गॉल्फ आणि मी...

Submitted by राज on 15 August, 2020 - 13:04
golf bags

"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अ‍ॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर

आर्नीच्या या कोटने लेखाची सुरुवात करण्याचं कारण मी हा अनुभव "याची देहि याची डोळा" घेतलेला आहे. वरकरणी एक्स्लुसिव वाटणारा गॉल्फ हा खेळ जगाच्या कानाकोपर्‍या पर्यंत का खेळला जातो (जागेची वानवा असणार्‍या जपान, साउथ कोरिया या देशांत सुद्धा), याची वार्षिक उलाढाल जवळजवळ $८० बिलियन का आहे, यातंच या खेळाचं गम्य दडलेलं आहे. या अद्भुत खेळाची थोडक्यात ओळख आणि त्याचा प्रवेश माझ्या आयुष्यात कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे मी करणार आहे. याकरता आपल्याला रिवाइंड करुन काहि वर्षं मागे जावं लागेल.

मुंबई अगदि सुरुवाती पासुनच एक भला मोठ्ठा मेल्टिंग पॉट आहे. भारताच्या काना-कोपर्‍यातुन आलेल्यांना मुंबईने सामावुन घेतल्याने त्यांनी सोबत आणलेली त्यांची भाषा, संस्कृती, पाककला इ. चं एक्स्पोझर मुंबईकरांना आपोआप मिळत जातं. त्यात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ. क्रिकेट जरी मुंबईच्या डिएनए मध्ये असले तरी क्रिकेट व्यतिरिक्त प्रांतिक विविधतेमुळे मला लहानपणी इतक्या खेळांची ओळख झाली, आणि ते खेळायला मिळाले कि आज त्या आठवणींनी अचंबीत व्हायला होतं (एस्पेशियली माझ्या मुलांना इथे किती कमी खेळ खेळायला मिळाले हे बघुन). शिवाय ते खेळ हि सिझनल, आणि प्रत्येक खेळात अ‍ॅट्लिस्ट पांच वेरिएशन्स. काहिं हटक्या खेळांची नांवंच द्यायची तर शीग-रुपी, लेबल्स पावसात; सिगरेट्सची रिकामी पाकिटं, सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचे बिल्ले, गोट्या हिवाळ्यात; आणि शेवटि पतंग, भोवरे, विटि-दांडु आणि इतर मैदानी खेळ उन्हाळ्यात. मूळात खेळाडु प्रकृतीचा असल्याने नविन खेळांचं आकर्षण मला नेहेमीच होतं. मात्र, सुरुवातीला तरी गॉल्फ हा एक अपवाद. चेंबूरला असताना बाँबे प्रेसिडेंसी गॉल्फ क्लब नजरेस पडायचा, तिथले हिरवेकंच फेरवेज, जोडिला वेल मॅनिक्युर्ड लँडस्केपिंग कुतुहुल वाढवायचे. पण तिथे जाउन खेळायचं सोडा, कोणि खेळतानाहि कधी दृष्टिस पडायचं नाहि. त्यामुळे गॉल्फबाबत एकप्रकारची मिस्टरी मनात कायम होती. ती मिस्टरी सॉल्व व्हायला नव्वदिचं दशक उजाडावं लागलं...

अमेरिकेत आल्यानंतर एकिकडे बास्केटबॉल, फुटबॉल, बेसबॉल या खेळांबाबत माझी रुची वाढत असतानाच, गॉल्फचीहि ओळख वाढत चालली होती. वीकेंड्सना टिवीवर मेजर टुर्नामेंट्सचं ४-५ तास लाइव कवरेज बघुन गॉल्फची कंटाळवाण्या खेळावरुन, समथिंग इंटरेस्टिंग असं वाटण्या पर्यंत प्रगती झाली होती. फ्रेड कपल्स, अर्नी एल्स यांचा स्मुथ, एफर्टलेस स्विंग; डेविस लव द थर्ड, ग्रेग नॉर्मन यांचा संयत पर्सेवरंस, आणि जॉन डेलीचा रासवट (ग्रिप इट अँड रिप इट) गेम या सगळ्यांमुळे उत्सुकता वाढतच चालली होती. शिवाय त्याकाळात ऑफिसमधे टिम बिल्डिंग अ‍ॅक्टिविटिज मधे गॉल्फ राउंड असायचाच. दोन-तीन राउंड्स खेळल्यावर हे प्रकरण दिसतं तेव्हढं सोप्पं नाहि याची कल्पना आली, फर्म कमिटमेंट शिवाय हा खेळ आत्मसात होणार नाहि आणि एंजॉय हि करता येणार नाहि याची खात्री पटत गेली. रोड-वॉरियर लाइफस्टाइल मुळे आपल्याला हे झेपेल का, याची शंका (इवेंच्युअली, इट टर्न्ड आउट टु बी ए बून*) होती पण तोपर्यंत गॉल्फचा किडा चावला होता. एका वीकेंडला जाउन गॉल्फची सगळी सामुग्री खरेदि केली, आणि जवळच्याच गॉल्फ कोर्स वर एक कोच गाठुन लेसन्स करता साइनप केलं.
Webp.net-compress-image.jpg
प्रचि. #१: गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे...

अजुनहि आठवतंय, सुरुवातीला कोचने ९ आयर्न देउन मला (इमॅजनरी बॉलसोबत) प्रॅक्टिस स्विंग करायला लावलं. माझा पर्फेक्ट स्ट्रेट ड्राइव बघुन त्याने स्पष्टं सांगितल कि यु हॅव टु अनडु योर क्रिकेट स्विंग; इट्स टफ, बट डुएबल. इट विल टेक ए व्हाइल टु बिल्ड ए मसल मेमरी फॉर गॉल्फ स्विंग. माझी मानसिक तयारी होतीच, शिवाय फ्रेड, अर्नी, जॉन, आणि गॉल्फ सेंसेशन टायगर वुड्स (तेंव्हा पिजीएचं दार ठोठावत होता) यांच्या स्विंगची पारायणं करुन गृहपाठ हि चालुच होता. पुढे चार आठवड्यांच्या ग्राइंडनंतर कोचने माझ्यातला क्रिकेटर इरेझ करुन गॉल्फर जन्माला घातला. या चार आठवड्यांत कोचने घालुन दिलेले काहि प्रमुख धडे:

१. गॉल्फ ग्रिप (पकड):
१.१ क्लब कसा धरावा, इंटर्लॉक, ओवरलॅप कि बेसबॉल (टेन फिंगर)
१.२ पकड अशी जसं एखादं कबुतर हातात पकडावं. पकड इतकि हळुवार नसावी कि कबुतराला सहज उडुन जाता येईल, आणि इतकि घट्ट हि नसावी कि कबुतर गुदमरुन जावं Happy
१.३ क्लब चोक डाउन कधी, आणि का करावा

२. गॉल्फ स्टांस:
२.१ बॉल कसा अ‍ॅड्रेस करावा; क्लबफेस टार्गेट एरियाशी कसा अलाइन करावा
२.२ दोन्हि पायांमधे किती अंतर ठेवावे
२.३ क्लब सिलेक्शन नुसार बॉलची पोझिशन कशी ठरवावी
२.४ पाठ-मान सरळ, पाय गुडघ्यात किंचित बेंड, आणि नजर फक्त बॉलवर कशी ठेवावी
२.५ खांदे, हात कसे सरळ आणि रिलॅक्स्ड, टेंशन फ्री ठेवावे

३. गॉल्फ स्विंग:
३.१ क्लब सिलेक्शन (पार्ट ऑफ कोर्स मॅनेजमेंट) कसे करावे
३.२ लोअर बॉडि (कंबरेखाली) कशी "काम" ठेवावी
३.३ बॅक स्विंग घेताना फक्त टॉर्सो कसा कॉइल करावा
३.४ डावा हात संपुर्ण स्विंग एक्झिक्युट होइपर्यंत सरळ (ताठ) कसा, आणि का ठेवावा
३.५ मान स्थिर आणि नजर न हलवता बॉलवर कायम कशी ठेवावी
३.६ बॅक स्विंग करताना उजव्या पायावर, आणि नंतर बॅक स्विंग ते फॉलो थु करताना उजव्या पायवरुन डाव्या पायाकडे वेट ट्रांस्फर कसं करावं
३.७ स्विंग एक्झिक्युट करताना फक्त टॉर्सो अन्कॉयल कसा करावा
३.८ बॉलशी काँटॅक्ट झाल्यावर, स्विंग फॉलो थ्रु कसा करावा

४. गॉल्फचे बेसिक नियम आणि एटिकेट्सः
४.१ बरोबर खेळणार्‍या गॉल्फरचं प्रिशॉट रुटिन सुरु झालं कि शांत रहावे बोलु किंवा हालचाल करु नये. मग तो टि-बॉक्स असो, वा फेरवे, वा पटिंग ग्रीन
४.२ फिक्स दि डिवट्स ऑन फेरवे, अँड बॉल मार्क्स ऑन द ग्रीन
४.३ बंकर्स (फेरवे, ग्रीन साइड) शॉट मारल्यावर बंकर्स मधली वाळु रेकने पुर्वि होती तशीच करावी
४.४ ऑनर सिस्टम पाळावी. तुमची टर्न येइस्तोवर तुमचा शॉट खेळु नये
(अजुन भरपुर आहेत, खाली चर्चेच्या ओघात लिहायचा प्रयत्न करेन…)

लेसन्स संपल्यवर मी रिलिजस्ली ड्रायविंग रेंजवर जायला सुरुवात केली. रेंजवर नविन मित्र मिळाले, गॉल्फ ग्रुप तयार झला. सुरुवा-सुरवातीला आम्हि अगदि झपाटल्यासारखे वेळ मिळेल तेंव्हा १८ होल्स खेळत होतो. वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर निघुन ९/१८ होल्स खेळायचो. खूप मस्ती केली. बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं.

गॉल्फ हा एक कंटाळवाणा खेळ आहे असं सुरुवातीला झालेलं माझं मत, आता गॉल्फ जगातला सर्वोत्तम खेळ आहे या मतापर्यंत पोचलं. याला कारणंहि तशीच आहेत. प्रत्येक गॉल्फ कोर्स हा वेगळा, स्वत:चं असं आगळं-वेगळं वैशिष्ठ्य (कॅरेक्टर) मिरवणारा असतो, इतर खेळांसारखा चौकटित बांधला जात नाहि. शिवाय खेळताना गॉल्फ कोर्स हा वारा, पाउस, बर्फवृष्टि, थंडि/उकाडा/आदृता इ. सोबत तुमचा एकाअर्थी प्रतिस्पर्धीच असतो. त्यात आणखी भर म्हणजे गॉल्फ कोर्स मॅनेजमेंटला टी-बॉक्स मागे-पुढे, ग्रीन्सच्या कप पोझिशन बदलत ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात, एकाच गॉल्फ कोर्सचे डाय्नॅमिक्स, टपाग्रफि सतत बदलता येण्याजोगे असल्याने त्यात नाविन्याची भर पडत असते. हे सगळे बारकावे, त्यांचा रेलवंस सुरुवातीला समजायला कठिण आहेत, पण मी वर लिहिल्या प्रमाणे तो "किडा" एकदा चावला कि अस्वस्थ करत रहातो. मिळेल त्या माध्यमातुन (टिवी, पुस्तकं, ऑडियो) माहिती मिळवुन, ज्ञान वाढवुन गेम इंप्रुव करण्याचा ध्यास लागतो. त्या प्रयत्नात शॉर्ट/लाँग आयर्न, ड्रायवर, वुड्स, हायब्रिड्स यांच्या क्लबफेसचा अँगल, ट्रॅजेक्टरी, बॉल स्लाइस्/फेड इत्यादिंना कारणीभूत असलेले फिजिक्सचे फंडे, जे शाळा/कॉलेजात डोक्यावरुन गेलेले असतात ते आता समजायला लागतात. अशा अनेक गोष्टि हळुहळु उलगडत जात रहातात, आणि त्यात जी मजा आहे ती शब्दात मांडणं कठिण आहे. थोडक्यात, पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाहि असं म्हणतात. तसंच काहिसं गॉल्फबाबत म्हणता येईल - वन कॅनॉट ट्रुली अ‍ॅप्रिशिएट गॉल्फ अनलेस फ्यु राउंड्स आर प्लेड...

