गॉल्फ आणि मी...

Submitted by राज on 15 August, 2020 - 13:04
golf bags

"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अ‍ॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर

आर्नीच्या या कोटने लेखाची सुरुवात करण्याचं कारण मी हा अनुभव "याची देहि याची डोळा" घेतलेला आहे. वरकरणी एक्स्लुसिव वाटणारा गॉल्फ हा खेळ जगाच्या कानाकोपर्‍या पर्यंत का खेळला जातो (जागेची वानवा असणार्‍या जपान, साउथ कोरिया या देशांत सुद्धा), याची वार्षिक उलाढाल जवळजवळ $८० बिलियन का आहे, यातंच या खेळाचं गम्य दडलेलं आहे. या अद्भुत खेळाची थोडक्यात ओळख आणि त्याचा प्रवेश माझ्या आयुष्यात कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे मी करणार आहे. याकरता आपल्याला रिवाइंड करुन काहि वर्षं मागे जावं लागेल.

मुंबई अगदि सुरुवाती पासुनच एक भला मोठ्ठा मेल्टिंग पॉट आहे. भारताच्या काना-कोपर्‍यातुन आलेल्यांना मुंबईने सामावुन घेतल्याने त्यांनी सोबत आणलेली त्यांची भाषा, संस्कृती, पाककला इ. चं एक्स्पोझर मुंबईकरांना आपोआप मिळत जातं. त्यात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ. क्रिकेट जरी मुंबईच्या डिएनए मध्ये असले तरी क्रिकेट व्यतिरिक्त प्रांतिक विविधतेमुळे मला लहानपणी इतक्या खेळांची ओळख झाली, आणि ते खेळायला मिळाले कि आज त्या आठवणींनी अचंबीत व्हायला होतं (एस्पेशियली माझ्या मुलांना इथे किती कमी खेळ खेळायला मिळाले हे बघुन). शिवाय ते खेळ हि सिझनल, आणि प्रत्येक खेळात अ‍ॅट्लिस्ट पांच वेरिएशन्स. काहिं हटक्या खेळांची नांवंच द्यायची तर शीग-रुपी, लेबल्स पावसात; सिगरेट्सची रिकामी पाकिटं, सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचे बिल्ले, गोट्या हिवाळ्यात; आणि शेवटि पतंग, भोवरे, विटि-दांडु आणि इतर मैदानी खेळ उन्हाळ्यात. मूळात खेळाडु प्रकृतीचा असल्याने नविन खेळांचं आकर्षण मला नेहेमीच होतं. मात्र, सुरुवातीला तरी गॉल्फ हा एक अपवाद. चेंबूरला असताना बाँबे प्रेसिडेंसी गॉल्फ क्लब नजरेस पडायचा, तिथले हिरवेकंच फेरवेज, जोडिला वेल मॅनिक्युर्ड लँडस्केपिंग कुतुहुल वाढवायचे. पण तिथे जाउन खेळायचं सोडा, कोणि खेळतानाहि कधी दृष्टिस पडायचं नाहि. त्यामुळे गॉल्फबाबत एकप्रकारची मिस्टरी मनात कायम होती. ती मिस्टरी सॉल्व व्हायला नव्वदिचं दशक उजाडावं लागलं...

अमेरिकेत आल्यानंतर एकिकडे बास्केटबॉल, फुटबॉल, बेसबॉल या खेळांबाबत माझी रुची वाढत असतानाच, गॉल्फचीहि ओळख वाढत चालली होती. वीकेंड्सना टिवीवर मेजर टुर्नामेंट्सचं ४-५ तास लाइव कवरेज बघुन गॉल्फची कंटाळवाण्या खेळावरुन, समथिंग इंटरेस्टिंग असं वाटण्या पर्यंत प्रगती झाली होती. फ्रेड कपल्स, अर्नी एल्स यांचा स्मुथ, एफर्टलेस स्विंग; डेविस लव द थर्ड, ग्रेग नॉर्मन यांचा संयत पर्सेवरंस, आणि जॉन डेलीचा रासवट (ग्रिप इट अँड रिप इट) गेम या सगळ्यांमुळे उत्सुकता वाढतच चालली होती. शिवाय त्याकाळात ऑफिसमधे टिम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटिज मधे गॉल्फ राउंड असायचाच. दोन-तीन राउंड्स खेळल्यावर हे प्रकरण दिसतं तेव्हढं सोप्पं नाहि याची कल्पना आली, फर्म कमिटमेंट शिवाय हा खेळ आत्मसात होणार नाहि आणि एंजॉय हि करता येणार नाहि याची खात्री पटत गेली. रोड-वॉरियर लाइफस्टाइल मुळे आपल्याला हे झेपेल का, याची शंका (इवेंच्युअली, इट टर्न्ड आउट टु बी ए बून*) होती पण तोपर्यंत गॉल्फचा किडा चावला होता. एका वीकेंडला जाउन गॉल्फची सगळी सामुग्री खरेदि केली, आणि जवळच्याच गॉल्फ कोर्स वर एक कोच गाठुन लेसन्स करता साइनप केलं.
Webp.net-compress-image.jpg
प्रचि. #१: गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे...

अजुनहि आठवतंय, सुरुवातीला कोचने ९ आयर्न देउन मला (इमॅजनरी बॉलसोबत) प्रॅक्टिस स्विंग करायला लावलं. माझा पर्फेक्ट स्ट्रेट ड्राइव बघुन त्याने स्पष्टं सांगितल कि यु हॅव टु अनडु योर क्रिकेट स्विंग; इट्स टफ, बट डुएबल. इट विल टेक ए व्हाइल टु बिल्ड ए मसल मेमरी फॉर गॉल्फ स्विंग. माझी मानसिक तयारी होतीच, शिवाय फ्रेड, अर्नी, जॉन, आणि गॉल्फ सेंसेशन टायगर वुड्स (तेंव्हा पिजीएचं दार ठोठावत होता) यांच्या स्विंगची पारायणं करुन गृहपाठ हि चालुच होता. पुढे चार आठवड्यांच्या ग्राइंडनंतर कोचने माझ्यातला क्रिकेटर इरेझ करुन गॉल्फर जन्माला घातला. या चार आठवड्यांत कोचने घालुन दिलेले काहि प्रमुख धडे:

