गॉल्फ आणि मी...

Submitted by राज on 15 August, 2020 - 13:04
golf bags

"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अ‍ॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर

आर्नीच्या या कोटने लेखाची सुरुवात करण्याचं कारण मी हा अनुभव "याची देहि याची डोळा" घेतलेला आहे. वरकरणी एक्स्लुसिव वाटणारा गॉल्फ हा खेळ जगाच्या कानाकोपर्‍या पर्यंत का खेळला जातो (जागेची वानवा असणार्‍या जपान, साउथ कोरिया या देशांत सुद्धा), याची वार्षिक उलाढाल जवळजवळ $८० बिलियन का आहे, यातंच या खेळाचं गम्य दडलेलं आहे. या अद्भुत खेळाची थोडक्यात ओळख आणि त्याचा प्रवेश माझ्या आयुष्यात कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे मी करणार आहे. याकरता आपल्याला रिवाइंड करुन काहि वर्षं मागे जावं लागेल.

मुंबई अगदि सुरुवाती पासुनच एक भला मोठ्ठा मेल्टिंग पॉट आहे. भारताच्या काना-कोपर्‍यातुन आलेल्यांना मुंबईने सामावुन घेतल्याने त्यांनी सोबत आणलेली त्यांची भाषा, संस्कृती, पाककला इ. चं एक्स्पोझर मुंबईकरांना आपोआप मिळत जातं. त्यात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ. क्रिकेट जरी मुंबईच्या डिएनए मध्ये असले तरी क्रिकेट व्यतिरिक्त प्रांतिक विविधतेमुळे मला लहानपणी इतक्या खेळांची ओळख झाली, आणि ते खेळायला मिळाले कि आज त्या आठवणींनी अचंबीत व्हायला होतं (एस्पेशियली माझ्या मुलांना इथे किती कमी खेळ खेळायला मिळाले हे बघुन). शिवाय ते खेळ हि सिझनल, आणि प्रत्येक खेळात अ‍ॅट्लिस्ट पांच वेरिएशन्स. काहिं हटक्या खेळांची नांवंच द्यायची तर शीग-रुपी, लेबल्स पावसात; सिगरेट्सची रिकामी पाकिटं, सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचे बिल्ले, गोट्या हिवाळ्यात; आणि शेवटि पतंग, भोवरे, विटि-दांडु आणि इतर मैदानी खेळ उन्हाळ्यात. मूळात खेळाडु प्रकृतीचा असल्याने नविन खेळांचं आकर्षण मला नेहेमीच होतं. मात्र, सुरुवातीला तरी गॉल्फ हा एक अपवाद. चेंबूरला असताना बाँबे प्रेसिडेंसी गॉल्फ क्लब नजरेस पडायचा, तिथले हिरवेकंच फेरवेज, जोडिला वेल मॅनिक्युर्ड लँडस्केपिंग कुतुहुल वाढवायचे. पण तिथे जाउन खेळायचं सोडा, कोणि खेळतानाहि कधी दृष्टिस पडायचं नाहि. त्यामुळे गॉल्फबाबत एकप्रकारची मिस्टरी मनात कायम होती. ती मिस्टरी सॉल्व व्हायला नव्वदिचं दशक उजाडावं लागलं...

अमेरिकेत आल्यानंतर एकिकडे बास्केटबॉल, फुटबॉल, बेसबॉल या खेळांबाबत माझी रुची वाढत असतानाच, गॉल्फचीहि ओळख वाढत चालली होती. वीकेंड्सना टिवीवर मेजर टुर्नामेंट्सचं ४-५ तास लाइव कवरेज बघुन गॉल्फची कंटाळवाण्या खेळावरुन, समथिंग इंटरेस्टिंग असं वाटण्या पर्यंत प्रगती झाली होती. फ्रेड कपल्स, अर्नी एल्स यांचा स्मुथ, एफर्टलेस स्विंग; डेविस लव द थर्ड, ग्रेग नॉर्मन यांचा संयत पर्सेवरंस, आणि जॉन डेलीचा रासवट (ग्रिप इट अँड रिप इट) गेम या सगळ्यांमुळे उत्सुकता वाढतच चालली होती. शिवाय त्याकाळात ऑफिसमधे टिम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटिज मधे गॉल्फ राउंड असायचाच. दोन-तीन राउंड्स खेळल्यावर हे प्रकरण दिसतं तेव्हढं सोप्पं नाहि याची कल्पना आली, फर्म कमिटमेंट शिवाय हा खेळ आत्मसात होणार नाहि आणि एंजॉय हि करता येणार नाहि याची खात्री पटत गेली. रोड-वॉरियर लाइफस्टाइल मुळे आपल्याला हे झेपेल का, याची शंका (इवेंच्युअली, इट टर्न्ड आउट टु बी ए बून*) होती पण तोपर्यंत गॉल्फचा किडा चावला होता. एका वीकेंडला जाउन गॉल्फची सगळी सामुग्री खरेदि केली, आणि जवळच्याच गॉल्फ कोर्स वर एक कोच गाठुन लेसन्स करता साइनप केलं.
Webp.net-compress-image.jpg
प्रचि. #१: गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे...

अजुनहि आठवतंय, सुरुवातीला कोचने ९ आयर्न देउन मला (इमॅजनरी बॉलसोबत) प्रॅक्टिस स्विंग करायला लावलं. माझा पर्फेक्ट स्ट्रेट ड्राइव बघुन त्याने स्पष्टं सांगितल कि यु हॅव टु अनडु योर क्रिकेट स्विंग; इट्स टफ, बट डुएबल. इट विल टेक ए व्हाइल टु बिल्ड ए मसल मेमरी फॉर गॉल्फ स्विंग. माझी मानसिक तयारी होतीच, शिवाय फ्रेड, अर्नी, जॉन, आणि गॉल्फ सेंसेशन टायगर वुड्स (तेंव्हा पिजीएचं दार ठोठावत होता) यांच्या स्विंगची पारायणं करुन गृहपाठ हि चालुच होता. पुढे चार आठवड्यांच्या ग्राइंडनंतर कोचने माझ्यातला क्रिकेटर इरेझ करुन गॉल्फर जन्माला घातला. या चार आठवड्यांत कोचने घालुन दिलेले काहि प्रमुख धडे:

१. गॉल्फ ग्रिप (पकड):
१.१ क्लब कसा धरावा, इंटर्लॉक, ओवरलॅप कि बेसबॉल (टेन फिंगर)
१.२ पकड अशी जसं एखादं कबुतर हातात पकडावं. पकड इतकि हळुवार नसावी कि कबुतराला सहज उडुन जाता येईल, आणि इतकि घट्ट हि नसावी कि कबुतर गुदमरुन जावं Happy
१.३ क्लब चोक डाउन कधी, आणि का करावा

२. गॉल्फ स्टांस:
२.१ बॉल कसा अ‍ॅड्रेस करावा; क्लबफेस टार्गेट एरियाशी कसा अलाइन करावा
२.२ दोन्हि पायांमधे किती अंतर ठेवावे
२.३ क्लब सिलेक्शन नुसार बॉलची पोझिशन कशी ठरवावी
२.४ पाठ-मान सरळ, पाय गुडघ्यात किंचित बेंड, आणि नजर फक्त बॉलवर कशी ठेवावी
२.५ खांदे, हात कसे सरळ आणि रिलॅक्स्ड, टेंशन फ्री ठेवावे

३. गॉल्फ स्विंग:
३.१ क्लब सिलेक्शन (पार्ट ऑफ कोर्स मॅनेजमेंट) कसे करावे
३.२ लोअर बॉडि (कंबरेखाली) कशी "काम" ठेवावी
३.३ बॅक स्विंग घेताना फक्त टॉर्सो कसा कॉइल करावा
३.४ डावा हात संपुर्ण स्विंग एक्झिक्युट होइपर्यंत सरळ (ताठ) कसा, आणि का ठेवावा
३.५ मान स्थिर आणि नजर न हलवता बॉलवर कायम कशी ठेवावी
३.६ बॅक स्विंग करताना उजव्या पायावर, आणि नंतर बॅक स्विंग ते फॉलो थु करताना उजव्या पायवरुन डाव्या पायाकडे वेट ट्रांस्फर कसं करावं
३.७ स्विंग एक्झिक्युट करताना फक्त टॉर्सो अन्कॉयल कसा करावा
३.८ बॉलशी काँटॅक्ट झाल्यावर, स्विंग फॉलो थ्रु कसा करावा

४. गॉल्फचे बेसिक नियम आणि एटिकेट्सः
४.१ बरोबर खेळणार्‍या गॉल्फरचं प्रिशॉट रुटिन सुरु झालं कि शांत रहावे बोलु किंवा हालचाल करु नये. मग तो टि-बॉक्स असो, वा फेरवे, वा पटिंग ग्रीन
४.२ फिक्स दि डिवट्स ऑन फेरवे, अँड बॉल मार्क्स ऑन द ग्रीन
४.३ बंकर्स (फेरवे, ग्रीन साइड) शॉट मारल्यावर बंकर्स मधली वाळु रेकने पुर्वि होती तशीच करावी
४.४ ऑनर सिस्टम पाळावी. तुमची टर्न येइस्तोवर तुमचा शॉट खेळु नये
(अजुन भरपुर आहेत, खाली चर्चेच्या ओघात लिहायचा प्रयत्न करेन…)

लेसन्स संपल्यवर मी रिलिजस्ली ड्रायविंग रेंजवर जायला सुरुवात केली. रेंजवर नविन मित्र मिळाले, गॉल्फ ग्रुप तयार झला. सुरुवा-सुरवातीला आम्हि अगदि झपाटल्यासारखे वेळ मिळेल तेंव्हा १८ होल्स खेळत होतो. वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर निघुन ९/१८ होल्स खेळायचो. खूप मस्ती केली. बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं.

गॉल्फ हा एक कंटाळवाणा खेळ आहे असं सुरुवातीला झालेलं माझं मत, आता गॉल्फ जगातला सर्वोत्तम खेळ आहे या मतापर्यंत पोचलं. याला कारणंहि तशीच आहेत. प्रत्येक गॉल्फ कोर्स हा वेगळा, स्वत:चं असं आगळं-वेगळं वैशिष्ठ्य (कॅरेक्टर) मिरवणारा असतो, इतर खेळांसारखा चौकटित बांधला जात नाहि. शिवाय खेळताना गॉल्फ कोर्स हा वारा, पाउस, बर्फवृष्टि, थंडि/उकाडा/आदृता इ. सोबत तुमचा एकाअर्थी प्रतिस्पर्धीच असतो. त्यात आणखी भर म्हणजे गॉल्फ कोर्स मॅनेजमेंटला टी-बॉक्स मागे-पुढे, ग्रीन्सच्या कप पोझिशन बदलत ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात, एकाच गॉल्फ कोर्सचे डाय्नॅमिक्स, टपाग्रफि सतत बदलता येण्याजोगे असल्याने त्यात नाविन्याची भर पडत असते. हे सगळे बारकावे, त्यांचा रेलवंस सुरुवातीला समजायला कठिण आहेत, पण मी वर लिहिल्या प्रमाणे तो "किडा" एकदा चावला कि अस्वस्थ करत रहातो. मिळेल त्या माध्यमातुन (टिवी, पुस्तकं, ऑडियो) माहिती मिळवुन, ज्ञान वाढवुन गेम इंप्रुव करण्याचा ध्यास लागतो. त्या प्रयत्नात शॉर्ट/लाँग आयर्न, ड्रायवर, वुड्स, हायब्रिड्स यांच्या क्लबफेसचा अँगल, ट्रॅजेक्टरी, बॉल स्लाइस्/फेड इत्यादिंना कारणीभूत असलेले फिजिक्सचे फंडे, जे शाळा/कॉलेजात डोक्यावरुन गेलेले असतात ते आता समजायला लागतात. अशा अनेक गोष्टि हळुहळु उलगडत जात रहातात, आणि त्यात जी मजा आहे ती शब्दात मांडणं कठिण आहे. थोडक्यात, पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाहि असं म्हणतात. तसंच काहिसं गॉल्फबाबत म्हणता येईल - वन कॅनॉट ट्रुली अ‍ॅप्रिशिएट गॉल्फ अनलेस फ्यु राउंड्स आर प्लेड...

