पायातली साखळी

Submitted by एविता on 3 September, 2020 - 03:59

पायातली साखळी.

"ऋषि उठला का गं ?" माईनी विचारलं

"नाही अजून माई."

अरे तुम्हाला लवकर निघायला हवं गुरुवायुरला पोचायचं असेल तर."

"तो म्हणाला आपण सहा वाजता निघालो तरी संध्याकाळी सहा वाजता पोचतो."

"हा असाच आहे लहानपणापासून. रात्री नुसतं जागायचं. दोन दोन वेळा अंगाई गीत गायचं तरच हे महाशय झोपणार."

" कुठलं लल्ला बाय माई?" मी विचारलं.

" सांगते गं, पण त्याला तुला मांडीवर घेऊन म्हणता येणार नाही त्याचं काय?!"माईनी माझी फिरकी घेतली.

" मला सांगा माई, पुढच्या वर्षी उपयोगी पडेल ना..!" मी ही गुगली टाकली.

माई हसल्या. "अगं ते, आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... मी शिकवीन तुला तू परत आलीस की."

" ऐकुन ऐकुन हे अंगाई गीत ऋषिन् ला पाठ झालं असेल ना माई?"

" तुला झोप येत नाही असं एकदा सांगून बघ. मग बघ तो हे म्हणतो का..."

मला झोप येत असेल तरीही तो मला जागवतो ते माईना कसं सांगायचं?....तेवढ्यात ऋषिन् किचन मध्ये आलाच. त्याला चहा दिला आणि मी बॅग भरायला घेतलं.

आम्ही हॉल मध्ये माई आणि अप्पांचा निरोप घेत होतो तेंव्हा अप्पा म्हणाले, " कुठला रुट घेतोयस ऋषि?"

" म्हैसूर, बांदीपूर, मुदुमालाई, नीलंबुर,गुरुवायुर. सव्वाचारशे किलोमीटर होईल साधारण.."

" होय. चांगला रूट आहे. बांदीपूर, मुदुमालाई ...व्वा... हत्तीच हत्ती दिसतील बघ. नाइस रूट. पण बांदीपूर नंतर खायला मिळत नाही कुठेच. सो ईट बेलिफुल सम व्हेअर... खाऊन घ्या भरपूर."

"ओके अप्पा. येस... बाय अप्पा.. बाय माई.."

दोघांना बाय करून आम्ही कार मध्ये बसलो तेंव्हा सकाळचे सहा वाजले होते.

बांदीपूर अभयारण्यात प्रवेश केला तेंव्हा अकरा वाजले होते आणि तिथल्या सिक्युरिटी गार्डने कारचा हॉर्न वाजवायचा नाही, मध्ये कुठेच उतरायचे नाही आणि कार वेगात चालवायची नाही अशा सूचना केल्या. रस्त्यात मध्येच एखादा हत्ती, वाघ दिसला तर गाडी हळू चालवा पण थांबू नका असेही त्याने सांगितले. 

"माझ्या गाडीत एक वाघीण आहे तिला इथल्या जंगलात सोडता येईल काय?," ऋषीन् कारची काच वरती घेत त्या गार्डला पुटपुटला. 

"काय म्हणालात सर?" 

"मी म्हणालो की गाडीवर वाघ हल्ला तर करणार नाही ना..? 

"इल्ला सर, तो हसत बोलला, "ते अगदी रेअर्ली दिसतील. हां आनी मत्तु काणस्ताव री साहेबरू.." (हां. हत्ती मात्र दिसतात हो साहेब...)

"ओके ओके.." असं म्हणत ऋषिन् ने गाडीला वेग दिला तसं मी त्याच्या दंडाला चिमटा काढला. "मी वाघीण काय? जंगलात सोडणार तू मला?"

"आपण दोघं राहायचं गं...! तू शिकार कर मी स्वैपाक करतो."

"तू.... हा हा हा.. स्वैपाक करणार?"

"बर तू कर, मी शिकार करतो."

"बायकांच्या मागचा स्वैपाक काय सुटत नाही बघ."

"जिनिव्हा करार माहिती आहे?"

"होय, त्याचं काय?"

"त्या करारानुसार प्रत्येक कैद्याला जेवण देणं बंधनकारक आहे."

"तू आणि कैदी..? मलाच गळ्यात मंगळसूत्र घालून, कैद करून तुझ्या घरात ठेवलंय तू....  कूर्गला आला होतास मला पळवायला...."

" लेकीन मुझे तुमसे प्यार हो गया और आपको मुझसे मुहब्बत।

" मुहब्बत ही ना जो समझे वो जालिम प्यार क्या जाने..." 

"गला किस का कटा, क्यों कर कटा, तलवार क्या जाने..."

"काय चाललंय ऋ.... मघाशी वाघीण म्हणालास, आता तलवार..."

"अगं तलवार वगैरे काहीं नाही गं, स्टॉकहोम सिंड्रोम..."

"ओह.. के... व्वा व्वा.. सो स्वीट..."

त्याला अजून एक चिमटा काढला तेवढ्यात " ते बघ, ते बघ"  असं म्हणत त्याने कारचा वेग अगदी हळू केला आणि जरा लांबवर दिसणाऱ्या हत्तीच्या कळपाकडे बोट दाखवले. "आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु..." तो म्हणाला. हिरव्या कंच गवतातून उंच हत्ती हळू हळू चालत जात होते. उजवीकडे नजर गेली तर अगदी जवळ हरणांचा कळप दिसला. ते डोळे रोखून गाडीकडे बघत होते आणि गाडी जवळ आल्यावर टणा टणा उंच उड्या मारत हिरव्या झाडीत दिसेनासे झाले. त्यांच्या बरोबरीने दहा बारा माकडं झाडावरून उड्या मारत गेली. 

