गॉल्फ आणि मी...

Submitted by राज on 15 August, 2020 - 13:04
golf bags

"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अ‍ॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर

आर्नीच्या या कोटने लेखाची सुरुवात करण्याचं कारण मी हा अनुभव "याची देहि याची डोळा" घेतलेला आहे. वरकरणी एक्स्लुसिव वाटणारा गॉल्फ हा खेळ जगाच्या कानाकोपर्‍या पर्यंत का खेळला जातो (जागेची वानवा असणार्‍या जपान, साउथ कोरिया या देशांत सुद्धा), याची वार्षिक उलाढाल जवळजवळ $८० बिलियन का आहे, यातंच या खेळाचं गम्य दडलेलं आहे. या अद्भुत खेळाची थोडक्यात ओळख आणि त्याचा प्रवेश माझ्या आयुष्यात कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे मी करणार आहे. याकरता आपल्याला रिवाइंड करुन काहि वर्षं मागे जावं लागेल.

मुंबई अगदि सुरुवाती पासुनच एक भला मोठ्ठा मेल्टिंग पॉट आहे. भारताच्या काना-कोपर्‍यातुन आलेल्यांना मुंबईने सामावुन घेतल्याने त्यांनी सोबत आणलेली त्यांची भाषा, संस्कृती, पाककला इ. चं एक्स्पोझर मुंबईकरांना आपोआप मिळत जातं. त्यात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ. क्रिकेट जरी मुंबईच्या डिएनए मध्ये असले तरी क्रिकेट व्यतिरिक्त प्रांतिक विविधतेमुळे मला लहानपणी इतक्या खेळांची ओळख झाली, आणि ते खेळायला मिळाले कि आज त्या आठवणींनी अचंबीत व्हायला होतं (एस्पेशियली माझ्या मुलांना इथे किती कमी खेळ खेळायला मिळाले हे बघुन). शिवाय ते खेळ हि सिझनल, आणि प्रत्येक खेळात अ‍ॅट्लिस्ट पांच वेरिएशन्स. काहिं हटक्या खेळांची नांवंच द्यायची तर शीग-रुपी, लेबल्स पावसात; सिगरेट्सची रिकामी पाकिटं, सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचे बिल्ले, गोट्या हिवाळ्यात; आणि शेवटि पतंग, भोवरे, विटि-दांडु आणि इतर मैदानी खेळ उन्हाळ्यात. मूळात खेळाडु प्रकृतीचा असल्याने नविन खेळांचं आकर्षण मला नेहेमीच होतं. मात्र, सुरुवातीला तरी गॉल्फ हा एक अपवाद. चेंबूरला असताना बाँबे प्रेसिडेंसी गॉल्फ क्लब नजरेस पडायचा, तिथले हिरवेकंच फेरवेज, जोडिला वेल मॅनिक्युर्ड लँडस्केपिंग कुतुहुल वाढवायचे. पण तिथे जाउन खेळायचं सोडा, कोणि खेळतानाहि कधी दृष्टिस पडायचं नाहि. त्यामुळे गॉल्फबाबत एकप्रकारची मिस्टरी मनात कायम होती. ती मिस्टरी सॉल्व व्हायला नव्वदिचं दशक उजाडावं लागलं...

अमेरिकेत आल्यानंतर एकिकडे बास्केटबॉल, फुटबॉल, बेसबॉल या खेळांबाबत माझी रुची वाढत असतानाच, गॉल्फचीहि ओळख वाढत चालली होती. वीकेंड्सना टिवीवर मेजर टुर्नामेंट्सचं ४-५ तास लाइव कवरेज बघुन गॉल्फची कंटाळवाण्या खेळावरुन, समथिंग इंटरेस्टिंग असं वाटण्या पर्यंत प्रगती झाली होती. फ्रेड कपल्स, अर्नी एल्स यांचा स्मुथ, एफर्टलेस स्विंग; डेविस लव द थर्ड, ग्रेग नॉर्मन यांचा संयत पर्सेवरंस, आणि जॉन डेलीचा रासवट (ग्रिप इट अँड रिप इट) गेम या सगळ्यांमुळे उत्सुकता वाढतच चालली होती. शिवाय त्याकाळात ऑफिसमधे टिम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटिज मधे गॉल्फ राउंड असायचाच. दोन-तीन राउंड्स खेळल्यावर हे प्रकरण दिसतं तेव्हढं सोप्पं नाहि याची कल्पना आली, फर्म कमिटमेंट शिवाय हा खेळ आत्मसात होणार नाहि आणि एंजॉय हि करता येणार नाहि याची खात्री पटत गेली. रोड-वॉरियर लाइफस्टाइल मुळे आपल्याला हे झेपेल का, याची शंका (इवेंच्युअली, इट टर्न्ड आउट टु बी ए बून*) होती पण तोपर्यंत गॉल्फचा किडा चावला होता. एका वीकेंडला जाउन गॉल्फची सगळी सामुग्री खरेदि केली, आणि जवळच्याच गॉल्फ कोर्स वर एक कोच गाठुन लेसन्स करता साइनप केलं.
Webp.net-compress-image.jpg
प्रचि. #१: गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे...

