झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (करडा- तपकिरी)

Submitted by संयोजक on 26 August, 2020 - 01:46

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेड व्हेलव्हेट कॉफी. (लालचुटूक ऐवजी तपकिरीच दिसते! दिव्याच्या प्रकाशाऐवजी उजेडात नेलं होतं तिला तरी तपकिरीच. अशीच असते म्हणे.)
CoffeeRed.jpg

gc.jpg
किरमिजी ग्रँड कॅन्यन मधली एक करडे आभाळ आणि स्नो-मय दुपार

एकसे एक भन्नाट फोटो सर्वांचे.

manimau2_0.jpg

माझा हा चालेल का, तपकिरी रंग कमी आहे यात पण आहे.

धन्यवाद श्रवु. कोकणातल्या घरातले माझ्या मोठ्या दिरांचे कुटुंब आहे ते, भरपूर माऊ आहेत. मी घाबरते, मी लांब पेट्सपासून. नवराही माऊप्रेमी.

Pages