बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार्कोटिकवाल्यानीं मारली पण ईकडे स्वताच्या स्वार्थासाठी कंगणाने वादग्रस्त विधाने करुन वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिस, मुंबई व महाराष्ट्राची बदनामी सुरु केली वादात राजकीय स्वार्थापोटी भाजपने कंगणाला पाठिंबा देत तीला वायप्लस सुरक्षा प्रदान करुन कंगना ही भाजपची पोपट आहे हे सीद्ध केले आणि मीडियाने मोदी सरकिरचे अपयश झाकण्यासाठी ब्रेकिंग न्युजचा रतीब सुरु केला कंगणाला भाजपत पद आणि बाँलीवुडमधे काम हवे ,भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत म्हणून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे ढोल महाराष्ट्रात वाजवणे सुरु आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

संघाचे लोक कसे ओळखतात म्हणे ? संघाचा आयडी असतो का ? की मी संघाचा आहे म्हणून मी फेसबुकवर आफ्रिकेतला फोटो टाकला तरी photo मधले सगळे लोक संघाचे होतात ?

ऑफिसचा आयडी नसेल तर हे लोक फिरत कसे होते ? आणि ऑफिसच्या आयडीवर फिरले तर उगाच आम्ही संघाचे ही आहोत हे कशाला हवे ?

कोणत्याही सार्वजनीक कामात कुणीही बोलावले नसताना उगीच पुढं पुढं करुन फोटॉ काढणारे दिसले.. त्याच कार्यक्रमत फुशारक्या मारत आत्मप्रौढी मारणारे दिसले.. आयत्या बिळावर नागोबा झालेल अथवा अगदी हपापाचा माल गपापा करताना दिसले.. गेला बाजार कुणी कसलीही मदत मागितलेली नसतानाही 'अहो घ्याच हो..' म्हणत कनपटीला बसणारे दिसले.. टीचभर मदत करुन (अथवा आजिबातही न करुन) हातभर जाहिरात करणारे दिसले की सरळ समजावे की हेच ते..!

बाकी काहीही म्हणा पण यांना पेरणी फार छान जमते... सगळीकडे यांनी यांचे माणसे पेरुन ठेवलेली असतात.. जाहिरातीसाठी..! कुठलेतरी दाखले देत सप्रमाण सिद्ध करण्याचा ते सतत प्रचंड अट्टाहास सुरु ठेवतात.

मदतीच्या नावाखाली यांनीच कोरोना पसरवला की काय असं वाटण्याइतपत परिस्थिती आहे.

आता बिहार निवडणुकीत अनावधानाने तिथेही कोरोना पसरवुन येऊ नयेत म्हणजे मिळवली..!

DJ,
पुरंदरे पन्नाशीचे होते. अगदी 80 वगैरे नाही हो. पण तुमचं बरोबर आहे, घरीच बसायला हवं होतं, फार तर फेसबुक लाईव्ह वगैरे करत.

बाकी संघाबद्दल अजून डिटेलमध्ये लिहा. इथे वाचणाऱ्या अनेकांचे नातेवाईक वगैरे संघ कार्यकर्ते /स्वयंसेवक आहेत. त्यांच्याबद्दल खुलेपणाने लिहा म्हणजे वाचणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की महाविकासआघाडीवाले आपल्या नातेवाईकांबद्दल कसा विचार करतात आणि काय बोलतात.
हो जाओ शुरु! आणि ते अनाजीपंत वंशज या संकल्पनेबद्दल सविस्तर लिहा हो. मविआ आघाडी समर्थक वंशजांना डोस मिळायला हवा!

बिहार विधानसभा निवडणुकीचा पहिल्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए असा राजकीय सामना रंगलेला दिसत असून, पंतप्रधान मोदी यांची पहिली रॅली आज सासाराम येथे झाली. या रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी कलम ३७० चा उल्लेख केला. आम्ही कलम ३७० रद्द केलं. मात्र हे लोकं (काँग्रेस आणि मित्र पक्ष) सत्तेत आल्यास ते परत आणू असं म्हणतात. त्यावर ते प्रचारसभांमधून मतं मागण्याची हिंमतही करतात, असं मोदी म्हणाले. हा बिहार राज्याचा अपमान नाहीय का? बिहारमधील लोकं त्यांच्या घरातील मुलांना, मुलींना देशासाठी सीमेवर लढायला पाठवतात त्यांचा हा अपमान नाहीये, तर काय आहे? असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला. मात्र आता यावरुनच जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी अजूनही मोदींना निवडणूक प्रचारासाठी कलम ३७० चा मुद्दा वापरावा लागतोय, यावरुनच सरकारकडे दाखवण्यासारखं काहीच काम नसल्याचा टोला लगावला आहे.