अजुनहि आठवतंय, सुरुवातीला कोचने ९ आयर्न देउन मला (इमॅजनरी बॉलसोबत) प्रॅक्टिस स्विंग करायला लावलं. माझा पर्फेक्ट स्ट्रेट ड्राइव बघुन त्याने स्पष्टं सांगितल कि यु हॅव टु अनडु योर क्रिकेट स्विंग; इट्स टफ, बट डुएबल. इट विल टेक ए व्हाइल टु बिल्ड ए मसल मेमरी फॉर गॉल्फ स्विंग. माझी मानसिक तयारी होतीच, शिवाय फ्रेड, अर्नी, जॉन, आणि गॉल्फ सेंसेशन टायगर वुड्स (तेंव्हा पिजीएचं दार ठोठावत होता) यांच्या स्विंगची पारायणं करुन गृहपाठ हि चालुच होता. पुढे चार आठवड्यांच्या ग्राइंडनंतर कोचने माझ्यातला क्रिकेटर इरेझ करुन गॉल्फर जन्माला घातला. या चार आठवड्यांत कोचने घालुन दिलेले काहि प्रमुख धडे:

१. गॉल्फ ग्रिप (पकड):
१.१ क्लब कसा धरावा, इंटर्लॉक, ओवरलॅप कि बेसबॉल (टेन फिंगर)
१.२ पकड अशी जसं एखादं कबुतर हातात पकडावं. पकड इतकि हळुवार नसावी कि कबुतराला सहज उडुन जाता येईल, आणि इतकि घट्ट हि नसावी कि कबुतर गुदमरुन जावं Happy
१.३ क्लब चोक डाउन कधी, आणि का करावा

२. गॉल्फ स्टांस:
२.१ बॉल कसा अ‍ॅड्रेस करावा; क्लबफेस टार्गेट एरियाशी कसा अलाइन करावा
२.२ दोन्हि पायांमधे किती अंतर ठेवावे
२.३ क्लब सिलेक्शन नुसार बॉलची पोझिशन कशी ठरवावी
२.४ पाठ-मान सरळ, पाय गुडघ्यात किंचित बेंड, आणि नजर फक्त बॉलवर कशी ठेवावी
२.५ खांदे, हात कसे सरळ आणि रिलॅक्स्ड, टेंशन फ्री ठेवावे

३. गॉल्फ स्विंग:
३.१ क्लब सिलेक्शन (पार्ट ऑफ कोर्स मॅनेजमेंट) कसे करावे
३.२ लोअर बॉडि (कंबरेखाली) कशी "काम" ठेवावी
३.३ बॅक स्विंग घेताना फक्त टॉर्सो कसा कॉइल करावा
३.४ डावा हात संपुर्ण स्विंग एक्झिक्युट होइपर्यंत सरळ (ताठ) कसा, आणि का ठेवावा
३.५ मान स्थिर आणि नजर न हलवता बॉलवर कायम कशी ठेवावी
३.६ बॅक स्विंग करताना उजव्या पायावर, आणि नंतर बॅक स्विंग ते फॉलो थु करताना उजव्या पायवरुन डाव्या पायाकडे वेट ट्रांस्फर कसं करावं
३.७ स्विंग एक्झिक्युट करताना फक्त टॉर्सो अन्कॉयल कसा करावा
३.८ बॉलशी काँटॅक्ट झाल्यावर, स्विंग फॉलो थ्रु कसा करावा

