बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार्कोटिकवाल्यानीं मारली पण ईकडे स्वताच्या स्वार्थासाठी कंगणाने वादग्रस्त विधाने करुन वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिस, मुंबई व महाराष्ट्राची बदनामी सुरु केली वादात राजकीय स्वार्थापोटी भाजपने कंगणाला पाठिंबा देत तीला वायप्लस सुरक्षा प्रदान करुन कंगना ही भाजपची पोपट आहे हे सीद्ध केले आणि मीडियाने मोदी सरकिरचे अपयश झाकण्यासाठी ब्रेकिंग न्युजचा रतीब सुरु केला कंगणाला भाजपत पद आणि बाँलीवुडमधे काम हवे ,भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत म्हणून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे ढोल महाराष्ट्रात वाजवणे सुरु आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुमचे म्हणणे बरोबर आहे , कंगना सारख्या लोकांनी इथे येवून महाराष्ट्रात तील बॉलीवुड मध्ये काम करून नाव पैसा कमवला वर महाराष्ट्रावर च टीका करत आहेत !
निश्चित च चुकीचे आहे , शिवाय आज कंगना महाराष्ट्र विरूद्ध बोलत आहे , उद्या अक्षय , अनुपम खेर यांच्या सारखी अजुन काही सुरू होतील . शिवाय दाऊद च्या कुरापती ऐकूनच असतो आपण !
या साठी एकच उपाय !
इथून बॉलीवुड हाकलने , म्हणजे कटकट च राहणार नाही .

दाऊद महाराष्ट्र विरोधी कधी बोलला नाही दाऊद आणि कंगना ची बरोबरी होवू शकत नाही.
उलट मी तर म्हणतो मराठी म्हणून दाऊद ल महाराष्ट्र नी स्वीकारावे.
राज्य हित महत्वाचे.

कोर्टाला कंगना चे बांधकाम तोडल्याबद्दल आक्षेप नाही

60000 बांधकामे पाडायची असताना हिचेच का पाडले ? हा आक्षेप आहे म्हणे. मग आता 60000 जेसीबी एकाच वेळी पाठवायचे ?

आणि हा आक्षेप कोर्टाने घेणे हास्यस्पद आहे , कोर्टातही 60000 बलात्कार , फसवणुकीच्या अन पाडापाडीविरोधात कोर्ट केसेस पेंडिंग असतीलच की, मग हिची केस ताबडतोब का घेतली म्हणे ?

जशी ही डिस्करीशनरी पॉवर कोर्टाला आहे तशीच बीएमसीलाही असते

उलट मी तर म्हणतो मराठी म्हणून दाऊद स्वीकारावे >>>>>
नमस्कार हो /\
Happy
पूर्वी त्याने मुंबईत ( मुस्लिम वस्त्या सोडून ) बॉम्ब स्फोट करून तीनशे लोक मारले !
आता सहाशे मारण्याची दाऊद ला संधी द्यावी असा विचार आहे का ?

{{{ सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल }}}

महाराष्ट्राने दिलं? म्हणजे नेमकं कोणी दिलं? महाराष्ट्र सरकारने? महाराष्ट्रातील जनतेने? नेमकं कोणी?