त्यानंतर गॉल्फ खेळायची एकहि संधी मी दवडली नाहि, रादर संधी निर्माण केल्या. *रोड-वॉरियर लाइफस्टाइल असल्याने क्लायंट मिटिंग्जना, सेल्स सायकल्स, ट्रेड शोज इ. च्या मिक्स मधे गॉल्फ राउंडस् यायला लागले. दुसरीकडे मित्रांसोबत अ‍ॅलबामा, नॉर्थ-साउथ कॅरलायना, फ्लोरिडा इ. जवळच्या स्टेट्समधे २-३ दिवसांच्या वार्षिक गॉल्फ ट्रिप्स होउ लागल्या. या ट्रिप्सची आय्टिनररी साधारण अशी असायची - ऑफिसमधुन शुक्रवारी लंचनंतर निघायचं. डेस्टिनेशन्ला पोचल्यावर १८ होल्स खेळायचे. शनिवारी पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन ३६ होल्स खेळायचे; मधे लाइट लंच. डिनरला फिंगर फुड, आणि सदर्न स्टाइल बार्बेक्यु रिब्ज हे स्टेपल फुड. सोबतीला सिंगल माल्ट, सिगार आणि कमराडरी. रविवारी परत पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन २७ अथवा ३६ (टाइम पर्मिटिंग) होल्स खेळायचे आणि संध्याकळी परत घरी. तोपर्यंत शरीराची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन झालेली असुनहि कुठलिहि तक्रार अजिबात नसायची. आत्मिक समाधान का काय म्हणतांत ते यालाच म्हणत असावेत. इट वाज ऑल्वेज वर्थ टु द लास्ट पेनी...
golffp.jpg
प्रचि. #२: गॉल्फ कोर्स खेळल्याचा पुरावा, नातवांकरता...

तर मंडळी, असा हा माझा गॉल्फचा प्रवास कित्येक वर्षे चालू आहे आणि पुढेहि चालू ठेवायचा आहे. टेनिस ३-४ वर्षांपुर्वि पासुनंच बंद केलं आहे. आता फक्त गॉल्फ. वीकडेजना संधी मिळेल तेंव्हा, शनिवारी हनी डु लिस्ट हातावेगळी केली कि पुढचा अर्धा रविवार फक्त माझा. त्या अर्ध्या दिवसांत मित्रांबरोबर गॉल्फ डेट - ब्रेकफास्ट+१८ होल्स्+लंच असा साधारण कार्यक्रम असतो. सुदैवाने मी रहातो त्या गावांत १० मैलाच्या रेडियसमधे पब्लिक, सेमाय-प्रायवेट, प्रायवेट असे मिळुन २०+ गॉल्फ कोर्सेस आहेल; माझे जवळपास सगळे खेळुन झाले आहेत. आजहि कामानिमित्त एखाद्या नविन शहरांत गेलो कि तिथले लोकल अ‍ॅट्रॅक्शन्स, पटेल स्पॉट्स वगैरे शोधण्या ऐवजी मी जवळपासच्या गॉल्फ कोर्सेसची माहिती काढतो, आणि तिथल्या एखाद्या गॉल्फ कोर्सवर कमीत कमी ९ होल्स तरी खेळण्याकडे माझा कल असतो. दोन्हि मुलांना सुरुवातीला मी स्वतः अणि नंतर कोचमार्फत लेसन्स दिल्याने त्यांच्यातहि आवड निर्माण झाली. दोघेहि आता रेग्युलरली खेळतात, माझ्याबरोबर क्वचित आपापल्या मित्रमंडळीत जास्त. मुलांसोबत टिवीवर गॉल्फ टुर्नामेंट्सचं कवरेज बघणं सहसा सोडत नाहि, मेजर्स तर बघतोच बघतो. टायगर वुड्सचा उभारीचा काळ (९०-०० दशक) आणि माय्केल जॉर्डनचा उतरता काळ बघता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. एम्जे आणि टायगर यांच्याविषयी काय लिहिणार, जेव्हढं लिहावं तेव्हढं कमीच आहे. नजीकच्या काळातले गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) माझ्या मते दोनच आहेत - माय्केल जॉर्डन आणि टायगर वुड्स. एम्जे आता रिटायर झालाय, लेकिन टायगर अभी जिंदा है. त्याचा गेल्या दहा वर्षातला स्लंप नसता तर आत्ता पर्यंत जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड कधीच मोडला गेला असता. अजुनहि वेळ निघुन गेलेली नाहि. टेक्निक इतकाच्, अंमळ टेक्निक पेक्षा जास्त गॉल्फ हा माइंड गेम आहे. अजुनहि चौथ्या राउंडला टायगरचं रेड-ब्लॅक आउट्फिट भल्या-भल्यांना इंटिमिडेट करतं, तो लिडरबोर्डच्या आसपास असला तर त्याच्या प्रत्येक ईगल/बर्डि नंतर होणार्‍या रोअर, आणि फिस्टपंप मुळे प्रतिस्पर्ध्यांचं अवसान गळुन पडतं. सर्वात जास्त पिजिए टुर्नामेंट्स जिंकण्याचा सॅम स्नीडचा रेकॉर्ड टायगरने टाय केला आहे, तो लवकरच मोडलाहि जाईल. जॅकचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड सुद्धा तो मोडेल याबाबत मला तरी अजिबात शंका नाहि...

लेखाची सांगता बॉबी जोन्सच्या या कोटने मी केली नाहि तर ते उचीत ठरणार नाहि. गॉल्फ टॅलंट म्हणजे काय असतं याचं बॉबी जोन्स हा चालतं--बोलतं उदाहरण, दुसरं अर्थात टायगर. बॉबी जोन्सने स्थापन केलेला, आणि नंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या गांवात हलवलेला अ‍ॅटलांटा अ‍ॅथलेटिक क्लब, बॉबी जोन्स ड्राइव पास करताना एक अद्भुत अशी लहर, चाटाहुची नदिवरुन येते आणि हृदयाला स्पर्शुन जाते. गॉल्फ ने आयुष्यात दिलेल्या सुवर्णक्षणांची आठवण करुन देत...

