पायातली साखळी

Submitted by एविता on 3 September, 2020 - 03:59

पायातली साखळी.

"ऋषि उठला का गं ?" माईनी विचारलं

"नाही अजून माई."

अरे तुम्हाला लवकर निघायला हवं गुरुवायुरला पोचायचं असेल तर."

"तो म्हणाला आपण सहा वाजता निघालो तरी संध्याकाळी सहा वाजता पोचतो."

"हा असाच आहे लहानपणापासून. रात्री नुसतं जागायचं. दोन दोन वेळा अंगाई गीत गायचं तरच हे महाशय झोपणार."

" कुठलं लल्ला बाय माई?" मी विचारलं.

" सांगते गं, पण त्याला तुला मांडीवर घेऊन म्हणता येणार नाही त्याचं काय?!"माईनी माझी फिरकी घेतली.

" मला सांगा माई, पुढच्या वर्षी उपयोगी पडेल ना..!" मी ही गुगली टाकली.

माई हसल्या. "अगं ते, आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... मी शिकवीन तुला तू परत आलीस की."

" ऐकुन ऐकुन हे अंगाई गीत ऋषिन् ला पाठ झालं असेल ना माई?"

" तुला झोप येत नाही असं एकदा सांगून बघ. मग बघ तो हे म्हणतो का..."

मला झोप येत असेल तरीही तो मला जागवतो ते माईना कसं सांगायचं?....तेवढ्यात ऋषिन् किचन मध्ये आलाच. त्याला चहा दिला आणि मी बॅग भरायला घेतलं.

आम्ही हॉल मध्ये माई आणि अप्पांचा निरोप घेत होतो तेंव्हा अप्पा म्हणाले, " कुठला रुट घेतोयस ऋषि?"

" म्हैसूर, बांदीपूर, मुदुमालाई, नीलंबुर,गुरुवायुर. सव्वाचारशे किलोमीटर होईल साधारण.."

" होय. चांगला रूट आहे. बांदीपूर, मुदुमालाई ...व्वा... हत्तीच हत्ती दिसतील बघ. नाइस रूट. पण बांदीपूर नंतर खायला मिळत नाही कुठेच. सो ईट बेलिफुल सम व्हेअर... खाऊन घ्या भरपूर."

"ओके अप्पा. येस... बाय अप्पा.. बाय माई.."

दोघांना बाय करून आम्ही कार मध्ये बसलो तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.

बांदीपूर अभयारण्यात प्रवेश केला तेंव्हा अकरा वाजले होते आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डने कारचा हॉर्न वाजवायचा नाही, मध्ये कुठेच उतरायचे नाही आणि कार वेगात चालवायची नाही अशा सूचना केल्या. रस्त्यात मध्येच एखादा हत्ती, वाघ दिसला तर गाडी हळू चालवा पण थांबू नका असेही त्याने सांगितले. 

"माझ्या गाडीत एक वाघीण आहे तिला इथल्या जंगलात सोडता येईल काय?," ऋषीन् कारची काच वरती घेत त्या गार्डला पुटपुटला. 

"काय म्हणालात सर?" 

"मी म्हणालो की गाडीवर वाघ हल्ला तर करणार नाही ना..? 

"इल्ला सर, तो हसत बोलला, "ते अगदी रेअर्ली दिसतील. हां आनी मत्तु काणस्ताव री साहेबरू.." (हां. हत्ती मात्र दिसतात हो साहेब...)

"ओके ओके.." असं म्हणत ऋषिन् ने गाडीला वेग दिला तसं मी त्याच्या दंडाला चिमटा काढला. "मी वाघीण काय? जंगलात सोडणार तू मला?"

"आपण दोघं राहायचं गं...! तू शिकार कर मी स्वैपाक करतो."

"तू.... हा हा हा.. स्वैपाक करणार?"

"बर तू कर, मी शिकार करतो."

"बायकांच्या मागचा स्वैपाक काय सुटत नाही बघ."

"जिनिव्हा करार माहिती आहे?"

"होय, त्याचं काय?"

"त्या करारानुसार प्रत्येक कैद्याला जेवण देणं बंधनकारक आहे."

"तू आणि कैदी..? मलाच गळ्यात मंगळसूत्र घालून, कैद करून तुझ्या घरात ठेवलंय तू....  कूर्गला आला होतास मला पळवायला...."