बिहारमधून मुंबईत आलेला प्रत्येक जण इथे हिरो बनत नाही. अनेक जण प्लॅटफॉर्मवर बूटपॉलिश करतात, कोणी टॅक्सी चालवतात, कोणी झाडू मारतात. अनेक जण मुंबईत आल्यावर लुबाडले जातात, गर्दीच्या लोकलमध्ये शिरुन गुदमरतात, लटकून उभे राहिलेले खाली पडून मरतात. मग त्यांच्या घरच्यांनी काय म्हणायचं यांना मुंबईने / महाराष्ट्राने - दु:ख / अपंगत्व / मृत्यू दिला? ज्याची जी क्षमता, कष्टायची तयारी त्याला ते मिळतं. जर एखाद्याच्या वाटेला आलेल्या वाईट भोगांना मुंबई / महाराष्ट्र जबाबदार नाही तर मग त्यांच्या यशाचं श्रेय घ्यायला तरी पुढे कशाला यायचं? आणि मुंबईने एखाद्याला सिनेमात नाव पैसा दिला म्हणजे नेमकं काय? फक्त मुंबईतले / महाराष्ट्रातले लोकच त्या व्यक्तिच्या सिनेमा करिता पैसे खर्चून तिकीटे विकत घेतात? या लोकांना सिनेमात काम देतात ते निर्माता मंडळी. कंगनाचाच विचार केला तर सिनेमात घेणार्‍यांपैकी मराठी असलेला म्हणजे मधूर भांडारकर चटकन आठवतो, बाकीचे तर सगळे अमराठीच. तेही मुंबई / महाराष्ट्रात बाहेरून आले. आणि या निर्मात्यांनी कंगना किंवा अजून कोणाला जर सिनेमात घेतले असेल आणि काही कोटी मानधन दिले असेल तर त्या पटीत त्यांनी नफाही कमावलाच ना? की पदरी प्रचंड तोटा सहन करुनही मुंबईकर निर्माते या कलाकारांना सिनेमात काम आणि वर रग्गड मानधन देत आहेत / होते? या सिनेमांना नफा का मिळाला कारण प्रेक्षकांनी सिनेमा पाहिला. फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व जगातील प्रेक्षक त्या करिता पैसा खर्चतात.

सिनेमा मुंबईत बनतो कारण सिनेमाचे स्टूडीओज इथे आहेत. जसे सिमला कुलू मनालीत हिल स्टेशन्स आहेत. म्हणून तिथे देशभरातले नवविवाहीत हनिमूनला जातात. महाराष्ट्रातली जोडपी मोठ्या प्रमाणात जातातच की. मग उद्या हिमाचल प्रदेशने त्यांना असे म्हंटले की आम्ही या महाराष्टातल्या जनतेला अपत्यसुख दिले तर तो युक्तिवाद चालेल का?

काही महाभाग असेही म्हणतील की महाराष्ट्रातील जनता तिथे हनिमूनला जाते म्हणून त्यांचा पर्यटन व्यवसाय चालतो. त्यांच्या माहितीकरिता - हजारो तरुण / तरुणी जेव्हा मुंबईत कलाकार बनायला येतात तेव्हा ते इथे भाड्याने घर घेऊन / पेइंग गेस्ट म्हणून राहतात, इथल्या खानावळीत / हॉटेलात जेवतात, इथल्या दुकानदारांकडून वस्तू खरेदी करतात तेव्हा तेही मुंबईच्या व्यवसायाला हातभार लावतातच की.

याला परस्पर सहजीवन म्हणतात. कोणी कोणावर उपकार करत नाही.

उदाहरण म्हणून
इथे ड्रायव्हर ला पगार 15000 हजार असतो आणि तोच दुबई मध्ये गेला की तेच काम करायला तर तिथे त्याच पगार 40000 असतो.
काम तेच ,मेहनत तीच फक्त जागेचा फरक .
म्हणजे त्या जागे मुळेच तुम्ही पैसे कमावू शकता.
मुंबई नी दिले म्हणजे मुंबई मध्ये आल्या शिवाय तुमच्या कला गुणांना,कष्टाला काही किंमत नसते ती मुंबई मुळेच वाढते.
त्या मुळे आम्ही कष्ट करून मुंबई मध्ये श्रीमंत झालो अशा फुशारक्या कोणी मारू नयेत.
मुंबई मुळेच तुमच्या कष्टाला किंमत आली.
आहे तिथेच किती ही कष्ट केले असते तरी श्रीमंत तुम्ही झाला नसता .
हे फुशारक्या मारणाऱ्या लोकांसाठी

