friends फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 15:49

फ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.

कृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.
जॉई बिट्स बारनी एनीडे.

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्रेंड्स फार उशिरा आली आयुष्यात, पण तेव्हापासून जामच आवडायला लागली. पहिल्यांदा पाहिली तेव्हा अमेरिकन यूथबद्दल इतके प्रश्न पडायला लागले की विचारू नका. हे लोक खरोखर लग्नात इतके सॅड कपडे घालतात का, किंवा घरभर चपला/बूट घालून फिरतात का, सदोदित पिझ्झा खातात का वगैरे वगैरे... इतक्या वेळा पाहूनही, विरंगुळा म्हणून परतपरत पहावीशी वाटते फ्रेंड्स अजूनही - कधीही कोणताही एपिसोड.
वैयक्तिक मत- पहिले पाच सीझन्स नंतरच्या 5 पेक्षा जास्त आवडतात (विशेषतः मोनिका आणि चॅन्डलर)

हिंदी मध्ये फ्रेंड्स चा एक सीझन बनवला होता म्हणे चोरी करून. >>> Uhoh बाप रे! काय भयाण!! का? का ?? Angry त्या क्लिप्स बघूनच शॉक मधे गेले मी. आख्खा सीझन कोणी कसा पाहिला असेल?!!

मी 10 सीझन डाउनलोड केले आहेत. हवं तेव्हा बघायचं Happy
आत्ता पण तेच बघतोय Lol
S1 E23 T.O.W. The Birth
बेनच्या जन्माचा एपिसोड
IMG_20200902_215924.jpg

यस
कुठे बघता येईल, 21 मे ला ना?

27 मे. भारतातून कसं बघता येईल काय माहीत. मी मुद्दाम हा धागा वर आणून ठेवला म्हणजे कोणाला लिंक मिळाली कुठून तर इथे टाकता येईल.

मला एका दिवसासाठी सबस्क्रीपशन घेता नाही येणार त्यामुळे अमेरिकेत पण कुठे फुकट मिळालं तर द्या इकडे लिंक प्लिज

अच्छा, 27 मे

नंतर कुठे न कुठे येईलच भारतात, नेटफ्लिक्स वगैरे.तेव्हा बघू.
हे सर्व कलाकार आधी रियुनियन ला उत्सुक नव्हते.फ्रेंड्स ची कथा 20-35 मधले तरुण मित्र मैत्रिणी आणि त्यांचे एकत्र माईलस्टोन यावर आहे, रियुनियन चांगली होणार नाही असं म्हणणं होतं.

पण आता ते तयार झालेच आहेत तर हा एक नक्की चांगला प्रोग्रॅम असेल.बघणार.

रियुनिअन हा त्यांचा एक प्रकारे interview किंवा एखादा इव्हेंट असणार आहे सोबत. पात्र नसणारेत त्यात.

मला त्याच दिवशी किंवा एक दिवस नंतर वगैरे बघायचाय खरंतर एपिसोड.

ओह अच्छा
मेमरीज सारखे असेल मग.
फ्रेंड्स आताच परत बघायला चालू केलंय.
चॅनडलर मोनिका च्या लग्नाचा एपिसोड, त्याचा नाच सगळंच भयंकर मजेशीर आहे.यातला त्याच्या नाचानंतरचा मोनिका च्या आई बरोबर चा सीन भारतीय नेटफ्लिक्स वर कापलाय.आणि बरेच संवाद काही एपिसोड मध्ये कापलेत.
तरीहि मनात ते संवाद रिप्ले होतातच.

