झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (आकाशी- पिवळा)

Submitted by संयोजक on 23 August, 2020 - 22:36

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

IMG-20190916-WA0041.jpg
असे वाचले आहे की वरील चक्र फिरताना दिसत असतील तर तुम्ही स्ट्रेस मध्ये आहात. खरे खोटे देव जाणे.

नीरु खरंच तुमच्याकडे खजिना आहे फोटोंचा, काढताही सुरेख. सर्वांचे फोटो मस्त आहेत, आवडले.

खालचा फोटो झुंबर (अमलताश), बदलापूर पाईपलाईन रोडवर दोन वर्षापूर्वी गाडीतून जाताना काढला. फोटो फार छान येत नाहीत त्यात मोबाईल जुना पण इथे या थीमसाठी शेअर करावासा वाटला.

IMG_20200825_013726.jpg

beach1.jpg
बिग आयलंड, हवाई.

Pages