वडे मस्त असल्याने कोणी यावर हरकत घेताना पाहिले नाहीये.
पिंपळे सौदागर ला आल्यास इन्डियन ऑइल पंप आबाचा ढाबा च्या बाहेर साहिल वडापाव आणि कुणाल आयकॉन रोडवर सीसीडी समोर भैरुनाथ पावभाजी.

कुंजविहार मध्ये वडापाव बरोबर लस्सी पण खुप छान मिळायची.
मामलेदारची मिसळ पण मस्त. ह्या दोन्ही ठिकाणी भेट देउन २५ पेक्षा जास्त वर्ष झाली पण चव आजुनही लक्षात आह्रे.
आमंत्रण मध्ये गेल्याचे आठवत नाही त्यावेळी कदाचीत नसेल

साहिल, कुंज विहारची लस्सी पण छान लागते तरी त्यात मैदा जास्त असतो असे वाटते त्या दाटपणामुळे.
तुम्हीजर २५ वर्षांपुर्वी तिथला वडापाव अन तहसिलदार मिसळ खाल्ली असेल तर आताची चव खुप बदलले. गेल्या १०-१५ वर्षांतच खुप फरक पडला आहे चवीत, खासकरुन कुंजच्या वड्याच्या चवित, पण तरिही बेस्ट आहे.

अंजुताई, डोंबिवली ईस्ट स्टेशनबाहेर खुप भटकलो आहोत आम्ही, खुप गर्दी असते तिकडे नेहमी. वेस्टला नाही गेले अजुन

मस्त लिहिलंय.
आम्ही पण घिसिंग अ‍ॅन्ड घिसिंग!

अनु, सारंग सोसायटीच्या खालच्या बाजूला मेन रोडवर एक कट डोशाची गाडी असायची तिथला डोसा खाल्लायस का? कट डोसा चवीला छान असायचाच, पण तो कट डोसा करण्याची त्याची कृतीपण प्रेक्षणीय असायची.
आता हे फारच अवांतर चाललंय. सॉरी म्हाळसा Happy

अवांतर चालू
नाही खाल्ली. परत कधी त्या एरियात जाता आलं तर खाईन Happy
अवांतर समाप्त

म्हाळसा घरातल्या सर्व पेशंटस ना लवकर बरं वाटू दे.

@ अनुताई,
सौदागर मध्ये साहिल वडापाव टेस्ट चांगली आहे पण छोट्याश्या जागेत फारशी स्वच्छता वगैरे पाळत नाही. त्या मालकाची मज्जा म्हणजे त्याचे गुगल पे अकाऊंट बायकोच्या नावावर होते आणि त्यासाठी तो कॅश द्या म्हणायचा. आणि तरी गुगल पे केले की बायकोला फोन करून कन्फर्म करायचा. घराच्या सर्वात जवळ हाच वडापाव असलेने ओके म्हणतो झाले.
थोडेसे पुढे जाऊन महादेव मंदिराच्या कोपऱ्यावर एक गाडा असायचा त्याचाही वडापाव बराच म्हणायचा.
कुठलाही वडापाव खाल्ला तरी बायको शेवटी गार्डन वडापाव भारी म्हणते. ्च््च्च्््च््च्च््च््च््््च््च्च्््च

मी_अनु , ते श्रीकृष्ण वाले खत्रूड काका आणि माझा खत्रूड नवरा कचाकचा भांडले आहेत त्या राऊंड ऑफ वरून Lol
@वावे , मी खाल्लाय तो कट डोसा

व्हय
अश्या गोष्टी खाताना 'अग्नी ने प्रक्रिया झालेलं ते शुद्ध Happy ' असं म्हणायचं आणि डोळे झाकून घ्यायचे. )त्या हायजिन इन्स्पेक्टर ला डेट केलेल्या फीबी सारखं: तू आम्हाला आवडनार्‍या प्रत्येक खाण्याच्या जागा अनहायजिनीक म्हणून बंद करत राहीलास तर आम्ही खायचं कुठे?)

मूनमूनफेम आजी गेल्या तरी मुलगा त्यांच्या तालमीत तयार झालाय बरं Wink अगदी तितका झटका नसेल आता पण तरी झटका आहे :-D. सध्या सुरु आहे की लॉकडाऊनमुळे बंद आहे अजून कल्पना नाही.