१. गॉल्फ ग्रिप (पकड):
१.१ क्लब कसा धरावा, इंटर्लॉक, ओवरलॅप कि बेसबॉल (टेन फिंगर)
१.२ पकड अशी जसं एखादं कबुतर हातात पकडावं. पकड इतकि हळुवार नसावी कि कबुतराला सहज उडुन जाता येईल, आणि इतकि घट्ट हि नसावी कि कबुतर गुदमरुन जावं Happy
१.३ क्लब चोक डाउन कधी, आणि का करावा

२. गॉल्फ स्टांस:
२.१ बॉल कसा अ‍ॅड्रेस करावा; क्लबफेस टार्गेट एरियाशी कसा अलाइन करावा
२.२ दोन्हि पायांमधे किती अंतर ठेवावे
२.३ क्लब सिलेक्शन नुसार बॉलची पोझिशन कशी ठरवावी
२.४ पाठ-मान सरळ, पाय गुडघ्यात किंचित बेंड, आणि नजर फक्त बॉलवर कशी ठेवावी
२.५ खांदे, हात कसे सरळ आणि रिलॅक्स्ड, टेंशन फ्री ठेवावे

३. गॉल्फ स्विंग:
३.१ क्लब सिलेक्शन (पार्ट ऑफ कोर्स मॅनेजमेंट) कसे करावे
३.२ लोअर बॉडि (कंबरेखाली) कशी "काम" ठेवावी
३.३ बॅक स्विंग घेताना फक्त टॉर्सो कसा कॉइल करावा
३.४ डावा हात संपुर्ण स्विंग एक्झिक्युट होइपर्यंत सरळ (ताठ) कसा, आणि का ठेवावा
३.५ मान स्थिर आणि नजर न हलवता बॉलवर कायम कशी ठेवावी
३.६ बॅक स्विंग करताना उजव्या पायावर, आणि नंतर बॅक स्विंग ते फॉलो थु करताना उजव्या पायवरुन डाव्या पायाकडे वेट ट्रांस्फर कसं करावं
३.७ स्विंग एक्झिक्युट करताना फक्त टॉर्सो अन्कॉयल कसा करावा
३.८ बॉलशी काँटॅक्ट झाल्यावर, स्विंग फॉलो थ्रु कसा करावा

४. गॉल्फचे बेसिक नियम आणि एटिकेट्सः
४.१ बरोबर खेळणार्‍या गॉल्फरचं प्रिशॉट रुटिन सुरु झालं कि शांत रहावे बोलु किंवा हालचाल करु नये. मग तो टि-बॉक्स असो, वा फेरवे, वा पटिंग ग्रीन
४.२ फिक्स दि डिवट्स ऑन फेरवे, अँड बॉल मार्क्स ऑन द ग्रीन
४.३ बंकर्स (फेरवे, ग्रीन साइड) शॉट मारल्यावर बंकर्स मधली वाळु रेकने पुर्वि होती तशीच करावी
४.४ ऑनर सिस्टम पाळावी. तुमची टर्न येइस्तोवर तुमचा शॉट खेळु नये
(अजुन भरपुर आहेत, खाली चर्चेच्या ओघात लिहायचा प्रयत्न करेन…)

लेसन्स संपल्यवर मी रिलिजस्ली ड्रायविंग रेंजवर जायला सुरुवात केली. रेंजवर नविन मित्र मिळाले, गॉल्फ ग्रुप तयार झला. सुरुवा-सुरवातीला आम्हि अगदि झपाटल्यासारखे वेळ मिळेल तेंव्हा १८ होल्स खेळत होतो. वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर निघुन ९/१८ होल्स खेळायचो. खूप मस्ती केली. बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं.

गॉल्फ हा एक कंटाळवाणा खेळ आहे असं सुरुवातीला झालेलं माझं मत, आता गॉल्फ जगातला सर्वोत्तम खेळ आहे या मतापर्यंत पोचलं. याला कारणंहि तशीच आहेत. प्रत्येक गॉल्फ कोर्स हा वेगळा, स्वत:चं असं आगळं-वेगळं वैशिष्ठ्य (कॅरेक्टर) मिरवणारा असतो, इतर खेळांसारखा चौकटित बांधला जात नाहि. शिवाय खेळताना गॉल्फ कोर्स हा वारा, पाउस, बर्फवृष्टि, थंडि/उकाडा/आदृता इ. सोबत तुमचा एकाअर्थी प्रतिस्पर्धीच असतो. त्यात आणखी भर म्हणजे गॉल्फ कोर्स मॅनेजमेंटला टी-बॉक्स मागे-पुढे, ग्रीन्सच्या कप पोझिशन बदलत ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात, एकाच गॉल्फ कोर्सचे डाय्नॅमिक्स, टपाग्रफि सतत बदलता येण्याजोगे असल्याने त्यात नाविन्याची भर पडत असते. हे सगळे बारकावे, त्यांचा रेलवंस सुरुवातीला समजायला कठिण आहेत, पण मी वर लिहिल्या प्रमाणे तो "किडा" एकदा चावला कि अस्वस्थ करत रहातो. मिळेल त्या माध्यमातुन (टिवी, पुस्तकं, ऑडियो) माहिती मिळवुन, ज्ञान वाढवुन गेम इंप्रुव करण्याचा ध्यास लागतो. त्या प्रयत्नात शॉर्ट/लाँग आयर्न, ड्रायवर, वुड्स, हायब्रिड्स यांच्या क्लबफेसचा अँगल, ट्रॅजेक्टरी, बॉल स्लाइस्/फेड इत्यादिंना कारणीभूत असलेले फिजिक्सचे फंडे, जे शाळा/कॉलेजात डोक्यावरुन गेलेले असतात ते आता समजायला लागतात. अशा अनेक गोष्टि हळुहळु उलगडत जात रहातात, आणि त्यात जी मजा आहे ती शब्दात मांडणं कठिण आहे. थोडक्यात, पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाहि असं म्हणतात. तसंच काहिसं गॉल्फबाबत म्हणता येईल - वन कॅनॉट ट्रुली अ‍ॅप्रिशिएट गॉल्फ अनलेस फ्यु राउंड्स आर प्लेड...

