झब्बू- तुझी माझी जोडी जमली रे- (आकाशी- पिवळा)

Submitted by संयोजक on 23 August, 2020 - 22:36

झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार क्युट निरु. हा पक्षी फार वर्षापुर्वी मला आमच्यामागे झाडावर फक्त एकदाच दिसलेला. नंतर कधीच नाही दिसला.

अनु मस्तच.

माहेरचा गणपतीबाप्पा, तीन वर्षापुर्वीचा फोटो. पाट आकाशी आणि गणोबाचा पितांबर कॉम्बो आकाशी पिवळया रंगाचं.

IMG-20170825-WA0003.jpg

सुरेख फोटो, परत हेच म्हणीन कि निरू काय मस्त फोटो आहेत सगळेच छान clicks.
आणि अंजू गणपतीची मूर्ती सुरेख. बाकी फोटो पण छान

हा आपल्या सुगरण (बया) पक्षाचा आफ्रिकन जातभाई..
अर्धवट घरटं विणून बसलेला...


आणि हा त्याचा एक लेट लतिफ भाऊ..
अजून लटकून लटकून घरट्याच्या फांदीची मजबुती तपासणं चालूच आहे.. Happy


अनु, धनुडी धन्यवाद.

एकसे एक भन्नाट फोटो आहेत. स्वरुप निवांत गप्पा फार गोड.

Pages