बिहार चा सर्वात जवळचा आणि जिव्हाळा चा विषय म्हणजे त्या राज्यातील स्थलांतरित लोक.
त्या राज्यातील ना करते पणामुळे बिहार मध्ये रोजगाराच्या बिलकुल कोणत्याच संध्या नाहीत .
रोजगार साठी दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या लोकांचे प्रमाण बिहार मध्ये सर्वात जास्त आहे.
तेथील सत्ताधारी लोकांचे,तेथील राजकारणी लोकांचे तेथील जनतेने वाभाडे काढू नयेत म्हणून मुंबई सारख्या शहरात कसा बिहारी लोकांना त्रास होतो अशी आरोळी तिकडे नेहमीच दिली जाते.
अशी आरोळी दिली की बिहारी जनता आपल्या सरकारचे ,नेत्यांचे दुर्गुण विसरून दुसऱ्याच फालतू वादात अडकतात आणि भावनिक होवून आरोळी देणाऱ्या लोकांना मत देतात.भले बिहार मध्ये रस्ते,वीज, पाणी त्यांना मिळत नसले तरी.
म्हणून सुशांत च्या मृत्यू चे राजकारण मुंबई मध्ये बिहारी नेते आणि बिहारी bjp करत आहे.
बिहारी लोकांसाठी दुसरा अत्यंत जवळचा विषय म्हणजे बिहार मधून आणि दिल्ली मुंबई,पुणे ला पोचवणाऱ्या ट्रेन .
एकादी अशी ट्रेन ची मागणी तेथील राजकारणी लोकांनी केली की बिहारी खुश.

जेसीबी दारात आली म्हणे
आम्हाला न सांगता का आली ? आजच का आली ?

Sad
तूमच्या मर्जीने तुम्ही बोलावून मग तुमच्या दारात यायला जेसीबी म्हणजे एमबुलन्स आहे का ?

Proud

Bihar aani यूपी देशाला लागलेला कॅन्सर आहे.
त्या दोन्ही राज्य पेक्षा आफ्रिका आणि केनिया पण चांगला आहे
अगदी पाकिस्तान आणि बांगलादेश पण ह्या दोन राज्यं पेक्षा उत्तम आहे.
ह्याच दीन राज्य मुळे देशाचा विकास होत नाही.

>>भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत <<
कोण अपयश झाकायचा प्रयत्न करतेय आणि त्यातून फ्रस्ट्रेट होओन अजुन अजुन चुका करतय ते दिसतच आहे!
Lol

न्हाय ! न्हाय !!!
आमचे सी एम बेस्ट हायेत !!!!!!!
Happy

न्हाय ! न्हाय !!! आमचे सी एम बेस्ट हायेत !!!!!!!>> व्हयंच की बग्गा.. त्या टरबुज्यापेक्षा भारीच म्हनायचं की ह्ये..! टरबुज्याला तर आपल्या पक्ष्याची बी मानसं खपत न्हवती म्हनुन त्येंची पखं कापली... ह्यो आत्ताचा सियेम आपल्या पक्ष्याच्या लोकांसंगट बाकि दोन पक्ष्यांच्या लोकास्नी बी बरुबर घेऊन काम करतुया का न्हाई..??

आवं ज्यो आपल्या पक्ष्याचा झाला न्हाय त्यो राज्याचा कस्सा हुईल बरं..?? द्या टाळी Rofl

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.
--

एका शेणा समर्थकाकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाच नाही. काय तर म्हणे "महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल". त्या सुशांतकडे प्रतिभा व गुण होते म्हणून त्याला सर्व काही मिळाले अन्यथा असे ५६ सुशांत देशाच्या कानाकोपर्‍यातून दिवसाला इथे येतात.