-----

महाराष्ट्रातपण हे 370 बद्दल बोलत होते

ज्या माणसाने स्त्रियांचे napkin , मास्क आणि सॅनिटायझर ई वर 18 टक्के जीएसटी लावला होता,

तो माणूस फुकट लस देईल का?

Proud

300 अतिरेकी घुसणार आहेत
आम्हालाच मत द्या

कुणीतरी कमलदल बोलले

लग्नात किती लोक जेवले हेही लोकांना मोजून समजत नाही , ह्यांना 300 अतिरेकी येणारेत , हे बरे समजते

गेल्या ३ वर्षांपासून कुठल्याही राज्यांच्या निवडणुका आल्या की त्या ठराविक राज्यातील जवान शहीद कसे होतात हे एक न उलगडणारे कोडे आहे.

गेल्या काही दिवसांपासून बिहार-महाराष्ट्र अशा दौऱ्यांमध्ये व्यस्त असलेले राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना करोनाचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे. फडणवीस हे गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरात दौरे करत होते. त्याचबरोबर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारीही भाजपानं त्यांच्यावर सोपवलेली असल्यानं बिहारमध्येही ते सातत्यानं फिरतीवर होते. आज ट्विट करत फडणवीस यांनी करोना झाला असल्याची माहिती दिली.

----/

बिहार पराभवाचे खापर फुटू नये म्हणून करोनाशी युती केली काय ?

संकटमोचक गिरीश महाजन यांनी बहुतेक लक्ष दिलं नसावं.म्हणून फडणवीस सरकारी दवाखान्यात भरती न होता,खाजगी दवाखान्यात भरती झालेत..!
आव्हाड साहेब,अशोक चव्हाण साहेब यांना कोरोना झाल्यावर "ही मंडळी सरकारी दवाखान्यात का भरती झाली नाहीत?",असा एकंदरीत सूर भाजपाने आवळला होता...!
आज फडनवीसांना कोरोना झाल्यावर ही मंडळी पंक्चर झाल्यागत अवघडून गेली आहेत..!

ओळखा पाहू ...
बिहार निवडणुकीच्या वेळेस &pictures किंवा झी सिनेमा वर कोणता चित्रपट असेल?

Submitted by swwapnil on 21 October, 2020 - 23:25

>>>>>>>>>>

झी सिनेमा केदारनाथ.. आज बिहार निवडणूक मतदान दुसरा टप्पा..

महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला. आज तर कळसाध्याय गाठला आहे. सगळी कामं सोडून अर्णबच्या मागे लागले आहेत म्हणजे अर्णबनी शेपटावर कसा बरोब्बर पाय दिला आहे हे लक्षात येतंय. किळसवाणं आहे हे!

कामे बरीच आहेत. ती आपापल्या गतीने सुरू आहेत. रोज नवी कामे , नव्या केसेस उद्भवतच असतात. त्याही दाखल करून घेऊन तेही काम सुरू करावे लागते. उगीच कोणी कुणाच्या मागे लागत नसते.
मुंबई आणि महाराष्ट्र पुलिस ही देशात इतर पुलिस खात्यांहून बऱ्याच वरच्या पातळीवरची आस्थापना आहे. त्यांचे नीतिधैर्य खच्ची करणे अनेक मराठी लोकांना आवडलेले नाही.

अर्णबला अटक २०१८ च्या केससंदर्भात झालेली आहे. अनव्य नाईक नावाच्या आर्किटेक्टने आणि त्याच्या आईने आत्महत्या केली कारण अर्णबने त्याचे 83 लाख बुडवले असा आरोप आहे.
जर सुशांतला न्याय मिळायचा हक्क आहे तर नाईक कुटुंबियांना का नाही ? आपला तो बाबा आणि दुसऱ्याच ते कार्ट असा प्रकार आहे का ? दोन मराठी मध्यमवर्गीय लोकांना अर्णबमुळे जीव गमवावा लागलाय . अर्णब कोण संत महात्मा आहे का की ज्याची चौकशी होऊ नये ?

सगळी कामं सोडून अर्णबच्या मागे लागले आहेत>> हो ना. माननीय पंप्र सोडले तर भाजपाच्या सगळ्या मोठ्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मोदींनी देखील मौन आणि इतर कामे सोडून या विषयावर आपले मत व्यक्त करावे. केवळ मत व्यक्त न करिता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करून टाकावी. हाकानाका. Wink

<< महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलिसांनी महाराष्ट्राचा बिहार करून दाखवला. आज तर कळसाध्याय गाठला आहे. सगळी कामं सोडून अर्णबच्या मागे लागले आहेत म्हणजे अर्णबनी शेपटावर कसा बरोब्बर पाय दिला आहे हे लक्षात येतंय. किळसवाणं आहे हे! >>

------- अर्णब ने कुणाला आत्महत्येस प्रवृत्त केले असेल तर त्या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. दोषी असेल तर कायद्याच्या चौकटीत शिक्षा जरुर व्हावी. दोषी नसेल तर सुटका करावी.