"गॉल्फ इज दि क्लोजेस्ट गेम टु द गेम वी कॉल लाइफ. यु गेट बॅड ब्रेक्स फ्रॉम गुड शॉट्स, यु गेट गुड ब्रेक्स फ्रॉम बॅड शॉट्स - बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स

img_0662.jpg
प्रचि. #३: युअर्स ट्रुली अ‍ॅट पिजिए टुर, चॅपियनशिप ट्रॉफि, शुगरलोफ कंट्री क्लब...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही.
गोल्फबद्दल पहिल्यांदाच ईतके वाचले.
टोपोग्राफी वेरीएशनचा मुद्दा एकदम पर्रफेक्ट वाटला. नक्कीच यामुळे हा खेळ सतत वेगळा होतो
कबूतराला पकडायची ग्रिपही ईमेजिन करून झाली.
गोल्फ कोर्सेसचे दोनचार छान फोटोही टाकायचे होते.

भारी लिहिलंय!
गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे >> हे नाही कळलं?

छान! गोल्फ टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटी कसं तेवढं नाही समजलं. सहसा वॉल क्लाईंबिंग, हर्ड्ल/अ‍ॅडव्हेंचर कोर्स इ. जिथे दुसर्‍यावर भिस्त ठेवावी लागते, त्याशिवाय जिंकता येत नाही असे खेळ टीम बिल्डींग मध्ये अनुभवले आहेत.

च्रप्स - टॉप गॉल्फ हे इंटरेस्टिंग, हाय-टेक प्रकरण आहे. आम्हि ओल्ड स्कूल, बॉल स्वतः टिअप करुन प्रॅक्टिस करणारे. Wink
ऋन्म्या - गॉल्फ कोर्सचे फोटो जितके टाकावे तितके कमीच आहेत. इथे काहि आहेत, जगातले टॉप पिक्चरेस्क...
maitreyee - हा हा. घरातली सिनियॉरिटी हो. अगदि उजवीकडे आहे ती माझी बॅग, मधली मोठ्या मुलाची, आणि डावी धाकट्याची... Happy

>>गोल्फ टीम बिल्डींग अ‍ॅक्टीव्हीटी कसं तेवढं नाही समजलं.<<
गुड क्वेश्चन! गॉल्फ इंडिविज्युअली किंवा टीम मध्ये खेळला जातो. टीम फॉर्मॅट मधे खेळताना स्कोरिंग (मॅच प्ले) वेगळं असतं. रायडर्स कप आणि प्रेसिडेंट्स कप हि दोन चांगली उदाहरणं आहेत. रायडर्स कप अमेरिका वि. युरप मधे खेळला जातो तर प्रेसिडेंट्स कप अमेरिका वि. रेस्ट ऑफ द वर्ल्ड.

टीम बिल्डिंग एक्सरसाइज मधे दोन टिम्स पाडतात - सेल्स वि. डिलिवरी इ.

गोल्फ टीम बिल्डिंग पेक्षा बिझिनेस बिल्डिंग जास्त आहे... बऱ्याच बिझिनेस डिल्स, काँट्रॅक्त डिस्कशन्स तिथे होतात... सेल्स किंवा प्री सेल्स वाल्याना माहीत असेल...

>>बिझिनेस बिल्डिंग जास्त आहे<<
गॉल्फ नेटवर्किंग करता परफेक्ट आहे. बिझनेस डेवलपमेंट, टीम बिल्डिंग इ. नेटवर्किंगचे प्रकार म्हणु शकतो. महत्वाचा मुद्दा हा कि - गॉल्फ इज ए ग्रेट इक्वलायझर. रिगार्डलेस ऑफ दि बॅकग्राउंड, एजुकेशन, सोशल स्टेटस ऑल गॉल्फर्स हॅव टु प्ले अ‍ॅट देर रिस्पेक्टिव लेवल (हँडिकॅप)...

अरे वा! छान ओळख. मुलाला गेली २-३ वर्ष बरीच आवड निर्माण झाली आहे. त्याच्याबरोबर म्हणून मी पण खेळले आहे ९ होल गेम बरेचदा. आम्ही फार कच्च लिंबु आहोत मात्र. बाकी यु एस ओपन आमच्या शेजारातच होत असते दर काही वर्षांनी पण जाऊन बघावं एवढी आवड आणि सवड नाही.

मस्त लिहीले आहे! गॉल्फ बद्दल फारशी माहिती नाही त्यामुळेही हा प्रवास वाचायला आवडला.

त्या टॉफगॉल्फ सारख्या ठिकाणी थोडेफार शॉट्स मारून पाहिले आहेत त्यामुळे हे प्रकरण सोपे नाही इतके माहीत आहे. बाकी गॉल्फचा बिझिनेस नेटवर्किंग, सोशलायझेशनकरता खूप फायदा होतो असे ऐकले आहे. तुमच्या लेखातूनही जाणवते.

छान लिहिलं आहे. गॉल्फ वरकरणी सोपं वाटत असलं तरी हे प्रकरण सोपं नाही हे नेहमी जाणवतच पण प्रत्यक्ष खेळलेल्या कोणाकडून त्यातल्या थोड्याफार खाचाखोचा ऐकायला मिळाल्याने चांगलं वाटलं.

फक्त लेखातली इंग्रजी शब्दांची आणि इंग्रजी + मराठी अश्या मिसळ वाक्यांची खैरात प्रचंड खटकली. काही काही शब्द / संज्ञा इंग्रजीतच लिहायला हवे पण बर्‍याच गोष्टी पूर्णपणे मराठीत सहज लिहित्या आल्या असत्या. उदा. "उजव्या पायावरून डाव्या पायावर वेट ट्रान्फर करणे" / " वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर"

"बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं." >>>> ह्या भाषेला नक्की मराठी म्हणावं का असा प्रश्न पडलाय. Happy

आजकाल असेच मराठी बोलतात Happy समजायला सोपी जाते...
शुद्ध मराठी पुणे 30 मध्ये पण ऐकायला येत नाही आता...

