friends फॅन क्लब

Submitted by कटप्पा on 19 August, 2020 - 15:49

फ्रेंड्स पंख्यांसाठी हा धागा.

कृपया फ्रेंड्स भारी की HIMYM हा वाद इथे घालू नये.
जॉई बिट्स बारनी एनीडे.

Joey: Hey Chandler, when you see Frankie, tell him Joey Tribbiani says hello. He'll know what it means.
Chandler: Are you sure he's gonna be able to crack that code?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण फ्रेंड्स ची फॅन आहे..
हे आठवलं..
Joey: Oh! Right! Okay.. ducks is heads, because ducks have heads.
Chandler: What kind of scary-a** clowns came to your birthday? Proud

परत परत बघून सगळे संवाद पण पाठ झालेत आता फ्रेंड्स चे
फ्रेंड्स नंतर big bang theory, how i met your mother, modern family सगळे बघितले पण फ्रेंड्स ची सर एकाला पण नाही. माझा सगळ्यात जास्त आवडता dialogue
joey dosent share food

कोणाला एखादा संदर्भ किंवा विनोद समजला नसेल तर इथे लिहा. इतरांकडून माहिती मिळेल. मला तो "Stop the Q tip when there is resistance" वाला कोट बरेच दिवस कळाला नव्हता. खूप सर्च केल्यावर नीट समजले. लाफ ट्रॅक वापरत असले, तरी त्या सीनला तो हशा उत्स्फुर्त वाटतो. त्या "टेलर" वाल्या एपिसोड मधेच आहे.

लंडनच्या पहिल्या एपिसोड मधे दोन प्रसिद्ध व्यक्ती चमकून जातात. एक 'फर्जी' आहे. दुसरी ओळखा. गूगल न करता Happy

मला तर F.R.I.E.N.D.S मधले सेलिब्रिटीज कधीच नाही ओळखता आले Sad Brad Pitt सोडून... मागचं पब्लिक ओरडायच तेव्हा कळायचं ...ही विशेष व्यक्तीची एन्ट्री आहे..

कधीच नाही ओळखता आले Sad Brad Pitt सोडून>>खरच तो ब्रॅड पीट कसला क्युट दिसत होता .. डोळ्यात बदाम आणणारा स्माईलि आहे का इथे Happy

ओके यापुढे सस्पेन्स ताणत नाही. जोई ज्याच्याकडून हॅट विकत घेतो (आणि दिवसभर घालून फिरतो) तो टोपी विकणारा म्हणजे व्हर्जिन समूहाचा मालक रिचर्ड ब्रॅन्सन. "What are you fine gentlemen in the market for?" विचारणारा.

मला नसता बा ओळखता आला.
मला सर्वात जास्त आवडतो तो म्हणजे रिचर्ड आणि मग एलिझाबेथ चे डॅड.
आणि मला फिबी चा पार्कर पण आवडतो.एक एपिसोड चा अती उत्साही बॉयफ्रेंड.

तो पार्कर महाधमाल आहे Happy अलेक बाल्डविन. सध्या एसएनएल मधे ट्रम्प चा रोल करतो.

बरं हे अजून एक. ही अ‍ॅड बघा आणि फ्रेण्ड्स मधे याचा रेफरन्स कोठे आहे व कोणाचा त्याबद्दल रिमार्क आहे ते ओळखा. अगेन - गूगल न करता Happy
https://www.youtube.com/watch?v=xAVALXH9nxU

अलेक बाल्ड्विन हा सगळ्यात भारी गेस्ट रोल आहे फ्रेन्ड्स मधला >>> टोटली. हे माझे आत्ता आठवणारे टॉप-५
१. ब्रूक शील्ड्स - जोई ची क्रेझी फॅन. "हान्स" रमोरे वगैरे
२. अनेक बाल्डविन - फीबीचा अति-ऑप्टिमिस्टिक बॉयफ्रेण्ड
३. ज्युलिया रॉबर्ट्स- चॅण्डलरची माजी वर्गमैत्रिण Wink
४. ब्रॅड पिट - आय हेट रेचेल क्लब
५. ब्रूस विलिस - लव्ह मशीन

रिचर्ड पण मस्त आहे पण तो बर्‍यापैकी रिकरिंग कॅरेक्टर आहे.

तो मोनिका चा डिफेक्टिव्ह बोलणारा बॉयफ्रेंड पण.(सगळ्यांना तो आवडणार नाही तिला वाटतं पण ब्रेकअप होताना तिच्या पेक्षा जास्त बाकी सगळे रडतात.)
आणि रॉस ची मोना.
आणि तो पाओलो.
मला ती जाहिरात बघून काहीच झेपलं नाही Happy व्यासंग कमी पडतोय.(गटणे)

तो बॉयफ्रेण्ड ("अ‍ॅलन") तसा बोलत नसतो स्वतः - आधीच्या तिच्या एका बीएफ च्या बोलण्याची ती नक्कल असते.

जाहितात हिंट - चॅण्डलर Happy

अजूनही नाही आठवत
चॅनडलर मीटिंग मध्ये झोपतो आणि टूलसा ला ट्रान्स्फर व्हायला येस म्हणतो तो नाही ना?

Pages