त्यानंतर गॉल्फ खेळायची एकहि संधी मी दवडली नाहि, रादर संधी निर्माण केल्या. *रोड-वॉरियर लाइफस्टाइल असल्याने क्लायंट मिटिंग्जना, सेल्स सायकल्स, ट्रेड शोज इ. च्या मिक्स मधे गॉल्फ राउंडस् यायला लागले. दुसरीकडे मित्रांसोबत अ‍ॅलबामा, नॉर्थ-साउथ कॅरलायना, फ्लोरिडा इ. जवळच्या स्टेट्समधे २-३ दिवसांच्या वार्षिक गॉल्फ ट्रिप्स होउ लागल्या. या ट्रिप्सची आय्टिनररी साधारण अशी असायची - ऑफिसमधुन शुक्रवारी लंचनंतर निघायचं. डेस्टिनेशन्ला पोचल्यावर १८ होल्स खेळायचे. शनिवारी पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन ३६ होल्स खेळायचे; मधे लाइट लंच. डिनरला फिंगर फुड, आणि सदर्न स्टाइल बार्बेक्यु रिब्ज हे स्टेपल फुड. सोबतीला सिंगल माल्ट, सिगार आणि कमराडरी. रविवारी परत पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन २७ अथवा ३६ (टाइम पर्मिटिंग) होल्स खेळायचे आणि संध्याकळी परत घरी. तोपर्यंत शरीराची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन झालेली असुनहि कुठलिहि तक्रार अजिबात नसायची. आत्मिक समाधान का काय म्हणतांत ते यालाच म्हणत असावेत. इट वाज ऑल्वेज वर्थ टु द लास्ट पेनी...
golffp.jpg
प्रचि. #२: गॉल्फ कोर्स खेळल्याचा पुरावा, नातवांकरता...

तर मंडळी, असा हा माझा गॉल्फचा प्रवास कित्येक वर्षे चालू आहे आणि पुढेहि चालू ठेवायचा आहे. टेनिस ३-४ वर्षांपुर्वि पासुनंच बंद केलं आहे. आता फक्त गॉल्फ. वीकडेजना संधी मिळेल तेंव्हा, शनिवारी हनी डु लिस्ट हातावेगळी केली कि पुढचा अर्धा रविवार फक्त माझा. त्या अर्ध्या दिवसांत मित्रांबरोबर गॉल्फ डेट - ब्रेकफास्ट+१८ होल्स्+लंच असा साधारण कार्यक्रम असतो. सुदैवाने मी रहातो त्या गावांत १० मैलाच्या रेडियसमधे पब्लिक, सेमाय-प्रायवेट, प्रायवेट असे मिळुन २०+ गॉल्फ कोर्सेस आहेल; माझे जवळपास सगळे खेळुन झाले आहेत. आजहि कामानिमित्त एखाद्या नविन शहरांत गेलो कि तिथले लोकल अ‍ॅट्रॅक्शन्स, पटेल स्पॉट्स वगैरे शोधण्या ऐवजी मी जवळपासच्या गॉल्फ कोर्सेसची माहिती काढतो, आणि तिथल्या एखाद्या गॉल्फ कोर्सवर कमीत कमी ९ होल्स तरी खेळण्याकडे माझा कल असतो. दोन्हि मुलांना सुरुवातीला मी स्वतः अणि नंतर कोचमार्फत लेसन्स दिल्याने त्यांच्यातहि आवड निर्माण झाली. दोघेहि आता रेग्युलरली खेळतात, माझ्याबरोबर क्वचित आपापल्या मित्रमंडळीत जास्त. मुलांसोबत टिवीवर गॉल्फ टुर्नामेंट्सचं कवरेज बघणं सहसा सोडत नाहि, मेजर्स तर बघतोच बघतो. टायगर वुड्सचा उभारीचा काळ (९०-०० दशक) आणि माय्केल जॉर्डनचा उतरता काळ बघता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. एम्जे आणि टायगर यांच्याविषयी काय लिहिणार, जेव्हढं लिहावं तेव्हढं कमीच आहे. नजीकच्या काळातले गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) माझ्या मते दोनच आहेत - माय्केल जॉर्डन आणि टायगर वुड्स. एम्जे आता रिटायर झालाय, लेकिन टायगर अभी जिंदा है. त्याचा गेल्या दहा वर्षातला स्लंप नसता तर आत्ता पर्यंत जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड कधीच मोडला गेला असता. अजुनहि वेळ निघुन गेलेली नाहि. टेक्निक इतकाच्, अंमळ टेक्निक पेक्षा जास्त गॉल्फ हा माइंड गेम आहे. अजुनहि चौथ्या राउंडला टायगरचं रेड-ब्लॅक आउट्फिट भल्या-भल्यांना इंटिमिडेट करतं, तो लिडरबोर्डच्या आसपास असला तर त्याच्या प्रत्येक ईगल/बर्डि नंतर होणार्‍या रोअर, आणि फिस्टपंप मुळे प्रतिस्पर्ध्यांचं अवसान गळुन पडतं. सर्वात जास्त पिजिए टुर्नामेंट्स जिंकण्याचा सॅम स्नीडचा रेकॉर्ड टायगरने टाय केला आहे, तो लवकरच मोडलाहि जाईल. जॅकचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड सुद्धा तो मोडेल याबाबत मला तरी अजिबात शंका नाहि...

लेखाची सांगता बॉबी जोन्सच्या या कोटने मी केली नाहि तर ते उचीत ठरणार नाहि. गॉल्फ टॅलंट म्हणजे काय असतं याचं बॉबी जोन्स हा चालतं--बोलतं उदाहरण, दुसरं अर्थात टायगर. बॉबी जोन्सने स्थापन केलेला, आणि नंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या गांवात हलवलेला अ‍ॅटलांटा अ‍ॅथलेटिक क्लब, बॉबी जोन्स ड्राइव पास करताना एक अद्भुत अशी लहर, चाटाहुची नदिवरुन येते आणि हृदयाला स्पर्शुन जाते. गॉल्फ ने आयुष्यात दिलेल्या सुवर्णक्षणांची आठवण करुन देत...

"गॉल्फ इज दि क्लोजेस्ट गेम टु द गेम वी कॉल लाइफ. यु गेट बॅड ब्रेक्स फ्रॉम गुड शॉट्स, यु गेट गुड ब्रेक्स फ्रॉम बॅड शॉट्स - बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स

img_0662.jpg
प्रचि. #३: युअर्स ट्रुली अ‍ॅट पिजिए टुर, चॅपियनशिप ट्रॉफि, शुगरलोफ कंट्री क्लब...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज.. खुप वर्षांपुर्वी मी टेनीस बद्दल लिहीताना एकदा लिहीले होते की टेनीसच्या चार मेजर्समधे विंबल्डनचे आकर्षण किंवा अप्रुप हे वेगळेच असते..

गॉल्फच्या चार मेजर्समधे ..मास्टर्सबद्दल तेच म्हणता येईल. मास्टर्ससारखी संपुर्ण गॉल्फमधे एकही टुर्नामेंट नाही.

