बिहारच राजकारण महाराष्ट्रात कशासाठी।

Submitted by ashokkabade67@g... on 13 September, 2020 - 06:02

सुशांत बिहारी रीया बंगालची नी कंगणा हिमाचल प्रदेशची,या साऱ्यांनीच कमाई महाराष्ट्रात केली महाराष्ट्राने यांना ईज्जत ,नाव, पैसा सार काही दिल.पण एवढ सार मिळवून सुशांतन मुंबईत आत्महत्या केली त्याच्या पीत्यानेही महाराष्ट्र पोलिसांकडे कुठलाही संशय व्यक्त केला नाही पण बिहारमधे जाताच अचानक साक्षात्कार होवून बिहार पोलिसांकडे गुन्हा दाखल केलाखरतर शुन्य नंबराने तो गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग होणे गरजेचे होते पण महाराष्ट्रात सरकार विरोधी पक्षाचे आणि बिहारचे ईलेक्षण या कारणामुळे केस सिबिआय कडे दिली गेली कदाचित सुशांत केसमुळे भाजपला मत मिळतुल असा आशावाद असावा त्यात ईडी आणि सिबिआय फेल गेले बाजी नार्कोटिकवाल्यानीं मारली पण ईकडे स्वताच्या स्वार्थासाठी कंगणाने वादग्रस्त विधाने करुन वादात उडी घेत महाराष्ट्र पोलिस, मुंबई व महाराष्ट्राची बदनामी सुरु केली वादात राजकीय स्वार्थापोटी भाजपने कंगणाला पाठिंबा देत तीला वायप्लस सुरक्षा प्रदान करुन कंगना ही भाजपची पोपट आहे हे सीद्ध केले आणि मीडियाने मोदी सरकिरचे अपयश झाकण्यासाठी ब्रेकिंग न्युजचा रतीब सुरु केला कंगणाला भाजपत पद आणि बाँलीवुडमधे काम हवे ,भाजपला आपले अपयश झाकुन बिहारमधे मते पाहिजेत म्हणून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे ढोल महाराष्ट्रात वाजवणे सुरु आहे।

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आपल्यावर आलं की बाकीच्या राज्यांचं सोडा. आता हा धागाच बिहारवर आहे तरी त्याबद्दल बोलू नका.

महाराष्ट्राच्या उत्कर्षासाठी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांना आणि राज्यपालांना केंद्राकडून येणे असलेला कर-वाट्यासाठी तोंड उघडायला सांगा.

स्वातंत्र्यसंग्रामासाठी कुठल्या पक्षातील लोकांनी बलिदान दिले, पुढाकार घेतला हे अनाजी पंतुकडी विचारसरणी असलेल्यांना ठाऊक असणे कठीणच म्हणा... इतिहास विषय ऑप्शन्ला टाकणार्‍या शाळेत शिकलेले असणार हे ओघाने आलंच.. शेवटी आपल्या पुर्वजांचा काळा इतिहास कुणाला शिकवावासा / शिकावासा वाटणार म्हणा..!! Proud

स्वातंत्र्यसंग्रामासाठी कुठल्या पक्षातील लोकांनी बलिदान दिले>> This point is not of use after so many years of independence. If a party was formed after independence they how they will be do scarifies for independence. I ma not talking about BJP. Except Congress, communist (may be) all other parties were formed later only. They should respect freedom fighters for sure but down the years this point will become more useless.

मंदार, त्यांची मातृसंस्था स्वातंत्र्या आधीपासून होती. त्यांचं त्या काळातलंही कार्य आणि लक्ष्य काय होतं हे वारंवार लक्षात आणून देणं गरजेचं आहे.