आणि एका बाईच्या "स्वकमाई"च्या प्रॉपर्टीवर बुलडोजर चालवणारी व एका ६५ वर्षाच्या निवॄत्त नौसेना अधिकार्‍याला मारहाण करणारी भेकड शिवसेना अख्खा महाराष्ट्र कधी झाली ? मुळात या भेकडांवर कोणी इतरांनी टिका केली रे केली कि महाराष्ट्राचा, छत्रपतींचा अपमान झाला वगैरे बरळणारी शिवसेना सुधारणार कधी.

>>बाकि दोन पक्ष्यांच्या लोकास्नी बी बरुबर घेऊन काम करतुया का न्हाई..??<<

तो विनोदाचा धागा तिकडे वेगळा आहे Lol

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान आंदोलन करू नये म्हणून या मायलेकांना ताब्यात घेतले होते..

भाजप सरकार बघा किती चांगले होते..

Screenshot_2020-09-14-23-44-44-895_com.android.chrome.pnghttps://www.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-ne...

परिस्थिती सामान्य नसली हे मान्य केले तरी महाआघाडी सरकार सामान्य जनतेच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देताना दिसत नाही.

त्यात दुर्दैव असे की,

जनतेचा कळवला असलेले आमचे विरोधी पक्षनेते बिहारची
काळजी करत आहेत.

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेली हानी,त्यासाठी आर्थिक मदत
विदर्भात विक्रीअभावी पडून असलेले कापूस पीक,
बोगस बियाणे वापरल्यामुळे झालेले नुकसान.

हे मुद्दे आमचे विरोधी पक्षनेते मांडणार तरी कधी की त्यांना चिंता फक्त कंगना राणावत आणि बिहारचीच आहे.

विरोधी पक्षनेत्यांचे अधिवेशनातले भाषण ऐकलेले दिसत नाही तुम्ही? नाहीतर इतका पोरकट प्रश्न विचारला नसता!

असो आयटी सेल वाल्यांकडून फारशी अपेक्षा नाहिये Wink

अधिवेशनात जोरात भाषण केले म्हणजे प्रश्न सुटले का?

थोडे विरोधात लिहिले की लगेच आयटी सेल?
म्हणजे सामान्य माणसांनी काय लिहायचे च नाही का?

तुम्ही खरे नाव लिहायला घाबरता आणि इतरांना आयटी सेलचे लेबल लावता
असो, चोराच्या मनात चांदणे.

अधिवेशनात नाही तर मग मुद्दे कुठे मांडावेत म्हणजे तुमचे समाधान होईल? मिडियात? तिथेही अतिशय संयतपणे आणि अभ्यासपूर्ण मुलाखती कुणाच्या आहेत बघा!
फिल्डवर कोण अखंड फिरतेय ते पण बघा

हे सगळे दिसत असुनही बिनबुडाचे आरोप कराल तर शिक्के बसणारच की मग राव!

आणि खऱ्या नावाचे म्हणाल तर काय नावाने आलो तर तुम्हाला खरे वाटेल? कुठल्या खऱ्या वाटणाऱ्या आयडींची गॅरंटी आहे तुम्हाला?

बाकी कंगना राणावतचा विषय मोठा कुणी केला हे जरा तपासून बघा म्हणजे मुद्द्यांवरुन लक्ष हटविण्याची गरज कुणाला आहे हे पण पटेल तुम्हाला (खरच आयटी सेल वाले नसाल तर Wink )

>>बाकी कंगना राणावतचा विषय मोठा कुणी केला हे जरा तपासून बघा<<
खरोखर कंगना ला एव्हढं फुटेज का मिळालं याचा शोध प्रत्येकाने आपल्या कोषातनं बाहेर येऊन करावा... Wink

@ डिजे, आवरा. याच टरबुजाने तुमच्या मराठा समाजाला आरक्षण देण्यास मदत केली, पण तुमच्याच मराठा पैलवानाने तुमच्याच मराठा समाजाला तोंडघशी पाडले. पावसात भिजणार्‍याला हिरोला पाहुन मराठा समाज गहीवरला आणी मग पुढे काय झाले तर ते ज्ञात आहेच. आता तुमचेच मराठा लोक महाभकास आघाडीला शिव्या देतायत. जय हो !