बांदीपूर संपल्यावर दहा मिनिटात मदुमालाई नॅशनल पार्क मध्ये प्रवेश झाला आणि प्रवेश द्वारावर सेक्युरिटी गार्डने तेच सांगितले जे बांदीपूर इथल्या गार्डने सांगितले होते. अगदी त्याचप्रमाणे हत्ती, माकडे, हरण दिसले. इथे मोर मात्र बरेच होते. नॅशनल पार्कच्या बाहेर पडल्यावर जे पहिलं हॉटेल दिसलं तिथे गाडी थांबवली आणि फ्रेश होऊन खाऊन घेतलं. त्यानंतर ऋषि न् ने गाडीचा वेग वाढवला आणि मध्ये एकदाच पेट्रोल पंप वर थांबून नंतर निघालो ते संध्याकाळचे सहा वाजले गुरुवयुरला पोचलो तेंव्हा. गाडीत बसून अंग एवढं आंबलं होतं की केंव्हा एकदा हॉटेल मध्ये जाऊन फ्रेश होतो असं झालं होतं. स्टर्लींग हॉटेलला कार पार्क केली तेंव्हा संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नऊ वाजता मंदिरात गेलो. हे मंदिर म्हणजे दक्षिणेची द्वारका. मंदिर परिसर आणि तिथली दुकानं बघण्यासारखी आहेत. ते बघितल्यानंतर मग मंदिराच्या ताब्यात असणारे हत्ती बघून येऊ असा विचार केला. मंदिराच्या मागच्या बाजूला साधारण तीन  किलोमीटर अंतरावर असलेल्या अन्नाकोट्टा नावाच्या परिसरात विशाल मैदानावर हे सर्व हत्ती असतात. हे ठिकाण टुरिस्ट स्पॉट म्हणून चांगलेच नावाजलेले आहे.

"एवढ्या सकाळी एवढे सगळे टुरिस्ट?" ऋषिन् म्हणाला.

"व्वाव.. खरंच की, तिकिटाला एवढी लांब लाईन?" 

शेवटी आम्ही आत शिरलो. हत्तींना आंघोळ घालण्याचा कार्यक्रम बरेच ठिकाणी चालला होता. एका हत्तीच्या समोर उभे राहून आम्ही बघत होतो. त्याच्या अंगावर पाईपने पाणी मारले जात होते.

"किती हत्ती आहेत इथे?" ऋषिन् ने त्या माहूताला विचारले

"एकसष्ट हत्ती आहेत."

"किती वजन असतं हो ह्यांचं?"

"साडेसहा हजार किलोग्रॅम पर्यंत असतं आणि तेरा ते चौदा फूट उंच असतात बघा ते."

"ओहो.. बरं.. पिल्लू हत्तीचं वजन काय असतं?" 

"जन्मलेल्या पिल्लुचं नव्वद शंभर किलो असतं. ताकदवान प्राणी आहे बघा. माणसानं त्याच्या ताकदीचा बराच वापर केला. लाकूड वहा, युद्ध कर, मिरवणूक काढ, हस्तिदंत चोरण्यासाठी मारून टाक... बिचारे... त्या विरप्पनने दोन अडीच हजार हत्ती मारले बघा.."

"आता एवढे दिवस, एवढी वर्षे हत्तींच्या सानिध्यात घालवल्यावर त्यांची भाषा तुम्हाला कळतच असेल ना..?" मी विचारलं.

"होय, त्यांची भाषा शिकवायला येतात महाराष्ट्रातून एक साहेब. ते हत्तीशी बोलतात.आनंद शिंदे नाव आहे बघा."

"व्हॉट.. रिअली? सरप्रायझिंग....! काय काय बोलता हत्तिशी तुम्ही? ह्याचं नाव काय?"

"एक तर ही हत्तीण आहे. नाव मंगला. यांच्यात मातृसत्ताक पद्धती असते. त्यांच्याशी खूप प्रेमाने बोलावं लागतं. यांना सात आठ किलोमीटर दूर असलेला बारीक आवाज पण ऐकू येतो. आम्ही शक्यतो कमी आवाज करतो. ते सोंडेने पाणी उडवतात ते व्यायाम म्हणून, खेळ म्हणून नाही. त्यांची स्वतःची एक वेगळी भाषा असते ते आपल्याला कळत नाही पण सात आठ किलोमीटर दूर असले तरी पण त्यांना त्यांची भाषा कळते. हे दहा प्रकारचे आवाज काढतात. बार्क, क्राय, ग्रंत, हस्की, रोर, रंबलींग, रेव्ह हे आवाज माणसाला ऐकू येत नाहीत पण ट्रम्पेट, नेझल ट्रम्पेट आणि स्नोर्ट ऐकू येते. भिंतीच्या अलीकडे आणि पलीकडे दोन हत्ती ठेवले तरी ते त्यांच्या भाषेत बोलतात." 

"भीती नाही वाटत तुम्हाला ते सोंडेनी तुम्हाला उचलतील? किंवा पळून जातील?" 

तो हसायला लागला. "नाही, काही करत नाहीत ते. साखळी आहे ना त्यांच्या पायात. लहान पिल्लू असतात तेंव्हापासून त्यांच्या पायात आम्ही अगदी हलकी साखळी बांधून ठेवतो. ते सुटण्याचा प्रयत्न करतात पण ती साखळी त्यांना पायाला काचते आणि तिथे जखमा होतात. असं चार पाच वेळेला झालं की ते पळायचा प्रयत्न करायचं सोडून देतात. मग साखळी काढून आम्ही साधा दोर बांधतो. काही दिवसांनी दोर काढून टाकतो. आम्ही त्यांना एका मानसिक सापळ्यात अडकवल्याने ते कुठे जात नाहीत. हे हत्ती केव्हाही त्यांच्या बंधनातून मुक्त होऊ शकतात परंतु ते तसे करूच शकत नाहीत. त्यांना माहीतच नाही ते बंधन तोडू शकतात."

" अरेरे.. बिचारे, " ऋषि न् म्हणाला...  " अजून दिसतायत पायाला ते जखमेचे वळ..." 

एकूणच हत्तीबद्दल ही माहिती ऐकून मन थोडे सुन्न झाले.