मोदी - शहा यांचे केंद्रातले सरकार सुडबुद्धीने काम करते अगदी तसेच महाराष्ट्र सरकारने नको करायला. मग त्यांच्यात आणि यांच्यात फरक ओत काय राहिला ?
गुजराथ मधे संजिव कुमार भट या अधिकार्‍याला तर तब्बल ३० वर्षे जुन्या केस मधे अडकवले आहे.
https://www.bbc.com/news/world-asia-india-48704352

<< मोदींनी देखील मौन आणि इतर कामे सोडून या विषयावर आपले मत व्यक्त करावे. >>

----- हे छान आहे... त्यांनी मत व्यक्त करावे असे म्हणायचे आणि लाखमोलाचे मत व्यक्त केल्यावर लाखात थम्स डाऊन ( उलटा अंगठा) दाखवायचे. भाषण झाल्याच्या काही तासांत दहा लाख थम्स (अर्थात DOWN ) मिळतात. DOWN हे UP आहे अशी मनाची समजूत घालण्यासाठी ते मान १८० अंशांत vertical plane मधे फिरवतात. अर्थात आता काही काळा पुरते ते बटनच बंद केले आहे.

ज्याप्रमाणे देव भावाचा भुकेला आहे तसेच आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी हे पण सोशल मिडिआवरच्या लाईक्स साठी झुरणारे आहे. तुम्ही लोक कमी लाईक्स द्या... पण थम्स डाऊन नकोच नको. किती यातना होतात. अशाने बोलणार्‍याचे धाडस कमी होते ना. Sad

पाटणाः बिहार विधानसभा निवडणुकी ( bihar election ) आज प्रचार संपण्याच्या काही तास आधी मुख्यमंत्री नितीशकुमार ( nitish kumar ) यांनी मोठी घोषणा केली. ही आपली शेवटची निवडणूक आहे, असं नितीशकुमार पूर्णियातील सभेत म्हणाले. पण पाटण्यात पोहोचता त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढण्यात आला आहे, असं म्हटलंय. ही शेवटचा निवडणूक नव्हे तर या निवडणुकीची शेवटची प्रचारसभा आहे असं त्यांचं म्हणणं होतं, असं नितीशकुमार यांचे निकटवर्तीय म्हणाले.

सद्ध्या संत-महात्मे तुरुंगात आहेत हाही एक योगायोग...!!>>>>> अश्याना संत तरी म्हणावे का ? हिंदू धर्माला कलंक आहेत ही लोकं

<< आता समस्त भाजपे बिहार मधील जनता कशी बिनडोक आहे हे तावातावाने सांगत येतील... थोडीशी वाट बघुया >>

----- थेट निवडून आले तर ठिक नाही तर नेहेमीप्रमाणे काड्या करतील. आमदारांची पळवापळवी करतील का ? पण मग ते आत्मनिर्भरतेच्या तत्वा विरुद्ध आहे.
बिहारचा गोवा होतो का म. प्र. का महाराष्ट्र ?

थांबा की हो थोडे. पहिले कल तर स्पष्ट होऊ द्यात>>>>

हाहा... तितका धीर असेल तर ना... निकालाआधीच सगळे बोलून घेतले कारण नंतर बोलण्यासारखे काही उरतच नाही.

तिकडे ट्रम्प पडला तर इकडे काहीजणांना आता उद्या मोदी सत्ताउतार असे वाटायला लागले होते. Happy नेमके त्याचवेळी बिहारमधले exit पोल रिझल्ट आले ज्यात महा ठग गठबंधन भरपूर आघाडी घेऊन येणार हे जाहीर झाले. लगेच आशाळू लोकांनी बिहारची जनता अमेरिकन जनतेसारखी हुश्शयार आहे म्हणून नाचायला सुरवात केली.

पण बिहारी जनता त्याहीपेक्षा हुशार निघाली. बिचाऱ्या आशाळूना उगीच 2 दिवस आशा दाखवून आता तोंडावर पाडले.

डर के आगे जीत है Proud

२०% मतमोजणीत भाजप पहिल्या नंबर वर आहे म्हणजे उरलेल्या ८०% मधे इतर पार्टींचे कुणी निवडुन येण्याची सुतराम शक्यता नाही. शतप्रतीशत बिहार झाले म्हणायचे.

२०% मतमोजणीत भाजप पहिल्या नंबर वर आहे म्हणजे उरलेल्या ८०% मधे इतर पार्टींचे कुणी निवडुन येण्याची सुतराम शक्यता नाही. शतप्रतीशत बिहार झाले म्हणायचे.>>>

चालायचेच....