त्यानंतर गॉल्फ खेळायची एकहि संधी मी दवडली नाहि, रादर संधी निर्माण केल्या. *रोड-वॉरियर लाइफस्टाइल असल्याने क्लायंट मिटिंग्जना, सेल्स सायकल्स, ट्रेड शोज इ. च्या मिक्स मधे गॉल्फ राउंडस् यायला लागले. दुसरीकडे मित्रांसोबत अ‍ॅलबामा, नॉर्थ-साउथ कॅरलायना, फ्लोरिडा इ. जवळच्या स्टेट्समधे २-३ दिवसांच्या वार्षिक गॉल्फ ट्रिप्स होउ लागल्या. या ट्रिप्सची आय्टिनररी साधारण अशी असायची - ऑफिसमधुन शुक्रवारी लंचनंतर निघायचं. डेस्टिनेशन्ला पोचल्यावर १८ होल्स खेळायचे. शनिवारी पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन ३६ होल्स खेळायचे; मधे लाइट लंच. डिनरला फिंगर फुड, आणि सदर्न स्टाइल बार्बेक्यु रिब्ज हे स्टेपल फुड. सोबतीला सिंगल माल्ट, सिगार आणि कमराडरी. रविवारी परत पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन २७ अथवा ३६ (टाइम पर्मिटिंग) होल्स खेळायचे आणि संध्याकळी परत घरी. तोपर्यंत शरीराची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन झालेली असुनहि कुठलिहि तक्रार अजिबात नसायची. आत्मिक समाधान का काय म्हणतांत ते यालाच म्हणत असावेत. इट वाज ऑल्वेज वर्थ टु द लास्ट पेनी...
golffp.jpg
प्रचि. #२: गॉल्फ कोर्स खेळल्याचा पुरावा, नातवांकरता...

तर मंडळी, असा हा माझा गॉल्फचा प्रवास कित्येक वर्षे चालू आहे आणि पुढेहि चालू ठेवायचा आहे. टेनिस ३-४ वर्षांपुर्वि पासुनंच बंद केलं आहे. आता फक्त गॉल्फ. वीकडेजना संधी मिळेल तेंव्हा, शनिवारी हनी डु लिस्ट हातावेगळी केली कि पुढचा अर्धा रविवार फक्त माझा. त्या अर्ध्या दिवसांत मित्रांबरोबर गॉल्फ डेट - ब्रेकफास्ट+१८ होल्स्+लंच असा साधारण कार्यक्रम असतो. सुदैवाने मी रहातो त्या गावांत १० मैलाच्या रेडियसमधे पब्लिक, सेमाय-प्रायवेट, प्रायवेट असे मिळुन २०+ गॉल्फ कोर्सेस आहेल; माझे जवळपास सगळे खेळुन झाले आहेत. आजहि कामानिमित्त एखाद्या नविन शहरांत गेलो कि तिथले लोकल अ‍ॅट्रॅक्शन्स, पटेल स्पॉट्स वगैरे शोधण्या ऐवजी मी जवळपासच्या गॉल्फ कोर्सेसची माहिती काढतो, आणि तिथल्या एखाद्या गॉल्फ कोर्सवर कमीत कमी ९ होल्स तरी खेळण्याकडे माझा कल असतो. दोन्हि मुलांना सुरुवातीला मी स्वतः अणि नंतर कोचमार्फत लेसन्स दिल्याने त्यांच्यातहि आवड निर्माण झाली. दोघेहि आता रेग्युलरली खेळतात, माझ्याबरोबर क्वचित आपापल्या मित्रमंडळीत जास्त. मुलांसोबत टिवीवर गॉल्फ टुर्नामेंट्सचं कवरेज बघणं सहसा सोडत नाहि, मेजर्स तर बघतोच बघतो. टायगर वुड्सचा उभारीचा काळ (९०-०० दशक) आणि माय्केल जॉर्डनचा उतरता काळ बघता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. एम्जे आणि टायगर यांच्याविषयी काय लिहिणार, जेव्हढं लिहावं तेव्हढं कमीच आहे. नजीकच्या काळातले गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) माझ्या मते दोनच आहेत - माय्केल जॉर्डन आणि टायगर वुड्स. एम्जे आता रिटायर झालाय, लेकिन टायगर अभी जिंदा है. त्याचा गेल्या दहा वर्षातला स्लंप नसता तर आत्ता पर्यंत जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड कधीच मोडला गेला असता. अजुनहि वेळ निघुन गेलेली नाहि. टेक्निक इतकाच्, अंमळ टेक्निक पेक्षा जास्त गॉल्फ हा माइंड गेम आहे. अजुनहि चौथ्या राउंडला टायगरचं रेड-ब्लॅक आउट्फिट भल्या-भल्यांना इंटिमिडेट करतं, तो लिडरबोर्डच्या आसपास असला तर त्याच्या प्रत्येक ईगल/बर्डि नंतर होणार्‍या रोअर, आणि फिस्टपंप मुळे प्रतिस्पर्ध्यांचं अवसान गळुन पडतं. सर्वात जास्त पिजिए टुर्नामेंट्स जिंकण्याचा सॅम स्नीडचा रेकॉर्ड टायगरने टाय केला आहे, तो लवकरच मोडलाहि जाईल. जॅकचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड सुद्धा तो मोडेल याबाबत मला तरी अजिबात शंका नाहि...

लेखाची सांगता बॉबी जोन्सच्या या कोटने मी केली नाहि तर ते उचीत ठरणार नाहि. गॉल्फ टॅलंट म्हणजे काय असतं याचं बॉबी जोन्स हा चालतं--बोलतं उदाहरण, दुसरं अर्थात टायगर. बॉबी जोन्सने स्थापन केलेला, आणि नंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या गांवात हलवलेला अ‍ॅटलांटा अ‍ॅथलेटिक क्लब, बॉबी जोन्स ड्राइव पास करताना एक अद्भुत अशी लहर, चाटाहुची नदिवरुन येते आणि हृदयाला स्पर्शुन जाते. गॉल्फ ने आयुष्यात दिलेल्या सुवर्णक्षणांची आठवण करुन देत...

"गॉल्फ इज दि क्लोजेस्ट गेम टु द गेम वी कॉल लाइफ. यु गेट बॅड ब्रेक्स फ्रॉम गुड शॉट्स, यु गेट गुड ब्रेक्स फ्रॉम बॅड शॉट्स - बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स

img_0662.jpg
प्रचि. #३: युअर्स ट्रुली अ‍ॅट पिजिए टुर, चॅपियनशिप ट्रॉफि, शुगरलोफ कंट्री क्लब...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, अरे या सुंदर बीबीवर पॉलिटिक्स व रेस प्लिज आणु नको रे! गॉल्फ व सगळेच एकंदरीत खेळ मला खुप प्रिय आहेत. मी सगळ्या अ‍ॅथलिट्सकडे त्याच्या/ तिच्या क्रिडानैपुण्याशिवाय कुठल्याच बाकीच्या गोष्टींकडे बघत नाही. खरे स्पोर्ट्सप्रेमी कधीच स्पोर्ट्स्कडे डेमोक्रॅट्स/ रिपब्लिकन किंवा काळे/ गोरे अश्या चष्म्यातुन बघत नाहीत. किंबहुना मी याही पुढे जाउन असे म्हणेन की खेळ व खेळाडुंमधे भिन्न विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणण्याची क्षमता असते. संपुर्ण सिटीमधली किंवा राज्यामधली किंवा देशामधली सगळी माणसे त्यांच्या सीटीच्या, राज्याच्या किंवा देशाच्या टीम मागे,एकजुटीने आपण कोणत्या पक्षाचे किंवा धर्माचे आहोत हे विसरुन जाउन येउ शकतात/येतात हे आपण नेहमीच बघतो.