राज.. मस्तच लिहीले आहेस रे!

पहीला आर्नॉल्ड पामरचा.. व शेवटचा बॉबी जोन्सचा... दोन्ही क्वोट्स... अफलातुन व चपखल! could not agree more!

टायगर व एम जे बद्दल सुद्धा बरोबर बोललास... फक्त मी रॉजर फेडररला सुद्धा “ गोट“ च्या पंगतीत बसवीन!.... Happy

मला वाटलच होत... तु बराच गॉल्फ खेळलेला दिसतोस. माझ्या गॉल्फ अनुभवाबद्दल मी तुला माझ्या अ‍ॅटलांटा ऑलिंपिक्स बीबी वर सांगीतलेच होते... Happy

हे पण बरोबर की एकदा का एखाद्या खेळाचे खाचखोळगे समजले की त्यात आपण गुंतत जातो. मी सुद्धा बहुतेक गॉल्फ च्या मेजर्स टुर्नामेंट्स व प्लेअर्स चँपिअन्शिप्स बघीतल्या आहेत... १९८९ पासुन. बट्.. नोबडी... आय मीन... नोबडी.. इंप्रेस्ड मी मोर दॅन टायगर.. किंबहुना मी तर असे
म्हणेन की... नोबडी.. गेव्ह मी मोर प्लेजर टु वॉच द गेम ऑफ गॉल्फ दॅन टायगर... .. तो दोन्ही .. पीजी ए टुर विन्स व मेजर्सचा.. विक्रम मोडेल असे मलाही वाटते.

कुठलाही खेळ समजणे व त्याचा “ किडा“ चावणे यावरुन एक गोष्ट आठवली.. माझ्या ग्रॅ ज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट स्टडीला मी युनीव्हर्सीटी ऑफ कॅन्सास मधे जवळजवळ ८ वर्षे होतो. त्यामुळे अमेरिकेतल्या कॉलेज स्पोर्ट्सचा मॉहोल मी अगदी जवळुन अनुभवला... त्यात माझी युनिव्हर्सीटी कॉलेज बास्केटबॉलचे माहेरघर व पॉवरहाउस असल्यामुळे मी एन सी ए ए बास्केटबॉलमधे गुरफटलो नसतो तर नवल! मी इथे जुन्या मायबोलीवर एन सी ए ए बास्केटबॉलचा बीबी उघडुन मार्च मॅडनेस बद्दल ३-४ पोस्ट्स टाकल्या होत्या.. एकट्यानेच.. मग कोणतरी २ जण आले आणी पोस्ट टाकुन गेले.. म्हणाले.. हा माणुस मॅड दिसतोय.. काहीतरी मार्च मॅडनेस बद्दल लिहीतोय.. .. Happy

एंजॉय युअर गॉल्फ माय फ्रेंड! .. Happy

नवी माहिती
आता पर्यंत फक्त पिक्चर्स मध्येच पाहिलंय.

लेख माहितीपूर्ण आहे.
पण मिंग्लिश भाषेत न लिहिता मराठी भाषेत लिहिला तर अजून समजायला सोपं जाईल .

पराग/जाई. - माझं मराठी आता बियाँड रिपेर झालेलं आहे, सांभाळुन घ्या. Happy
फारएण्ड - धन्यवाद. सोशलायझेशन मुद्द्याबाबत सहमत. पोटेंशियल क्लायंट, वेंडर, पार्टनर इ. सोबत गॉल्फ खेळ्ण्यात मूळ हेतु हाच असतो. सुरुवातीला (प्रॉस्पेक्टिंग) दोन्हि पार्टिज एकमेकांना जोखत असतात - व्हेदर आय कॅन ट्रस्ट धिस गाय, अँड डु बिझनेस विथ हिम. गॉल्फ खेळताना डिल होणे, काँट्रॅक्ट साइन होणे वगैरे फक्त सिनेमातंच होतं, प्रत्यक्षात माझ्या बाबत अजुन तरी झालेलं नाहि... Wink

पुढे पोर्टफोलियोतल्या क्लायंट्स बरोबरचं गॉल्फ इज पार्ट ऑफ रिलेशन्शिप मॅनेजमेंट...

सिंडरेला - मस्त. मुलाबरोबर टिवीवर गॉल्फ कवरेज पण बघत जा. मी सुद्धा बघुन-बघुन खूप शिकलो, एस्पेशियली कोर्स मॅनेजमेंट, क्लब सिलेक्शन इ. जे ऑफ कोर्स शिकण्या सारखं आहे. गॉल्फ टुर्नामेंट्सचं टिवी कवरेज इतकं डिटेल मधे असतं कि टिवीच्या उजवीकडे वरच्या कोपर्‍यात पिन पासुनचं डिस्टंस, स्कोअर, कितवा शॉट, पार इ. दाखवतात. डिस्टंस वरुन कुठला क्लब सिलेक्ट करायचा हे त्याला ठरवु द्या. हे ड्रिल तो जेंव्हा गॉल्फ कोर्सवर प्रत्यक्षात खेळेल त्यावेळेस उपयोगी पडेल...