>>आता हा धागाच बिहारवर आहे तरी त्याबद्दल बोलू नका.<<

मग ते तुमच्या हाकलून दिलेल्या मित्राला सांगा Proud

>>this point will become more useless<<

त्या हाकलून दिलेल्या आयडीचा कुठला पॉइंट useful असतो Rofl

भरतराव,
डोळ्यावरची पट्टी जरा बाजूला काढून संघाने केलेल्या समाजकार्याच्या निम्म्याने देखील कामे केलेली इतर कुठल्या पक्षाची मातृसंस्था दाखवा Happy
उगीच कधीकाळच्या कॉंग्रेसने केलेल्या कामांचे श्रेय आत्ताच्या कॉंग्रेसने किंवा त्यांच्या चमच्यांनी घेवू नये.
वर्तमानात जगा Happy

पोटावळे पत्रक्/अमावस्या-पॉर्णिमेला निघणार्‍या सो कॉल्ड पेपरला हाताशी धरुन अन फोटोशॉपचा आधार घेऊन सरकारच्या कामाचे श्रेय लाटण्यात माहीर असलेल्या मातृसंस्थांच्या स्वयंघोषित् सेवकांनी मदत केल्याच्या कितीही आरोळ्या ठोकल्या तरी जमीनीवर रहणार्‍यांना 'यांची मदत कुठे दिसते का बरे..?' हे मोठाल्या भिंगांतुन शोधावे लागण्याची शक्यता १००% एवढी आहे.

>>तरी जमीनीवर रहणार्‍यांना 'यांची मदत कुठे दिसते<<

जमिनीवर राहणाऱ्यांना दिसते.... तुम्हाला नाही दिसणार Wink

अरे वाचलेस ना पोटावळे पत्रकात? अजुन काय पाहिजे?
किल्लारी भूकंपापासून धारावीतल्या करोनामुक्तीपर्यंत संघाचे काम अनेक ठिकाणी आहे..... तुमच्या काही जमिनीवर असणाऱ्या नेत्यांनीही ते अनेकवेळा मान्य केले आहे.... संघाकडून शिका असा सल्लाही आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
पण घरात दडून बसून कीबोर्डवरुन जातीपातीची विषे पेरणाऱ्याला ते काम दिसले नाही तर त्यात काही फारसे नवीन नाही Wink

ते कार्य(!) फक्त पोटावळ्या पत्रकात आणि व्हॉटसप फेसबुकात पहायला मिळाले.. वास्तवीक जीवनात सगळीकडे सरकारी मदत मिळाली (जिच्या पुढे पुढे करुन काही नतद्रष्ट लोकांनी शिकवणुकीप्रमाणे हाप चड्डीत फोटो काढुन पोटावळ्या पत्रकांना छापायला दिले....!)

असे तुमच्या ब्रिगेडमध्ये सांगितले का? Rofl

हे घे तुमच्या लाडक्या पत्रकाराच्या तोंडून ऐक:
(पूर्ण बातमी वाच बर का! अर्थात तुझ्याच्याने वाचवलीतर Wink )

https://www.google.com/amp/s/www.theyouth.in/2020/05/26/barkha-dutt-surp...

थोडक्यात तुझ्यासाठी हे घे:
Dutt said that RSS volunteers are playing a crucial role in this hard time and these real heroes have emerged as saviours for the daily wagers and homeless people. The selfless people, who, without even caring for their own life, sprung into action to give a helping hand to the sufferers.

>>सरकारी मदत<<

ती पण केंद्र सरकारने दिलेली Wink

उदाहरणार्थ एक टाका बरे इथे.... लगेच शहानिशा करु आपण>> ज्जे बात डिज्जे. ते तसलं काही करणार नाहीत मात्र. एकतर पळून तरी जातील अन्यथा पिंगा तरी घालतील. Wink

>> ज्जे बात डिज्जे. ते तसलं काही करणार नाहीत मात्र. एकतर पळून तरी जातील अन्यथा पिंगा तरी घालतील. Wink<<

ज्जे बात!
चुकीच्या वेळी चुकीची पोस्ट!
What a timing सरजी Wink

खोटे पुनवडीकर>> अरे बापरे... हो का..? गुगल ची लिंक देताय होय... बरं बरं... किती ते खोदकाम करुन उंदीर काढत बसला हो तुम्ही Proud