एक दोन तास त्या पार्क मध्ये फिरल्या नंतर  तिथली मंदिरं बघितली आणि मग थ्रिसूरला जायचं ठरवलं. वाटेतच खाणं करून मग  थ्रिसूरहून यायला चार वाजले. आल्यानंतर गुरुवयुर फिरून झालं आणि कृष्णाचं दर्शन परत एकदा घेऊन हॉटेल वर परतलो. रात्री बेडवर झोपल्यावर मी ऋषिला म्हणाले, " ऋ..... मला झोप येत नाही, माई तुला लहानपणी अंगाई गीत म्हणायच्या ते म्हण की..." मी हसत बोलले.

"अगं ते...? म्हणतो की."  त्याने माझ्या डोक्यावर थोपटायला सुरुवात केली आणि म्हणायला लागला, " आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु...."

मी कुशीवर वळले आणि त्याच्या पायावर पाय टाकला. माझा पाय त्याच्या पायावर पडल्यावर तो म्हणायचा थांबला आणि उठून बसला. मी पण डोळे उघडले. 

 "एवी," तो बोलला, " आय नेव्हर न्यु की जो हत्ती मला लहानपणी झोपवायचा तो हत्ती लहानपणी किती यातना भोगायचा ना..? पायात साखळ्या घालून त्याला अवखळपणे हुंदडू पण देत नसत. खूप वाईट वाटलं बघ सकाळचं ते हत्तीबद्दल ऐकून."

मी ही उठून बसले. " हो ना.. अरे मला पण वाईट वाटलं रे... पण तुला आता का आठवलं ते?"

"तुझ्या पायातली साखळी टोचली आणि माझ्या मनात तो विचार तरळला.." 

मला हसू फुटलं.. " मला हळूच इंडिरेक्टली हत्ती म्हणतोयास ना...?"

"हत्तीच्या पिल्लाच्या वजनानुसार अर्धं वजन आहेच की तुझं..."

मी त्याच्या पाठीत एक गुद्दा घातला. 

"एवी, जोक अपार्ट, सिरीयसली सांगतोय स्विटी, तू एक काम करशील काय?"

"काय?"

"परत पायात कधीही साखळी घालू नकोस. प्लीज."

" अरे..." मी हसत बोलले," एकतर मी हत्तीण नाही आणि सेकंडली तू मला कधीच बंधनात ठेवलं नाहीयेस, पूर्ण स्वातंत्र्य दिलंयस... मग व्हाय वरी?" 

" मला सारखे हे हत्ती आठवत राहतील तुझ्या पायातली साखळी बघितली की..." 

"ओके डिअर, ये लो मैं निकाल देती हूं.." असं म्हणत मी दोन्ही पायातल्या साखळ्या काढून टाकल्या.

दुसऱ्या दिवशी बेंगलोरला पोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते.

"कशी झाली ट्रीप?" आम्ही हातपाय धुऊन डायनिंग टेबल वर बसल्यावर, माईनी चहाचे कप आमच्यासमोर सरकवले आणि त्यांनी आणि अप्पांनी प्रश्न केला.

"बेस्ट," ऋषि बोलला, " वेरी मेमोरेबल. मस्त. मजा आली.थ्रिसूरला पण जाऊन आलो काल दुपारी."

"एवि, अन्नाकोट्टातले हत्ती बघितले का?"

"हो अप्पा. बघितले आणि बरीच माहिती मिळाली." मी ट्रीपची सगळी हकीकत सांगितली आणि अप्पाना आणि माईना हे ही सांगितलं की मी आता पायात साखळी कधीच घालणार नाही. आय वॉन्ट टू रिस्पेक्ट ऋषिज् फिलींग्ज.

"नको घालू. खरंच आहे ते. गजांतलक्ष्मी म्हणायचं आणि साखळदंडांनी करकचून ठेवायचं त्या हत्तींना," माई म्हणाल्या, " साक्षात् गजानन तो आणि त्याला बांधून ठेवायचं म्हणजे काय?"

"पिटिफुल" अप्पा म्हणाले.

आणि त्या दिवसापासून माझ्या पायात साखळी नाही.

......

(आनी बंत आनी, या उर आनी, इल्लिग याक बंदित्तू, हादी तप्पे बंदित्तु... हत्ती आला हत्ती, कुठल्या गांवचा हत्ती, इथे का आला होता, वाट चुकून आला होता...)

........

 

Group content visibility: 
Use group defaults

नक्की येणार... तू पुण्यात आलीस की मला मेसेज कर... नक्कीच भेटू...

आवडत्या लेखिकेला भेटायची आयती संधी कोण सोडेल...
मला तर पाहुणचार पण मिळणार आहे.... Lucky me

खरंच पुण्यात आल्यापासून म्हैसूरची बऱ्याचदा आठवण येते.

कन्नडिगा लोक खूप चांगली असतात. (निदान मला भेटलेली तरी तशी होती.) लिबरल, खऱ्या अर्थाने उच्चशिक्षित आणि वेल मॅनर्ड. हिशोबाला काटेकोर, पण मी एकटाच राहत होतो तेव्हा जवळपास एक दिवसाआड ती लोक काहीनाकाही निमित्त करून मला खाऊ घालायची. कधी नाश्ता, तर कधी जेवण.. खूप गोड!

छान प्रतिसाद दिलात एविता. मनापासून पटला. अगदी हेच आलेलं माझ्या मनात. लेख तर आवडलाच. तु नशिबवान आहेस आणि आपल्या माणसांबद्दल कृतज्ञ ही आहेस याहून छान काय असू शकतं.

कविन, अरे व्वा! छानच गं! पण मराठी वर्जन की ओरिजिनल कानडी गुणगुणलीस...?! :-):-)

वावे. मनःपूर्वक धन्यवाद.

Buki, थँक्यू सो मच.

शुभ८६ मनःपूर्वक धन्यवाद.

