friends फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 15:49

फ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.

कृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.
जॉई बिट्स बारनी एनीडे.

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेंड्स फार उशिरा आली आयुष्यात, पण तेव्हापासून जामच आवडायला लागली. पहिल्यांदा पाहिली तेव्हा अमेरिकन यूथबद्दल इतके प्रश्न पडायला लागले की विचारू नका. हे लोक खरोखर लग्नात इतके सॅड कपडे घालतात का, किंवा घरभर चपला/बूट घालून फिरतात का, सदोदित पिझ्झा खातात का वगैरे वगैरे... इतक्या वेळा पाहूनही, विरंगुळा म्हणून परतपरत पहावीशी वाटते फ्रेंड्स अजूनही - कधीही कोणताही एपिसोड.
वैयक्तिक मत- पहिले पाच सीझन्स नंतरच्या 5 पेक्षा जास्त आवडतात (विशेषतः मोनिका आणि चॅन्डलर)

हिंदी मध्ये फ्रेंड्स चा एक सीझन बनवला होता म्हणे चोरी करून. >>> Uhoh बाप रे! काय भयाण!! का? का ?? Angry त्या क्लिप्स बघूनच शॉक मधे गेले मी. आख्खा सीझन कोणी कसा पाहिला असेल?!!

मी 10 सीझन डाउनलोड केले आहेत. हवं तेव्हा बघायचं Happy
आत्ता पण तेच बघतोय Lol
S1 E23 T.O.W. The Birth
बेनच्या जन्माचा एपिसोड
IMG_20200902_215924.jpg

Pages