" लेकीन मुझे तुमसे प्यार हो गया और आपको मुझसे मुहब्बत।

" मुहब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने..." 

"गला किस का कटा, क्यों कर कटा, तलवार क्या जाने..."

"काय चाललंय ऋ.... मघाशी वाघीण म्हणालास, आता तलवार..."

"अगं तलवार वगैरे काहीं नाही गं, स्टॉकहोम सिंड्रोम..."

"ओह.. के... व्वा व्वा.. सो स्वीट..."

त्याला अजून एक चिमटा काढला तेवढ्यात " ते बघ, ते बघ"  असं म्हणत त्याने कारचा वेग अगदी हळू केला आणि जरा लांबवर दिसणाऱ्या हत्तीच्या कळपाकडे बोट दाखवले. "आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु..." तो म्हणाला. हिरव्या कंच गवतातून उंच हत्ती हळू हळू चालत जात होते. उजवीकडे नजर गेली तर अगदी जवळ हरणांचा कळप दिसला. ते डोळे रोखून गाडीकडे बघत होते आणि गाडी जवळ आल्यावर टणा टणा उंच उड्या मारत हिरव्या झाडीत दिसेनासे झाले. त्यांच्या बरोबरीने दहा बारा माकडं झाडावरून उड्या मारत गेली. 

बांदीपूर संपल्यावर दहा मिनिटात मदुमालाई नॅशनल पार्क मध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश द्वारावर सेक्युरिटी गार्डने तेच सांगितले जे बांदीपूर इथल्या गार्डने सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे हत्ती, माकडे, हरण दिसले. इथे मोर मात्र बरेच होते. नॅशनल पार्कच्या बाहेर पडल्यावर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथे गाडी थांबवली आणि फ्रेश होऊन खाऊन घेतलं. त्यानंतर ऋषि न् ने गाडीचा वेग वाढवला आणि मध्ये एकदाच पेट्रोल पंप वर थांबून नंतर निघालो ते संध्याकाळचे सहा वाजले गुरुवयुरला पोचलो तेंव्हा. गाडीत बसून अंग एवढं आंबलं होतं की केंव्हा एकदा हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होतो असं झालं होतं. स्टर्लींग हॉटेलला कार पार्क केली तेंव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नऊ वाजता मंदिरात गेलो. हे मंदिर म्हणजे दक्षिणेची द्वारका. मंदिर परिसर आणि तिथली दुकानं बघण्यासारखी आहेत. ते बघितल्यानंतर मग मंदिराच्या ताब्यात असणारे हत्ती बघून येऊ असा विचार केला. मंदिराच्या मागच्या बाजूला साधारण तीन  किलोमीटर अंतरावर असलेल्या अन्नाकोट्टा नावाच्या परिसरात विशाल मैदानावर हे सर्व हत्ती असतात. हे ठिकाण टुरिस्ट स्पॉट म्हणून चांगलेच नावाजलेले आहे.

"एवढ्या सकाळी एवढे सगळे टुरिस्ट?" ऋषिन् म्हणाला.

"व्वाव.. खरंच की, तिकिटाला एवढी लांब लाईन?" 

शेवटी आम्ही आत शिरलो. हत्तींना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बरेच ठिकाणी चालला होता. एका हत्तीच्या समोर उभे राहून आम्ही बघत होतो. त्याच्या अंगावर पाईपने पाणी मारले जात होते.

"किती हत्ती आहेत इथे?" ऋषिन् ने त्या माहूताला विचारले

"एकसष्ट हत्ती आहेत."

"किती वजन असतं हो ह्यांचं?"

"साडेसहा हजार किलोग्रॅम पर्यंत असतं आणि तेरा ते चौदा फूट उंच असतात बघा ते."

"ओहो.. बरं.. पिल्लू हत्तीचं वजन काय असतं?" 

"जन्मलेल्या पिल्लुचं नव्वद शंभर किलो असतं. ताकदवान प्राणी आहे बघा. माणसानं त्याच्या ताकदीचा बराच वापर केला. लाकूड वहा, युद्ध कर, मिरवणूक काढ, हस्तिदंत चोरण्यासाठी मारून टाक... बिचारे... त्या विरप्पनने दोन अडीच हजार हत्ती मारले बघा.."