मी_ अस्मिता. (१)तुझ्या प्रतिसादातील एक एक शब्द म्हणजे खणखणीत नाणं आहे. त्यातलं आयकॉनिक वाक्य म्हणजे Technically you demean the relationship to pamper your personal ego. बंधनं झुगारणे. झुगारणे या क्रियापदातच एक प्रकारचं बंड सामावलेले आहे. हा बंड कशासाठी? कसलं स्वातंत्र्य हवंय आपल्याला? कुठल्याच मुलीला सासर चुकलेले नाही. मुलींसाठी तो एक प्रकारचा पुनर्जन्मच. नवीन नाव, नवीन फॅमिली, नव्या बाळाला हातात वाळा घालतात तश्या बांगड्या, नवीन वस्त्रालंकार, दागिने, जन्मलेल्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट तसे मॅरेज सर्टिफिकेट. हा पुनर्जन्मच नाही काय? मग ज्या घरात आपला पुनर्जन्म झालाय त्याचं घरातली बंधनं तोडायची? ही निव्वळ कृतघ्नता नाही तर काय आहे? त्याला कुठलं लॉजिक लागू पडतं कळत नाही. कशासाठी ही नकारात्मक भावना मनात बाळगायची? मनातली नकारात्मकता शेवटी बूमरॅंग प्रमाणे आपल्यावरच उलटते आणि केवळ आपल्यावर नाही तर आपल्याशी संबंधीत असणाऱ्या आपल्या अगदी जवळच्या माणसांवर सुद्धा त्याचा परिणाम होतो. आपण नकारात्मक भूमिकेत शिरलो कि नात्यातली सहजता हरवून जाते याचं ज्ञान असणं गरजेचं आहे. संवेदना, जाणिवा आणि अनुकंपा बाळगायला काय हरकत आहे? काय बिघडतंय आपण समोरच्या व्यक्तीचा विचार केला तर? काही लोकं जात्याच क्षमाशील आणि परहितदक्ष ( altruistic ) असतात. पण आपण तसे नसू तर निदान बनू तर शकतो. नाहीतर सकारात्मक कार्यशाळेत जावून पहावे काही फायदा होतो का. आपण अख्ख्या जगावर सूड उगवायचा आहे अशा पद्धतीने का वागतो याची कारण मिमांसा कधी करतच नाही. जगाला प्रेमानं मिठीत घ्यायचा ऑप्शन ही असतो त्याचा विचारच होत नाही. लोकं दुखावली जाऊ नयेत हे प्राथमिक उद्दिष्ट असायला हवे. आपल्याला हिशेबी असून चालत नाही. बदलत्या काळानुसार प्रतिक्रियेचा परीघ बदलतो. जे काय झुगारायचं ते विरलेल्या आणि विझलेल्या क्षणांचे ओझे. नाती दुखावली जायला लागली की त्याच्यावर राख साठत जाते आणि बऱ्याच काळानंतर, अजून त्या नात्यात धुगधुगी असेल म्हणून आपण फुंकर घालायला जातो तेंव्हा त्यातली राख आपल्याच डोळ्यात अशी उडते की डोळे चुरचुरायला लागतात आणि डोळ्याची लाली कमी व्हायला काळ जावा लागतो.

(२)दिव्यांग मुलांचे आई वडील मी बघीतले आहेत. जर देव ही संकल्पना दया, करुणा, क्षमा, अनुकंपा ह्याच्याशी जुडली असेल तर हेच ते आई वडील जे जितेजागते देव आहेत. पृथ्वीतलावर वावरणारे. कशाला जायचं त्या काळ्याकभिन्न पाषणातल्या आणि पांढऱ्या फटक संगमरवरी दगडाच्या देवळात आणि ती मोठी घंटा वाजवून आपण फार मोठं पाप केलं अशा थाटात दोन्ही गालाला हात लावायचा? नतमस्तक व्हायचं असेल तर हेच ते पालक. इथे कर्नाटक आणि तामिनाडूमधील असे कित्येक पालक मी पाहिले आहेत. त्यांच्या डोळ्यात दुःखाचा टिपूस शोधणे म्हणजे समुद्रात सुई शोधणे. कसं करत असतील हे सगळं.? माझा देवावर विश्वास नाही. विश्वास ठेवणे म्हणजे त्याला मानणे, मूर्त स्वरूप देणे. पण तो निर्गुण निराकार आहे. त्याचे स्तोत्र गाऊन आणि आरती ओवाळून त्याचे भाट आणि चारण मला नाही व्हायचं. मी त्याची खूष मस्कऱ्या नाही. देव असेल तर तो ह्या माऊलीत. स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी ही ओळ यशवं ताना अशीच माऊली पाहून सुचली असावी असं वाटतं. किती तो त्याग करावा अशा आईनी. १९६६ सालचा एक हिंदी चित्रपट आहे दादी मां. त्यातलं हे गाणं इथे देते त्यातला अर्थ कळला तरी बस्स.

उसको नहीं देखा हमने कभी
पर इसकी ज़रुरत क्या होगी
ऐ माँ, ऐ माँ तेरी सूरत से अलग
भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी
उसको नहीं देखा हमने कभी

इनसान तो क्या देवता भी
आँचल में पले तेरे
है स्वर्ग इसी दुनिया में
क़दमों के तले तेरे
ममता ही लुटाये जिसके नयन
ऐसी कोई मूरत क्या होगी
ऐ माँ, ऐ माँ तेरी सूरत...

क्यों धूप जलाए दुखों की
क्यों गम की घटा बरसे
ये हाथ दुआओं वाले
रहते हैं सदा सर पे
तू है तो अँधेरे पथ में हमें
सूरज की ज़रुरत क्या होगी
ऐ माँ, ऐ माँ तेरी सूरत...

कहते हैं तेरी शान में जो
कोई ऊँचे बोल नहीं
भगवान के पास भी माता
तेरे प्यार का मोल नहीं
हम तो यही जानें तुझसे बड़ी
संसार की दौलत क्या होगी
ऐ माँ, ऐ माँ तेरी सूरत...

अशा माऊलीला २१ तोफांची सलामी पण कमी आहे.

आसा, मनःपूर्वक धन्यवाद.

अंजली१२ मनःपूर्वक आभार

नंबर१वाचक. इतनी तारीफ!? शर्म के मारे हम इतने लाल हो जायेंगे के टमाटर भी जेलस हो जायेंगे...!

अजिंक्य राव पाटील, आता तर याच तुम्ही मैसूर ला!