आपल्या दोघांकडे बघ. आपण राजकारणाच्या बीबीवर परस्परविरोधी विचारांवर वाद घातले. मला तुझे माहीत नाही पण तरीसुद्धा मी तुझ्याकडे बघताना तु आणी मी दोघेही गॉल्फ या खेळावर ( व माझ्या बाबतीत फुटबॉलवर सुद्धा) प्रचंड प्रेम असणारे दोन वेडे या द्रुष्टीतुनच बघतो.

टायगर या अपघातातुन आधी सहीसलामत बाहेर यावा हीच माझी इच्छा आहे. मग नंतर तो गॉल्फ खेळु शकेल की नाही ही नंतरची बाब आहे. मास्टर्स त्याच्याशिवाय बघायची कल्पनाच मला करवत नाही Sad

<< खरे स्पोर्ट्सप्रेमी कधीच स्पोर्ट्स्कडे डेमोक्रॅट्स/ रिपब्लिकन किंवा काळे/ गोरे अश्या चष्म्यातुन बघत नाहीत. >>

हे खरे आहे. पण त्याच वेळी हे स्पोर्ट्सप्रेमी या खेळाडूंना देवत्व बहाल करताना दिसतात, ते बघून पण गंमत वाटते. (विषयांतर झाले म्हणून क्षमस्व)

राजकारण नाहि रे, एक निरिक्षण नोंदवलं. बायस्ड मिडिया सिलेक्टिव रिपोर्टिंग करुन एखादी बातमी सेंशनलाय्ज कशी करु अथवा दाबु शकते याचं ते एक उदाहरण आहे. अशा बातम्या वाचुन, इंटर्प्रिट करुन पुढे काय होतं हे आपण बघतंच आहोत. असो.

इन हाइंडसाइट, या धाग्यासंदर्भातला तुझा पॉइंट लक्षात आला, आता माझ्याकडुन या विषयावर पूर्णविराम... Happy

मुकुंद, प्लेयर्स पाहिलीस का? केविन नाचा सिग्नेचर होल (#१७) वरचा मेल्टडाउन वाज ए होरेंडस ब्लीड. मला वाटलेलं डिशँबो जिंकेल; पण शेवटि जेटिने बाजी मारली. हि जस्ट फॉलोड टायगर्स मंत्रा - फोकस ऑन एव्हरी शॉट, वन अ‍ॅट ए टाइम. बर्डि-बर्डि-ईगल टु क्लिंच वन शॉट लीड ओवर वेस्टवूड; अँड किपिम्ग द मोमेंटम टु विन दॅट ट्रॉफि. ऑसम शो...

अफ कोर्स! बघीतली ना. प्लेयर्स चँपिअनशिप माझी मास्टर्स नंतरची सगळ्यात फेव्हरेट टुर्नामेंट आहे!

बिचार्‍या केव्हिन ना चा १७थ होलवरचा मेल्टडाउन लाइव्ह नाही बघीतला. त्यावर ट्विटर वरची एकाची प्रतिक्रिया खुप मजेशीर होती. “ विल केव्हिन ना एव्हर फाइंड ग्रिन ऑन १७थ?..... ना! “ Happy

त्या टी पी सी सॉ ग्रासवरच्या १७थ होलने भल्याभल्यांची भंबेरी उडवली आहे. मला तर त्या होलकडे बघुनच भिती वाटते Happy

संडे फायनल राउंडमधे डिशँबो व वेस्टवुड.. दोघांनीही ४थ होलवर माती खाल्ली! त्याने जस्टिन थॉमसला ओपनींग मिळले व त्या संधीचा त्याने पुरेपुर फायदा उठवला. ८ व्या होलवर बोगी केल्यावर ९,१०,११,१२ होल वरच्या त्याच्या बर्डी, बर्डी, इगल, बर्डी स्ट्रेचने डिशँबो व वेस्टवुडचे कंबरडेच मोडले. तरी वेस्टवुड व डिशँबो केप्ट चिपिंग अ‍ॅट द लिड. १६ थ होलवर डिशँबोने इगल केल्यावर मला वाटले की कम बॅक करतोय का हा बाबा. पण शेवटच्या दोन होलमधे बर्डी, बर्डी वॉज टु मच टु आस्क फॉर.

पण शनिवारी बघीतलस जस्टिन कसा खेळला? ७ बर्डीज व १ इगल! ही वॉज ऑन फायर! मी तेव्हाच म्हटले की ही हॅज द मोमेंटम गोइंग इन्टु फायनल राउंड. ( बाय द वे, शनिवारचा डी जे चा १७थ होलवरचा अनलकी शॉट बघीतलास? होल इन वन होण्याऐवजी पोलला लागुन बॉल पाण्यात गेला! )

एनिवे! आता वेध मास्टर्सचे.. ३ आठ्वड्यात २ वर्षांनी मास्टर्सवरच्या र्होडेडेंड्रॉन्स व अझेलियांचे दर्शन होइल. विल डी जे रिपिट हिअर इन लेस दॅन ५ मंथ्स? तुझा काय अंदाज? कोण जिंकेल मास्टर्स?

पण टायगर वुड्सशिवाय मास्टर्स Sad

हो रे, डिजेज #१७ होल डिबाकल वाज पेनफुल. पर्फेक्ट लाइन आणि डिसंट्स असुनहि बर्डि हातातुन निसटली कि मनाला चुटपुट लागुन रहाते. टाययगरच्या नशिबी हि अशी वेळ आली होती, २०१३ च्या मास्टर्समधे. टायगर लिडर बोर्डावर होता, १५वं मेजर अगदि दृष्टिक्षेपात होतं. #१५व्या होलवर टायगरचा अ‍ॅप्रोच शॉट पिनला (डिरेक्ट हिट) लागला आणि बॉलने निषेध नोंदवत, घरंगळत पाण्यात डुबकि मारली. बॉल पिनला लागला नसता तर टायगर वाज अप फॉर ए टॅप इन बर्डि. एनीवेज, टायगर टूक ए ड्रॉप (ज्याची पुढे मोठि स्टोरी झाली), अँड एंडेड अप पुटिंग ए बोगी ऑन स्कोअरकार्ड. सॅडली, हि कुड नेव्हर रिकवर फ्रॉम दॅट अन्फॉर्चुनेट इंसिडंट...