"आता एवढे दिवस, एवढी वर्षे हत्तींच्या सानिध्यात घालवल्यावर त्यांची भाषा तुम्हाला कळतच असेल ना..?" मी विचारलं.

"होय, त्यांची भाषा शिकवायला येतात महाराष्ट्रातून एक साहेब. ते हत्तीशी बोलतात.आनंद शिंदे नाव आहे बघा."

"व्हॉट.. रिअली? सरप्रायझिंग....! काय काय बोलता हत्तिशी तुम्ही? ह्याचं नाव काय?"

"एक तर ही हत्तीण आहे. नाव मंगला. यांच्यात मातृसत्ताक पद्धती असते. त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलावं लागतं. यांना सात आठ किलोमीटर दूर असलेला बारीक आवाज पण ऐकू येतो. आम्ही शक्यतो कमी आवाज करतो. ते सोंडेने पाणी उडवतात ते व्यायाम म्हणून, खेळ म्हणून नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी भाषा असते ते आपल्याला कळत नाही पण सात आठ किलोमीटर दूर असले तरी पण त्यांना त्यांची भाषा कळते. हे दहा प्रकारचे आवाज काढतात. बार्क, क्राय, ग्रंत, हस्की, रोर, रंबलींग, रेव्ह हे आवाज माणसाला ऐकू येत नाहीत पण ट्रम्पेट, नेझल ट्रम्पेट आणि स्नोर्ट ऐकू येते. भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे दोन हत्ती ठेवले तरी ते त्यांच्या भाषेत बोलतात." 

"भीती नाही वाटत तुम्हाला ते सोंडेनी तुम्हाला उचलतील? किंवा पळून जातील?" 

तो हसायला लागला. "नाही, काही करत नाहीत ते. साखळी आहे ना त्यांच्या पायात. लहान पिल्लू असतात तेंव्हापासून त्यांच्या पायात आम्ही अगदी हलकी साखळी बांधून ठेवतो. ते सुटण्याचा प्रयत्न करतात पण ती साखळी त्यांना पायाला काचते आणि तिथे जखमा होतात. असं चार पाच वेळेला झालं की ते पळायचा प्रयत्न करायचं सोडून देतात. मग साखळी काढून आम्ही साधा दोर बांधतो. काही दिवसांनी दोर काढून टाकतो. आम्ही त्यांना एका मानसिक सापळ्यात अडकवल्याने ते कुठे जात नाहीत. हे हत्ती केव्हाही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात परंतु ते तसे करूच शकत नाहीत. त्यांना माहीतच नाही ते बंधन तोडू शकतात."

" अरेरे.. बिचारे, " ऋषि न् म्हणाला...  " अजून दिसतायत पायाला ते जखमेचे वळ..." 

एकूणच हत्तीबद्दल ही माहिती ऐकून मन थोडे सुन्न झाले.

एक दोन तास त्या पार्क मध्ये फिरल्या नंतर  तिथली मंदिरं बघितली आणि मग थ्रिसूरला जायचं ठरवलं. वाटेतच खाणं करून मग  थ्रिसूरहून यायला चार वाजले. आल्यानंतर गुरुवयुर फिरून झालं आणि कृष्णाचं दर्शन परत एकदा घेऊन हॉटेल वर परतलो. रात्री बेडवर झोपल्यावर मी ऋषिला म्हणाले, " ऋ..... मला झोप येत नाही, माई तुला लहानपणी अंगाई गीत म्हणायच्या ते म्हण की..." मी हसत बोलले.

"अगं ते...? म्हणतो की."  त्याने माझ्या डोक्यावर थोपटायला सुरुवात केली आणि म्हणायला लागला, " आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु...."

मी कुशीवर वळले आणि त्याच्या पायावर पाय टाकला. माझा पाय त्याच्या पायावर पडल्यावर तो म्हणायचा थांबला आणि उठून बसला. मी पण डोळे उघडले. 

 "एवी," तो बोलला, " आय नेव्हर न्यु की जो हत्ती मला लहानपणी झोपवायचा तो हत्ती लहानपणी किती यातना भोगायचा ना..? पायात साखळ्या घालून त्याला अवखळपणे हुंदडू पण देत नसत. खूप वाईट वाटलं बघ सकाळचं ते हत्तीबद्दल ऐकून."