मुद्दे मांडले म्हणजे प्रश्न मिटला असे असेल तर मग विषयच संपला.
सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना हे शब्दिक खेळ नको आहेत.

आयटी सेलवरून एक कल्पना सुचली,
जसे पक्षांचे आयटी सेल असतात तसा सर्वसामान्य लोकांचा का असू नये.
विरोधात मत मांडले की आयटी सेल वाले लगेच प्रकट होतात.

राजकीय गदारोळात मूळ प्रश्न बाजूला पडतात.
म्हणून आता असे होताना दिसले की शक्य होईल तेव्हा सर्वसामान्य माणसांच्या आयटी सेलचा स्वयंघोषित सदस्य म्हणून प्रकट होण्याचे मी ठरवले आहे.

धन्यवाद, @खरा पुणेकर तुमच्यामुळे चांगली कल्पना सुचली.

रश्मी.. वैनी. आता टरबुज्याने काय केले ते समस्त मराठा समाजाला कळाले आहे त्यामुळे त्याचं वकिलपत्र अगदी सुब्रमणियम स्वामीने घेतले तरी काही उपयोग नाही. ज्या म्हातार्‍या पैलवानाची खिल्लि उडवत आहात त्यानेच शेवटी टरबुज फोडुन नटवून-थटवून नागपुरला पाठवले... आता तर म्हणे बिहारची जबाबदारी दिली आहे. ऑल द बेस्ट Bw

Dj.. ला कुठे समजावता त्याला काय परत उडेल आणि DJ... होउन येईल Wink

असल्या विखारी लोकांना फाट्यावर मारायचे असते.... ते सुधारणाऱ्यातले नसतात Happy

तिकडे UP मधे योगी आदित्यनाथ यांनी, आग्र्यात नव्याने तयार होणार्‍या मुगल गार्डनला, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिले देखिल. व इथे बायका व वृद्धांवर हात उचलणारे, भेकड त्या औरंगाबादचे नाव संभाजी नगर कधी करणार ?

फरक काय पडणार ?

रेव्हेन्यू देण्यात ताज अन लाल किल्लाच पुढे आहे

आणि हिंदू राज्यकर्त्यांनी हिंदू जनतेला म्युझियम दिले , ह्यात नवल काहीच नाही.

सर्व राजघराण्यांनी सत्ता, संपत्ती , जागा, महाल , 7/12 हे सगळे खजिने स्वतःकडे ठेवले व जनतेला 10 हजार वर्षे खालील प्रॉपर्टी दिली

खंड ( पुस्तकांचे )

खिंड

खिंडार ( पडलेले बुरुज)

खंदक ( पूर्वी अमका राजा पाणी पीत होता म्हणे , आता शेवाळे असते आणि घरात नळ आहे , त्याचे मात्र कौतुक नसते)

खंडहर

खिद्रापूर वगैरे ( पुरातन स्थापत्य शास्त्र म्हणे , हेमाडपंती 1 बी एच के कोण बांधून देईल का ? की भिंतीवर मृदुन्ग वाजवणार्या पुष्ट बायका कोरायच्या ? )

खांब ( लेण्या मधले )

खापराचे तुकडे , खेळणी , खंजीर ( म्युझियम मध्ये नेऊन दाखवतात , तिथे सोने नाणे , हिरे दाखवत नाहीत )

म्युझियम बघायला जा आणि खापर खेळणी खंजीर बघा

ज्या म्हातार्‍या पैलवानाची खिल्लि उडवत आहात त्यानेच शेवटी टरबुज फोडुन नटवून-थटवून नागपुरला पाठवले... आता तर म्हणे बिहारची जबाबदारी दिली आहे. ऑल द बेस्ट Bw
Submitted by DJ.. on 15 September, 2020 - 11:16
--

गद्दारी करणे या म्हातरड्याच्या रक्तातच आहे. त्याने आयुष्यभर अनेकजणांबरोबर गद्दारी केली आहे. म्हणूनच महाराष्ट्रात त्याला कधीही एक हाती सत्ताच काय पण तीन आकडी आमदार व दोन आकडी खासदार देखील निवडुन आणाता आले नाहीत.