@अंजू डोंबिवलीच बेस्ट है अपनी इस्ट हो या वेस्ट Wink डास हो या लोड शेडींग खड्डे हो या पानी कम. है तो है बेस्ट Lol

आम्ही डोंबिवली सोडल्यानंतर एकदा विकेंडला तिथली काही कामं करुन उशीरा परत निघाले होते. एकटीच होते. मी डोंबिवलीत असताना जिथून भाजी घ्यायचे त्या मावशी ठाण्याला घरी जायला निघाल्या होत्या. योगायोगाने एकाच ट्रेनला भेटलो. लांबून मला बघून आत आल्या आणि म्हणाल्या, "बाय माझे दिसत नाही आजकाल. रागावली काय मावशीवर"
शिफ्ट झाल्याच कळल्यावर मला त्यांच्याकडची घरी न्यायला ठेवलेली भाजी थोडी पिशवीत भरुन दिली. पैसेही नाही घेतले वर म्हणे मावशीची आठवण म्हणून घे. आता सांग असे अनुभव आले की का नाही म्हणायचे डोंबिवली बेस्ट Happy

मूनमूनफेम आजी गेल्या तरी मुलगा त्यांच्या तालमीत तयार झालाय बरं Wink >> अगदी.. लहानपणापासूनच आज्जीने मुलाला दिलेली तालिम प्रत्येक खेपेला बघितली आहे.. लग्नानंतर नवऱयालाही एकदा आज्जींचं दर्शन घडवायला नेलं होतं..
काहीही म्हणा, बिजनेस करावा तर मूनमूनवाल्या आज्जीसारखा

डोंबिवलीच बेस्ट है अपनी इस्ट हो या वेस्ट Wink डास हो या लोड शेडींग खड्डे हो या पानी कम. है तो है बेस्ट >> जीयो मेरी जान

लग्नानंतर नवऱयालाही एकदा आज्जींचं दर्शन घडवायला नेलं होतं..>> आम्ही दोघेही डोंबिवलीचेच. त्यामुळे कोणी कोणाला नेलं नाही पण गणपतीच्या मंदिरात जसं साखरपुडा झाल्यावर हजेरी लावण्याची पद्धत आहे तसच एक रिवाज त्यांच्या मिसळीला भेट देण्याचा असल्याने तो मात्र पाळला आम्ही Lol

नवरा आणि त्या दोघे डोंबिवली वेस्टचे. त्यातून सासरच्या अख्ख्या खानदानाचं त्यांच्याकडे खातं उघडलेलं त्यामुळे त्या कायम त्याला झुकतं माप द्यायच्या आणि माझ्यावर नेहमी सासुगिरी करायच्या Lol माझी मिसळ आधी खाऊन झाली आणि मी पैसे किती झाले विचारले तर चक्क टोटल दुर्लक्ष करायच्या आणि त्याचं खाऊन झाल्यावर त्यालाच पैसे सांगायच्या. माझ्याकडून पैसे अजिबात घ्यायच्या नाहीत. त्याच्या हातून मात्र लगेच घ्यायच्या. Lol

>> सारंग सोसायटीच्या खालच्या बाजूला मेन रोडवर एक कट डोशाची गाडी असायची

कल्पना Happy खूप मस्त मिळतो तिथे. आता माहीत नाही. पण पूर्वी ते खूप प्रसिद्ध होते.

हा लेख वाचून भांडी घासताना स्वतःचा अभिमान वाटू लागला आहे Happy Proud
नवीन Submitted by किल्ली on 9 October, 2020 - 03:48 >>
किल्ली, काय सांगू तुला.. हा लेख लिहील्यापासून दोन घरची भांडी घासावी लागताएत.. सकाळी डोंबिवलीला आईकडे आणि दुपारनंतर सासरी

ओह!
एखादं।motivating गाणं रचावं लागेल बहुतेक

कोकणे चौक चौपाटीकडून snbp शाळेकडे जाताना, हैद्राबाद house साठी वळतो त्या कोपऱ्यावर संध्याकाळी 4,5 तास एक लाल हातगाडी लागते. कायम गरम समोसे आणि वडापाव... सामोस्यांची खरपूस कड तिथं येते तशी अख्ख्या जगात कुठेच नाही!

ओह!
एखादं।motivating गाणं रचावं लागेल बहुतेक>> बघा हे चालतय का

घास गं भांडी, कशी मी घासू?
या घरचा, त्या घरचा
ढिग हा जमला, विमही संपला
कशी मी घासू?
घास गं भांडी

या घरचा, त्या घरचा
ओटाही छोटा, उंचीचा तोटा
कशी मी घासू?
घास गं भांडी

या घरचा, त्या घरचा
मदतनीसही हरला
कशी मी घासू?
घास गं भांडी

धू बाई धू वाटी चमचे
चमकवून टाक ताटाळं आमचे
गाडी बाई गाडी चारचाकी गाडी
स्टेशनावर वाट पाहे वडापावची गाडी

एकच no कविन Happy
हे गाणं गातभांडी घासणाऱ्या म्हाळसा देवी नजरेसमोर आल्या Wink

कट डोशाची गाडी असायची

कल्पना Happy खूप मस्त मिळतो तिथे. आता माहीत नाही. पण पूर्वी ते खूप प्रसिद्ध होते.

Submitted by atuldpatil on 9 October, 2020 - 13:14>>
हो का? नाव कल्पना होतं हे माझ्या लक्षात नव्हतं. तळजाईला टेकडीवर जाऊन आल्यानंतर हमखास तो कट डोसा खायचो आम्ही. त्याच्यासोबत मिळणारी चटणीही छान असायची.

Pages