टायगरच्या अ‍ॅब्सेंस मधे डिजे आणि जेटि हे दोघे माझे फेवरेट आहेत. बट हे, इट्स मास्टर्स टुर्नामेंट डुड. अ‍ॅन इटर्नल ब्युटि - अ‍ॅट्रॅक्टिव फ्रॉम ए डिस्टंस, अँड टनेशस टु फ्लर्ट...

उद्या मास्टर्स टायगरशिवाय. Sad

२६ वर्षात ही त्याची चौथी वेळ मास्टर्समधे नसण्याची. २२ प्रयत्नात ५ वेळा जिंकला, २ वेळा दुसरा व ५ वेळा ३ रा किंवा ४था! काय बोलणार?( म्हणजे ५० टक्के वेळेला तो मास्टर्स खेळतो तेव्हा तो पहिल्या ५ मधे येतो. निव्वळ लाजबाब कामगिरी आहे त्याची ऑगस्टाला!)

अरे मुकुंद, बघतोयस का? ली वेस्वुड, ब्रुस केप्का, झॅक जॉन्सन, रोरी मॅकल्रॉय सारखे अतीरथी/महारथी कटच्या (+३) बाहेर आहेत. डिजे इज स्ट्रगलिंग टू, होपफुली वुड मेक ए कट...

नाही रे, टुर्नामेंट फक्त शनिवारी व आजच बघता आली.

डी जे ने माती खाल्ली!

आज फायनल राउंड बघताना, मात्सुयामा जिंकताना व इतरांचा खेळ बघताना असे वाटले की मात्सुयामा जिंकला म्हणजे वासरात लंगडी गाय जिंकली!

कोणाचाच खेळ डॉमिनेटींग वाटला नाही. पुर्वी टायगर, लेफ्टी यांचा डॉमिनेटींग खेळ बघताना मजा यायची. ऑगस्टा कोर्स ओळखुन कसे खेळायचे हे त्यांना बरोबर माहीत होते. हे सगळे नवशिके खुप टेंटेटिव्हली खेळत होते. शॅफलीला ओपनींग मिळाले होते पण पार ३ , १६ व्या होलवर ट्रिपल बोगी करुन त्याने मात्सुयामाला मास्टर्स बहाल करुन टाकला.

साधे साधे पट्स.. ओव्हरथिंक करुन सगळे मिस करत होते. वेवर्ड्स टी शॉट्स व मोक्याचे शॉट्स बंकर किंवा पाण्यात सगळे मारत होते.

डिशँबोच्या वल्गनांनी त्याचेच दात घशात गेले. त्याला वाटते की त्याच्याकडे प्रत्येक टी शॉट ३५०-४०० यार्ड्स मारण्याची पॉवर आहे म्हणुन तो ऑगस्टाला डॉमिनेट करु शकेल. कसच काय आणी कसच काय!

थोडक्यात एक फर्गेटेबल व कंटाळवाणे मास्टर्स.

पण १२ व१३ व्या होलवरचे शॉट्स बघताना कॅमेर्‍यामधुन रेज क्रिक व होगन्स ब्रिज व एकंदरीत मनोहरी ऑगस्टा गॉल्फ कोर्स बघणे मात्र कधीच कंटाळवाणे वाटत नाही.

कधी कधी मला वाटते की मी मास्टर्स जितका जगातल्या टॉप गॉल्फर्सचा खेळ बघायला बघतो त्यापेक्षा जास्त स्प्रिंगमधला ऑगस्टाचा नयनरम्य मास्टर्स गॉल्फ कोर्स बघण्यासाठी बघतो! Happy

>>थोडक्यात एक फर्गेटेबल व कंटाळवाणे मास्टर्स.<<
तुझ्याशी अंशतः सहमत. कंटळवाणं झाला चौथा राउंड, शेवटि-शेवटि फक्त २ शॉट लीड झाल्यावर सुद्धा. मला वाटत होतं शॉफली मुसंडि मारेल, पण एक बॅड शॉट भल्या-भल्यांचा मोमेंटम बिघड्वतो. शॉफलीचं तेच झालं. दुसरीकडे, हिडेकि मात्सुयामा जस्ट हंग इन देअर. #१५ होलवर बोगी झाल्यावरहि तो सावरला. एस्पेशियली #१६ (१५०+ यर्ड) होलवर शॉफलीचा टी-शॉट (८ आयर्न) पाण्यात गेलेला बघुन हिडेकिने क्लब चेंज केला (७ आयर्न) आणि बॉल सेफली डॅंसिंग फ्लोअरवर पोचवला. नंतरचा त्याचा बर्डि पट बघताना मला याच होलवरच्या टायगरच्या या चिपची आठवण झाली...

बट हिडेकि मेड हिस्टरी, यार. फर्स्ट जॅपनीज अँड एशियन टु विन मास्टर्स चँपियनशिप. टायगर अर्धा एशियन आहे, बट दॅट डझंट काउंट... Wink

राज, तुझे गॉल्फचे टेक्निकल नॉलेज जबरी आहे. मला तुझ्याइतके टेक्निकल नॉलेज नाही. त्यामुळे मात्सुयामाने क्लब चेंज केला व कशामुळे केला हे माझ्या लक्षातही नाही आले! मला नेहमी ते क्लब त्यांच्या पोतडीमधुन बाहेर काढुन प्रॅक्टिस स्विंग करुन झाल्यावर परत क्लब पोतडीत टाकुन दुसरा क्लब शॉट मारायला निवडताना बघुन एवढेच वाटायचे की स्विंगचा आवाज प्रचलीत वार्‍याच्या वेगाला साजेसा आला नाही त्यामुळे बॉल हवा तेवढा लांब किंवा जवळ मारता येणार नाही म्हणुन दुसरा क्लब काढला Happy

मास्टर्स कोर्स व त्या कोर्सवरचा अनड्युलेटींग सरफेस व प्रत्येक होलचे टफ लोकेशन भल्याभल्यांना त्यांची चुक महाग पाडते मग तो “ शार्क“ ग्रेग नॉर्मन असो की ग्रेट टायगर वुड्स असु देत हे मला माहीत आहे.