फ्रेंड्स आताच परत बघायला चालू केलंय. >>> ते आपल्याकडच्या कादंबर्‍यांत असते ना, की ती विचारते माझी आठवण आली का, तर त्यावर तो म्हणतो मुळात विसरलो तर आठवण पुन्हा येणार ना? तसे फ्रेण्ड्स चे आहे. बराच काळ बघितले नाही असे होतच नाही Happy

सुरूवातीला ही सिरीज फक्त ऐकून होतो. मग ओळख झाली तेव्हा संध्याकाळी साडेसहा आणि सात ला एका चॅनल वर बॅक टू बॅक एपिसोड असत (बहुधा सिरीज च्या दृष्टीने सलग नसत). घरी असलो तर चार वाजता सुद्धा एक असे. त्याखेरीज गुरूवारी ८ वाजता नवा एपिसोड असे, (सप्टेंबर ते मे या काळात) - या प्रत्येक स्लॉट मधला भाग हा त्या त्या ट्रॅक प्रमाणे वेगळ्या सीझन मधे असे. सुरूवातीला तो क्रम माहीत नव्हता नीट. मग नंतर एकदा पूर्ण दहा सीझनचा डीव्हीडी सेट घेतला. त्यात बराच अ‍ॅडिशनल भाग आहे जवळजवळ प्रत्येक एपिसोड मधे - जो नेटवर्क चॅनल्स वर दाखवत नाहीत. त्यात अनेक मजेदार सीन्स्/संवाद आहेत. ते काही वेळा बघून झाले.

मग नंतर नेफि वर आल्यावर तर गिरणी रोज सुरूच असे. आता एचबीओ मॅक्स वर तुलनेने कमी बघितले जाते पण फार लंबी जुदाई नसते. तसे फेबुही अधूनमधून फीड करतच असते. परवाच "The best of Chick and Duck" नावाचे एक कंपायलेशन आले होते. धमाल होते.

मी फ्रेंड्स, होउ आय मेट युअर मदर आणि रुल्स ऑफ इंगजमेंट एकापाठोपाठ एक चालू असते.. एक सिरीज संपली की दुसरी...

Friends-the reunion बघितलं. Finally. Pure nostalgia. सगळे स्टार्स, त्यांचं bonding, त्यांच्या आठवणी, सगळं सगळंच खूप भारी वाटलं. जूने सीन्स, bloopers सगळ्याशी कनेक्ट झालं. त्यांच्या नजरा अजूनही बोलतात एकमेकांशी. मॅथ्यू पेरीला बघून काळजाचा ठोकाच चुकला. सगळ्यांत जास्त एनर्जेटिक कलाकार आज सगळ्यात जास्त थकलेला/म्हातारा आणि सगळ्यात जास्त शांत (disturbingly) वाटला. शो संपताना डोळ्यांना धार कधी लागली कळलंच नाही. या शो ची खूप पारायणे होतायत, अगदी हवी तेव्हा. पण तरीही मनाला हुरहूर लागली. इतका मोठा फॅनबेस (worldwide) कुठल्या शो ला लाभला असेल असं मला तरी वाटत नाही. माझ्यासाठी तरी हा शो 'न भूतो न भविष्यति' असा आहे.
Disturbed minds साठी हा शो अगदी संजीवनीच ठरलाय.Hats off.

रियुनियन पाहिलं.
सगळा एपिसोड अगदी नीट प्लॅन केला होता.

थोडे स्पॉयलर:
मॅथ्यू जितका पहिल्यांदा पाहताना थकलेला, हरवलेला वाटला तितका दुसऱ्यांदा पाहताना नाही.तोही मजेत होता.तो इमर्जन्सी डेंटल प्रोसिजर नंतर शूटिंग करत होता असे वाचले.त्यामुळे जरा थकलेला वाटत असावा.
त्यांना अजून थोडे पाहुणे आणता आले असते.माईक हॅनिगन नव्हता.फ्रॅंक नव्हता.एमी नव्हती.एमिली नव्हती.कॅरोल सुझन बेन एमा नव्हते.
जे पाहुणे आले त्यांनी मात्र खूप मजा आणली.
मला एकंदर प्लॅन गोष्टींना वेळ कमी पडला असे वाटले.अजून बरेच संदर्भ आणता आले असते.(हा एपिसोड विशेषतः प्रेक्षकांसाठी नसून त्या कलाकार आणि दिग्दर्शक क्रू साठी होता हे जाणवले.)
जोई, रॉस, फीबी च्या नव्याने प्रेमात पडले आहे.जोई अतिशय मजेत, कम्फर्टेबल वाटत होता.बाकी स्टार्स 'गेले ते दिन गेले' मोड मध्ये दुःखी वाटले(जे अतिशय नॅचरलच आहे.)
जॅक ज्यूडी आले.इतर ह्यात पालक पण आवडले असते.एमिली चे, माईक चे, चॅनडलर चे,रेचेल ची आई वगैरे.जॅक ज्यूडी आल्यावर रेचेल आणि मोनिका ज्या प्रकारे इमोशनल झाल्या होत्या ते खूप आवडले.(मला तर डेव्हिड, पीट बेकर,चार्ली, जोशुआ पण परत बघायला आवडले असते.कितना भी करो कम पड जाता है)