मी ही उठून बसले. " हो ना.. अरे मला पण वाईट वाटलं रे... पण तुला आता का आठवलं ते?"

"तुझ्या पायातली साखळी टोचली आणि माझ्या मनात तो विचार तरळला.." 

मला हसू फुटलं.. " मला हळूच इंडिरेक्टली हत्ती म्हणतोयास ना...?"

"हत्तीच्या पिल्लाच्या वजनानुसार अर्धं वजन आहेच की तुझं..."

मी त्याच्या पाठीत एक गुद्दा घातला. 

"एवी, जोक अपार्ट, सिरीयसली सांगतोय स्विटी, तू एक काम करशील काय?"

"काय?"

"परत पायात कधीही साखळी घालू नकोस. प्लीज."

" अरे..." मी हसत बोलले," एकतर मी हत्तीण नाही आणि सेकंडली तू मला कधीच बंधनात ठेवलं नाहीयेस, पूर्ण स्वातंत्र्य दिलंयस... मग व्हाय वरी?" 

" मला सारखे हे हत्ती आठवत राहतील तुझ्या पायातली साखळी बघितली की..." 

"ओके डिअर, ये लो मैं निकाल देती हूं.." असं म्हणत मी दोन्ही पायातल्या साखळ्या काढून टाकल्या.

दुसऱ्या दिवशी बेंगलोरला पोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.

"कशी झाली ट्रीप?" आम्ही हातपाय धुऊन डायनिंग टेबल वर बसल्यावर, माईनी चहाचे कप आमच्यासमोर सरकवले आणि त्यांनी आणि अप्पांनी प्रश्न केला.

"बेस्ट," ऋषि बोलला, " वेरी मेमोरेबल. मस्त. मजा आली.थ्रिसूरला पण जाऊन आलो काल दुपारी."

"एवि, अन्नाकोट्टातले हत्ती बघितले का?"

"हो अप्पा. बघितले आणि बरीच माहिती मिळाली." मी ट्रीपची सगळी हकीकत सांगितली आणि अप्पाना आणि माईना हे ही सांगितलं की मी आता पायात साखळी कधीच घालणार नाही. आय वॉन्ट टू रिस्पेक्ट ऋषिज् फिलींग्ज.

"नको घालू. खरंच आहे ते. गजांतलक्ष्मी म्हणायचं आणि साखळदंडांनी करकचून ठेवायचं त्या हत्तींना," माई म्हणाल्या, " साक्षात् गजानन तो आणि त्याला बांधून ठेवायचं म्हणजे काय?"

"पिटिफुल" अप्पा म्हणाले.

आणि त्या दिवसापासून माझ्या पायात साखळी नाही.

......

(आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... हत्ती आला हत्ती, कुठल्या गांवचा हत्ती, इथे का आला होता, वाट चुकून आला होता...)

........

 

Group content visibility: 
Use group defaults

Calling Parichit ID . Separate bb is needed for detailed discussion.

ऋ ssन्मेष यांना माझे अनुमोदन.

(१) ऋग्वेदातील संदर्भांनुसार 'दास' या
शब्दापेक्षा 'दासी' हा स्त्रीलिंगी शब्द ऋग्वेदात अधिक आढळून येतो. स्त्रीधन किंवा
दासींचे राजन्य या वर्गासाठी असलेले महत्त्व इत्यादी ऋग्वेदातील संदर्भ स्त्रीलिंगी
व्यक्तीवरील पुरुषांच्याअधिकाराचे सूचन करतात. स्त्रियांच्या लैंगिकतेविषयीचे काही
महत्त्वाचे संदर्भदेखील ऋग्वेदात
सापडतात. पुरुरवा या राजाला आपल्या प्रेमपाशात ओढून त्याचा त्याग करणारी
ऊर्वशी पुरुरव्याला जेव्हा भेटते तेव्हा 'न वै स्त्रैणानि सख्यानि सन्ति
सालवृकाणां हृदयान्येताः (स्त्रियांशी सख्य, स्नेह वगैरे होत नसतो, त्यांची हृदये लांडग्याची असतात.) अशी टिप्पणी ऋग्वेदकारांनी केलेली आहे.
ऋग्वेद- काळातील समाजधारणेत
पुरुषांचे स्वामित्व मान्य न करणाऱ्या आणि त्यांच्याशी एकनिष्ठ न राहणाऱ्या आणि बंधनं झुगरणाऱ्या उन्मुक्त स्त्रियांबद्दल असे विधान का बरे केले असावे? इथे रिया आणि सुशांत चा संदर्भ चपखल बसतो. रियाला लांडगा समजावे. ऋग्वेद काळातल्या काही स्त्रिया जर इतक्या उच्छृंखल असतील तर आजच्या स्त्रिया बंधनं झुगारुन, संधी मिळाली तर निर्वस्त्र फिरायला उत्सुक असतील का? प्रतीकात्मक मानसिक वस्त्र काहींनी त्यागलेलीच आहेत असं म्हणायला काही हरकत नाही.