म्हणुनच मग या कोर्सवर इमॅजिनिटिव्ह व क्रिएटिव्ह शॉट्सची जरुरी असते जी सध्याच्या लॉटमधे फारच कमी जणांकडे आहे असे मला म्हणायचे होते. त्यात डी जे वगैरे मंडळींनी कट मिस केल्यामुळे फारच थोडे तसे इमॅजिनिटिव्ह व क्रिएटिव्ह थिंकिंग करणारे प्लेयर्स या विकेंडला उरले होते असे माझे प्रामाणिक मत आहे.

आठ्वत तुला टायगरने ऑगस्टाला कसे एक एक जबरी व अनएक्झ्युटेबल वाटणारे शॉट्स/ पट्स मारुन/ एक्झ्युक्युट करुन लोकांना तोंडात बोटे घालायला लावले होते? तसा स्पार्क व तसा इमॅजिनिटिव्ह व क्रिएटिव्ह खेळ ( किंवा तश्या स्पार्कच्या जवळही जाणारा) या वर्षी कोणातही दिसुन आला नाही असे मला म्हणायचे होते.

आणी एक.. शॅफलीने १६ व्या होलवर ट्रिपल बोगी केली व त्यामुळे त्याची मास्टर्स जिंकण्याची संधी हुकली हे सगळ्यांच्या लक्षात राहील. पण मला वाटत १५ व्या होलवर मात्सुयामा बोगी करत असताना शॅफलीला त्याच होलवर इगल करायची सुवर्णसंधी होती! तो इगलसाठी लागणारा पटही काही फारसा कठिण नव्हता! पण त्याला तो जमला नाही व त्याला बर्डीवरच समाधान मिळुन गप्प बसायला लागले. तो इगल शॉट जर त्याने मिळवला असता तर १६ व्या होलवर ट्रिपल बोगी करुनसुद्धा त्याला जिंकायची संधी होती! खासकरुन ज्या पद्धतीने मात्सुयामा क्लोज्ड आउट विथ अ बोगी अ‍ॅट १८!

(आणी त्या मिस इगल व ट्रिपल बोगीमुळे दुसरा किंवा एकटा तिसरा येण्याऐवजी त्याला ३ रा नंबर जॉर्डन स्पिथ बरोबर वाटुन घ्यायला लागला व त्यामुळे त्याचे हाफ अ मिलिअन डॉलर्सचे नुकसान झाले!)

>>स्विंगचा आवाज प्रचलीत वार्‍याच्या वेगाला साजेसा आला नाही त्यामुळे बॉल हवा तेवढा लांब किंवा जवळ मारता येणार नाही म्हणुन दुसरा क्लब काढला<<
अजुन थोडं सविस्तर लिहितो. कोर्स मॅनेजमेंट, क्लब सिलेक्शन इ. हे प्रिशॉट रुटिनचे अतिशय मह्त्वाचे भाग आहेत. प्रॅक्टिस स्विंगच्या मागे उद्देश हाच असतो कि - हाउ यु फील अबौट द क्लब. सवयीने किंवा अनुभवाने तुमची बॉडि+माइंड सांगते, क्लब बरोबर आहे कि नाहि ते. तु अजुन एक गोष्ट नोटिस केली असशील, प्रत्येक गॉल्फर एक छोटि डायरी/नोटपॅड खिशात ठेवतो. त्यात प्रत्येक होलची टपाग्रफि, पिन पोझिशन, ग्रीन्सचे चढ-उतार यांची नोंद केलेली असते. हि डायरी ते प्रॅक्टिस राउंड (मंगळवार्/बुधवार) पासुन मेंटेन करायला सुरुवात करतात. आणि मुख्य म्हणजे ती रिफर करतात - पार्ट ऑफ ए प्रिशॉट रुटिन. अजुन एक प्रिशॉट रुटिनचा भाग म्हणजे, चिमुटभर गवत उपटुन ते वर हवेत भिरकावलं जात, ते कुठल्या दिशेने (आणि वेगाने) जातंय यावरुन वार्‍याची दिशा, वेग यांचा अंदाज बांधला जातो; क्लब सिलेक्शन करता. परवाच्या फायनल राउंडला शॉफलीचा अंदाज चूकला. तसं पहाता ८ आयर्न पर्फेक्ट क्लब आहे १५० यार्ड्सकरता. परंतु शॉफलीला समोरुन येणार्‍या वार्‍याचा अंदाज आला नाहि, अथवा त्याने फुल स्विंग (मॅक्सिमम क्लब स्पीड) न केल्याने अपेक्षित डिस्टंस मिळालं नाहि, त्याचा परिणाम होउन बॉल ग्रीनवर लँड न होता घरंगळत पाण्यात गेला. व्हॉट हॅपन्ड नेक्स्ट वाज ए टुर्नामेंट चेंजर...

असो, शेवटि हे सगळे सोपस्कार करुनहि बॅड शॉट मारले जातातच. परंतु, त्या धक्क्यातुन सावरुन पुढचे शॉट व्यवस्थित एक्झिक्युट करणाराच चँपियनशिप्स जिंकतो...

मस्त समजवुन सांगीतलस रे.

ती डायरीची भानगड अशी असते होय!मला ती डायरी म्हणजे अस वाटायच की पेन्सिलीने त्यात त्या त्या होलवर झालेला स्कोर लिहीतात व तो डायरीवजा स्कोरबोर्ड दर दिवसाच्या शेवटी सबमिट करायचा. म्हणजे अमुक अमुक होलवर माझा स्कोर पार झाला, अमुक अमुक होलवर बर्डी तर अमुक वर बोगी/ इगल वगैरे. थोडक्यात माझ्यासारखे जी लोक फक्त पट पट गॉल्फ मजा म्हणुन खेळायला जातात तेव्हा आम्हाला एक स्कोरकार्डच चिठोर व पेन्सिल देतात त्यात आम्ही ग्रुप मधल्या सगळ्यांचा स्कोर लिहीतो तस काहीतरी Happy

राज, नवल आहे! लेफ्टी आज ५० वर्षाचा म्हणजे सगळ्यात वयस्कर गॉल्फर मेजर टुर्नामेंट जिंकुन इतिहास घडवत असताना इथे तुझे त्याबद्दलचे एकही पोस्ट नाही? शो. ना. हो हे तुला Happy

मी विकेंडला बघीतली टुर्नामेंट.आज फायनल राउंडला शेवटी वाटत होते की परत एकदा हा बाबा हातातली टुर्नामेंट घालवतो की काय?