ऑगस्टा मास्टर्स गॉल्फ , तिथले ग्रीन्स, तिथली झाडे व एकंदरीत माहोल.. नोव्हेंबरमधे कसा दिसेल याची मला उत्सुकता आहे.

वरची क्लिप बघताना माझे मन ऑगस्टाला एक फेरी मारुन आले.... व गेल्या ३० वर्षांच्या.. संडे .. फायनल राउंड अ‍ॅट ऑगस्टाच्या आठवणी डोळ्यासमोरुन गेल्या... त्यात मला तरुण फ्रेड कपल्स व निक फाल्डो दिसले.. , बर्नहार्ड लांगर दिसला,होजे मरिया ओलाफाबल दिसला, माइक विअर दिसला, विजय सिंग दिसला, लेफ्टी इथे ३ दा जिंकताना व आनंदाने उड्या मारताना दिसला ,१९९६ मधला ग्रेग नॉर्मन उर्फ शार्क... त्याचा संडे राउंड सुरु व्हायच्या आधीचा.. ६ शॉटचा लिड ब्लो आउट करुन.. निक फाल्डोला ग्रिन जॅकेट बहाल करताना दिसला ..२००९ मधला .. (केनी पेरीकडे..शेवटचे २ होल बाकी असताना व २ शॉटचा लिड असताना.. तो लिड त्याने गमावलेला ) अ‍ॅनहेल कब्रेरा.. अनपेक्षितपणे मास्टर्स जिंकताना दिसला, बबा वॉटसन दिसला,२०१६ मधला जॉर्डन स्पिथचा इथला एपिक संडे मेल्टडाउन दिसला व टायगर.. त्याच्या फिस्ट पंपींगने बर्डी, इगल्स साजरे करताना व इथले ग्रीन जॅकेट ५ वेळा जिंकताना दिसला...

सोन्यासारख्या जतन करुन ठेवण्यासारख्या या माझ्या मास्टर्सच्या एक एक आठवणी आहेत!

>>मास्टर्ससारखी संपुर्ण गॉल्फमधे एकही टुर्नामेंट नाही.<< +१
अगदि माझ्या मनातलं बोललास. गॉल्फचा ओरिजिन भले स्कॉटलंड मधे असेल, पण खर्‍या अर्थाने "गॉल्फ मेका" इज मास्टर्स टुर्नामेंट, अगस्ता.

गेली काहि वर्षं, आर्नी इज मिस्ड डियर्ली ड्युरिंग मास्टर्स किकऑफ, पण हे तिघे (आर्नी, जॅक, गॅरी) डुइंग द ऑनर इज ऑल्वेज गॅलवनाय्झिंग. बाय्दवे, मी सुद्धा एक प्रथा पाळतो. मास्टर्सच्या प्रोशॉप मधुन घेतलेला पोलो मी वर्षातुन फक्त एकदाच घालतो. मास्टर्स्च्या ओपनिंग (गुरुवारी) राउंडला, जगाच्या पाठिवर मी कुठेहि असलो तरी. माय वे ऑफ शोइंग रिस्पेक्ट टु दि ग्रेट गेम ऑफ गॉल्फ...

worship.gif

राज.. फर्स्ट राउंड फॉर द डिफेंडींग मास्टर्स चँपिअन..टायगर वुड्स... इज इन द बँक..

प्रथम... ऑगस्टा लुक्स अ‍ॅज ब्युटीफुल अ‍ॅज एव्हर!.. मायनस अझेलिया- र्होडेडेंड्रॉन्स अफकोर्स!

फेअरवे ग्रास मस्त ग्रिन दिसत आहे.. नॉट बॅड फॉर नोव्हेंबर! काही काही पटींग ग्रीन्स थोडे ब्राउन दिसत आहेत.. पण हा नोव्हेंबर महिना आहे हे लक्षात घेता ठिक आहे.

आता टायगरच्या पहिल्या राउंडबद्दल... ४ अण्डर.. टाइड फॉर थर्ड.. ठिक आहे. आजच्या त्याच्या शेवटच्या होलवर.. त्याची बर्डी थोडक्यात हुकली.. पण ओव्हरऑल.. नाइस सॉलिड बोगी फ्री राउंड.

बट व्हॉट आय सॉ टुडे वॉज.. फिट लुकिंग टायगर.. खासकरुन त्याच्याबरोबर पेअरींग मधे असलेला.. डिफेंडींग ब्रिटिश ओपन चॅम्पिअन.. बिअर बेलिड.. ढेरपोट्या.. शेन लावरी कडे बघताना... फिट अँड ट्रिम टायगर स्टुड आउट..

पास्ट विनर.. लुइस उस्टनहाउझन .. त्याची पण पहीली राउंड सॉलिड होती.. ४ अंडर..

पॉल केसी.. क्लबहाउस लिडर.. ७ अंडर.. पण ज्या पद्धतीने जस्टिन थॉमस व २ टाइम पास्ट विनर.. बबा वॉटसन...या दोघांनी त्यांची पहिली राउंड सुरु केली आहे.. त्यावरुन अस वाटतय की केसी मे नॉट बी द लिडर अ‍ॅट द एंड ऑफ द फर्स्ट राउंड..

बबा वॉटसन लेफ्टी असल्यामुळे त्याचे.. कर्व्ह होणारे टी शॉट...नेत्रसुखद असतात. जसा लेफ्टी फिल मिकल्सनचा खेळ त्याच्या प्राइममधे .. नेत्रसुखक दिसायचा तसा..

>>ऑगस्टा लुक्स अ‍ॅज ब्युटीफुल अ‍ॅज एव्हर!<<
हो रे, मला वाटलं होतं फेरवेज डॉर्मंट झाले असतील पण कोर्स सुपर्ब मेंटेन केला आहे. एव्हाना दिसणारे फॉल कलर्स सुद्धा नजरेला पडले नाहित. स्पिकिंग ऑफ कलर्स, मास्टर्स टुर्नामेंट नेहेमीच कलरफुल असते, अगदि गॅरी, जॅक यांच्या सेरिमोनियल ओपनिंग टी शॉट्स पासुन ते ग्रीन जॅकेट सेरिमनी पर्यंत. इतर मेजर्सच्या तुलनेत मास्टर्स इझी, थोडि फरगिविंग आहे. आणि याच कारणामुळे जिंकायला अतिशय कठिण. शिवाय यावेळेला डेलाइटचा अजुन एक वेरिएबल अ‍ॅड झाला आहे. सो लेट्स सी...