४. गॉल्फचे बेसिक नियम आणि एटिकेट्सः
४.१ बरोबर खेळणार्‍या गॉल्फरचं प्रिशॉट रुटिन सुरु झालं कि शांत रहावे बोलु किंवा हालचाल करु नये. मग तो टि-बॉक्स असो, वा फेरवे, वा पटिंग ग्रीन
४.२ फिक्स दि डिवट्स ऑन फेरवे, अँड बॉल मार्क्स ऑन द ग्रीन
४.३ बंकर्स (फेरवे, ग्रीन साइड) शॉट मारल्यावर बंकर्स मधली वाळु रेकने पुर्वि होती तशीच करावी
४.४ ऑनर सिस्टम पाळावी. तुमची टर्न येइस्तोवर तुमचा शॉट खेळु नये
(अजुन भरपुर आहेत, खाली चर्चेच्या ओघात लिहायचा प्रयत्न करेन…)

लेसन्स संपल्यवर मी रिलिजस्ली ड्रायविंग रेंजवर जायला सुरुवात केली. रेंजवर नविन मित्र मिळाले, गॉल्फ ग्रुप तयार झला. सुरुवा-सुरवातीला आम्हि अगदि झपाटल्यासारखे वेळ मिळेल तेंव्हा १८ होल्स खेळत होतो. वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर निघुन ९/१८ होल्स खेळायचो. खूप मस्ती केली. बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं.

गॉल्फ हा एक कंटाळवाणा खेळ आहे असं सुरुवातीला झालेलं माझं मत, आता गॉल्फ जगातला सर्वोत्तम खेळ आहे या मतापर्यंत पोचलं. याला कारणंहि तशीच आहेत. प्रत्येक गॉल्फ कोर्स हा वेगळा, स्वत:चं असं आगळं-वेगळं वैशिष्ठ्य (कॅरेक्टर) मिरवणारा असतो, इतर खेळांसारखा चौकटित बांधला जात नाहि. शिवाय खेळताना गॉल्फ कोर्स हा वारा, पाउस, बर्फवृष्टि, थंडि/उकाडा/आदृता इ. सोबत तुमचा एकाअर्थी प्रतिस्पर्धीच असतो. त्यात आणखी भर म्हणजे गॉल्फ कोर्स मॅनेजमेंटला टी-बॉक्स मागे-पुढे, ग्रीन्सच्या कप पोझिशन बदलत ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात, एकाच गॉल्फ कोर्सचे डाय्नॅमिक्स, टपाग्रफि सतत बदलता येण्याजोगे असल्याने त्यात नाविन्याची भर पडत असते. हे सगळे बारकावे, त्यांचा रेलवंस सुरुवातीला समजायला कठिण आहेत, पण मी वर लिहिल्या प्रमाणे तो "किडा" एकदा चावला कि अस्वस्थ करत रहातो. मिळेल त्या माध्यमातुन (टिवी, पुस्तकं, ऑडियो) माहिती मिळवुन, ज्ञान वाढवुन गेम इंप्रुव करण्याचा ध्यास लागतो. त्या प्रयत्नात शॉर्ट/लाँग आयर्न, ड्रायवर, वुड्स, हायब्रिड्स यांच्या क्लबफेसचा अँगल, ट्रॅजेक्टरी, बॉल स्लाइस्/फेड इत्यादिंना कारणीभूत असलेले फिजिक्सचे फंडे, जे शाळा/कॉलेजात डोक्यावरुन गेलेले असतात ते आता समजायला लागतात. अशा अनेक गोष्टि हळुहळु उलगडत जात रहातात, आणि त्यात जी मजा आहे ती शब्दात मांडणं कठिण आहे. थोडक्यात, पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाहि असं म्हणतात. तसंच काहिसं गॉल्फबाबत म्हणता येईल - वन कॅनॉट ट्रुली अ‍ॅप्रिशिएट गॉल्फ अनलेस फ्यु राउंड्स आर प्लेड...