बरं ऐका... उगीच असल्या फोटॉ काढा काढीच्या नसत्या फंदात पडु नका इथुन पुढे ६ महिने... कोरोना जाईपर्यंत. काय्ये की आमच्या कॉलनीतल्या एका हाफ चड्डी स्वयंसेवकाला (वय ६९) जाम खोड होती असे नको तिथे जाऊन फोटो काढुन स्वतःची आणि टीम ची लाल करण्याची. गेल्या १५ दिवसांपुर्वी गेला फोटो काढायला. कुठे म्हणुन काय विचारता... आमच्या शहरात कोवीड सेंटर उभारलं (सरकारने) तिथं (ढापलेले सरकारी) कीट वाटायला... मस्त फोटॉ काढले.. पोटावळ्या पत्रकांत त्याने स्वतः नेऊन दिले.. अन झाला ना गडी पॉझिटीव. मग असं धाबं दणाणलं त्याचं की काहीही ताप-बीप-खोकला-सर्दी नसतानाही जाम थरथरायटीस सुटला त्यांना.. कुठुन झक्क मारली अन कोवीड सेंटरला गेलो असं म्हणु लागला. शेवटी व्हायचं तेच झालं... परवा दिवशी गेला बिचारा. त्यांची पोरं जाम शिव्या घालत आहेत नसते उद्योग करुन घरादाराला पॉझिटीव केलं म्हणुन. आता बोला.

मी शक्यतो राजकारण विषयावर कमी लिहिते कारण माझा फार अभ्यास नाही आणि ज्या पक्षाला मत देते, मानते त्यांचे दोषही दिसतात मला.

धारावीसाठी संघाने काम केलं, कोविडसाठी लढणाऱ्या टीमला मदत केली हे अगदी खरं आहे. माझ्या एका चुलत चुलत भावाच्या मुलाने प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काही दिवस काम केले. असे संघाचे अनेक जण तिथे काम करत होते, मदत करत होते.

>>अरे बापरे... हो का..? गुगल ची लिंक देताय होय... बरं बरं... किती ते खोदकाम करुन उंदीर काढत बसला हो तुम्ही Proud<<

अपेक्षित प्रतिसाद Rofl
बाकी पुढे तुम्ही जे काही लिहले आहे त्याचा पुरावा कुठल्या ब्रिगेडी पत्रकातून देणार आहात Wink

ती लिंक दिली कारण तुमचा काही ठराविक (आणि सोईच्या) लोकांवरच विश्वास बसतो

तश्या बऱ्याच authentic लिंका सापडतील

आता तुमच्या मातृसंस्थेचे कार्य चिकटवा बघू..... कुठे कुठे मारझोड केली, काळे फासले, सभा उधळल्या, तोडफोड केली, पुतळ्यांची विटंबना वगैरे वगैरे
Rofl

कुणी ठासली?
तुझीच ठासली गेलीय.... परत वाच सकाळपासूनची तुझी लागलेली वाट Wink
गिरे तो भी टांग उपर!

आज फारच मज्जा येतेय राव

लिंका चिकटव की तुमच्या समाजकार्याच्या..... का आता गूगलून पण काही सापडत नाहीये Wink

सापडत नाहीत वाटत लिंका Wink
बाकी तूच मागितलीस म्हणून चिकटवली.... नाहीतर आम्हाला काही हौस नव्हती Rofl

सर्वांना कोविड डोस देणार

भाजपाचा बिहार मॅनिफेस्टो

काँग्रेसने स्मॉल पोक्स पासून रेबीज पर्यंत सगळे डोस फुकट दिलेत , पण कधी निवडणुकीत नव्हते बोलले

सापडली का रे लिंक?
का गूगलने हाकलून दिल्या सगळ्या लिंका जसे तुला हाकलले होते इकडून तसे Wink

दिवसभर शोधूनही लिंक मिळत नाहीये तर Wink

तुला असे हाकलले होते का रे इकडून? चल हो पुढच्या वेबसाईटला वगैरे?
तरी आला परत नावापुढे टिंब टिंब वाढवून.... लोचट आयडी Rofl

हायला... कसला रे चिकटगुंडा तु... अनाजी पंतुकड्या पासुन सर्व वंशावळ अशीच निपजली का तुमची..? फुकटचं खाऊन माज दाखवणारी Biggrin

त्याला हत्तीच्या पायी दिले.. तुझ्यावर हत्ती बसवायला पाहिजे... चल फुट इथुन..!