भाग्यश्री १२३ मनःपूर्वक धन्यवाद. कृतज्ञ असणं नैसर्गिक आहे. कृतघ्न होण्यासाठी बराच अभ्यास करावा लागतो. हाहाहा!

सूर्य गंगा, तुझे मनःपूर्वक धन्यवाद.

माहिती नाही का, पण हा लेख वाचल्यानंतर मनापासून वाटलं आणि मी आज लेकिच्या पायातील वाळे काढून ठेवले Happy

एविता, लेख आणि तुझा पहिला विस्तृत प्रतिसाद आवडला पण दुसरा बहुतांशी नाही पटला.

लग्न म्हणजे पुनर्जन्म ही संकल्पना नवऱ्याला का बरं नाही लावायची ? सासरच्या घरी माहेरच्या प्रथा राबवल्या तर ते चुकीचं कसं? हिंदू धर्म सोडता इतर धर्मात चांगल्या प्रथा नाहीत ? दुसऱ्या जाती धर्मातली मुलगी लग्न करून आणली म्हणून तिच्या प्रथा सासरी accept होतात ?

त्याबद्दल एखाद्या मुलीला आक्षेप असू शकतोच की. ते बंधन वाटू शकतंच. हां आता तुझ्या घरी जे चालू आहे ते बरोबर आहे हे तुझं मत झालं. त्यात तू कम्फर्टेबल आहेस पण म्हणून सगळेच असतील असं नाही.

हा बंड त्याच्यासाठीच.
जसं आपल्याला कोणी जज करू नये असं आपल्याला वाटतं तर इतरांना जज करण्याचा हक्क ही आपल्याला नाही. तुझ्या दुसऱ्या विस्तृत पोस्टितल्या पहिल्या मुद्द्यामध्ये तू स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी झगडणार्या स्त्रियांना जज करतेएस असं मला वाटतं. अगदी मनापासून

पहिल्या पोस्ट मध्ये तूच लिहिलयेस ना एकी अगदी आर्थिक स्वातंत्र्यही न देणारी कुटुंब आहेत जगात . अशा मुलींसाठी तुझी पोस्ट कितीतरी चुकीची आहे.
तो सो कॉल्ड 'संस्कृतीरक्षक' समाज याच विचारांचा असतो जनरली.

तू विचारी वाटतेस , तुझं लिखाण बरेच जण आवडीने वाचतात म्हणून तुला उद्देशून लिहावंसं वाटलं. गैरसमज करून घेऊ नकोस

लेख छान आहे आणि त्या लेखातील साखळी काढण्याच्या प्रसंगाला त्या दिवसातल्या अनुभवाची पार्श्वभूमी आहे म्हणून साखळी काढणे हे समजू शकते.
पण @किल्ली, तुमच्या भावनांचा पूर्ण आदर ठेऊन फक्त दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. पायातली फक्त साखळी हे बंधन नाहीये. त्या साखळीचे दुसरे टोक खुंटीला बांधलेले असणे हे बंधन आहे.

लेख नेहमीप्रमाणेच आवडला..

मात्र काही प्रतिक्रिया वाचून असं वाटलं की :
कुठल्यातरी विशिष्ट विचारसरणीच्या साखळीत स्वतःच अडकल्यामुळे इतरांचं साधं, सोपं, सहज आणि सुंदर साहचर्याचं
(1. साहचर्यात थोडी adjustment/जमवाजमवी असणारंच नाहीतर ते साहचर्य कसं.. 2. जी सासू सुनेला <<<सांगते गं, पण त्याला तुला मांडीवर घेऊन म्हणता येणार नाही त्याचं काय?!">>> असं चेष्टेनं म्हणते, इतका त्या नात्यात सहजभाव आहे. )
वागणं, नातं बहुतेक समजूनही घेता येत नाहीये, उलट त्यांच्या नसलेल्याच साखळ्या मात्र दिसतायत.
असो.. जैसी जिसकी सोच..
पुन्हा एका सहज लेखाबद्दल धन्यवाद..

एविता तुमचं लेखन मनाला खरचं भावतं. तुमच्या घरातील वातावरण मनमोकळं आणि सकारात्मक असावं असं तुमच्या लेखनावरून सहज जाणवतं. बंधने वैगरे हा खूप मोठा चर्चेचा विषय आहे त्यावर मी काही लिहित नाही. पण तुमच्या घरातलं चैतन्यमय वातावरणाचा सुवर्णमध्य गाठण्यास तुमच्या पतीचे जास्त सहकार्य असेल असं वाटतं. घरात एकमेकांन बद्दल वाटणारा जिव्हाळा आणि आपुलकी हे तुमचं पतीवर आणि सासु सासऱ्यांचं त्यांच्या मुलावर असलेलं अतोनात प्रेम हे असावं. एकमेकांबद्दल वाटणारं प्रेम हेच सारी नाती जपतं. तुमच्या घरकुलातील मायेची ऊब अशीच राहू दे. बाकी माझ्याकडून " नांदा सौख्यभरे".

निरु, मी माझ्याबद्दल लिहिते.
मला एवितासाठी कोणत्याही साखळ्या दिसल्या नाहीत. मला तिचं घर आणि माणसं खूप आवडतात म्हणूनच तिचा लेख आणि पहिला प्रतिसाद मला फार आवडला. पण दुसऱ्या प्रतिसादात जे खटकलं ते लिहावंसं वाटलं.

तुम्ही कदाचित मला उद्देशून नसेल लिहिलं पण तरीही मला सांगावसं वाटलं

रियाशी सहमत!
जाचक रुढींमधे अडकलेल्या, त्यातून बाहेर पडू पाहणार्‍यांच्या संघर्षांचे कौतुक आहेच.

नुसत्या पायातल्या साखळ्या काढून उपयोग नाही, ज्यांना खरंच बंधनात रहावे लागते, त्यांच्या मनावरची साखळी निघणे गरजेचे!

मला साखळ्या, छुमछुम फार आवडतात, मी त्यांच्याकडे फक्त एक दागिना म्हणूनच बघते. Happy
अर्थात एखाद्या घरात त्या घालाव्यात की न घालाव्यात याबद्दल वाद असू शकतात.