पण शेवटच्या २ होलवर दर्शक वेडे झालेले असताना त्याने त्याचे कंपोझर एकदम शांत ठेवले व २ स्ट्रोकने ब्रुस कोप्का व लुइस उस्टहाउझनला हरवुन पी.जी.ए. वॉनामेकर मेजर ट्रॉफी जिंकली व इतिहास घडवला!

“ लेफ्टी “ फिल मिकलसनचे मनापासुन अभिनंदन! आय अ‍ॅम हॅपी फॉर हिम.

मुकुंद - अरे, मी एकहि मेजर चुकवत नाहि. यावेळी मात्र टायगर नाहि म्हणुन उत्सुकता कमी होती, तरीहि अधुन-मधुन बघत होतो. लेफ्टि पहिल्या दिवसां पासुन लीडर बोर्डावर होता. पण तिसर्‍या राउंड नंतर केप्का, उस्थेगन वेर ब्रिदिंग डाउन हिज नेक. फायनल राउंडची सुरुवातंच लेफ्टिने बोगी, आणि केप्काने बर्डिने केल्यावर मला पण तुझ्यासारखंच वाटलं - हा बाबा टुर्नामेंट हातची घालवतो कि काय. आठव, २००६ यु एस ओपन, विंग्ड फुट. इट वाज ब्रुटल टु से द लीस्ट...

बट हि प्रिवेल्ड, अँड आयॅम हॅपि फॉर हिम. हि मेड हिस्टरी, इन्स्पार्य्ड मेनी (इंन्क्लुडिंग टायगर) टु विन मेजर्स रिगार्डलेस ऑफ द एज फॅक्टर. लेट्स होप, टायगर हॅझ ए हेल्दि रिकवरी, अँड क्लेम्स फोर मोर मेजर्स टु पॅस जॅक्स रेकर्ड... Happy

राज, टायगरबाबत सहमत!

टोरी पाइन्सला आज सुरु होणार्‍या यु एस ओपनमधे तुझ्यासारख्या एक्स्पर्टचे काय प्रेडिक्शन आहे?

डिशेंबो परत जिंकेल या वर्षी की जॉन राह्म, टोनी फिनाव या दोन पैकी (सातत्यपुर्ण चांगले खेळणारे पण अजुन एकही मेजर न जिंकणारे) एक इथे यंदा बाजी मारुन जातील?

कॉलिन मोरिकावा सुद्धा कन्सिस्टंटली चांगला खेळत आहे. इज ही ड्यु फॉर हिज सेकंड मेजर?

डी जे व जे टी थोडे सुस्तावलेले वाटत आहेत.

ब्रुस कोप्काला यु एस ओपन मधे विसरुन चालणार नाही, आफ्टरऑल त्याने गेल्या ४ वर्षात २ दा यु एस ओपन जिंकले आहे व एकदा तो रनर अप होता.

का लेफ्टी मधे अजुन एक मेजर जिंकायचे टॅलंट आहे?

एक गोष्ट मात्र खर आहे, टोरी पाइन्सला ८ वेळा जिंकलेल्या टायगरला मी व गॉल्फ प्रेमी मात्र नक्की मिस करु Sad

लेफ्टि दुसर्‍यांदा चमत्कार करु शकणार नाहि. माझा डॉलर डिजे वर. माझ्यामते तो एक निद्रिस्त ज्वालामुखी आहे. कधी फुटेल ते सांगता येत नाहि, पण फुटला तर सगळे पोळुन निघतील... Happy

बाय्दवे, टायगरला एनबिसीने ऑफर दिली होती, अ‍ॅनलिस्टची. त्याने नम्रपणे नाकारली.

दोज हु आर केपेबल ऑफ स्कोरिंग, डु नॉट किप स्कोर...

राज, बघीतलीस का यु एस ओपन गॉल्फ टुर्नामेंट?

मी फक्त काल फायनल राउंडच बघीतली. शनिवारी ओमाहाला सबंध दिवस स्विम ट्रायल्स बघायला गेलो होतो.

मी म्हटल्याप्रमाणे राह्मने शेवटी एकदाचे मेजर जिंकले. फायनल राउंडला मस्तच खेळला राह्म. शेवटच्या २ होलमधे बर्डी- बर्डी करुन त्याने बिचार्‍या उस्टहाउझनच्या छातीत खंजीरच खुपसला. १७थ होलवरची राह्मची बर्डी जबरदस्त होती! काय कर्व्ह झाला बॉल! टायगरच्या मास्टर्स वरच्या काही इनक्रेडिबल पट्सची आठवण आली त्याने. राह्म खरच यु एस ओपन जिंकायला पात्र होता.

पण स्कोर करायला हा गॉल्फ कोर्स कठिण का होता? मुठभर प्लेयर्सच कुड ब्रेक पार स्कोर हिअर!

बिचारा उस्टहाउझन ७ व्यांदा मेजर्समधे दुसरा आला. Happy

मी म्हटल्याप्रमाणे डी जे व जे टी च्या खेळात मधे स्पार्क नव्हता. डिशँबो व ब्रुस कोप्काला पुरेसा चार्ज करता आला नाही. रोरी मॅकलोरी हंग अराउंड पण २०१४ पासुनचा त्याचा मेजर्समधला ड्राउट चालुच राहीला.

आणी टोरी पाइन्सचा गॉल्फ क्लबचा नजारा बघितलास? काय दिसत होता टोरी पाइन्सचा गॉल्फ कोर्स एरिअल शॉट्समधे!बाजुला सॅन डिअ‍ॅगोचा एकदम रॉकी समुद्र किनारा व त्याला लागुनच त्या रॉक्सवरचा हा हिरवाहार गॉल्फ कोर्स! मजा आली गॉल्फ बघायला.

हो हो, पाहिली तर. र्‍मला विचारशील तर, र्‍हाम गॉट लकि. बट, हे, जो जिता वोहि सिकंदर. असो.

उस्थेझनची १७व्या होलची बोगी (ड्राइव आउट ऑफ बाउंड, ड्रॉप मुळे) त्याला महागात पडली. त्याचा मोमेंटमच बिघडला. १७वा होल त्याने पार केला असता (हि मिस्ड बाय फ्यु इंचेस), तर शेवटचा होल इंटरेस्टिंग झाला असता. आधीच्या ३ राउंडमधे १८व्या होलवर त्याचा स्कोर होता - बर्डि, बर्डि, ईगल...