त्यानंतर गॉल्फ खेळायची एकहि संधी मी दवडली नाहि, रादर संधी निर्माण केल्या. *रोड-वॉरियर लाइफस्टाइल असल्याने क्लायंट मिटिंग्जना, सेल्स सायकल्स, ट्रेड शोज इ. च्या मिक्स मधे गॉल्फ राउंडस् यायला लागले. दुसरीकडे मित्रांसोबत अ‍ॅलबामा, नॉर्थ-साउथ कॅरलायना, फ्लोरिडा इ. जवळच्या स्टेट्समधे २-३ दिवसांच्या वार्षिक गॉल्फ ट्रिप्स होउ लागल्या. या ट्रिप्सची आय्टिनररी साधारण अशी असायची - ऑफिसमधुन शुक्रवारी लंचनंतर निघायचं. डेस्टिनेशन्ला पोचल्यावर १८ होल्स खेळायचे. शनिवारी पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन ३६ होल्स खेळायचे; मधे लाइट लंच. डिनरला फिंगर फुड, आणि सदर्न स्टाइल बार्बेक्यु रिब्ज हे स्टेपल फुड. सोबतीला सिंगल माल्ट, सिगार आणि कमराडरी. रविवारी परत पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन २७ अथवा ३६ (टाइम पर्मिटिंग) होल्स खेळायचे आणि संध्याकळी परत घरी. तोपर्यंत शरीराची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन झालेली असुनहि कुठलिहि तक्रार अजिबात नसायची. आत्मिक समाधान का काय म्हणतांत ते यालाच म्हणत असावेत. इट वाज ऑल्वेज वर्थ टु द लास्ट पेनी...
golffp.jpg
प्रचि. #२: गॉल्फ कोर्स खेळल्याचा पुरावा, नातवांकरता...

तर मंडळी, असा हा माझा गॉल्फचा प्रवास कित्येक वर्षे चालू आहे आणि पुढेहि चालू ठेवायचा आहे. टेनिस ३-४ वर्षांपुर्वि पासुनंच बंद केलं आहे. आता फक्त गॉल्फ. वीकडेजना संधी मिळेल तेंव्हा, शनिवारी हनी डु लिस्ट हातावेगळी केली कि पुढचा अर्धा रविवार फक्त माझा. त्या अर्ध्या दिवसांत मित्रांबरोबर गॉल्फ डेट - ब्रेकफास्ट+१८ होल्स्+लंच असा साधारण कार्यक्रम असतो. सुदैवाने मी रहातो त्या गावांत १० मैलाच्या रेडियसमधे पब्लिक, सेमाय-प्रायवेट, प्रायवेट असे मिळुन २०+ गॉल्फ कोर्सेस आहेल; माझे जवळपास सगळे खेळुन झाले आहेत. आजहि कामानिमित्त एखाद्या नविन शहरांत गेलो कि तिथले लोकल अ‍ॅट्रॅक्शन्स, पटेल स्पॉट्स वगैरे शोधण्या ऐवजी मी जवळपासच्या गॉल्फ कोर्सेसची माहिती काढतो, आणि तिथल्या एखाद्या गॉल्फ कोर्सवर कमीत कमी ९ होल्स तरी खेळण्याकडे माझा कल असतो. दोन्हि मुलांना सुरुवातीला मी स्वतः अणि नंतर कोचमार्फत लेसन्स दिल्याने त्यांच्यातहि आवड निर्माण झाली. दोघेहि आता रेग्युलरली खेळतात, माझ्याबरोबर क्वचित आपापल्या मित्रमंडळीत जास्त. मुलांसोबत टिवीवर गॉल्फ टुर्नामेंट्सचं कवरेज बघणं सहसा सोडत नाहि, मेजर्स तर बघतोच बघतो. टायगर वुड्सचा उभारीचा काळ (९०-०० दशक) आणि माय्केल जॉर्डनचा उतरता काळ बघता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. एम्जे आणि टायगर यांच्याविषयी काय लिहिणार, जेव्हढं लिहावं तेव्हढं कमीच आहे. नजीकच्या काळातले गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) माझ्या मते दोनच आहेत - माय्केल जॉर्डन आणि टायगर वुड्स. एम्जे आता रिटायर झालाय, लेकिन टायगर अभी जिंदा है. त्याचा गेल्या दहा वर्षातला स्लंप नसता तर आत्ता पर्यंत जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड कधीच मोडला गेला असता. अजुनहि वेळ निघुन गेलेली नाहि. टेक्निक इतकाच्, अंमळ टेक्निक पेक्षा जास्त गॉल्फ हा माइंड गेम आहे. अजुनहि चौथ्या राउंडला टायगरचं रेड-ब्लॅक आउट्फिट भल्या-भल्यांना इंटिमिडेट करतं, तो लिडरबोर्डच्या आसपास असला तर त्याच्या प्रत्येक ईगल/बर्डि नंतर होणार्‍या रोअर, आणि फिस्टपंप मुळे प्रतिस्पर्ध्यांचं अवसान गळुन पडतं. सर्वात जास्त पिजिए टुर्नामेंट्स जिंकण्याचा सॅम स्नीडचा रेकॉर्ड टायगरने टाय केला आहे, तो लवकरच मोडलाहि जाईल. जॅकचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड सुद्धा तो मोडेल याबाबत मला तरी अजिबात शंका नाहि...

