पाककृती स्पर्धा १ - उपवास मोदक/ उपवास शाही मोदक - साक्षी

Submitted by साक्षी on 30 August, 2020 - 14:11

साहित्य :

सारणासाठी -
आळीव/ हाळीव - ५० ग्रॅम
ओलं खोवलेलं खोबरं - २ वाट्या
गुळ - १.५ वाटी
वेलची पावडर

उपवास मोदक पारीसाठी -
वरई पीठ - १ वाटी
पाणी - १ वाटी
लोणी/ तेल - १ चमचा
चवीपुरते मीठ

उपवास शाही मोदक पारीसाठी -
काजू - १ वाटी
साखर - अर्धी वाटी
पाणी - पाव वाटी

कृती :
सारण -
१) आळीव २ तास दुधात किंवा नारळाच्या पाण्यात भिजत घालावे. किंवा नारळाच्या चव घेऊन त्यात मिसळून ठेवले तरी चालतील.
२) आळीव भिजले की गुळ मिसळून गॅस वर शिजवायला ठेवा. अंदाजे ८-१० मिनिटांत व्यवस्थित शिजेल. सारण आधी पातळ असेल नंतर घट्ट होत जाईल.
३) सारण शिजलं की गॅस बंद करून वेलची पावडर मिसळा.
४) हे सारण दोन्ही प्रकारच्या मोदकांसाठी कॉमन असणारे.

तयारी
IMG_20200830_185027.jpg
उपवास मोदक
१) जाड बुडाच्या पातेल्यात पाणी घ्या. त्यात लोणी/ तेल आणि चवीपुरतं मीठ घाला. पाणी चांगले रटरट उकळले की वरईचे पीठ घाला आणि भराभर हलवा. सगळं नीट मिक्स होऊ द्या. झाकण ठेऊन एक दणदणीत वाफ येऊ द्या आणि आच बंद करा.

२) उकड गरम असतानाच चांगली मळून घ्या. छोटा गोळा घेऊन तो परत छान मळून घ्या. हाताला किंचित तेल लावून वाटी चा आकार द्या. पातळ पारी झाली की एक चमचा सारण भरा. बोटांनी पारीच्या कडेवर निऱ्या घाला आणि मोदक वळून पूर्ण करा. असे सगळे मोदक वळून घेऊन नेहेमीच्या मोदकांसारखे १५ मिनिटे वाफवून घ्या.
IMG_20200830_185103.jpg

उपवास शाही मोदक
१) मिक्सरमधून काजूची पूड करुन घ्या.
२) जाड पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून गॅसवर ठेवा. पाणी उकळलं की लगेच काजू पावडर घालून सतत ढवळा. मिश्रण थोडं घट्ट झालं की लगेच गॅस बंस करा.
३) जरा गार झालं की ह्याचा गोळा मळून घ्या.
४) एक छोटा गोळा घेऊन त्याला वाटीचा आकार द्या. उकडिच्या मोदकाइतकी पातळ पारी नको. जाड ठेवा.
५) ह्यात एक चमचा सारण भरून वाटी बंद करून मोदकाचा आकार द्या. मग चमच्याच्या मागच्या बाजूने हळुवार हाताने निर्‍या काढा. याच पद्धतीने सगळे मोदक वळून घ्या. तुमच्याकडे मोदकाचा साचा असेल तर हे मोदक साच्यात करायला जास्त सोपे जातील. माझ्याकडे साचा नाहिये आणि स्पर्धेला साचा नको असा नियम होता म्हणून मी असे केले.

शाही मोदक कसे करायचे ते इथे बघून कळेल
KajuModakCollage.jpg

तयार शाही मोदक
KajuModakReady.jpg

अजुन एक
KajuModakReady1.jpg

हे उकडीचे आणि काजूचे सगळे एकत्र
All_2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला कल्पना आवडली...
तुमचे दर वेळी, छानच मोदक पाहिलेत; खास करून उकडिच्या प्रकारात हातखंडा आहे तुमचा. मस्त सुबक वळता नेहमीच.
———
काही संधीसाधू आणि बेशिस्त लोकांनी, सहज विचारलेल्या प्रश्णाचा विपर्यास केल्याने, संपादित करतेय.

झंंपी यांनी आपली कमेंट मागे घेतली। म्हणून आणि या धाग्याचे स्वरूप पूर्ववत यावे म्हणून माझा प्रतिसाद एडिट करतेय।

फॉर रेकॉर्ड : साक्षीचेे पाककौशल्य जवळून अनुभवले आहे हे नोंदवून ठेवतेय।

अवल, तुम्ही कुठल्या अर्थाने घेता व दुसर्यांना कसे लिहिता ते लक्षात घेता, तुम्हाला माझी कमेंटं एका चांगल्या हेतुने लिहिलीय कळणार नाहीच मुळी. तेव्हा, उगाच घाणेरडे वळण लावून, दुसर्‍यावर आरोप करु नका. तेव्हा तुमच्या डोक्याने लावलेला अर्थाने फरक नाही पडत. स्वतः , तुम्ही ज्या पद्धतीने दुसर्‍यांना जज करताय ना तसे करायचे बंद करा.

मी साक्षीला लिहिलेच आहे, त्यांचे मोदक दर वेळी छानच असता.
साक्षी, मी फक्त कुतुहलाने विचारलेले, तेव्हा हा विचार न्हवता की, अतिशहाणे लोकं त्याला “विचित्र” वळण देतील. नक्कीच वाईट अर्थी न्हवते ह्याची खात्री बाळगा.

संधीसाधु लोकांनी इथे उगाच घाण करु नये. इथे वातावरण दुषित करु नये.
प्रतिसाद साक्षीला दिलाय, तिला काही म्हणायचेय तर ती सांगेल.

प्रतिसाद साक्षीला दिलाय, तिला काही म्हणायचेय तर ती सांगेल.>>
तुम्हाला काय प्रतिसाद अपेक्षित आहे माहित नाही पण दुर्दैवाने आई आता आपल्यात नाही. माझ्या जुन्या प्रतिसादांत सुद्धा तसा उल्लेख तुम्हाला दिसेल. मोदक शिकवले मात्र तिनेच.

साक्षी, माझ्या लिहिण्याने तुमचा गोंधळ झाला असेल आणि त्यात इतरांनी मुद्दामहून वाईट वळण लावायचा प्रयत्न केला , असते ज्याची त्यांची बुद्धी, जे दुसर्‍याला स्वतःसारखेच जज करतात.
झाले काय, तुमच्या मोदकांची तारीफ तारीफ करता, सहज मनात आले की, हि सुबकता आईच्या हातच्या मोदकात असते. लिहिताना, पटकन म्हणून विचारले.
त्यात स्पर्धेत तुम्ही केले की कोणी असा तिरकस विचार न्हवताच मुळी.
मुळात, इतके स्पष्टीकरण मी देतेय कारण , इतरांच्या डोक्यात आलेला विचार माझ्या डोक्यांतच न्हवता. आणि, तुमचा गैरसमज टाळण्यासाठी इतकेच म्हणेन, हे प्रामाणिकपणे लिहिलेय.
—-
आणि, संधीसाधू लोकांना दुर्लक्ष करणे हेच उत्तम.

Pages