तोल ढळायला लागलाय.... नेहमीसारखा थयथयाट चालू झालाय.
चालू दे तुझे.... मज्जा येतीय Proud

बाकी तुला आज जाम खाज आलेली दिसतेय.. असो... तु बस मज्जा करत. तुझ्या सारख्या सडक्या मानसिकतेच्या पिलावळीला आजचा डोस पुरे.. उद्या भेटु. तो पर्यंत असाच लोळत रहा.. वंशाला शोभेल-साजेलसा..!! Bw

डोस?
कुणी दिला? आज पुरता भंजाळलेला दिसतोयस तू Wink
जा रात्रभर लिंक शोधत बस आणि सापडली की ये इकडे Lol

अंजुताई,
तुमच्या भाच्याचे कौतुक व अभिनंदन. पुण्यातही गरवारे कॉलेजमध्ये संघाचं कोविद सेंटर आहे. माझा एक मित्र तिथे कार्यरत होता आणि फेसबुकवर अपडेट लिहीत असे त्यामुळे माहीत आहे.
पुण्यात स्वरूपवर्धिनी संस्थेचे ज्ञापु(ज्ञानेश पुरंदरे) हेही संघ परिवारातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व कोविडमुळे गेले. तेही कोविदकाळात फील्डवर काम करत होते.

ओह्ह.... सो सॅड Uhoh . आमच्या कॉलनीतल्यांच्या सारखं त्यांचंही घरदार (अविवाहित नसतील तर) पॉझिटीव झालं का..??

बाकी ज्येष्ठ नागरीक कशाला बाहेर पडतात? कोरोना हा काही पूर, आग, भुकंप, परकीय आक्रमण यांसारखा फोटो काढुन मोकळं होण्यासारखा नाहिय हे का समजत नाही यांना..?? आपल्या सोबत आपल्या घरच्यांना पॉझीटीव करुन ईहलोकीची यात्रा संपवण्यात काय हशील...?? की टीममधे युवा खेळाडुंची वानवा आहे..?? की तरुण खेळाडु फक्त व्हॉटस्अप, फेसबुक, ट्विटर यांवर अ‍ॅक्टिव असतात..???

धन्यवाद सनव.

धारावीत जास्त तरुण वर्ग होता, डेडीकेशनने काम करत होते. इथे पण केडीएमसीने संघाची मदत घेतली, कन्टोन्मेंट एरीयात जाऊन काम केलं टीमने, हे फेसबुकवर बघितलं. टीममधले तरुण कार्यकर्तेच होते बहुतेक. ज्याबद्दल प्रत्यक्ष माहीतेय तेवढंच मी लिहीलं.

तेच तर... किती काम करतात बिचारे पण कुठल्याही न्युज चॅनेल वर स्कॉलिंगबार वर साधी एक ओळीची बातमी देखील देत नाहीत मग दांडकेधार्‍यांनी घेतलेले बाईट्स तर फार दूरची बात.

असो.. फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर यांच्याद्वारे माहिती पोचतेय हे तरी काय कमी आहे का...

राजदीप सरदेसाईने चक्क दाखवलेली पुण्यातल्या संघ कार्यकर्त्यांची बातमी, तेही मी fb वर बघितल.

असो, धारावीचा विषय आला आणि मला प्रत्यक्ष माहितेय म्हणून लिहिलं.

पुण्यातल्या संघ कार्यकर्त्यांची बातमी, तेही मी fb वर बघितल>> aho FB warach asata he sarv.

शंभरात असतं म्हणा एखादं चांगलं ... नाही असं नाही.

संघाने धारावीत चांगलं काम केलं असेल तर ते चांगलं म्हणायला हवं. तसेच काम पुणे वगैरे शहरात करावे. तिथे फारच करोना वाढतोय.

रच्याकने ही फेसबुक पोस्ट द्वारकानाथ संझगिरीची आहे. त्यात त्यांनी धारावीच्या कोरोनामुक्तीचे रहस्य सांगितले आहे.
--------------------------------------------------------
*द्वारकानाथ संझगिरी यांचा अप्रतीम लेख ... धारावी आणि इतर परिसरात मुंबई महानगर पालिकेच्या लोकांनी कशी प्रयत्नांची शर्थ केलीय हे यावरून कळेल. महापलिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांना मन:पूर्वक सलाम ! या कहाण्या सर्वांच्या कानांवर जायलाच हव्यात ...