लेखाची सांगता बॉबी जोन्सच्या या कोटने मी केली नाहि तर ते उचीत ठरणार नाहि. गॉल्फ टॅलंट म्हणजे काय असतं याचं बॉबी जोन्स हा चालतं--बोलतं उदाहरण, दुसरं अर्थात टायगर. बॉबी जोन्सने स्थापन केलेला, आणि नंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या गांवात हलवलेला अ‍ॅटलांटा अ‍ॅथलेटिक क्लब, बॉबी जोन्स ड्राइव पास करताना एक अद्भुत अशी लहर, चाटाहुची नदिवरुन येते आणि हृदयाला स्पर्शुन जाते. गॉल्फ ने आयुष्यात दिलेल्या सुवर्णक्षणांची आठवण करुन देत...

"गॉल्फ इज दि क्लोजेस्ट गेम टु द गेम वी कॉल लाइफ. यु गेट बॅड ब्रेक्स फ्रॉम गुड शॉट्स, यु गेट गुड ब्रेक्स फ्रॉम बॅड शॉट्स - बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स

img_0662.jpg
प्रचि. #३: युअर्स ट्रुली अ‍ॅट पिजिए टुर, चॅपियनशिप ट्रॉफि, शुगरलोफ कंट्री क्लब...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, वेदर डिलेड प्लेयर्स चँपिअनशिप पाहीलीस का? भारताचा अनिर्बन लाहीरी.. जिंकलाच होता ऑल्मोस्ट! पण दुसरा आला. स्टिल.. इन्क्रेडिबल अचिव्हमेंट! मी शनिवार- रविवार बघत होतो. मस्त खेळत होता. फायनल राउंड बघता आली नाही.

नेहमीप्रमाणे डेंजरस १७ होलने अनेकांना जलसमाधी दिली Proud

टायगर हॉल ऑफ फेम सेरीमनी पाहीली का? नंतर एन बी सी वर मुलाखत देताना अर्नीच्या हातुन ज्युनिअर नॅशनल मधे ३दा रिप्रेझेंट केल्यावर मिळालेल्या ट्रॉफीची गंमत ऐकताना त्याचा अर्नीबद्दलचा रिस्पेक्ट व फॅसिनेशन दिसुन आले.

टायगर.. असा गॉल्फर पुन्हा होणे नाही! व्हॉट अ‍ॅन इन्क्रेडिबल प्लेयर अँड व्हॉट अ‍ॅन इन्क्रेडिबल गॉल्फ करिअर! टेक अ बाव टायगर!

अनिर्बन लाहिरी तिसर्‍या दिवसा पासुन लिडरबोर्डावर होता. तु म्हणतोस तसा ऑल्मोस्ट जिंकला होता; बट कॅमरन'स क्लच बर्डि ऑन #१७ चेंज्ड होल आउटकम ऑफ दि टुर्नामेंट... Happy

मुकुंद, टायगरचा मास्टर्स गो/नो गो डिसिजन हॅज बिकम ए हाट टापिक ॲज वि बिगिन मास्टर्स विक. तुला कल्पना असेल कि टायगर स्टिल स्ट्रगलिंग टु वाक १८ होल्स, हौएवर नो इशु स्विंगिंग. अशा परीस्थितीत त्याला कार्ट देउन एक वेगळा प्रेसिडंस राबवला जाणार नाहि ( आठव जान डेली). सो, विल टायगर प्ले? यु, आय ॲंड द होल एफिंग फ्रॅटरनिटि वांट्स हिम टु प्ले. ॲाल वि कॅन डु इज किप अवर फिंगर्स क्राॅस्ड…