<<तुम्ही कदाचित मला उद्देशून नसेल लिहिलं पण तरीही मला सांगावसं वाटलं>>
नाही रीया, हे तुम्हाला उद्देशून नाही.
खर तर मी बराच वेळ इतर कामं करता करता ही पोस्ट टाईप करत होतो. त्या वेळेपर्यंत (म्हणजे मी टाईप करायला घेतलं तेव्हा) तुमची आणी punekarp यांची पोस्ट आलीही नव्हती.
मला हे खरं तर कालपासून लिहायचं होतं पण राहिलं.
कृपया गैरसमज नसावा.. _/\_

आणि तुमची आणि लेखिकेची काही मतं जुळली, काही नाही जुळली (मी वरती म्हटलंच आहे : जैसे जिसकी सोच) तरी प्रतिसाद सुसंवाद साधणारा होता, सौजन्यशील होता.. त्यामुळे मी तरी अशा प्रतिसादांचं स्वागतच करतो..

Mulat jya goshti aapan swatachya icchene karto tyala bandhan mhuat nahi.........Bandhan ashyach goshtich aset jithe iikhadyala na patunahi karala lagtat ..hattichi bandhan ya sathi vegali aahet.....baki mala lekhikeche donhi pratisad patale nahit.......

मी माझ्या बायकोला स्वातंत्र्य देतो आणि माझी बायको स्वतंत्र आहे या दोन वाक्यातला फरक फार महत्वाचा आहे.
तसा आपला देश "ढोल, गंवार, सुद्र, पशु, नारी, सब है ताडन के अधिकारी" अगदी चालीत मान डोलवत म्हणणारा देश, या देशात बऱ्याचशा स्त्रियांना स्टॉकहोम सिंड्रोम झालाय असंच वाटतं. असो!

डिस्क्लेमरः माझी आयडी हॅक झालेली नाही.

कुठल्याच मुलीला सासर चुकलेले नाही. मुलींसाठी तो एक प्रकारचा पुनर्जन्मच. नवीन नाव, नवीन फॅमिली, नव्या बाळाला हातात वाळा घालतात तश्या बांगड्या, नवीन वस्त्रालंकार, दागिने, जन्मलेल्या बाळाचे बर्थ सर्टिफिकेट तसे मॅरेज सर्टिफिकेट. हा पुनर्जन्मच नाही काय? मग ज्या घरात आपला पुनर्जन्म झालाय त्याचं घरातली बंधनं तोडायची? ही निव्वळ कृतघ्नता नाही तर काय आहे?>> हे पुनर्जन्म आणि रिलेटेड हे फार रिग्रेसिव्ह थिंकिन्ग आहे. प्रत्येक मुलीचा एक व्यक्ती म्हणून विचार झाला पाहिले . लग्न संसार ह्या महत्वाच्या आहेत बाबी पण जर तिथे स्वतःच्या मनाला मुरड घालून जगावे लागत असेल तर रिलेशन शिपचा पुनर्विचार केला पाहि जे. ताईंनी कै. अपर्ना रामतीर्थ कर ह्यांच्या भाषणातले लॉजि क शर्करा वगुं ठित शब्दात मांडले आहे.

माझे स्वातंत्रय माझ्या जन्माबरोबरच मला मिळाले ले आहे व ते मला कोणी देउ शकत नाही किंवा हिरावून घेउ शकत नाही. असे कोणी केले तर
ओके टाटा बाय बाय. टुकार व अन प्रॉडक्टिव लग्नात अडकलेल्या कितीतरी मुलीना ही ऑप्शन समजावून सांगितली पाहिजे. नवर्‍याला पेडेस्टल वर जरू र ठेवा पण मग त्या बदल्यात व्यक्तिमत्वा वर नकळत आलेली किंवा खुशीने लादून घेत लेली बंध ने १०० % स्वीकारावी ल लागतात. हे काहींना नको असू शकते. तो त्यांचा चॉइस आहे. तुमची विचारसरणी तुम्हाला नक्कीच मुबारक. इट इज रिअली वर्किंग फॉर यु.

नांदा सौख्य भरे.

इतके प्रतिसाद का म्हणून डोकावले. अमा आणि सिंडरेलाला अनुमोदन. एविता यांचे प्रतिसाद आणि इतर काही त्याला अनुमोदन देणारे बरेच प्रतिसाद वाचून वाटले की त्यांनी पॉइन्ट मिस केला आहे.
नाती चांगली जपणे हे छान. तुमची फॅमिली गोड आहे ती अशीच छान गोग्गोड राहो हीच सदिच्छा.
पण! अनेक स्त्रियांना मिळत नसताना नवर्‍याने मला स्वातंत्र्य "दिले" याचे अप्रूप, लग्न म्हणजे स्त्रीचा मृत्यू / पुनर्जन्म , बंधनच गोड ,
स्वातंत्र्य हवे कशाला, स्वातंत्र्य म्हणजे इगो, कृतघ्नता अशा विचारांचे आणि त्याचे समर्थन करणारेही बरेच प्रतिसाद पाहून अतोनात आश्चर्य वाटते आहे. विशेषतः या लेखातच हत्तींनी खर्‍या साखळ्या निघाल्या तरी मानसिक बंधनात अडकण्याबद्दल लिहिले असल्यामुळे हे अजूनच आयरॉनिक वाटते.

तुमचे सगळे प्रतिसाद वाचले. तुमच्या बाजूने असलेले आणि नसलेले यांचेही प्रतिसाद वाचले.