माझ्या दोन डोळ्यात दोन वेगवेगळ्या प्रकारचे अश्रू आहेत. एका डोळ्यात दुःखाचे अश्रू असले तरी दुसरा डोळा आनंदाश्रू मिरवतोय. पहिला डोळा रडतोय तो आणखीन एक कर्तबगार अधिकारी धारातीर्थी पडला म्हणून आणि दुसरा आनंद मिरवतोय ते धारावीच्या लढाईबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे 'डब्लूएचओ'ने पाठ थोपटली म्हणून.

खैरनार यांचं बलिदान सहजासहजी विसरलं जाऊ नये. खैरनार या नावाला एक इतिहास आहे. एक खैरनार मानवाच्या पाशवी शक्तीविरुध्द लढला. जिंकला नाही, पण हरला सुद्धा नाही. त्या खैरनारने पण आपले प्राण पणाला लावले होते. ह्या खैरनारने तर अदृश्य विषाणूला अंगावर घेतलं.
हे खैरनार ‘एच पुर्व’ विभागाचे सहायक आयुक्त म्हणजे पूर्वीचे वॉर्ड़ ऑफिसर. परवाच एका डॉक्टर मित्राशी बोलताना तो मला म्हणाला, "आमच्या एच पूर्व वॉर्ड़मधे सर्वात कमी रुग्ण सापडले. इथे दोन-तीन मोठ्या झोपडपट्टया आहेत. भारतनगर, गोळीबार वगैरे. इथे महानगरपालिका कर्मचारी फार सुंदर काम करताहेत. माझ्या हॉस्पिटलात एक गरोदर बाई पॉझिटिव्ह निघाली, तिला ते थेट 'नायर'मधे घेउन गेले. तिचं घर निर्जंतुक केलं, घरच्यांना विलग केलं. त्यानंतरही चौदा दिवस त्यांना रोज फोन यायचा."
त्याचे शब्द हवेत विरायच्या आत, खैरनार गेल्याची बातमी आली. आमच्या 'व्हीजेटीआय'चे ते विद्यार्थी. मग त्यांनी आयआयटी मधून मास्टर्स डिग्री घेतली. करोनाच्या महामारीत त्यांनी केलेलं काम काही तिथल्या ज्ञानात बसणारं नव्हतं. पण उपजत बुद्धिमत्ता वापरुन ते विषाणूशी लढले. पहिल्या महिन्यात त्यांच्या विभागात दिवसाला वीस रोगी सापडत. पण अत्यंत दाटीवाटीच्या वस्तीवर त्यांनी ड्रोनच्या मदतीने लक्ष ठेवलं, झोपड़या पिंजून काढल्या अणि विषाणूला रोखले. रुग्णसंख्या दुप्पट व्हायचा दर त्यांनी १३६ दिवसावर नेऊन ठेवला. संपूर्ण देशात हा दर कुणीही मिरवत नाही.
त्यांनी त्यांच्या वॉर्ड़ला वाचवलं अणि त्या लढाईत स्वतःची आहुती दिली. त्यांचा डॉक्टर मुलगा नानावटी हॉस्पिटलमधे कोविडशी लढतोय. सूनही डॉक्टर. कोविडशी ते स्वत:चं अख्खं कुटुंब घेऊन लढले. पंचावन्नच्या पुढे वय आणि मधुमेहाच्या व्याधीने पिडीत असलेला हा अधिकारी ही जबाबदारी सहज टाळू शकत होता. पण त्यांनी तसं न करण्याचा निर्णय घेतला. आपले सर्वांचे अश्रू हीच त्यांच्यासाठी तुमच्या सर्वांच्या वतीने दिलेली तोफेची मानवंदना आहे. हे निर्जीव गोळे नाहीत, सजीव अश्रू आहेत.