जे काम वसुंधराराजे, शिवराज सिंग, ममता बॅनर्जी, मुलायम सिंग यादव, लालू यादव, द्रमुक अद्रमुक चे नेते यांना जमले ते या पन्नास वर्षे राजकारणात राहाणार्‍याला जमले नाही. याचे कारण तेच 'गद्दारी'. केंद्रिय सत्तेत नेहमीच यांना दुय्यम खाती दिली गेली आणि हे म्हणे भावी पंतप्रधान ?

इथे महाराष्ट्रात छत्रपतींची कितीतरी स्मारके अगदी मोक्याच्या ठिकाणी आहेत. शहीद भगत सिंह आहेत, गुरु तेज बहादुर आहेत, झाशीच्या राणी आहेत, स्वा वीर सावरकर आहेत, नेताजी सुभाष चंद्र आहेत, विवेकानंद आहेत, गांधी तर आहेतच आहेत. उत्तर प्रदेशने एखाद्या जागेला छत्रपतींचे नाव दिले तर त्यांनी अभिमानाने छाती फुगवणे आणि आम्ही लज्जित होऊन चेहेरा पाडणे याची काहीच जरूर नाही. हां, आता त्यांनी मुघल गार्डनला छत्रपतींचे नाव दिले यात मर्दुमकी दिसत असेल तर दिसो बापडी.

शिवसेनेवर कुरघोडी आणि बिहार इलेक्शन साठी योगीने म्युझियमला शिवाजी महाराजांचे नाव दिले

मोगलांची निशाणी नको तुला तर 21 कोटी ताजमहालचे येतात ते मोघलांच्या वारसांना देऊन टाक

तुम्ही नका लोड घेऊ जास्त ! Lol तिथे योगी मुख्यमंत्री आहेत, उद्या ते ताज महालचे नाव देखील चेंज करु शकतात. आता या घटनेचा बदला घेण्यासाठी व येत्या निवडणुकीत मतांची बेगमी करण्याकरता , तुम्ही तुमच्या जाणत्या राजाला सांगून शिवाजी पार्क चे नाव बाबर पार्क करुन घ्या.

१०५ जणांची गठडी वळुन ठेवल्यामुळे भक्तगणांची जळजळ होणे सहाजीक च आहे... जेवढी ओकली जाईल तेवढा आराम वाटेल Proud

>>मुद्दे मांडले म्हणजे प्रश्न मिटला असे असेल तर मग विषयच संपला.
सर्वसामान्य लोकांना व शेतकऱ्यांना हे शब्दिक खेळ नको आहेत.<<

मग काय करावे तुमच्या मते? गर्दी गोळा करुन मोर्चे काढावेत?

बाकी तुमच्या उरलेल्या प्रतिसादावरुन तुम्ही सर्वसामान्यांचे आयटी सेल वगैरे नक्कीच नाही एव्हढे मात्र कळले.
इथे भल्याभल्यांचे बुरखे फाटलेत तेंव्हा जे आहात ते मान्य करत चला Proud

फडणवीस बिहारला गेले म्हणे

आणि कंगना , सौ फडणवीस मिळून कोशारीना भेटल्या ना ? त्या फोटोत सौ फडणवीस आहेत ना ??

बिहारमधे जाऊन महाराष्ट्राची बदनामी करणारा टरबुज्या हा पहिला कमनशिबी मुख्यमंत्री (माजी) ठरेल. पण याचं त्याला, त्याच्या पक्षाला आणि समर्थकांना काहीही सोयरसुतक नसेल.