मुकुंद - अरे मी पण एकेकाळी मार्च मॅडनेस बघायचो. एनसी डबल ए बास्केटबॉल अथवा फुटबॉल, दोन्हित पोरं अगदि जीव तोडुन खेळतात. कॉलेज फुटबॉल मधे हाइझमन ट्रॉफि, एनएफएल ड्राफ्ट वगैरे मुळे बर्‍यापैकि मोटिवेटेड असतात. मूळात, एनएफएलच्या पैशामुळे (अजुन) स्पॉय्ल झालेले नसतात. मी अजुनहि मुलांबरोबर कॉलेज फुटबॉल बघतो. घरी टेकचे फॅन्स असुनहि मला बुलडॉग्ज्+गेटर्स रायवलरी बघायला मजा येते. दुसरीकडे बामा आणि ऑबर्न. फुल्ल राडा... Happy

राज... २००५ मधे ... माझी पुतणी युनिव्हरसिटी ऑफ जॉर्जिया, अथेन्सला मास्टर्स करत होती तेव्हा मला जॉर्जिया बुलडॉग्स स्टेडिअममधे बसुन बुलडॉग्स विरुद्ध ऑबर्न हा फुटबॉल गेम बघायला मिळाला होता... स्टेडिअममधले अ‍ॅट्मॉसफिअर व व्हाइब... शब्दात सांगता येणार नाही.. जबरदस्त अनुभव... मला वाटत बुलडॉगचे सॅनफोर्ड स्टेडिअम इज वन ऑफ द लार्जेस्ट फुटबॉल स्टेडिअम इन आमेरिका.. .. त्या दिवशी ९०,००० पेक्षा जास्त लोक होती.. त्यांचा बँड पण मस्त होता.. व त्यांचा मॅस्कॉट... उगा.. Happy पण जॉर्जिया फॅन्सचा त्या दिवशी खुप हिरमोड झाला.. अगदी अटितटिच्या सामन्यात फक्त एका पाँइंटच्या डिफरंसने जॉर्जिया बुलडॉग्स हरलेले मला आठवते.

जॉर्जिया बुलडॉग्स व फ्लोरिडा गेटर्सची रायव्हलरी खुप फेमस आहे( पण ते नेहमी जॅकसनव्हिलला.. न्युट्रल ठिकाणीच का खेळतात?)

पण मिड्वेस्ट मधे शनिवारी तो गेम दाखवत नाहीत.. पण बामा व एल एस यु चे गेम खुप वेळा दाखवतात... तुमची एस इ सी कॉन्फरंस जबरी आहे.. एस इ सी वेस्ट मधे.. बामा- ऑबर्न व बामा- एल एस यु... गेममधे नेहमी फुल टु राडा असतो.. गेल्या कित्येक् वर्षात नॅशनल चँपिअन तुमच्याच कॉन्फरंस मधुन येत आहेत.. सिंपली डॉमिनेटिंग फुटबॉल कॉन्फरंस इन द नेशन फॉर शुअर!

पुर्वी नॉटर डेम- मिशिगन रायव्हलरी बघायला पण मजा यायची... पण आता नॉटर डेम पुर्वीसारखे पॉवर हाउस राहीले नाही.. त्यापेक्षा आता मिशिगन -ओहायो स्टेट रायव्हलरी बघायला जास्त मजा येते.

पण माझा कल जास्त एन सी ए ए बास्केटबॉलकडे असतो कारण के यु फुटबॉलमधे अगदीच डफ्फर आहे.. पण बास्केट्बॉलमधे आम्ही एकदम दादा आहोत... ऑल्वेज इन टॉप ३ इन द नेशन... Happy

तुझे गॉल्फचे अजुन अनुभव येउन देत इथे... मजा येइल वाचायला..

>>पण ते नेहमी जॅकसनव्हिलला.. न्युट्रल ठिकाणीच का खेळतात?<<
अरे, राडा मिनिमाय्ज करायला. Proud जोक अपार्ट. मला वाटतं जॅक्सनविल मध्यावर्ती ठिकाण (अ‍ॅथन्स आणि गेन्सविल) असल्यामुळे आहे, असं वाचलं कुठेतरी...

अ‍ॅथन्स माझ्यापासुन जास्त लांब नाहि, पण मी एक-दोनदाच गेलोय तिथे. एकदा मुलाबरोबर कॅंपस टुर करता आणि दुसर्‍यांदा, अर्थात युजीए गॉल्फ कोर्स खेळण्याकरता. सॅनफर्ड स्टेडियम पाहिलंय, पण तिथे गेम बघण्याची संधी अजुन आलेली नाहि.

माझा गॉल्फ अनुभव इथे शेअर करीनच, त्याचबरोबर पिजीए टुरचे ऑन-कोर्स आणि ऑफ-कोर्स किस्से सुद्धा शेअर करेन... Wink

बाय्दवे, चार्ली वुड्सने गेल्या वीकेंडला ९ होल पार ३ जुनियर गॉल्फ टुर्नामेंट जिंकली. ३ अंडर पार, विथ ५ शॉट्स लीड. आफ्टरऑल, दि अ‍ॅपल डझ नॉट फॉल फार फ्रॉम द ट्री... Happy

मुकुंद, फेडेक्स कप प्लेऑफचा पहिला गेम (नॉदर्न ट्रस्ट) पाहिलास?

मागे तु डिजे वर कामेंट केली होतीस - हि इज नॉट इंटिमिडेटिंग इनफ लाइक टायगर. मी असहमती दाखवली होती. नाव गेस व्हॉट! टुडे हि टोटली डामिनेटेड अँड क्रश्ड दि कांपिटिशन. ३० अंडर पार, विथ ११ शॉट्स लीड. मी होल १६ पर्यंत बघत होतो, त्यानंतर वेदर डिले मुळे गेम थांबवलेला. त्यावेळेसच तो ९ शॉट्सने लीड वर होता, म्हणुन मी पुढे बघितलंच नाहि (गॅरंटिड विन), घरच्या कामाला लागलो आणि आता स्कोर चेक केला. विल यु अग्री विथ मी? Wink आय स्ट्रॉम्गली बिलिव, करंटली डिजे इज द ओन्लि प्लेयर ऑन टूर (आफ्टर टायगर) हु कॅन शो अ‍ॅब्सोलुट डामिनंस...

नाही रे ... नॉर्दर्न ट्रस्ट टुर्नामेंट नाही पाहीली...तसेही मी मोस्टली मेजर्स टुर्नामेंट्स किंवा रायडर्स कप वगैरेच बघतो

मी काल एन बी सी वर... इंडीयानापोलिस ५०० इंडी कार रेस बघत होतो. तसा मी कार रेसींगचा खुप मोट्ठा फॅन नाही ... पण वर्षातुन २ रेस नेहमीच बघतो... एक म्हणने फेब्रुआरीतली डेटोना ५००.... व मेमोरिअल डे विकेंडला होणारी इंडीयानापोलीस ५००... ( या वर्षी .. इंडी ५०० मेमोरिअल डे ला होण्याऐवजी काल झाली... पँडेमिक मुळे पोस्ट्पोन झाली होती. ) मस्त झाली कालची इंडी ५००.... ऑल्मोस्ट ९०% रेसमधे स्कॉट डिक्सन पुढे होता... पण शेवटी जपानच्या टकुमा साटोने बाजी मारली व ही रेस दुसर्‍यांदा जिंकली... स्कॉट डिक्सन दुसरा आला.