मुळात मला 'हे काय संपला पण' झाले.रियुनियन चा पार्ट2 आला तरी बघेन.पण मूळ कलाकारांना क्लोजर हवे.त्यामुळे पार्ट2 चा आग्रह गुंडाळून ठेवते आहे.

बघायला सुरूवात केली. मस्त आहे.

तो खालच्या मजल्यावर राहणारा "हेकल्स" अजूनही तसाच दिसतो. तो तेथील ए के हनगल असावा.

हो खरंच
हेकल्स वर स्पेस आणि टाईम चा काहीही फरक पडलेला नाही.
अनेक पात्रं नसण्याबद्दल आयोजकांनी स्पष्टिकरण दिलं आहे की एपिसोड फक्त दिड तासांचा होता आणि सोशल डिस्तंसिंग वगैरे च्याही मर्यादा होत्या.

मला अजून एखादा दिड तासाचा एपिसोड फक्त फ्रेंड्स मधले पाहुणे आणि रिकरिंग असाही चालेल.
मिस्टर ट्रिगर पण हवा त्यात.

RIP Gunther.
छोट्या भूमिकेत पण अगदी लक्षात राहणारे व्यक्तीमत्व.

Ohh...
Reuinion episode मध्ये पाहिलं होतं. व्हिडिओ कॉल वरून होता तो.
त्याचे आणि रॉस चे सीन बेस्ट आहेत Happy

अलेक बाल्ड्विन हा सगळ्यात भारी गेस्ट रोल आहे फ्रेन्ड्स मधला >>> टोटली. हे माझे आत्ता आठवणारे टॉप-५
१. ब्रूक शील्ड्स - जोई ची क्रेझी फॅन. "हान्स" रमोरे वगैरे
२. अनेक बाल्डविन - फीबीचा अति-ऑप्टिमिस्टिक बॉयफ्रेण्ड
३. ज्युलिया रॉबर्ट्स- चॅण्डलरची माजी वर्गमैत्रिण Wink
४. ब्रॅड पिट - आय हेट रेचेल क्लब
५. ब्रूस विलिस - लव्ह मशीन

रिचर्ड पण मस्त आहे पण तो बर्‍यापैकी रिकरिंग कॅरेक्टर

>>
डेनिस रिचर्ड्स -- रॉसची कझिन
रीझ विदरस्पुन -- रेचेलची बहिण
जॉऱ्ज क्लुनी -- मोनिकाचा डॉक्टर
पॉल रड -- फीबीचा बॉय्फ्रेन्ड
डॅनी डिव्हिटो -- छोटा स्ट्रीपर
विनोना रायडर -- रेचेलची मैत्रिण

फ्रेन्ड्स अ‍ॅक्चुली १९९६ पासुन २००४ पर्यंत एकही भाग न चुकवता टेव्हीवर पाहिला त्यामुळें हाउ आय मेट युर मॉम शीकम्पेर होणार नाही, तो आमच्या पुढच्या जनरेशनच सिटकॉम.

सगळीच पात्रं भारी आहेत.
जॉर्ज क्लुनी मात्र आठवत नाहीये मला.कोणत्या एपीसोड मध्ये होता?