टरबूज , फावड्या , वाकड तोंड्या , कोंबडी चोर
मराठी भाषा किती समृद्ध आहे याचा प्रत्यय येतोय इथे Happy

त्या मानाने उठा मामु हे शब्द बरेच संयमीत आहेत.

बिहारमधे जाऊन महाराष्ट्राची बदनामी करणारा टरबुज्या हा पहिला कमनशिबी मुख्यमंत्री (माजी) ठरेल. पण याचं त्याला, त्याच्या पक्षाला आणि समर्थकांना काहीही सोयरसुतक नसेल.>>>>> आणी माजी नौसैनिकाला मारहाण व कंगना प्रकरणावरुन अख्ख्या भारतात बदनामी होणारे उठा हे पहिलेच मु असतील.

शिवसेनेवर कुरघोडी आणि बिहार इलेक्शन साठी योगीने म्युझियमला शिवाजी महाराजांचे नाव दिले >>>>>>>>>
ब्लॅक कॅट ,
खरे म्हणजे मोगल अक्रमकांशी लढा देवून शून्यातून मराठा साम्राज्य उभे करत त्यांनी सगळे आयुष्य अर्पण केले !
जर योगी उत्तर भारतात शिवाजी महाराजांच्या नावाने संग्रहालय बनवत आहे तर त्या वर टीका करून तुमची कोती मनोवृत्ती दाखवू नका !

तुम्ही भाजप , फडणवीस योगी , मोदी यांच्या विरोधात हवे तेव्हढे विचार मांडा आणि वैचारिक स्वातंत्र्याचा लाभ घ्या
कोणी का करेना ! महाराजांचे नाव वाढतंय ना ?
मग काय प्रॉब्लेम आहे ?

गर्वाचे घर खाली

ही म्हण ऐकून माहीत होती

घर खाली आले

जय जेसीबी

कोणी का करेना ! महाराजांचे नाव वाढतंय ना ?
मग काय प्रॉब्लेम आहे ?>>>>> बाडगा जास्त धर्माभिमानी असतो.

माजी नौसैनिकाला मारहाण >> तो म्हातारबुवा मर्चंट नेव्ही मधे होता.. नौसेनेत नव्हे. भक्तगणांचे हुकलेले लॉजिक जाम एंटरटेन करते.. आणि वर तो म्हातारा स्वतः भक्त होता... मग दाखवलेल्या भक्तीप्रती प्रसाद मिळाल्यावर कोल्हेकुई कशासाठी करायची Proud

Proud

महाराजाणा कुणी काही बोलले नाही.

सेना महाराजांचे नाव घेऊन मोठी झाली , असे लोक म्हणतात ते चालते

तेच योगीनाही बोलले तर म्हणायचे महाराजांचे नाव मोठे होते तर प्रॉब्लेम काय आहे ?

कर्नाटकात तर पुतळा उखडला होता

>>गर्वाचे घर खाली

ही म्हण ऐकून माहीत होती

घर खाली आले

जय जेसीबी<<

किती मोठे काम केलय ना!
महाराष्ट्राचा सन्मान... व्वा व्वा!

तो म्हातारबुवा मर्चंट नेव्ही मधे होता.. नौसेनेत नव्हे. भक्तगणांचे हुकलेले लॉजिक जाम एंटरटेन करते.. आणि वर तो म्हातारा स्वतः भक्त होता... मग दाखवलेल्या भक्तीप्रती प्रसाद मिळाल्यावर कोल्हेकुई कशासाठी करायची
--

थापाड्या "वडापाव" सैनिकासाठी खास.

https://www.aajtak.in/india/maharashtra/story/madan-sharma-shows-naval-i...
--
https://www.freepressjournal.in/mumbai/fpj-fact-check-was-madan-sharma-t...

असल्य वेब साईट आणि विकत घेतलेले चॅनेल पैशाला पासरी सापडतात हल्ली.. बाय द वे मर्चंट नेव्ही ऑफिसर चं मराठीत भाषांतर काय होते..? Wink

Pages