फर्स्ट राउंडनंतर टायगर लिडर्बोर्डवर आहे, इज ए गुड साइन. बोगी फ्री राउंड डेमंस्ट्रेटेड हिज स्टेट ऑफ माइंड. मला अपेक्षा होती कि पार फाय्व्जचा अ‍ॅडवांटेज घेउन तो एक-दोन ईगल्स खिशात टाकेल, बट दॅट्स ओके. हिज ड्राइव्हज आर गुड, पटर इज हॉट; इफ हि कंटिन्युज द मोमेंटम, वि विल गेट टु सी ग्रेट गॉल्फ धिस वीकेंड.

मुकुंद, मी एक खुणगांठ बांधुन ठेवलेली आहे. दोन राउंड्स नंतर लिडरबोर्डवर टायगर, लेफ्टि, डिजे आणि आता जेटि, राम, डिशँबो असल्या शिवाय विनर प्रेडिक्ट करण्यात काहि हशील नाहि. कारण वेब सिंप्सन, माइक वियर, पॉल केसी, लुई उस्थेझन, ली वेस्टवुड (विथ ऑल ड्यु रिस्पेक्ट तु दीज गाय्ज), आणि इतर वान्नाबीज शेवटि-शेवटि गळपटतात. आणि साला, मास्टर्स (ऑर एनी गॉल्फ टुर्नामेंट फॉर दॅट मॅटर) अशी टुर्नामेंट आहे कि इफ यु डोंट पुल अप योर सॉक्स, यु बाउंड टु गेट रन ओवर बाय ए मॅन ब्रिदिंग डाउन योर नेक... Wink

शेवटि हे खास तुझ्यासाठी, आत्तापर्यंत बघितलं नसशील तर. इट्स ब्लडी इन्सेन...

मस्त चर्चा. तुमच्या बाफ मुळे मी सी एन एन वर मास्टर्स फॉलो करते आहे. काल तिथे १८ ग्रेटेस्ट मोमेंट दाखवले फोटो द्वारा. एंजॉय . आता वेदर पण पर्फेक्ट असावी . जास्त थंडगार नाही. पण प्लेझंट

तो टीशर्ट चा फोटो टाका

मी फोटो (सेल्फि) सहसा काढत नाहि, तरी बघतो कुठे काढलेला असेल तर.

तुम्हाला, आणि इतर इच्छुकांना मास्टर्स लाइव स्ट्रिमिंग इथे पहाता येईल. एंजॉय...

डी जे दाखवुन देतोय.. का तो नंबर वन प्लेयर आहे..

इट इज हिज मास्टर्स टुर्नामेंट टु लुज..

टायगर शोड हिज एज टुडे.. एका दिवसात २६ होल्स... टु मच फॉर हिज एजींग बॉडी अँड इन्ज्युर्ड बॅक.

ऑस्ट्रेलियाचा.. कॅमेरुन स्मिथ.. इंप्रेसिव्ह प्ले..

लेफ्टीची तर आज पार वाट लागली... टायगर कडे व लेफ्टीकडे बघुन स्पष्ट होतय.. द गेम हॅज लेफ्ट देम बिहाईंड..

जॅक निकलस व गॅरी प्लेयर ओपनींग सेरीमनीला जे बोलले की.. गॉल्फ बॉल व गॉल्फ क्लब बनवणार्‍या कंपनींनी जर त्यांच्या टेक्नॉलॉजीला आळा घातला नाही तर पी जी ए ला सगळ्या अमेरिकेतले गॉल्फ कोर्सेस बाद करुन नविन १२,००० ते १५००० यार्डचे कोर्सेस तयार करायला लागतील. डिशँबु , कोपका व डस्टीन जॉन्सनसारखे प्लेयर्स ५०० -५०० यार्ड टी शॉट्स मारुन .. पटींग, आयर्न व वेज गेम अ‍ॅब्स्युल्युट करुन टाकतील.. आपल्याला जसा ट्रॅडिशनल गॉल्फ आज माहीत आहे तसा गॉल्फ गेम नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

थोडक्यात... टी-२० ने जशी खर्‍या क्रिकेटची वाट लावली तसा काहीसा प्रकार.. गॉल्फबाबतीत..या नविन टेक्नॉलॉजीच्या बॉल व क्लब्सने होइल.

>>डी जे दाखवुन देतोय.. का तो नंबर वन प्लेयर आहे..<<
हो रे, आज फ्रंट नाइनला तर त्याने सुसाट सुरुवात केली. पार-ईगल-बर्डी-बर्डी. होल #२चा अ‍ॅप्रोच शॉट पिनपासुन एका फुटावर येउन थांबला. टॅप इन ईगल. फोर शॉट लीड उद्द्या तो डबल डिजिट मधे नेउन टुर्नामेंट जिंकणार. डिजेच्या मागे दुसर्‍या नंबरवर असलेले सगळे नवखे आहेत. स्मिथ सारखाच, इम आणि मेक्सिकोच्या एंसरचा ५४ होल्सचा परफॉर्मंस उल्लेखनीय आहे. परंतु त्यांच्या आणि ग्रीन जॅकेटच्या मधे डिजे, आणि मागे जेटि, केप्का, राम असल्याने तिघांना कांसलेशन प्राइझ मी आजंच देउन टाकतो... Wink

>>या नविन टेक्नॉलॉजीच्या बॉल व क्लब्सने होइल.<<
माझं याबाबतीत संमिश्र मत आहे. गॉल्फची सुरुवात काठी आणि दगडाला फडकि बांधुन झाली. त्यानंतर पुढे झालेली वाटचाल अचंबित करणारी आणि प्रोग्रेसिव आहे. टेक्नालजीचा उपयोग स्पर्धा आणि गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टिकोनातुन होत असेल तर माझ्यामते तो स्वागतार्ह आहे. गॅरी/जॅक या दोघांच्या मतांमधे भिती पेक्षा एक्झाजरेशन जास्त आहे. टुर्नामेंटमधे ५०० यार्ड ड्राइव एखाद दुसरा असु शकेल*, पण कंसिस्टंटली ५०० यार्ड ड्राइव करणे फक्त "वर्ल्ड लाँग ड्राइव चँपियनशिप" मधे आपल्याला पहायला मिळेल. गॅरी प्लेयर आजकाल वादग्रस्त विधानं करुन प्रकाशझोतात रहातोय, चलता है...

