friends फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 15:49

फ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.

कृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.
जॉई बिट्स बारनी एनीडे.

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहहह नो नो नो
मला तो एपिसोड अजिबात आठवायचा नाहीये Happy

फा - कीप युअर माउस ब्याक इन दी हाऊस?

Submitted by च्रप्स on 21 August, 2020 - 06:44 >> गन्थर ...Best.

Little Women पण त्यातच होतं ना

अरेच्चा इतक्या मनापासून एकेकाळी friends पाहिलेली मी, आता हे वरचं काहीच्च आठवत नाहीये.
फक्त chandlar नक्की कुठे काम करतो हे कोणालाच कधीच कळत नाही हे आठवलं!

फक्त chandlar नक्की कुठे काम करतो हे कोणालाच कधीच कळत नाही हे आठवलं
>>> तो धमाल एपिसोड आहे... अपार्टमेंट जिंकण्यासाठीच्या क्विझ चा...

नंतर अशी एक क्विझ मोनिका ची ब्राईडमेड कोण यासाठी देखील होते..

fifth dentist caved! >>> चिडकू, परफेक्ट! Happy
इथे आहे
https://www.youtube.com/watch?v=q8r4wQbwbo8&t=2m20s

ते 4 out of 5 dentists एक स्टॅटिस्टिक्स आहे, पण चॅण्डलर ती अ‍ॅड लिटरली घेउन तो जोक मारतो. धमाल आहे.

फा - कीप युअर माउस ब्याक इन दी हाऊस? >>> नाही Happy त्या एपिसोड मधे फीबी सोडून इतरांना समजलेले असते तेव्हा ते त्याबद्दल वेगवेगळे मेटॅफोर्स वापरून सांकेतिक विनोद करतात ते संवाद जबरी आहेत. पण ही अ‍ॅड त्याच्याशी संबंधित नाही.

तो माझा फेव सिझन आहे...
Because I am Joe.. I do disgusting things ...

शेवटी मोनिकवर ढकलतो.. ते पण मस्त आहे...

यात जोई >>. टोटली Lol शेवटी ते त्याच्या इतके डोक्यावरून जाते की जेव्हा रेचेल आणि फीबी तू हे सांगू नकोस म्हणून धमकावतात तेव्हा तो म्हणतो "Couldn't if I wanted to"

तो आख्खा सीझन माझा भयंकर आवडता आहे. अनेक वेळा पाहून झालाय.
त्याच वेळेचा पॅरलल ट्रॅक म्हणजे रॉस चे अँगर इश्यूज .."यू .. यू एट माय सँडविच??" Lol त्या मेल्ट डाउन नंतर सब्बाटिकल घ्यायला लागतं आणि नेमके ते पार पडल्यावर त्याचा बॉस त्याला भेटायला म्हणुन येतो तेव्हाच नेमके रॉस ला खिडकीतून मोनिका आणि चँडलर दिसतात आणि "गेट ऑफ माय सिस्टर.. ... ..!!" Rofl

हो त्याच्या सॅण्डविच करता ओरडण्यामुळे शहरातील पक्षी उडताना दाखवले आहेत. एखाद्या स्फोटानंतर उडतात तसे Happy

फा, फ्रेंड्स च्या एपिसोड्स ची पारायणं झाली आहेत. पण तू जेव्हा लिहीतो, तेव्हा कळतं, की हे खरं ज्ञात्याचं पहाणं. Happy

स्पेशल २६ मधल्या दिव्या दत्ताच्या भाषेत सांगायचं तर 'असली काम तो तु कर रहा हैं, हम लोग तो बस ........' Happy

मला रॉस चे बॅगपाईप आणि तो कीबोर्ड वाजवतो ते एपिसोड खुप आवडतो.आणि रॉस चा सोफा वाला पण.
शिवाय बेंजामिन होबार्ट वाला पण.(तो माणूस लिटल मिस सनशाईन मध्ये आहे ना?)