ज्यांना मानसिक साखळीतून बाहेर पडायचे आहे त्यांना पडू द्या. ज्यांना त्यांचा इगो कुरवाळत बसायचे आहे त्यांना बसू द्या. ज्यांना सासरला ४९८ लावायचे आहे त्यांना लावू द्या. ज्यांना स्वैर वागायचे आहे त्यांना वागू द्या. ज्यांना सासू सासरे वेस्ट पेपर बास्केट वाटतात त्यांना वाटू द्या. ज्यांना नवरा म्हणजे पेडेस्टलवर ठेवण्याची वस्तू वाटते त्यांना ठेवू द्या. प्रत्येक सिंडरेलाला स्वप्नातला राजकुमार मिळणं अशक्य असतं. जिला मिळाला नाही तिची तगमग होणारच. मग ती संसारात नाखूष असेल आणि तिला स्वैर वागायचे असेल तर वागू द्या. लेडी डायनाला राजकुमार मिळाला. पण तिला बंधनं झुगारायची होती. स्वैर वागायचे होते. मानसिक घुसमट होत होती म्हणे. काय झालं शेवटी? विवाहबाह्य संबंधात अडकली आणि आयुष्याचे मातेरे करून घेतले. तसे कुणाला करावेसे वाटत असेल तर करू द्या.

साखळी तोडून आई वडिलानी दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा रियाने घेतला आणि एनसीबीच्या जाळ्यात सापडली. एक साखळी तोडली आणि दुसऱ्यात अडकली. विषकन्या नावाने ओळखली जाते आता. एका निष्पाप माणसाला उल्लू बनवून जगातून उठवले आणि त्या मुलाच्या बहिणींना एकमेव असणारा भाऊ हरवला. आई वडिलांचा एकुलता एक गेला. स्वतःच्या सख्ख्या भावाचे आयुष्य पण वाया घालवले.

मुंबईतली ड्रग सिंडिकेट साफ करू पाहणाऱ्या कंगना राणावतचा पुतळा शिवसेना पुरस्कृत महिलांनी जाळला. या महिलांची मुलंच उद्या नशेच्या आहारी जाणार नाहीत हे कशावरून?

अमायार! छोड़ दो ये लिखापढ़ी। तुम्हाला नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद देतील पण तो मनापासून नसेल.

विषकन्या. असा शब्द आहे. विषपुत्र असा शब्द का नाही.

"Frailty, thy name is woman!" said Shakespeare. Why didn't he say, " Frailty, thy name is man!"

काही बायकांच्या डीएनए मध्येच असा दोष असतो. त्यांच्याकडे बंधनं तोडण्याचा फॉर्म्युला असतो. त्यांना त्याची स्टॅंडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम माहित असते आणि ते खऱ्याला खोटं करण्यात वाकबगार असतात. त्याला तुम्ही काहीच करू शकणार नाही.

विशेषतः या लेखातच हत्तींनी खर्‍या साखळ्या निघाल्या तरी मानसिक बंधनात अडकण्याबद्दल लिहिले असल्यामुळे हे अजूनच आयरॉनिक वाटते. >>>> सहमत.

एक घर आहे
ज्यात चार खोल्या आहेत
आणि सहा माणसे आहेत
प्रत्येकाला आपल्या मनासारखा रंग घराला द्यायचा आहे
कोणाचे स्वातंत्र्य जपावे?
नशीब नाझी बायको मायबोलीवर नाही, अन्यथा आमच्या सुखी संसाराची खाट खडी झाली असती.
मायबोलीवर एखादा ऋन्मेष येतो आणि दणादण धागे काढू लागतो. तेव्हा त्याचे ते स्वातंत्र्य हिरावून घ्यायला काही जण आरडाओरडा करतात. त्या आरडाओरडा करणारयांची मायबोली स्वताचीही नसते. ते देखील तिथले मुसाफिरच असतात. पण तरीही त्यांना ऋन्मेषला आपल्या मर्जीने धागे काढायचे स्वात्रंत्र्य देणे मंजूर नसते.
पण लग्नानंतर दुसरया घरात जाणारया मुलीला मात्र आपल्या मर्जीने वागायचे स्वातंत्र्य मिळायलाच हवे. आणि ते देखील उपकार म्हणून नाही तर हक्क म्हणून.
काही हरकत नाही. समानतेचा निकष लावता हे शत प्रतिशत योग्यच आहे.
पण मग हा निकष मूळातूनच लागला पाहिजे. मुलींनी लग्नानंतर सासरी जाणे सोडायला हवे. नवरयाचे नाव लावणे सोडायला हवे. गळ्यात मंगळसूत्र कुंकू वगैरे सौभाग्याची बंधनेही टाळायला हवीत. तिथे मग परंपरांच्या गोंडस नावाखाली खपवून घेण्यात काही हशील नाही. आणि जर एक स्त्री हे सगळे करत असेल तर तिने दुसरया महिलेला तू अमुकतमुक बंधनात आहेस ते झुगारायची गरज आहे असे सांगण्यात अर्थ नाही.

सच है कडवा है.. नसेल झेपणार तर पोस्ट उडवा हे Happy

आणि हो, आपल्याकडे अशी सरसकट बंधने झुगारायची हिंमत फक्त बॉलीवूड नट्या दाखवतात. आणि आपण करतो काय, तर त्यांच्याबद्दल गॉसिप Happy

विशेषतः या लेखातच हत्तींनी खर्‍या साखळ्या निघाल्या तरी मानसिक बंधनात अडकण्याबद्दल लिहिले असल्यामुळे हे अजूनच आयरॉनिक वाटते.>>+1
प्रतिसाद अचाट आहेत.
मी मंगळसूत्र घालत नाही , आडनाव बदलले नाही , बदलणार नाही .

मी सासरच्या घरी राहायला आले नाही मी आणि नवरा आमच्या आमच्या घरी राहायला लागलो.

एकमेकांवर प्रेम केलं आणि एकत्र रहावं वाटलं कायम करता म्हणून लग्न केलं

आता सासु सासर्या च्या विशिष्ट वयानंतर एकत्रही राहतो.
माझे आई-वडील अजुनी अक्टिव आहेत. त्यांना गावात जोरदार सोशल लाईफ आहे.
पण जेव्हा त्यांना यावसं वाटेल तेव्हा ते देखील इथे येतील यात काही शंका नाही.
यामध्ये स्वैराचार कुठून झाला?

माणसाने प्रेमा करता एकत्र यावं आणि प्रेम करता एकत्र राहावे.

प्रेम आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्था यात गल्लत करू नये.
फायदे असले तरी अनेकदा कोणाच्यातरी बळी वर चालू आहे हे विसरू नये.

