बर्तन घिसींग.. ॲंड घिसींग..ॲंड घिसींग

Submitted by म्हाळसा on 6 October, 2020 - 11:23

तुम्हाला सांगते, या सासू लोकांना त्यांच्या नवऱ्यांना आणि सूनांना छळायला काहीही निमित्त चालतं.. कोरोनामुळे तसंही सासूने कामवालीला कल्टी देऊन, तीला दिल्या जाणाऱ्या पगाराचे पैसे भिशीत फिरवून माझ्या साध्याभोळ्या सासऱ्यांना कामाला जुंपलंय.. कोरोना येण्यापूर्वी काय रूबाब असायचा त्यांचा म्हणून सांगू..अगदी ठाकूर भानुप्रतापच..जागेवर बसून फक्त चहाची ॲार्डर सोडायची आणि घरकामात मदत मागितली की लगेचच स्कुटीला टांग मारून भाजी आणायच्या नावाखाली अख्खं ठाणं पछाडून यायचं..
पण आता भानूप्रतापचा पूर्ण हिरा ठाकूर झालायहो.. पूर्वी, सकाळी उठून फक्त माठभर प्यायचं पाणी भरत एकीकडे चहा टाकायचे बिचारे.. आता सासू उठण्यापूर्वी एकीकडे माठ, चहा आणि लगेहात रात्री घासलेली भांडीही जागच्या जागी ठेऊन देतात..बरं, ती भांडी रात्री त्यांनीच घासलेली असतात हे सांगायची गरज आहे का?..नुसता म्हणजे नुसता छळ चाललाय त्यांचा आणि ह्या सगळ्या कामाच्या मोबदल्यात त्यांची नाश्त्याची साधीसुधी मागणीही सहजासहजी पूर्ण होत नाही.. मागणी पण काय तर चमचाभर तूप सोडून बनवलेले फक्त ४-५ क्रिस्पी डोसे, त्याच्या सोबत फोडणी घालून बनवलेली दोनच वाट्या नारळाची चटणी.. बास..इतकं मिळाले तर सोबतीला असलेले इतर पदार्थ, जसं की लुसलूशीत ४-५ इडल्या आणि गरमागरम सांबार, ते अगदी कसलीही कुरकूर न करता खातात.. आता सांबार म्हटल्यावर एखाद-दुसऱ्या मेदू वड्याची मागणी केली तर कुठे काय बिघडतंय.. पण सासू मात्र ह्या माफक मागण्या तीच्या कपाटातल्या दोन सोन्याच्या पाटल्या मागितल्या सारखे भाव आणत पूर्ण करते.. आता बघा, एकीकडे वडे तळले जात असताना एखादीने न सांगता दुसऱ्या गॅसवर काॅफी चढवली असती..पण नाही..ते ही सासऱ्यांनाच सांगावं लागतं..आणि त्यावर काॅफी आवडल्यास “अर्धा कप अजून मिळेल का?” असं विचारायचीही सोय नाही.. जीथे घरी राहून लोकांची वजने ८-१० किलोने वाढलीएत तीथे सासऱ्यांच्या वजनात जेमतेम ५ चीच भर पडली आहे.. असो ..म्हणतात ना.. भगवान के घर देर है अंधेर नही ..
मी लगेचच त्यांच्या मदतीसाठी धाऊन आले.. सून ३ वर्षांनी आली म्हणून सुरवातीचे काही दिवस सासूने माझे जोरदार लाड पुरवले आणि सासऱ्यांनीही वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले..माझ्याकडूनही छान भरलेल्या ताटाचे फोटो खाऊगल्लीच्या धाग्यावर टाकण्यात आले.. आणि शेवटी व्हायचं तेच झालं .. गाववालो, ये जो मायबोली है ना, मायबोली ..यहाके एक बुढ्ढे मामाने बिचमे भांजी मारके नजर लगादी..ॲंड तबसे मै किचन मे बर्तन घिसींग, ॲंड घिसींग ॲंड घिसींग.. (मानव आता तरी तुमचं वयं सांगा)