फेफ - कसचं कसचं, पण धन्यवाद Happy
चॅण्ड्लर म्हणेल - मला तारीफ ऐकायची सवय नाही. त्यापेक्षा एखादी सरकॅस्टिक कॉमेण्ट मारली तर चालेल का Happy

रच्याकने आता परत पहावी लागणार मालिका. या सिरीजने माझ्या आयुष्यातील जरा खडतर काळात मला ठिकाणावर राहायला आणि आयुष्यातला humour जपायला खूप मदत केलीये. I' m very grateful to it.
Friends च्या पूर्ण स्टारकास्ट ला एकसोबत भेटायची खूप इच्छा झाली होती मालिका संपल्यावर (अजूनही आहे)

शिवाय बेंजामिन होबार्ट वाला पण.(तो माणूस लिटल मिस सनशाईन मध्ये आहे ना >>> यस. ग्रेग किनीयर.

फ्रेण्ड्स मधल्या असंख्य गेस्ट रोल्स मधे एकदा साइनफेल्ड मधल्या एका कलाकाराने रोल केला आहे. तर एकदा सेक्स अ‍ॅण्ड द सिटी मधल्या. ते कोणाच्या लक्षात आहेत का?

तसेच फ्रेण्ड्स मधल्या एका कलाकाराने द वेस्ट विंग मधे गेस्ट रोल केला आहे. एकूणच किमान ४-५ कॉमन कलाकार आहेत दोन्हीमधे.

साइनफेल्ड : जेसन अलेक्झांडर (जॉर्ज कॉस्टॅन्झा)

फ्रेन्ड्समध्ये कास्ट व्हायच्या आधी कोर्टनी कॉक्सने (मोनिका गेलर ) साइनफेल्डच्या एका भागात जेरीच्या डेट/गर्लफ्रेंडचे काम केले होते.

जेसन अलेक्झांडर (जॉर्ज कॉस्टॅन्झा) >> यस! फीबी प्रिन्टरचे टोनर विकायचा जॉब करते तो एपिसोड Happy तो तिला "मी आत्महत्या करणार आहे" म्हणतो तेव्हा तिला दिलेल्या छापील प्रश्नोत्तरांमधे त्याचे उत्तर आहे का ते शोधते ती. तेथे सापडत नाही तेव्हा "कारण तुझ्याकडे टोनर नाही म्हणून (आत्महत्त्या करणार) का?" असेही विचारते Happy

भारी आहे तो एपिसोड
डॉ हाऊस मधली अंबर पण आहे, माइक ची 'प्रेशस' गर्लफ्रेंड. अजिबात ओळखू येत नाही.गोड दिसते तिथे

हाव आय मेट मध्ये पण प्रेशस टेड ची गफ्रे आहे आणि त्यांचा पण ब्रेकअप होते. तिच्या बर्थडे च्या दिवशीच.

सेक्स अ‍ॅण्ड द सिटी मधली शार्लेट (क्रिस्टिन डेव्हिस) "एरिन" म्हणून एका एपिसोड मधे होती. या तिघीजणी जबरदस्तीने जोईला तिच्या प्रेमात पाडायला बघत असतात. लायब्ररीमधे रॉस चे पुस्तक असलेल्या शेल्फची कथा असलेला एपिसोड Happy

मॅथ्यू पेरी ने वेस्ट विंग मधे ४-५ एपिसोड्स मधे रोल केला आहे. इतर असे अनेक लोक आहेत की फ्रेण्ड्स मधे अगदी छोटे रोल्स होते पण त्यामानाने वेस्ट विंग मधे बर्‍यापैकी मोठे रोल्स मिळालेत.

द ऑफिस मधला तो मायकेल ला फोर्कलिफ्ट न चालवू देणारा शॉप मधला - तो ही एका छोट्या रोल मधे आहे फ्रेण्ड्स मधे.

फा जबरी अभ्यास आहे...

माझा प्रश्न सर्वांना - रेचेल कडे एक पेट असते.. कोणते आणि नाव सांगा Happy

ते भयंकर हेअरलेस मांजर ना >>> "IT'S NOT A CAT!" Wink

बाय द वे, सिरीज मधे प्रत्यक्षात दाखवलेले पेट ते बरोबर आहे. पण रेचेल च्या लहानपणीच्या पेट कुत्र्याचाही उल्लेख आहे. Lapooh

Pages