गंमत पहा. हे खैरनार आधी जी नॉर्थ वॉर्ड्चे सहायक आयुक्त होते. त्यांनीच या वॉर्ड़ची सूत्रं किरण दिघावकरांकडे दिली. दिघावकरांनी धारावीत करोनाच्या विषाणूला असं काही रोखलं की जगाने त्यांची पाठ थोपटली. धारावी हा काही मुंबईचा दागिना नाही. अनेकांच्या मते तर तो एक डाग आहे. जग त्याबद्दल कुजकटपणे बोलतं. कोविडसाठी ती गवताची गंजी होती. फक्त एक ठिणगी ती गंजी पेटवायला पुरेशी होती. ती ठिणगी गंजीवर पडल्यावर गंजी पेटायला लागली होती. जगाला वाटलं, पेटला वणवा. आता भस्म होणार मुंबई. पण असं काही झालं नाही. दिघावकर सेनापती झाले. महानगरपालिकेचे सैनिक त्यांच्या हाताखाली लढले. त्यात डॉक्टर, पोलिस ते सफाई कामगार असे सर्व लढले. काही कोसळले, इतरांनी लढाई पुढे सुरु ठेवली.

जग दिःग्मुढ का झालं ते सांगतो. धारावीत अडीच चौरस किलोमीटर्समधे साडेसात लाख लोक रहातात. तिथे जीएसटी भरणारे पाच हजार धंदे आहेत. चामडं, कापड, मातीच्या वस्तू बनावणारे तिथे पंधरा हजार कारखाने आहेत. तिथली ऐंशी टक्के जनता फक्त साडेचारशे टॉयलेट्स वापरते. दहा बाय दहाच्या एका खोलीत पंधरा माणसं रहातात. यूरोप- अमेरिकेतील देश अशा गोष्टी कल्पनेतसुद्धा आणू शकत नाहीत. त्यांच्यासाठी हा एक सांस्कृतिक धक्का असतो. म्हणून जगाला वाटलं, हे अशक्य आव्हान आहे. 'एक आगका दर्या है और डुबके जाना है' अशी ही परिस्थिती.
सुरवातीला तिथले काही डॉक्टर जिवाच्या भीतीने पळाले. मग दिघावकरांनी, तिथल्याच चोवीस डॉक्टरना एकत्र केलं. त्यांना मास्क, हातमोजे, पीपीइ किट्स दिले. त्यांचे दवाखाने सॅनिटाइज केले. अणि मग अख्खी धारावी पिंजून काढली. ज्यांच्यात लक्षणं आढळली त्यांना विलग केलं. तिथली तीन हॉस्पिटल्स कोविडसाठी घेतली गेली. तिथे घरात विलगीकरण शक्यच नव्हतं. तिथले लग्नाचे हॉल, शाळा वगैरे घेउन विलगीकरण केलं. त्याना खाणंपिणं, जीवनसत्वं, औषधं पुरवली, ज्यांचं पोट बाहेरच्या खाण्यावर अवलंबून होतं अशा पंचवीस हजार माणसांना अन्न दिलं. दोनशे बेड असलेलं एक हॉस्पिटल उभारलं गेलं. तिथे प्राणवायूची सोय आहे. फक्त दहा टक्के अतीगंभीर रोग्यांना धारावीबाहेर नेण्यात आलं. मोक्याच्या ठिकाणी धारावीत प्रवेश बंद केला गेला.