* बॉल ५०० यार्डावर लँड होणे याला इतर बाबीहि जबाबदार असु शकतात. १. फेयरवेचा डाउनहिल स्लोप, २. विंड कॅरिंग द बॉल इन फ्लाइट, आणि ३. बॉलला बसलेली फेवरेबल किक (कार्टपाथ इ.). हे झालं एक उदाहरण, जिथे फेयरवेज एका सरळ रेषेत आहेत. दुसर्‍या प्रकारात बरीच उदाहरणं आहेत जिथे होल (फेयरवे) डॉग लेगच्या आकाराचे आहेत. या प्रकारात डिजेने बरेच पार फोर्स, ५००+ यार्ड्स, ट्री लाइन्सवरुन (शॉर्ट कट) ड्राइव करुन ग्रीनवर किंवा ग्रीनपासुन ५०-७५ यार्डावर लँड केले आहेत. कालंच डिशँबोने हा प्रकार केला. आता अशा वेळी कोर्स डिझायनर काय करणार, कप्पाळ! Happy

सध्या सगळे टुर प्लेयर्स ३००-३५० यार्ड कंसिस्टंटली ड्राइव करतात. भविष्यात नविन टेक्नालजीमुळे जास्तीत-जास्त ४०० यार्ड करु शकतील, कारण शेवटि माणसाच्या शरीराला मर्यादा आहेत. अशा परिस्थितीत गॅरी म्हणतो तसे गॉल्फ कोर्सेस ८०००-९००० यार्ड करावे लागण्याची शक्यता माझ्यामते तरी फारफेच्ड आहे...

राज.. नॉट सो सून...

मी ऑगस्टाला इतके एपिक मेल्टडाउन पाहीले आहेत की मी एवढ्यात ग्रिन जॅकेट बहाल करणार नाही.. ग्रेग नॉर्मन, केनी पेरी, रोरी मॅक्लोरी, जॉर्डन स्पिथ.. टु नेम अ फ्यु!

कॅमेरुन स्मिथ मस्तच खेळत आहे.

हा साउथ कोरियाचा इम सुद्धा मायटी इंप्रेसिव्ह खेळतोय..

आत्ताच.. जॉर्डन स्पिथचा १२ थ होलवरचा. ( होल नेम... गोल्डन बेल)..बर्डी शॉट दाखवला.. काय पिक्चर्सिक दिसत होते १२ थ होल... अहाहा... १२ थ होलच्या बाजुच्या रेज क्रिकमधे .. रेज क्रिकच्या काठावरच्या झाडांचे ..क्रिस्टल क्लिअर रिफ्लेक्शन .... रेज क्रिकच्या पाण्यात दिसत होते...

असल्या ऑगस्टाच्या पिक्चरसिक कोर्समुळे मी मास्टर्स संडे व टुर्नामेंट कधीच मिस करत नाही.

आइ ग.. राज.. बघीतलास का.. टायगरचा एपिक मेल्टडाउन अ‍ॅट १२ थ पार ३.... ही टुक १० शॉट्स!!...

माझ्याच डोळ्यात पाणी आले बिचार्‍या टायगरचे त्या होलवरचे हाल बघुन.. अरेरे!

रेज क्रिकने भल्याभल्यांची वाट लावली आहे या होलवर... पण मास्टर्स किंग टायगर? आय नेव्हर इमॅजिन्ड टायगर स्कोरींग १० अ‍ॅट धिस होल! बिचारा रेज क्रिक ते बंकर .. बॅक टु रेज क्रिक.. बॅक टु बंकर.. असच करत बसला होता.. इट्स लाइक ग्राउंड हॉग्स डे! इट वॉज सो ह्युमिलिएटींग अँड हंबलींग एक्स्पिरिएंस फॉर द ग्रेटेस्ट गॉल्फर ऑफ ऑल टाइम!

सिल्व्हर लायनींग टु धिस एपिक मेल्टडाउन..

बबा वॉट्सन.... वन मास्टर्स २०१२
बबा वॉटसन.. स्कोर्ड १० अ‍ॅट पार ३ १२ थ होल... २०१३
बबा वॉट्सन ... वन मास्टर्स २०१४

टायगर वुड्स.. वन मास्टर्स २०१९.
टायगर वुड्स.. स्कोर्ड १० अ‍ॅट पार ३ १२ थ होल...२०२०
टायगर वुड्स...२०२१...? ( विन ... मे बी?)

>>मी ऑगस्टाला इतके एपिक मेल्टडाउन पाहीले आहेत<<
डिजे पुर्वि बेभरवशी होता, आता खूप बदललांय. युएस ओपन आणि पिजीए सारख्या मेजर्स मधे त्याने काहि वर्षांपुर्वि डिसायसिव लीड ब्लु अप केला आहे. पण यावेळेस त्याची बॉडि लँग्वेज, ओवरॉल डिमिनर वाज कूल अ‍ॅज ए क्युकंबर. फ्रंट नाइनला दोन बोगी दिल्यानंतर लिडरबोर्डावरची मांड त्याने अजिबात ढिली होउ दिली नाहि. हि डिझर्व्ड मास्टर्स चँपियनशिप...

>>बघीतलास का...<<
टायगर्स १२थ होल डिबाकल वाज नथिंग लेस दॅन ए पेट्रिफाइंग नाइटमेर. गॉल्फ गेमच साला असा आहे ना कि, प्रत्येक शॉटमागे नीट विचार केला नाहि, गॉल्फ कोर्स्/होलला अंडरएस्टिमेट केलं तर तो लागलीच तुम्हाला जमीनीवर आणतो. टायगरच्या बाबतीतहि हे होउ शकतं, हि ब्रुटल रियॅलिटि. बट आफ्टरॉल हि इज टायगर. पुढचे उरलेले होल्स त्याने बर्डि-पार-बर्डि-बर्डि-बर्डि-बर्डि करुन राउंड फिनिश केला, अंडर पार. फियास्को इज टेंपररी, बट क्लास इज पर्मनंट...

>>सिल्व्हर लायनींग टु धिस एपिक मेल्टडाउन..<<
एमेन टु दॅट...

>>तो टीशर्ट चा फोटो टाका<<
हा मुंबईत, आरे मधल्या एका रेस्टराँ मधे काढलेला आहे. मास्टर्सच निमित्त साधुन बाँबे प्रेसिडेंसी मधे एक राउंड खेळल्यानंतर १९व्या होलकरता मित्रांबरोबर इथे आलो होतो... Happy

IMG_0651.JPG

राज..फोटो मस्त.. पण मास्टर्सवाले.. त्यांचा लोगो एवढा लहान का ठेवतात?