हा धागा पाहिलाच नव्हता. त्यामुळे जावेदखानांच्या धाग्यावर दिलेला प्रतिसाद इथेपण टाकून जातो.

मतदान यंत्रांची संख्या कोवीडमुळे वाढवलीय. मतदानाला गर्दी होऊ नये म्हणून एका यंत्रात जास्तीत जास्त १००० मतेच असणार आहेत.

पण कल पाहाता धीरज पासवानमुळे सगळीकडे टफ फाईट होतीय. तो जर वेगळा लढला नसता तर राजद 30 जागांवर आघाडीवर असती. तेजस्वीसुध्दा पिछाडीवर असता. भाजप व जेडीयू यांच्या जागांत फारसा फरक नसता.

धीरजचं भवितव्य उज्वल दिसतंय. ७% पेक्षा जास्त मतं मिळवतोय पठ्ठ्या!

नितीशकुमारांच्या कोलांटउड्यामुळे त्यांचीच वाट लागलीय. कारण नसता संपलेल्या लालूंना प्रथम रक्तदान केलं. त्याने धृवीकरणाला चालना मिळून भाजपाला मोठ केलं. इतिहासातून कोणि शिकतच नाहीये!!!

मतदान यंत्रांची संख्या यावेळेस 63% जास्त आहे.

थोडक्यात मुंबई मनपा निवडणुकीचे डावपेेच आखाायला आता सुुरवात होईल.

लोकं विचार कसा करताहेत ते कळले. माझा निवडणूकीतला रस संपला.
समाप्त
Happy

नितीश कुमार ह्यांना मुख्यमंत्री पद नाकारलं तर jdu aani rjd काँग्रेस एकत्र येईल का.

नेमके त्याचवेळी बिहारमधले exit पोल रिझल्ट आले ज्यात महा ठग गठबंधन भरपूर आघाडी घेऊन येणार हे>>>>>>>> काहीही कारण नसताना फक्त भाजपच्या मतांची विभागणी करण्यासाठी सेनेने बिहार च्या निवडणुकीत भाग घेतला होता , आणि तेथील मतदारांनी सेनेला पायतान दाखवले !
जी काही २० / २५ मते मिळाली आहेत ती कशाच्या जोरावर भेटली हे शोधण्यासाठी सेनेने पोलिसांना कामाला लावलेच पाहिजे !

1 च सीट जास्त जिंकले मला तर हे इ व्ही एम मॅनेज केल्यागत वाटते.

भरपूर प्रचार करूनही २०१६ तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत २३२ पैकी तब्बल २३० जागांवर डिपॉझिट जप्त झालेले शिवसेनेच्या २० जागांवर हसतांयत !

https://www.loksatta.com/maharashtra-news/pravin-darekar-raised-question...

शिवसेना खासदार संजय राऊत हे परस्पर विरोधी भूमिका मांडून काय साधत आहेत याचं आश्चर्य वाटतं. बिहार निवडणुकीचे निकाल आले तेव्हा म्हणाले की नितीश कुमार हे मुख्यमंत्री होतील. त्यानंतर संजय राऊत म्हणाले की तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेले नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यास तो बिहारच्या जनतेचा अपमान ठरेल. जर हाच नियम महाराष्ट्रात लागू केला तर शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला नाही का? असा प्रश्न आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांना विचारला आहे.

बिहारबाबत शिवसेना सातत्याने भूमिका बदलताना दिसते आहे. नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री झाले तर श्रेय शिवसेनेला जाईल असं संजय राऊत म्हणाले होते. आता आज संजय राऊत यांनी उलट भूमिका घेतली आहे. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केल्यास तिथल्या जनतेचा, जनाधाराच अपमान होईल असे संजय राऊत म्हणत आहेत. शिवसेना मांडत असलेली ही भूमिका दुतोंडी नाही का? असाही प्रश्न प्रवीण दरेकर यांनी विचारला आहे.

धाग्याचं शीर्षक - बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

ह्या प्रश्नाचे उत्तर बिहारात सर्व जागांवर अनामत रक्कम जप्त झालेला आणि महाराष्ट्रात सत्ताधारी असलेला पक्षच देऊ शकेल कारण रोज उठून पक्षाचे खासदार संपादक बिहारच्या राजकारणावर न मागता सल्ले देत असतात.

या पप्पूची लायकी तर आता बराक ओबामाने देखील काढली. आपल्या आत्मकथेत बराक ओबामा यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचा आदराने उल्लेख केला आहे मात्र राष्ट्रीय विदुषक पप्पूची 'लायकी नसलेला नेता' अशी संभावना केली आहे. आता पप्पू मुत्र पिण्यात धन्यता मानणारे त्याचे समर्थक ओबामाचा निषेध करणार का ?

Pages