आता कालचीच गोष्ट घ्या.. तब्बल तीन वर्षांनी आम्ही बाप-लेक तंगड्या पसरून तारे जमीन पे बघत होतो .. आमचा आराम बघून लगेचच कुठूनतरी जळका वास येऊ लागला.. सासूने टेबलावर लाडू-चिवडा तर सोडा पण साधी चहा-काॅफी न ठेवता, ४ खोबऱ्याच्या वाट्या किसायला आणि किलोभर कांदे कापायला आणून दिले.. आम्हीही नाराजी व्यक्त न करता रात्री जेवायला कोंबडी असणार म्हणून कापायची कामगिरी झटपट पार पाडली .. पण एवढ्यावरंच समाधान मानेल ती सासू कसली.. एऱ्हवी तीचे जेवण बनवण्याची प्रोसेस फारच पद्धतशीर.. पद्धतशीर बोले तो.. उगाच एखादं जास्तीचं पातेलं, वाटी, चमचा ..काही म्हणजे काहीच धुवायला निघणार नाही.. वापरलेली भांडी तेव्हाच्या तेव्हा विसळून एक तर पुन्हा वापरली जातात किंवा जागच्या जागी ठेवली जातात..पण आता सून भांडी घासणार म्हणून कोरोनाच्या काळात धूळ खाऊन जाडजूड झालेले कपाटातले राखिव टोपही मैदानात उतरवले.. नाही नाही म्हणता दिवाळीची साफसफाई आत्तापासूनच सुरू झाल्याचा फील आला.. आमटीचा टोप, कुकरचे डबे, कणिक मळलेली परात, कोशिंबीरीचे भांडं, किसणी, चाकू, चमचे,कलथे .. हे सगळं जणू कमीच म्हणून शिजवलेलं जेवण डायनिंग टेबलावर मांडण्यासाठीची वेगळी भांडी आणि हे ही जणू कमीच म्हणून उरलेलं अन्न फ्रिजमधे काढून ठेवण्यासाठी वापरलेले डबे.. काय रे देवा हे सगळे चोचले..”आदमी पाच और बर्तन पचास..बहोत नाईंसाफी है” असं अगदी ओरडून बोलावसं वाटत होतं.. पण शेवटी “सुहागनके सीर का ताज होता है एक बकेट बर्तन” म्हणत सगळी भांडी खळखळून घासली,धुतली आणि पुसून ठेवली..
एनीवेज, वो सेर तो हम सवासेर.. उद्या माझा आणि सासऱ्यांचा एस्केप प्लॅन ठरलाय.. सासूची आणि कुंभकर्णाची रास एकच..म्हणून उद्या दुपारी ती झोपली रे झोपली की मुलींना नवऱ्यावर ढकलायचं, मास्क लावायचा, ग्लव्ह्ज चढवायचे, गाडीची चावी घ्यायची आणि भुर्र उडून जायचं.. थेट राम मारूती रोड गाठायचा, राजमाता वडापाव खायचा..तीथून उपवनला चक्कर टाकून वाटेत सासूसाठी थोडीशी चाफ्याची फुलं उचलून घरी आलं की सासू पण खिशात..त्यानंतर “आम्ही आज जेवणार नाही, आम्ही भांडी घासणार नाही” असं टिळकांच्या शैलीत ठणकावून सांगायचं आणि सरळ खाली वाॅकसाठी निघून जायचं.. एवढा साधा सोप्पा प्लॅन आहे.. तो सक्सेसफुल होईल एवढीच आशा.

आजच्या साठी एवढंच .. तर मंडळी घासताय ना? असेच घासत रहा.. उप्स हसत रहा.. चला हवा येऊ द्या
.
.
.
लोकहो, तुमच्यापैकी काही जणांनी एस्केप प्लॅन सक्सेसफुल झाल्यावर इथे अपडेट करा म्हणून सांगितलेलं .. जास्त उत्सुकता ताणून न धरता आता सांगते.. त्याचं झालं काय की आमचा एस्केप प्लॅन हायजॅक करण्यात आला.. कधी कधी लेख इंटरेस्टिंग बनवण्यासाठी मी बऱ्याचदा कोणाचा न कोणाचा बळी देते.. ह्या धाग्यात सासूचा द्यावा लागला.. पण तशी माझी सासू जितकी कणखर तितकीच जीव लावणारी आहे त्यामुळे मी आणि माझे सासरे, तीला एकटं टाकून मजा मारण्या इतके स्वार्था नक्कीच नाही आहोत.. म्हणून नवऱ्याला ॲार्डर सोडली “चला गाडी काढा, तुमच्या मातेला घेऊन राजमातेत वडापाव खायचाय” .. मग काय, त्याने गाडी काढली, मला, मुलींना, सासू सासऱ्यांना गाडीत टाकलं आणि गेलो वडापाव खायला. झणझणीत वडापाव खाऊन तोंड गोड करण्यासाठी प्रशांत काॅर्नर मधून चार-पाच मिठाया उचलल्या आणि सोसायटीच्या गार्डनमधे बसून संपवल्या.
अंत भला तो सब भला Happy

Group content visibility: 
Use group defaults

कवे हो गं, अपनी डोंबिवली बेस्टच. ती आहेच तशी म्हणून तर मी १४ वर्षाच्या वनवासानंतर परत डोंबिवलीत आले.

भाजीवाली मावशी अनुभव गोड.

माझ्यावर नेहमी सासुगिरी करायच्या >>> Lol

कवे कविता बेस्टच.

म्हाळसा किचन फोटो मस्त.

Motivational song - ये बर्तन तो प्यार का बंधन है, जन्मोंका संगम है ...... Lol
किचन मस्त आहे.

(भांडे हातात घेऊन)
ये बर्तन है... इस बर्तन का...