क्रिस्तिना ऍपलगेट पण क्लासिक.रेचेल ची दुसरी बहीण.
खरं तर रियुनियन एपिसोड 3 तासांचा बनवून या सगळ्यांना आणायला पाहिजे होतं.पोट भरलं नाही.

तो भाग म्हणजे रेचेल इन्शुरन्स करता आपण मोनिका आहोत असे सांगते त्या मेडीकल फॅसिलिटी मधे. तेथे त्यांना जॉर्ज क्लूनी व आणखी एक डॉक्टर भेटतो. ते यांच्या घरी आल्यावर तीच नावे त्यांना वापरावी लागतात. पण मधे यांचे भांडण झाल्याने एकमेकींची बदनामी करायला "स्वतःचे" नाव वापरून त्या करतात - तो एपिसोड.

>>फ्रेन्ड्स अ‍ॅक्चुली १९९६ पासुन २००४ पर्यंत एकही भाग न चुकवता टेव्हीवर पाहिला त्यामुळें हाउ आय मेट युर मॉम शीकम्पेर होणार नाही<<
अशीच काहिशी माझी अवस्था झाली - साइनफेल्डची अडल्टरेटेड कॉपी फ्रेंड्स बघितल्यावर. माझ्यामते साइन्फेल्डची उंची फ्रेंड्स कधीच गाठु शकली नाहि, प्रयत्न जरुर केला गेला. जसा शारुख खान, बच्चन/दिलिप कुमार बनायचा निष्फळ प्रयत्न करत असतो. त्याला कुवती नुसार फॅन्स मिळतात, लेकिन बात कुछ जम्या नहि... Proud

नेफिवर साइनफेल्ड आलेली आहे. आता सलग बघायची आहे. रॅण्डम एपिसोड्स कायम बघितले आहेत आणि आवडलेही. पण "जुनी" वाटते. आम्ही इथे आलो तेव्हा फ्रेण्ड्स जोरात होती. साइनफेल्ड बहुधा नुकतीच संपली होती. तेव्हा आमच्या आधी इथे आलेले लोक अफाट कौतुक करत त्या सिरीज चे. तेव्हा स्ट्रीमिंग नसल्याने रीरन्स मधेच काय ते भाग बघायला मिळत. पण मी जितके भाग बघितले आहेत त्यातून तरी साइनफेल्डच्या विनोदाची जातकुळी वेगळी वाटते. त्या मानाने फ्रेण्ड्स व हाउ आय मेट अगदी सिमिलर आहेत. इव्हन बिग बँड थिअरी च्या नंतरच्या सीझन्स मधे सायन्स कमी व डेटिंग जास्त झाले तेव्हाच्या विनोदांतही साम्य वाटते.

हो, फ्रेंड्सने केलेली वॅल्यु अ‍ॅड नाकारता येणार नाहि. बट स्टिल, ओरिजिनल का श्रेय नै नाकारु शकताय...

मेबी, इट्स जस्ट मी. पहिलि आवडलेली डेटाबेस सिस्टम (इंफॉर्मिक्स), ऑपरेटिंग सिस्टम (स्को युनिक्स) यांची जागा पुढे कोणी घेउ शकत नाहि. तसंच काहिसं आहे ते... Wink

अच्छा हां.तो जॉर्ज क्लुनी का.तो एपिसोड विशेष वाटला नाही.
आणि रेचेल चे कामातले पाहुणे कलाकार पण भारी.झेलनर, टॅग,किम,जोऍना, गॅविन मिचेल.

मी साइन्फेल्ड बघायचा प्रयत्न केला.पण फ्रेंड्स इतकं झेपलं नाही.(आता अनेक वर्षांनी फ्रेंड्स मधल्या चुकीच्या गोष्टी पण लोक दाखवून देतात तेही पटतंय.पण तरीही सोडवत नाही.)

छोटीसी बात स्टॉकिंग ला प्रोत्साहन देतो, त्यात 'तो समझो तुम हो प्रेमी नंबर 2' सारखी वाक्य आहेत.पण तरीही तो आवडीने पाहणं सोडवत नाही, तसं.

Pages