हो रे! बहुतेक तो खेळेल अस वाटतय. खेळला तर तो एक चमत्कारच म्हटला पाहीजे! केवळ १ वर्षापुर्वी भिषण कार अपघातातुन जिवानीशी वाचला, ऑल्मोस्ट पाय गमावला. पण आता तो मास्टर्स खेळण्यापर्यंत रिकव्हर झाला आहे. केवळ अविश्वसनिय!काय जबरदस्त इच्छाशक्ती आहे या माणसाची!

पण आज मी आकाशात तरंगत आहे! आजचा एन सी ए ए बास्केटबॉल कॉलेज चँपिअनशिपचा गेम बघीतलास का? हाफ टाइमला १५ पॉइंट्सने मागे पडुनही दुसर्‍या हाफमधे जबरदस्त कम बॅक केला आम्ही व नॅशनल चँपिअनशिप गेममधे माझ्या अल्मामॅटर युनिव्हरसीटी ऑफ कॅन्सस जेहॉक्सनी युनिव्हरसीटी ऑफ नॉर्थ कॅरोलायना टार हिल्सना हरवुन आमची सहावी नॅशनल चॅम्पिअनशिप जिंकली! जबरदस्त जल्लोष! माझ्या कॉलेजमधल्या सगळ्या मित्रमैत्रीणींचे फोन रात्री २ पर्यंत चालु होते! Happy

छान इन्ट्रो!! एकदम उत्सुकता निर्माण झाली आता खेळायची. जवळ २२-२३ वर्षांनी क्रिकेट खेळलो, ते पण सीजन बॉल वर. मजा आली पण त्यात परत प्लेयरांची जमवा जमवी हे एक लफडं असतच. I was always curious about the game but never ventured out. Have not played even once! Now I am intrigued and if I ever pick up a club, then credit goes to you. Happy

मुकुंद, हार्दिक अभिनंदन, जेहॉक्सच्या नॅशनल चँपियनशिप बद्दल. अल्मामाटर विन म्हणजे तर बोलायलाच नको...

टायगर इज प्रौलिंग. १ ओवर पार इज नॉट ए बॅड स्कोर अ‍ॅटॉल आफ्टर ३६ होल्स. लिडर ५ अंडर आहे. तिसर्‍या आणि चौथ्या राउंडला अगस्ता नॅशनल त्याच्या ठेवणीतली हत्यारं बाहेर काढतो, लिडरबोर्ड रिसेट होउन फक्त कसलेले गॉल्फर्स त्यावर दिसतात. जॅक म्हणतो तसं, टायगर करता इट्स लाइक हिज बॅकयार्ड. तर बघुया सहावं ग्रीन जॅकेट मिळतं का ते. गेल्या वर्षी फोर्थ राउंडमधल्या बॅक नाइन वरच्या बॅक-टु-बॅक सहा बर्डिज अजुन डोळ्यासमोर आहेत...

वैद्यबुवा, इट्स नेवर लेट. अ‍ॅटलांटात असता तर मीच बेसिक लेसन्स दिले असते. तरीहि सुरुवात करा. गेमचे नुआंस, माइंड-बॉडि कोऑर्डिनेशन मुळे मिळालेला रिझल्ट, स्ट्निंग आउटडोअर्स, ब्युटिफुल लॅडस्केप्स यांची मजा लुटता-लुटता गॉल्फचा किडा कधी चावला ते तुम्हाला कळणार देखील नाहि... Wink

वैद्यबुवा, गॉल्फ मला अजिबात खेळता येत नाही पण क्रिकेट, टेनिस, स्विमिंग व गॉल्फ यामधे मला कोणत्या खेळाचे जास्त आकर्षण आहे हे सांगणे कठिण आहे. टायगर ९० च्या दशकात गॉल्फ सीनवर आल्यापासुन तर गॉल्फने मला वेडच लावले.