होरे.. गॉल्फ गेमबद्दल तु एकदम बरोबर बोललास..

तुला आठवतय का.. १९९९ ब्रिटिश ओपन १८ थ होल? फ्रान्सचा जिन व्हान ड व्हॉल्ड.. लॉस्ट हिज ३ शॉट लिड.. बाय कमीटींग ट्रिपल बोगी.. बाय पुटींग बॉल इन बंकर, रफ अँड वॉटर... अ‍ॅट १८थ.. अँड इव्हेन्च्युअली लुजिंग ब्रिटिश ओपन.. तेव्हाचा त्याचा रडवेला चेहरा आणी आजचा टायगरचा रडवेला चेहरा...सारखाच होता.. टायगरच्या चेहर्‍यावरचे ह्युमिलिएशन स्पष्ट दिसत होते.

डस्टिन जॉन्सन मस्तच व सॉल्लिड खेळला.. त्याचे अभिनंदन!

>>तुला आठवतय का.. <<
हो, आठवतेय. नशीब तो क्रिक मधे उतरला होता पण तिथुनंच न खेळता त्याने ड्रॉप घेतला. नाहितर प्लेऑफला हि पोचला नसता. अशा प्रसंगी, आपल्याला बघताना चुटपुट लागते, तर त्यांची काय अवस्था होत असेल. लेटर, जीन समहाउ मॅनेज्ड टु फोर्स थ्री वे प्लेऑफ, बट कुडंट रिकवर फ्रॉम द मिसहॅप. इन धिस शॉर्ट क्लिप, हि रिलिव्ड दॅट अन्फॉर्च्युनेट मोमेंट...

इथे टायगरची मुलाखत बघ, काल त्याचा राउंड संपल्यावर घेतलेली...

मस्तच फोटो . लोगो छोटुसा आहे पर चलता है. नाम बहुत बडा है. धन्यवाद.

आमच्या इथे बिझनेस पेपर आहे बिझनेस स्टँ डर्ड त्यात मास्टर व्यवस्थित कव्हर करत आहेत. परवाचे ते पार इ गल बर्डी बर्डी बघितले. त्या कोर्सचे वर्णन पण फार भारी आहे. तिथे आयसेन हॉवर प्रेसिंडेंट पण खेळायला यायचे. त्यामुळे तिथे एक त्यांना साजेशी एक कॅबिन आहे. व आत खाली बेसमेंटा त सिक्रेट सर्विस. कोर्स आधी तिथे एक नर्सरी ऑर्किड्स ची बाग आणि ऑर्चर्ड होते. गॉल्फ कोर्स बनवल्या पासून ३५००० कि काय ते झाडे नव्याने लावली आहेत. किती रम्य जागा असेल. आणि आत्ता वेदर परफेक्ट असेल. तिथे वर व्युअर्स गॅलरी मधून
समथिंग कोल्ड अँड ब्लू इन अ टॉल ग्लास विथ अ पेपर पॅरासोल असे ड्रिंक घेत खालचा खेळ बघता यावा. किती धमाल.

टायगर वूड तर पार खड्ड्यात चालला नव्हे.

https://www.business-standard.com/article/sports/masters-tournament-2020...

हे इथले कव्हरेज.

राज.. चला .. अजुन एक मास्टर्सप्रेमी.. मायबोलिवर.. अमा! Happy

अमा.. अग तु ऑगस्टाचा मास्टर्स गॉल्फ कोर्स ... एप्रिलमधे बघ.. या वर्षी पँडेमिकमुळे मास्टर्स टुर्नामेंट एप्रिलमधे होण्याऐवजी नोव्हेंबरमधे झाली. .. ऑगस्टाचा मास्टर्स गॉल्फ कोर्स... एप्रिलमधे ..अझेलिया व र्होडेडेंड्रॉनचच्या ऐन बहरात तु बघ.. केवळ अवर्णनिय!

राज.. अरे ती क्लिप बघताना आजही मला तितकेच वाइट वाटले .. जितके तेव्हा लाइव्ह ( त्याचे हे नाइटमेअर) बघताना वाइट वाटले होते.. पण त्याने स्वतःने चांगला पॉझिटिव्ह द्रुष्टिकोन ठेवला आहे..

पँट वर फोल्ड करुन तो पाण्यात उभा राहिल्याचे तेव्हाचे चित्र माझ्या डोळ्यासमोर अगदी.. ती गोष्ट कालच झाल्यासारखे.. आजही उभे आहे!

आय्झेनहॉवरच्या नावाने एक पाइन वृक्ष होता #१७ वर, फेयरवेच्या डाव्या अंगाला. आय्झेनहॉवरच्या हूक ड्राइव्जना त्या झाडाचा अडथळा होत अस्ल्याने त्या झाडावर आय्झनहॉवरचा अतिशय राग होता. पुढे आय्झेनहॉवर ख्रिस्तवासी झाल्यावर अगस्ता नॅशनलने त्याचंच नांव त्या झाडाला दिलं (सॉर्ट ऑफ पोएटिक जस्टिस, यु नो. Wink ). पुढे अनेक वर्षं त्या झाडाने अनेकांना आपला हिसका दाखवला, आणि शेवटि ५-६ वर्षांपुर्वि एका स्नोस्टॉर्म मधे पडझड झाल्याने ते झाड शेवटि काढुन टाकण्यात आलं...

अगस्ता नॅशनल कोर्सच्या खाली भुयारी मार्ग आहेत, हि गोष्ट खरी आहे. पोटस, सेलेब्रिटिजची डिस्क्रिटली ने-आण करण्या करता त्याचा वापर केला जातो. आणि एक हायटेक गोष्ट कोर्स्च्या बाबतीत आहे, ती म्हणजे अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्स्टम. ग्रीन्सच्या खाली पाइप्स्चं जाळं आहे जेणेकरुन पावसाचं पाणी साचुन ग्रीन्स्वर पडल्स होउ नयेत. हि ड्रेनेज सिस्स्टम ग्रीन्सच्या पृष्ठभागावरचं पाणी शोषुन घेते आणि पंख्यांच्या सहाय्याने लगोलग ग्रीन्स कोरडी करुन टाकते. अन्यथा, पावसानंतर ग्रीन्स कोरडी होण्यास बराच वेळ लागतो, जो टुर्नामेंटचं वेळापत्रक बिघडवु शकतो...

मुकुंद, एप्रिल मधल्या मास्टर्सची बातंच वेगळी. आता फक्त पांच महिन्यांचा अवकाश...