सिंड्रेला म्हणाली तसं स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि राहणार. राहायला हवा .
माझी मागचा पिढीतल आई पण बाबांनी स्वातंत्र्य दिलं असं म्हणत नाही- जपलं असं म्हणते.

प्रेम करायचं स्वभाव असला आणि माणसं समजस असतील तर सर्वांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवून एकत्र राहता येऊ शकते .कटकट न करता.

माझ्या प्रतिसादाने कुणाला धक्का बसला असेल तर क्षमस्व , पण तो फक्त प्रतिसादातील स्पेशल पेरेंट्स साठी जे एविताने लिहिले त्याबद्दल होता. तेवढा फक्त copy paste करून खाली प्रतिसाद दिला आहे. बाकीच्या लेख व प्रतिसादाबद्दल मी काही विशेष मत दिलेले नाही. नंतरचा एविता यांचा नंतरचा प्रतिसाद मी वाचला नाही. ते मला खूपच संवेदनशील वाटले होते म्हणून आवडले. गैरसमज नसावा म्हणून. #काटेरी मुकूटावर ३ # as a special parent माझ्या व अमा यांच्या अनुल्लेखाने हे पाहून टडोपाच झालं. Sad ,
एविताच्या ह्या सपोर्टने गहिवरून फक्त त्या भागाबद्दल माझा प्रतिसाद दिल्या गेला आहे. नवरा बायकोच्या नात्याबद्दल माझा प्रतिसाद नाही . फक्त काटेरी अनुभव नसूनही काटेरी वाटणाऱ्या पालकत्वाविषयी आहे. ह्या धाग्यावर ते तिने स्वतःहून याबद्दल लिहील्याने भरून आले. प्लीज समजून घ्या.
धन्यवाद.

अमायार! छोड़ दो ये लिखापढ़ी। तुम्हाला नांदा सौख्यभरे असा आशिर्वाद देतील पण तो मनापासून नसेल.>> का हो इग्नोअर करा ना माझे प्रतिसाद.

एवि ता तुम्हाला व पतींना अतिशय सुखी संसार लाभो . माझी मते चॉइस एक तरफ ती व्यक्त होणारच लाइफ एक्स्पिरीअन्स मधून ती अनुभव सिद्ध झालेली आहेत. ती वरून वाचणार्‍या लोकांसाठी असतात. माझ्या एका जावयाचे नाव ही ऋषी आहे. दुसृयांचे वाइट चिंतून आपले चांगले कधीही होत नाही.

डायना काय किंवा रिया काय किंवा लेखिका काय कोणी प्रत्यक्षात काय अनुभवांतून जात असेल व त्या नुसार मते बनवतात, अ‍ॅक्षन घेतात ते आपल्याला कळत नाही त्यांच्या साठी ती परफेक्ट असेल.

इथे आता तरूण व जीवनानुभव कमी असलेले पण अमाप उत्साह असलेले सभासद् जास्ती आहेत ते जरा अगदी अहो दुसर्‍या बाजूने विचार करून बघा, इतरांचा विचार करून बघा, क्षितिजे रुंदवा असे सांगितले तर लगेच डिफेन्सिव होतात अजून दहा वर्शांनी वाचले तर माझे प्रतिसाद त्यांना थोडे पटतील बहुतेक. हा विचार धारांचा विषय असतो व्यक्ति सापेक्ष काहीच नाही कधीच नाही.

कथा वाचली. साखळी पार्ट वगळता चांगली आहे.
त्याबाबत अमाच्या पोस्ट्सशी सहमत. स्वतंत्र अस कोणी उपकार केल्यासारखं देत असेल किंवा त्या व्यक्तीच्या मनात स्वातंत्र्य दिले ही कृतज्ञता भावना असेल तर मला तरी पटणार नाही . Any Man is born free .

बाकी बिथोवन, रियाला नाव ठेवताना कंगना स्वतः ड्रग्ज घ्यायची हे माहितेय का ? तिने स्वतःच कबूल केलेय रजत शर्माच्या मुलाखतीत.

ऋ, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे तर तुला माहीत असेलच ?
>>>

आपलं ते स्वातंत्र्य दुसरयाचा तो स्वैराचार मला हे माहीत आहे Happy

जर कोणी आपल्या लाईफमध्ये आपल्या मर्जीने काहीही करत असेल तर त्याला स्वैराचाराचा शिक्का मारायचा हक्क तुम्हाला कोणी दिला?
मुळात तो स्वैराचार आहे हे कोणी ठरवले? तर तुम्ही ज्या विचारात आजवर वाढला आहात त्यावर तुमचे निकष ठरलेले असतात. तीच फूटपट्टी घेऊन तुम्ही माणसांची वर्तणूक जोखत असता..

वर ड्रग्जचा विषय निघाला आहे...

ड्रग्ज घेणारयालाही नावे ठेवावीत की त्याला सहानुभुती द्यावी की त्यांची लाईफ जगताहेत म्हणून दुर्लक्ष करावे.

बहुतांश लोकं नावेच ठेवतात.
पण दारू पिणारयांबद्दल आपण हेच निकष बदलतो कारण ती आपल्यातलेही कैक जण पित असतात.

बरं त्यातही जेव्हा एखादी मुलगी ड्रग्ज घेणारी असते तेव्हा तिच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडवणे फार सोपे होते. मुळात व्यसन आणि कॅरेक्टर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बाकी कॅरेक्टरबद्दलतरी आपल्या विचारात कुठे क्लॅरीटी आहे. एकापेक्षा जास्त पुरुषांशी शरीरसंबंध ठेवणारी स्त्री हि कॅरेक्टरलेस ठरवली जाते. हे तिचे स्वातंत्र्य म्हणून न बघता स्वैराचार म्हणून बघितले जाते. का? कारण मुळातच आपली मानसिक जडनघडण तशी झाली आहे. त्यामुळे निसर्गत:च एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल आकर्षण वाटत असले तरी आपण स्वत:च्या भावनांना बंधनातच ठेवायचा प्रयत्न करतो. जे ही बंधने झुगारतात त्यांना स्वैराचारी बोलतो.

Pages