(भांडे घासताना...)
यही है, यही है, यही है...

(घासून झाल्यावर...)
यही है.... रंगरूप

Motivational song -
टण टणा टण ट्ण ट्ण टारा, घिसती है क्या नौ से बारा...
विम लगा के तूने मारा, घायल हो गया ग्रीज बेचारा...
सुना है तेरे बर्तन इतने... आगे द्स है पीछे बारा...
एक बार से दिल नही भरता.. घिसके देख इसे दोबारा...

एक ठाण्याची एक डोंबिवलीची असेल.>> सही जवाब Happy
सकाळी डोंबिवलीची आणि रात्री ठाण्याची भांडी घासते

सीमंतिनी- Motivational song एकदम जबरी

देवकी, अतुलदा, सिमांतिनी Rofl
आता घरी गेले कि टण टणा टण ट्ण ट्ण टारा.....असं नाचतच भांडी घासेन..आधी फक्त इयरफोन कानात घालून गाणी ऐकत घासायचे.आता विथ 'बर्तन घसो मोटिवेशनल गाणी'... Lol

सारंग ला आता मोठी रांग असते हातगाड्यांची.. सुरुवातीला (९४-९५) फक्त तीन गाड्या असायच्या तिथे - हा कट डोसे वाला, कच्छी दाबेली वाला आणि एक सँडविच वाला.

@सान्वी, माझ्याकरता तरी जुन्या आठवणीच या सध्या Lol अजून तरी बाहेरचे खाणे सुरु नाही केलेय

लोकहो, तुम्ही बाहेरचं खाणं चालू केलंय का करोना काळात?

नाही ओ सान्वीतै. लोकं "पुर्वीच पुणं राहिलं नाही !!!" च्या चालीवर जुनं आठवुन आठवुन उसासे टाकत व्हर्च्युअली लाळ गाळत आहेत.

बाहेरून आणुन जे धुता येत नाही किंवा तीन दिवस वेगळे ठेऊन मग खाता येत नाही असे बाहेरचे खाणे सुरू केले नाहीय.

तुम्ही बाहेरचं खाणं चालू केलंय का करोना काळात? >> खरं सांगू तर आम्ही अमेरीकेत असे पर्यंत कोरोनाच्या काळातही बाहेरचं खाणं म्हणजे रेस्टाॅरंट मधून टेकआऊट्स चालूच ठेवलं होतं.. फक्त घरी आणल्यावर सगळे डबे सॅनिटाईज करून घ्यायचो. इथेही मी ठाण्यातल्या प्रशांत काॅर्नरमधून भरमसाट गोष्टी आणते कारण मला वाटतं ते सगळे प्रोटोकाॅल्स फाॅलो करत आहेत. ह्या सगळ्याला अपवाद म्हणजे एकदाच राजमातेतला वडापाव खाल्ला. मग घरी येऊन वाफ घेतली Happy
जर कोणीच बाहेरचं खाणार नाही तर ह्या छोट्या उद्योजकांनी जायचं कुठं? म्हणून झेपेल तेव्हढा हातभार लावणार Happy

इथेही मी ठाण्यातल्या प्रशांत काॅर्नरमधून भरमसाट गोष्टी आणते >>>

प्रशांत कॉर्नर्स मधून हल्ली नवरा आणि बँकेतले लोकं मागवतात snacks वगैरे. जास्त करून तो एखादी मिठाई आणि शाही कचोरी मागवतो आणि घरी घेऊन येतो. एकदा शाही सामोसे आणलेले, खरंतर सारण छान होतं पण त्यात गोड बेदाणे बघून जीव कळवळला माझा Wink , एकवेळ काजू ok पण बेदाणे. अर्थात ते काजू, बेदाणे सर्व बाजूला काढून नवऱ्याला देऊन मी खाल्ले. त्यांचे बरेचसे snacks छान असतात, मला आवडतात. गोड वस्तुत stuffed काला जामून सुरेख असतो, पण अति गोड असतो.

थंडी सुरु झाली की मी अमृतसरी छोले कुलचे आणायला सांगणार आहे एकदा, सुपर्ब असतात.

बाकी lockdown मधे घरी केलं सर्व. दुध, लादीपाव, ब्रेड,snacks कोपऱ्यावर मिळतो त्यांच्याकडे घरगुती इडली पीठ पण मिळते, ते आणून इडली, उत्तप्पा आठवड्यातून एकदा करत होते आणि बटाटेवडेही घरीच केले.

जर कोणीच बाहेरचं खाणार नाही तर ह्या छोट्या उद्योजकांनी जायचं कुठं? म्हणून झेपेल तेव्हढा हातभार लावणार Happy>>ज्जे बात.. हे तर कायमस्वरूपी मार्गदर्शक तत्त्व म्हणून स्वीकारणे आहे. यामुळे बाहेर खाताना मन खाणार नाही Proud

Pages