विचार करा, मे महिन्यात सूर्य आग ओकत असताना डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, कारकुनापासुन सफाई कामगारांनी पीपीइ कोट घालून कसं काम केलं असेल? कसे गटारात उतारले असतील? फक्त साडेचारशे टॉयलेट असलेल्या वस्तीत किती घाण बाहेर गटार किंवा नाल्यामधे असेल? हे सगळे कसे छोट्या गल्लीत फिरले असतील? स्वत:च्या जिवाची भिती वाटली नसेल? एक धान्य वाटणारा पोलिस कोविडने गेल्यावर आणि पंधरा वीस पॉझिटिव्ह झाल्यावर अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला नसेल? दिघावकर म्हणाले" काही क्षण भिती वाटली, पण त्यावर आम्ही मात केली." दिगावकरांनी अजून स्वतःची करोनाची चाचणी केलेली नाही. “मला अजुन तरी कधी लक्षणं जाणवली नाहीत. त्यामूळे कधी टेस्ट केली नाही. मला एक दिवस सुद्धा विश्रांती नकोय." या सर्व गोष्टींमुळे हळूहळू करोना आटोक्यात आला. रोगी दुप्पट होण्याचा वेग अठरा दिवसांवरुन सरासरी एकशे आठ दिवसांवर आला. जुलैमधे तर तो सरासरी तीनशेवर आलाय.
अपयश हे पोरकं असतं. पण यश ही गुळाची ढेप असते, त्यामूळे यशाला अनेक मुंगळे चिकटायचा प्रयत्न करतात. तसा प्रयत्न इथेही होतोय. ह्या धारावीच्या कार्यात अनेक सेवाभावी संस्थांनी खारीचा वाटा उचलला. पण सेतू बांधणारी सेना महानगरपालिका, पोलिस, अंगणवाडी कर्मचारी आणि खासगी डॉक्टर ह्यांची होती. त्यांनी प्राण दिले. त्यातल्या अनेकांच्या अंगात विषाणू शिरला, पण ते वाचले. दिघावकर त्यांचे सेनापती आहेत.
अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमं ह्या घटनेचा वेध घेत होती. त्यांनी दिघावकरांचीच मुलाखत का घेतली? कारण त्यांना सेनापती दिसत होता. दिघावकर बातमी घेउन माध्यमांकडे गेले नाहीत, माध्यमं त्यांच्याकडे आली. कारण त्यांना केंद्रबिंदू ठाऊक होता. हे काम प्रसिद्धीसाठी केलेलं नव्हतं. ते निष्ठेने पार पाडलेलं कर्तव्य होतं. त्यामूळे कोविड्च्या लढाईत प्राण देणाऱ्या आणि प्राणाची बाजी लावणाऱ्या आमच्या पालिका कर्मचारी आणि पोलिसांना सलाम.

aho FB warach asata he sarv. >>> fb वर बातमी लिंक बघितली होती प्रत्यक्ष राजदीप सरदेसाई बातमी देताना आणि दाखवताना. पोस्ट्स नाही वाचत मी कोणाच्या. व्हिडीओ असेल छोटासा तर बघते.

केडीएमसीतल्या कार्यकर्त्यांचा व्हिडीओ बघितला पण अनेकजण ओळखीचे त्या एरियात राहतात त्यांनी प्रत्यक्ष सांगितले, संघ कार्यकर्ते टीम येऊन गेली आमच्याकडे. माझं बालपण ज्या एरियात गेलं तिथे कोरोनाचा कहर होता, तिथे ओळखीचे राहतात अजुनही.

मी कुठेही फक्त संघाने काम केलं असं लिहिलं नाही. संघाने कोविड टीमसाठी काम करणाऱ्यांना मदत केली धारावीत असं लिहिलं आहे.

कोविड टीम म्हणजे सुखदा यांनी शेअर केलेल्या लेखात असलेले सर्वच (त्या सर्वाना सलाम आहेच, त्यांचे ऋण आहेत). खैरनार यांचे वाचून डोळ्यातून पाणी आलं.

त्यांना प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन ज्या कोणी मदत केली असेल त्यांचंही कौतुक आणि सलाम त्यात संघाबरोबर इतरही असतील. धारावीत संघ कार्यकर्ते काम करतायेत याचा उल्लेख एबीपी माझाने पण केला होता, मी बघितली आहे news.

अन्जू : छान Bw

सुखदा_ : लेख शेअर केल्यबद्दल धन्यवाद...धारावी संदर्भात याच आशयाच्या बातम्या सर्वच 'मराठी' न्युज चॅनेलवर बघायला मिळत होत्या.

डीजे , हो आमच्याकडे महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाने खूप मेहनत घेतलीये. जवळपास तीनदा चेकिंगला येऊन जायचे. स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करण्याऱ्याचं कौतुक व्हायलाच हवे.
माझे काका कोविदग्रस्त होते. तेव्हा महापालिकेच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले. बेड वगैरे ची व्यवस्था महानगरपालिकेनेच केलेली.

@ सुखदा_ आमच्या इथेही फक्त सरकारी यंत्रणाच येऊन जात होत्या आणि आहेत. त्यासाठी जेवढे धन्यवाद द्यावेत तेवढे कमी. फेसबुक, व्हॉटसअप वर सांगितल्याप्रमाणे इतर कोणी आमच्या एरियात फिरकले नाही... जे डोळ्यांना दिसतं आणि अनुभव येतो त्यावरुन मी माझं मत मांडलं.

Pages