मी २००२ ला.. इंडियानापोलिस ला गेलो होतो इंडी ५०० रेस बघायला... कसले अ‍ॅट्मोस्फिअर असते म्हणुन सांगु रेसच्या दिवशी.. आणी काय तो आवाज इंडी रेसींग कार्सचा... आपल्यासमोरुन जेव्हा २०० माइल्स/ तासाने जेव्हा या गाड्या जातात... तेव्हा.... कानावर प्रोटेक्टिव्ह हेडफोन असुन सुद्धा कसला सुसाट आवाज येतो ना गाड्यांचा... अनबिलिव्हेबल! आणी तसल्या वेगात ते टर्न्स, टेक ओव्हर वगैरे प्रकार करतात.. त्या वर्षी ब्राझीलचा हुलिओ कॅस्टरनोव्हास जिंकला होता.

डी जे... मस्तच खेळतो रे.. मी फक्त त्याच्यात आणी टायगरच्या फायनल राउंड्स ची तुलना करत होतो... टायगरच्या प्राइममधे.. तो रविवारी.. फायनल राउंडला... पुढे असताना.. लाल नायके टी शर्ट घालुन आला... की बाकीचे त्याला घाबरुनच नांगी टाकुन द्यायचे.. एकदा नाही.. दोनदा नाही..... जवळ जवळ ९०% वेळा तोच जिंकायचा... डी जे किंवा इतरांची .. रवीवारी लिड मधे असताना ... जिंकण्याची टक्केवारी टायगर सारखी नाही हेच मला म्हणायचे होते... हे सगळेच टॉप प्लेअर्स आहेत हे मला ठाउक आहे.

३० अंडर पार? मस्ट बी सम काइंड ऑफ स्कोरींग रेकॉर्ड! वॉव!

टु सुन टु कॉमेंट ऑन ज्युनिअर टायगर!

>>टु सुन टु कॉमेंट ऑन ज्युनिअर टायगर!<<
अग्री, टू अर्ली टु कामेंट. दुसरीकडे जॉन डेली ज्यु. पण गाजतोय. बघुया दोघे पुढे बापाचं नांव काढतात का...

नाहि रे, नास्कार, फॉर्मुला-१ एखाद दुसरे इवेंट्स टिवीवर पाहिले असतील पण त्यात कधी घुसलो नहि. कार रेसिंगबाबत माझी मजल फक्त मुलांबरोबर पिएस४ गेम्स खेळण्या इतपतंच. त्यातहि मी मार खातो...

राज... डी जे फेडेक्स कप जिंकला.. सोबत १५ मिलिअन डॉलर्स! नॉट अ बॅड डे अ‍ॅट द ऑफिस... Happy

हो रे, वायर-टु-वायर विन हल्ली सहसा बघायला मिळत नाहि. डिजे रविवार पासुनच डॉमिनेटिंग होता, तेंव्हा तो जिंकायची खात्री होतीच. काल मी येउन-जाउन बघत होतो.

खरी मजा आली गेल्या आठवड्यात, बीएमडब्लु चँपियनशिप्सचा चौथा राउंड बघताना. तु बघितला नसशील तर थोडक्यात रिकॅप -
जॉन रामने त्याचा फायनल राउंड फिनिश केला होता, विथ वन शॉट लीड. डिजे वाज टाय्ड फॉर सेकंड पोझिशन, अँड प्लेइंग सिक्स्टिंथ होल. मला वाटंत होतं कि डिजे आरामात उरलेल्या होल्स मधे बर्डी-बर्डी करुन मॅच खिशात टाकणार. पण १८व्या होल पर्यंत हि वाज स्टिल वन शॉट बिहाइंड. १८वा होल, पार फोर स्लाइट डॉग लेग लेफ्ट. डिजेज अ‍ॅप्रोच शॉट लँडेड ४० फीट फ्रॉम द कप. एटिंथ ग्रीन इज अन्ड्युलेटिंग, टफ पट अहेड फॉर डिजे. बट हि मेड ए बर्डि. जॉन राम रेंजवर होता, जबरदस्त रोर ऐकुन त्याला क्ल्पना आली, काय झालं असेल त्याची. मॅच टाय होउन प्लेऑफ ला गेली. ३ होल, सडन डेथ. १८, १०, १८ वेर प्लेऑफ होल्स. खरी गंम्मत पुढे.

रामने पर्फेक्ट ड्राइव करुन बॉल एटिंथ फेरवे वर टाकला. डिजे वेंट लिटल अग्रेसिव बाय गोइंङ ओवर द वुड्स. (आय थिंक हि वाज व्हेरी रिलॅक्स्ड, सिंस हि वाज अ‍ॅट फर्स्ट पोझिशन फोर नेक्स्ट वीक टुर चँपियन्शिप गेम, रिगार्डलेस ऑफ द आउटकम ऑफ धिस गेम.) डिजेचा बॉल एका झाडाला लागुन परत फेरवे वर आला; लकि डॉग. डिजेने त्याचा अ‍ॅप्रोच शॉट ग्रीनवर २० फुटांवर लँड केला. रामचा अ‍ॅप्रोच शॉट साधारण ६० फुटांवर लँड झाला. मला वाटलं आता डिजे बर्डी करुन मॅच खिशात घालेल किंवा दोघेहि पार करुन पुढचा होल खेळतील. पण चमत्कार झाला. राम सँक ए ६० फुटर! व्हॉट ए पट!! डिजे कुडंट मेक ए बर्डी, अँड राम वन बीएमड्ब्लु चँपियन्शिप...