(२) उन्मुक्त म्हणाव्या अशा स्त्रीसमूहांविषयी
अजून एक संदर्भ.जैमिनीय ब्राह्मण या सामवेदाशी संबद्ध असलेल्या ब्राह्मणग्रंथातील "दीर्घजिव्ही" नामक लांब जीभ असलेल्या, सोमरसाचे पान करणार्या (भद्र/ सभ्य समाजात लांब जीभ हे बडबडेपणाचे किंवा आगाऊपणाचेही लक्षण मानले जाते.) "राक्षसीचा" बंदोबस्त करण्यासाठी इंद्र सुमित्र नामक देखण्या युवकाला तिला प्रेमपाशात ओढण्यासाठी पाठवतो. त्याला पाहून ती म्हणते, 'तुला एकच पौरुष अवयव (लिंग) आहे. माझ्याकडे मात्र अनेक जननेंद्रिये आहेत.' मग सुमित्रच्या प्रत्येक
अवयवावर लिंग निर्माण करून त्याला इंद्र पुन्हा तिच्याकडे पाठवतो व त्यांच्या रतिक्रीडेच्या वेळी ती झोपली असतानाच इंद्र तिच्यावर आघात करून तिला मारतो अशी ती कथा.
( त्या काळात ही वटवट करणाऱ्या बायकांची जमात अस्तित्वात होती हे सिद्ध होते. आता तर संशोधनातून सिद्ध झाले आहे की बायका पुरुषा पेक्षा जास्त बोलतात आणि ते ही निरर्थक, असंबद्ध आणि सबंध जोडायचाच असेल तर बादरायण संबंध जोडण्यात माहीर असतात.)

(३) बौद्ध जातकांनी काय म्हंटले आहे ते जाणून घेवू. स्त्री ही असत्याचे प्रतीक, वाळूप्रमाणे चंचल, निसरडी,
सत्यासत्यतेचा संभ्रम निर्माण करून फसवणाऱ्या असल्याचं विधान जातककार सहज करतात. दुसरे एक जातक स्त्रियांना
बिनदिक्कतपणे आक्रस्ताळ्या, काड्या
लावणाऱ्या, बिनडोक आणि मूर्ख असल्याचं घोषित करून टाकतं. बौद्ध साहित्याची प्रकृती साधारणतः वेदविरोधी, समताप्रवण असल्याचे मानले जात असले तरीही. 'बंधनमोक्खजातक' या
जातकामध्ये उन्मुक्त विवाहबाह्य संबंध
ठेवणार्या व ते बिंग फुटू नये म्हणून संबंधित
पुरुषाविषयी राजाकडे खोटे आरोप नोंदवणाऱ्या राणीच्या कथेत तिच्या उदाहरणावरून स्त्रीजातीवर केलेलं भाष्य अशाच धारणांचे प्रतिनिधित्व करते.

चला, ऋग्वेद काळ म्हणजे फार प्राचीन काल आहे असं मानलं तर त्यानंतर तब्बल साडेसहा हजार वर्षांनंतर तुलसी दास " ढोल गंवार शूद्र पशु नारी ये सब ताड़न के अधिकारी" असं का म्हणतात?

तथाकथित स्वातंत्र्यासाठी बंडाचा झेंडा घेऊन निघालेल्या बायकांचं मत यावर काय असेल माहिती नाही. ते ऋग्वेद खोटं आहे असं ही म्हणतील. जातक भंपक आहे असं ही विधान करतील. तुलसी दास असा कोणी अस्तित्वातच नव्हता असेही प्रमाणपत्र देतील. Who knows...?