इट मे बी टु लेट इन माय लाइफ टु टेक द ऑफर फ्रॉम राज टु टेक द गॉल्फ लेसन्स फ्रॉम हिम( इफ ही ऑफर्स द ऑफर टु मी टु Happy ) पण वैद्यबुवा तु राजने तुला दिलेली ऑफर जरी तु घेउ शकला नाहीस तरी तु जिथे असशील तिथे लेसन्स घे.. राज म्हणतो तसा ग्रेट स्टनींग आउट्डोअर्स चा अनुभव गॉल्फ्मधे जरुर घेता येतो. मी दर वर्षी ऑगस्टा, जॉर्जियाला होणार्‍या मास्टर्स टुर्नामेंटची आतुरतेने वाट बघत असतो, नुसत्या टायगर व लेफ्टीला गॉल्फ खेळताना बघायलाच नव्हे तर सबंध मास्टर्स गॉल्फ कोर्स म्हणजे डोळ्याला एक मेजवानीच असते. काय ते ग्रिन्स! काय ते स्लोप्स! काय ते ब्रिजेस!काय ती झाडे! व काय ते र्होडेडेंड्रॉन व अझेलियाचे बहर… इन माय हंबल ओपिनिअन देअर इज नो गॉल्फ कोर्स अ‍ॅज ब्युटिफुल अ‍ॅज ऑगस्टा, जॉर्जियाज मास्टर्स गॉल्फ कोर्स इन द होल वर्ल्ड!

राज, टायगर इज इन द हंट पण शेफ्लरचा ९ चा लिड जरा डाँटींगच वाटतो पण तु , मी व जगाने भल्या भल्यांना मास्टर्समधे तिसर्‍या व चौथ्या राउंडमधे गटांगळ्या खाताना व माती खाताना असंख्य वेळेला बघीतले आहे व त्याउलट टायगरला तिसर्‍या व चौथ्या राउंडमधे मुसंडी मारताना बघीतले आहे! होप ही गेट्स हिज सिक्स्थ ग्रीन जॅकेट! इफ ही डझ देन दॅट विल बी अ ग्रेटेस्ट अचिव्हमेंट बाय एनी अ‍ॅथलिट इन द हिस्टरी ऑफ द वर्ल्ड!( गाय वॉज नॉट शुअर इफ ही कुड वॉक अगेन एव्हर इन हिज लाइफ जस्ट अ‍ॅन यिअर अगो आफ्टर द हॉरिफिक कार अ‍ॅक्सिडंट ही वॉज इन्व्हॉल्व्हड! )

शनिवार, रविवार टिव्ही समोर बसुन मास्टर्सचा आनंद लुटणार!

अश्विनीमावशी, तुम्ही पण गॉल्फ व टायगरप्रेमी का! छान! वेलकम टु द ग्रुप! Happy

टायगर मास्टर्सच्या कठिण परिक्षेला तयार नव्हता.तशी अपेक्षा ठेवणेही चुकीचे होते. पण तो “ टायगर“ असल्यामुळे तशी अपेक्षा त्याच्यासारख्याकडुन ठेवायला माझ्यासारखे वेडे तयार होते. Happy

टायगर १३ स्ट्रोक्सने मागे आहे. जाउ दे. आता दुपारची वामकुक्षी घेतो.

मुकुंद - गेल्या विकेडची पिएनसी टुर्नामेंट बघितली असशीलंच. चार मेजर्स, आणि प्लेयर्स नंतर हि माझी फेवरेट टुर्नामेंट आहे. व्हॉट ए फँटॅस्टिक डिस्प्ले ऑफ स्पोर्टस्मन्शिप अँड फॅमिली रिलेशिनशिप! अनिका-विल मगी, विजय-कॅस सिंग, जॉर्डन-माइक स्पिथ, जॉन-जॉन २ डेली, कुचर्स, ट्रविनोज, थॉमसेस, हॅरिंग्टन्ज आणि टायगर-चार्ली वुड्स. मजा आली बघताना - ए ट्रु फॅमिलि इवेंट. देर कुडंट बी ए बेटर वे टु किकॉफ हॉलिडेज.

सुरुवातीला टिऑफ केल्यावर, टायगर अँड चार्ली कॉग्रॅच्युलेटेड एरिन ऑन बर्थ ऑफ ए चाइल्ड. ए क्लासी जेस्चर...

Pages