>>जीन्स कसले प्रभावी असतात!<<
हो रे, इथे वेगळ्या अँगल मधुन बघ, मिरर इमेज... Happy

आणि दुसरी गंमतीची गोष्ट म्हणजे जो लकावा जु. चार्ली वुड्सचा कॅडि आहे...

मुकुंद, बघितलीस का पिएनसी चँपियन्शिप? व्हॉट ए फन गेम टु वॉच. ए चिप ऑफ द ओल्ड ब्लॉक या म्हणीचा अर्थ कोणाला प्रत्यक्षात बघायचा असेल तर त्याने पिएनसीचं कवरेज बघावं. चार्लीचा स्विंग, प्रत्येक स्ट्रोक मागचं त्याचं क्लब सिलेक्शन, हिटिंग द टार्गेट लाइन सगळं रुलबुक नुसार. बाप-लेकाचं टीमवर्क, टायगरने चार्लीला दिलेला अ‍ॅडवांटेज, थंब्स अप्स, फिस्ट बंप्स... एव्हरिथिंग वाज सो कूल. ए पर्फेक्ट हॉलिडे, फॅमिली इवेंट...

हो रे.. मीसुद्धा माझ्या मुलासोबत बघत होतो रवीवारी.. फक्त ११ वर्षाचा असुनसुद्धा .. चार्ली.. एवढ्या मोठ्या स्टेजला न घाबरता.. एवढे सगळे कॅमेरे त्याच्यावर असुनसुद्धा.. काय पॉइजमधे खेळला.. अमेझिंग!

त्याचे टेक्निक ,शॉट सिलेक्शन व शॉट एक्झुक्युशन बघुन.. बापाच्या पावलावर पाउल टाकुन.. या पोराने नाव काढले नाही तर मला खरच नवल वाटेल..

तो झाडामागुन .. कर्व्ह करुन.. मारलेला शॉट बघताना... व इगल करताना..हा टायगरचाच मुलगा आहे हे अक्षरशः दिसुन येत होते.. तीच स्टाइल.. तसेच शॉट सिलेक्शन.. तसेच शॉट एक्झ्युक्युशन.. तसेच फिस्ट पंपिंग करुन केलेले सेलिब्रेशन.. तसेच हॅटला टीप करुन केलेले अ‍ॅकनॉलेजमेंट!

मला गॉल्फमधले.. तुझ्याइतके टेक्निकल नॉलेज नाही.. पण .. या चार्लीकडे बघुन एवढ्या लहान वयात जर हा मुलगा असे टी शॉट्स, असे स्विंग व असे पट्स एक्झ्युक्युट करु शकत असेल तर मी निश्चितच म्हणेन की ही इज गॉल्फिंग.. कॉपी बुक स्टाइल!

>>तसेच हॅटला टीप करुन केलेले अ‍ॅकनॉलेजमेंट!<<
अरे चार्लीला हॅट एटिकेट्स या वयात कदाचित (अजुन) शिकवले नसतील. चार्ली हॅटला टिप करायचा ते बॉल मार्कर ठेवण्याकरता. हॅट साठी एक मॅग्नेटिक क्लिप मिळते, बॉल मार्कर ठेवण्या करता. होल फिनिश झाल्यावर यु पुट बॅक द मार्कर ऑन द क्लिप. दॅट्स व्हॉट चार्ली वाज डुइंग... Happy

मी सुद्धा मुलांबरोबर संडे राउंड बघितला. माय बॉय्ज टू वेर ब्लोन अवे विथ हिज टॅलंट...

राज.. पॅट्रिक रिड.. फार्मर्स ओपन जिंकला.. पण परत एकदा तो चिटर आहे असे म्हणायला त्याने कारण दिले. Happy

तुझे काय मत या नविन चिटींग कॉन्ट्रोव्हर्सीवर?

माझ्या मते वन्स अ चिटर इज ऑल्वेज अ चिटर!

>>तुझे काय मत या नविन चिटींग कॉन्ट्रोव्हर्सीवर?<<
वेल, आय विल गिव बेनिफिट ऑफ डाउट टु कॅप्टन अमेरिका. रुल ऑफिशियलने बॉल प्लग्ड इन होता हे मान्य केलं, रिलिफ दिला; एंड ऑफ स्टोरी!!!

पण... पॅट्रिक, ऑफिशियल येइस्तोवर थांबला असता, आणि बॉल त्या ऑफिशियल समोर उचलला असता तर हि सगळी कांट्रवर्सी झालीच नसती. बॉल मार्क (लिप) वाज एविडंट फ्रॉम द विडिओ क्लिप...

समटाइम्स, यु जस्ट हॅव टु सप्रेस द नॉइज कमिंग आउट ऑफ द प्रेस...

आज सकाळी टायगर वुड्स गाडीच्या भयानक अपघातात जखमी झाला आहे. पायाची हाडे मोडली व ऑपरेशन रुम मधे आहे एवढेच कळले. अपघात प्राणघातक ठरु नये व यातुन तो बरा होउन लवकर खेळु शकावा हीच सदिच्छा! कोबी ब्रायंटची ट्रॅजीडी अजुन ताजी आहे.

अतिशय दुर्दैवी घटना, टायगरच्या पायावरच निभावलं हि एक जमेची बाजु. प्लेट्स टाकले आहेत, रिकवरी कुड बी लाँग; मोस्ट लाइकली हि विल मिस दि मास्टर्स. लेट्स किप द फिंगर्स क्रॉस्ड...

एलएच्या शेरिफचं मात्र याबाबतीत कौतुक. दे अंडर्स्टुड द सिनॅरियो अँड डिडंट प्रेस एनी चार्जेस. याउलट, नु जर्सीवाले; ब्रुस स्प्रिंगस्टिनने फॅन्स सोबत दोन टकिला शॉट काय मारले, हे त्याच्या मागे हात धूउन (डिड्ब्लुआय चार्जेस) लागले आहेत, आणि त्याची वाच्यता कुठेहि नाहि. जस्ट इमॅजिन, ब्रुसच्या जागी स्टिवी वंडर किंवा गेला बाजार कान्ये वेस्ट असता तर काय बबाल उठला असता. आफ्टरऑल, इट्स ए ब्लॅक हिस्टरी मंथ... एफिंग हिपक्रिट्स...

अरे हो काल रात्रीच मी ही बातमी वाचली. त्याचे बोन दोन पेक्षा जास्त तुटले आहे. सर्जरी फार अवघड होती. प्रेइन्ग फॉर सेफ रिकव्हरी.
कुठे लिहू समजेना.

Pages