इथे हायलाइटस आहेत. १४:५२च्या पुढे बघ, डिजेचा १८व्या होलचा पट (वन दॅट फोर्स्ड प्लेऑफ) पासुन पुढे...

राज.. टायगरनेही झलक दाखवली.. सुरुवातीलाच.... अ‍ॅट ०.४४ सेकंड.... Happy

होरे .. डस्टीनचा १८ व्या होलचा व जॉन राह्म चा प्लेऑफचा .. दोन्ही शॉट्स... जबरी...

च्रप्स... तु टायगर वुडसने त्याच्या प्राइममधे.. मल्टिपल मास्टर्स टुर्नामेंट्स जिंकताना .. ऑगस्टा गॉल्फ क्लब वर मारलेले काही काही शॉट्स ( पट्स) बघ... केवळ अविश्वसनिय!... क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाले तर बॅटीने बॉल स्क्वेअर लेगकडे मारल्यावर... तो बॉल... असाआआआआ... ९० अंशात फिरुन...कर्व्ह करुन... बॉलरच्या पायाशी असणार्‍या होलमधे त्याने बॉल टाकले आहेत... आता बोल! Happy

>>अँगल स्लोप असताना बॉल कसा काय होल मध्ये बरोबर टाकतायत..<<
त्यामागे टेक्निक, आणि एक प्रोसेस आहे, त्याला ग्रीन रिडिंग म्हणतात. ग्रीनच्या पृष्ठ्भागावर असणार्‍या प्रत्येक बॉलची लाइन (बॉल पोझिशन ते कप) वेगळी असते. ती लाइन रीड करण्याची एक प्रोसेस (मेथड, इफ यु विल) असते. थोडक्यात अशी -
१. बॉल पोझिशन ते कप अंतर किती आहे?
२. ग्रीनचे ग्रेन्स लाइनच्या दिशेने आहेत कि विरुद्ध दिशेने? विरुद्ध दिशेने असतील तर रेझिस्टंस वाढतो म्हणुन बॉल स्पीड अ‍ॅडजस्ट करावा लागतो.
३. लाइन मधे ब्रेक्स (वळणं) आहेत का? ब्रेक कुड बी लेफ्ट टु राइट ऑर राइट टु लेफ्ट. ब्रेक कुड बी हार्ड (सडन ड्रॉप) ऑर सॉफ्ट. ब्रेक कुड लाय/बिगिन एनिव्हेअर बिटविन ए लाइन ऑफ पट.
४. लाइन मधे स्लोप (चढ-उतार) आहेत का? इथे परत ग्रेडिंगवर बॉल स्पीड ठरवला जातो. उदा: ६० फुट पट, आणि ३० फुटांनंतर उतार असेल बॉल स्पीड शुड जस्ट बी इनफ टु कॅरी द बॉल अंटिल स्लोप बिगिन्स, देरआफ्टर ग्रॅविटी टेक्स ओवर. वर मी शेअर केलेल्या लिंकमधे डिजे आणि राम या दोघांचा पट बघा.

हे सगळे डिसिजन्स घेण्याची प्रक्रिया पटिंगच्या प्रि-स्ट्रोक रुटिनमध्ये येते. टिवी वर एखादी टुर्नामेंट बघितली असेल तर तुम्हाला आढळुन येइल कि, प्लेयर त्यांचा बॉल ग्रीनवर मार्क केल्यावर कसे गुडघ्यावर बसुन "पटिंग लाइन" ठरवतात, ब्रेक्स, स्लोप्स, ग्रेन्स इ. कंन्फर्म करतात. पटिंग लाइनला एक प्रदक्षिणा घालुन परत एकदा "रीड" कशी कंन्फर्म करतात इ.; कॅडिशी बोलुन, त्याची मतं वॅलिड असतील तर ती विचारात घेतात. वर मी बॉल स्पीडचा उल्लेख केला आहे. बॉल स्पीड इज डायरेक्टली प्रपोर्शनल टु द फोर्स अ‍ॅप्लाय्ड, सो यु नीड टु डिटरमाइन हाउ हार्ड्/सॉफ्ट द बॉल शुड बी टॅप्ड टु सिंक ए पट. कल्पना करा कि पटर हा एक पेंडुलम आहे. पटरला पेंडुलम सारखी सिंपल हारमानिक मोशन (इथे परत एकदा फिजिक्स Wink ) देणे हे उत्तम पटिंगचं लक्षण आहे. बेसिकली, वर दिलेल्या चार मुद्द्यावरुन बॉल स्पीड ठरवला जातो. ओवरऑल स्कोअर लो ठेवण्यात पटिंगचा हिस्सा अतिशय महत्वाचा असल्याने सगळे प्रोज पटिंग सिरियस्ली घेतात. गॉल्फच्या दुनियेत एक म्हण आहे - ड्राइव फॉर द शो, पट फॉर द डो... Happy

कमिलो विजेगस ची युनिक स्टाइल, ग्रीन रीड करण्याची... Proud

मस्तच समजवुन सांगीतलेस रे..

मी सुरुवातीला गॉल्फ बघायला सुरुवात केली तेव्हा होल कुठे... ?शॉट कुठल्या दिशेला मारतोय..? असे बोलायचो.. पण बॉल होलमधे गेल्यावर.. खजील व्हायचो.. Happy

पण इतकी वर्षे गॉल्फ बघताना मला एक गोष्ट अजुनही कळली नाही... स्टुडिओच्या समालोचन बुथ मधे बसुन जिम नँस, निक फाल्डो, डेव्हीड मिलर वगैरे व्हिस्पर करत का बोलतात? एक वेळ हे मी समजु शकतो की डेव्हिड फेरेटी, पिटर कॉस्टस, व्हर्न लुंडक्विस्ट हे प्रत्यक्ष गॉल्फ कोर्सवरुन , गॉल्फ क्लब( कुठला आयर्न वगैरे) ,स्लोप, लाय, ब्रेक वगैरेची माहीती देत असताना.. ते हळु हळु व्हिस्पर करत बोलतात... पण स्टुडिओमधे.. ? ..जिम नँस सुद्धा?.. .. Happy

Pages