मायबोलीवर एखादा ऋन्मेष येतो आणि दणादण धागे काढू लागतो. तेव्हा त्याचे ते स्वातंत्र्य हिरावून घ्यायला काही जण आरडाओरडा करतात >>>> तेच म्हटलं अजून 'मी मी' कसं आलं नाही.
स्वातंत्र्य म्हणजे nuisance नाही. प्रत्येकाने आपलं (जन्मतः असलेलं) स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यवर घाला घालत नाही ना हे पहायला हवं. त्याला मॅच्युरिटी म्हणतात.
लग्न झालेल्या सुनेने स्वतःचं स्वातंत्र्य जपताना सासरच्या लोकांची established जीवनपद्धती उधळून लावावी असं वरच्या चर्चेत कोणीच म्हणालं नाही आहे. पण थोडं तुझं थोडं माझं आणि काही एकमेकांचं आवडलेलं adopt केलेलं असं सुद्धा करताना स्वातंत्र्य जपता येतं आणि ती तडजोड किंवा आवडलं/वाटलं म्हणून adopt केलेली नवीन गोष्ट स्वतःच्या मताने केलेली असते, लादलेली नाही.

थोडेतरी धागे निखळ आनंदासाठी असावेत असा नियम केला पहिजे माबो वर....
प्रत्येक धाग्यात काही ना काही चुकीचं दिसतं आणि मग गोंधळ सुरुच...
या अशा सगळ्या चर्चांमुळे मूळ लेखातली मजाच निघुन जाते....असो...
डीबेट असा एक स्वतंत्र ग्रुप करयला हवाय माबो वर आता...म्हणजे माझ्यासारखे काही लोक तिकडे फिरकणार च नाहीत...

लग्न झालेल्या सुनेने स्वतःचं स्वातंत्र्य जपताना सासरच्या लोकांची established जीवनपद्धती उधळून लावावी असं वरच्या चर्चेत कोणीच म्हणालं नाही आहे. पण थोडं तुझं थोडं माझं आणि काही एकमेकांचं आवडलेलं adopt केलेलं असं सुद्धा करताना स्वातंत्र्य जपता येतं

>>>>>>>>>>

एक्झॅक्टली !

मला वाटते एविता यांनी तेच म्हटले होते.

कुठलीही स्त्री लग्नानंतर सासरी जाते तेव्हा तिला नवीन माणसांत राहताना माहेरची आपली वागणूक बदलावीच लागणार. कारण तिचे जे वागणे माहेरच्या वातावरणाला साजेसे होते ते सासरच्या वातावरणाला असेलच असे नाही. थोडक्यात तिच्या आधीच्या मनासारखे वागण्यावर बंधने येणारच. ते तिने सांमजस्यानेच थोडे तुझे थोडे माझे करत घ्यायला हवे. आणि या थोडेमध्ये तिला जास्त मिळाले तर तिने सासरच्यांचे आभार मानल्यास काय चुकले?

पण काही प्रतिसादात पुर्ण स्वातंत्र्याचा हट्ट दिसतोय तो चुकीचा आहे. अन्यथा मग तुम्ही लग्नसंस्थेवर आणि पितृसत्ताक पद्धतीवर मुळापासूनच घाव घालायला हवा.

स्वातंत्र्य म्हणजे nuisance नाही. प्रत्येकाने आपलं (जन्मतः असलेलं) स्वातंत्र्य जपताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यवर घाला घालत नाही ना हे पहायला हवं. त्याला मॅच्युरिटी म्हणतात.
लग्न झालेल्या सुनेने स्वतःचं स्वातंत्र्य जपताना सासरच्या लोकांची established जीवनपद्धती उधळून लावावी असं वरच्या चर्चेत कोणीच म्हणालं नाही आहे. पण थोडं तुझं थोडं माझं आणि काही एकमेकांचं आवडलेलं adopt केलेलं असं सुद्धा करताना स्वातंत्र्य जपता येतं आणि ती तडजोड किंवा आवडलं/वाटलं म्हणून adopt केलेली नवीन गोष्ट स्वतःच्या मताने केलेली असते, लादलेली नाही.

>>>> प्रतिसाद आवडला !

Pages