टोरी पाइन्सच्या लँडस्केपबाबत सहमत. अगदिच नाहि तरी स्कॉटलंडच्या लिंक गॉल्फशी या कोर्सची तुलना करु शकतो. विंड इज ए मेजर फॅक्टर इन मेकिंग धिस ए टफ कोर्स...

मुकुंद, तिथला केलबचा फोटो सेल्फि पेक्षा फोटोबाँब जास्त वाटतोय रे. मात्र, तुझी ट्रिक बेमालुम आहे; पब्लिक गंडतंय... Wink

मुकुंद, अरे आहेस कुठे? आज रायडर्स कप बघताना तुझी खूप आठवण काढली. १९-९ टोटल डॉमिनेशन, दॅट टू मेजोरिटि ऑफ देम आर यंग गन्स. आय थिंक दे सेट द रेकर्ड ऑफ मॅक्सिमम पॉइंट्स इन रायडर्स कप...

अरे बघितला पुर्ण डॉमिनेटींग व रेकॉर्ड ब्रेकींग परफॉर्मन्स! मजा आली. खुप वर्षांनी अमेरिकेला रायडर कप जिंकताना बघितले. गेल्या २५-३० वर्षात युरोपच डॉमिनेटींग करत आलय रायडर्स कपमधे.

दस्तुरखुद्द टायगरने टीमला तसा खेळ खेळायचे आव्हान दिले होते म्हणे Happy

वाटलंच होतं मला कि तु मिस करणार नाहिस. रायडर्स, प्रेसिडेंट्स कप सारखे इंटरनॅशनल इवेंट्स आर फॅब्रिक्स ऑफ द अमेरिकन स्पोर्ट्स कल्चर. यु कॅनॉट मिस देम, इफ यु आर ए स्पोर्ट्समन अ‍ॅट हार्ट...

मेजर्सची मजा वेगळी आणी रायडर्स कपची मजा वेगळी! मला तर रायडर्स कप च्या आधीपासुनचे कॅप्टन कोणाला निवडतात , मग को कॅप्टन कोण कोण आहेत, टीममधे कोण? कॅप्टन्स पिक कोण हे फॉलॉ करायला पण खुप आवडत.

या वर्षी डि जे चा ५-० डॉमिनेटींग रेकॉर्ड जबरीच होता. कॉलिन मॉरिकावा पण मस्त खेळला. पण गुरुवारच्या फोरसम मधे, पार ५ वर, ब्रायसन डिशँबोने मारलेला ४१७ यार्डचा टी शॉट माझ्याच काय पण सगळ्या जगाच्या लक्षात राहील! ओव्हर द टॉल फेस्क्यु ग्रास, ओव्हर द वॉटर.. ४१७यार्ड! अबब! मग फक्त शॉर्ट वेज शॉट व मग ईगल! नविनच गॉल्फ बघण्यार्‍याला वाटले असेल की किती सोप्पा खेळ आहे गॉल्फ! Happy

अरे ३-४ दिवसांपुर्वी मी रायडर्स कप वरचे माझे पोस्ट लिहीत असताना बेसबॉल बीबीवर( अ‍ॅट्लांटा ब्रेव्ह्स- लॉस एंजलस डॉजर्समधला सहावा गेम बघत असताना) कॉमेंट लिहीले होते की आज ब्रेव्ह्स जिंकावे व गेल्या वर्षीच्या गेम ७ मधे केलेल्या रनींग बिटविन बेसेसच्या बोनहेड एररमुळे झालेल्या पराभवाची परतफेड करावी. पण तो बीबी बहुतेक बंद झाला आहे. कारण ते पोस्ट प्रकाशितच झाले नाही त्या दिवशी.

ब्रेव्ह्ज त्या दिवशी सहज जिंकले. एम व्ही पी रोझॅरिओची जबरदस्त हिटींग व सातव्या इनींगमधे लेफ्टी रिलिव्हर टायलर मॅझटेकने दाखवलेले पिचींगचे अप्रतिम प्रात्यक्षिक बघताना मजा आली! मॅझटेक काय एक एक जबरदस्त फास्ट बॉल डार्ट/ स्ट्राइक टाकत होता! तेही प्रेशर सिचुएअशन मधे.. बेसेस लोडेड अँड नोबडी आउट! ही इनहेरिटेड दॅट मेस! अँड व्हॉट डझ ही डु? स्ट्राइक्स आइट नेक्स्ट ३ बॅटर्स .. .. जबरी मजा आली त्याचे पिचींग बघताना! मला ९० च्या दशकातले अ‍ॅटलांटा ब्रेव्हजचे डॉमिनेटींग पिचर्स आठ्वले… ग्रेग मॅडक्स, टॉम ग्लॅव्हिन,स्टिव्ह एव्हरी व जॉन स्मोल्ट्झ… त्या चौघांच्या पिचींग डॉमिनन्सच्या जोरावर( व डेव्ह जस्टिस, फ्रेड मॅक्ग्रिफ, चिपर जोन्स व अँड्र्यु जोन्सच्या बॅटींगच्या जोरावर) ९० च्या दशकात अ‍ॅटलांटा ब्रेव्ह्ज्स वेअर पेरिनिअल डिव्हिजन अँड पेनंट विनर्स! बॉबी कॉक्सच्या मॅनेजरशिपच्या त्या काळात त्यांनी एकदाच वर्ल्ड सिरीज जींकली ही एक खेदाची बाब आहे!

काल वर्ल्ड सिरीजचा पहिला गेम जिंकुन अ‍ॅटलांटा ब्रेव्ह्जनी वर्ल्ड सिरीजची सुरुवात तर मस्तच केली आहे पण इंजुरी मुळे दे लॉस्ट स्टार्टर चार्ली मॉर्टन फॉर रेस्ट ऑफ द वर्ल्ड सिरीज! ! दॅट्स अ बिग ब्लो! Sad

साईड नोट: या शनिवारी आदित्यची व्हार्सिटी कॉन्फरंस चँपिअनशिप आहे. ५० मिटर्स फ्रिस्टाइलमधे त्याचे टाइमिंग २४.०९ सेकंड्स पर्यंत आले आहे. जस्ट फॉर कंपॅरिझन भारताचा सेन्सेशनल स्विमर विरधवल खाडेचा ५० मिटर्समधे विक्रम आहे २२.५९ सेकंड्स! आदित्यचे या शनिवारी अंडर २४ सेकंडचे टारगेट आहे. बघुया काय होते ते.. Happy

>>आदित्यचे या शनिवारी अंडर २४ सेकंडचे टारगेट आहे<<
ऑल द वेरि बेस्ट टु आदित्य. वि ऑल आर प्राउड ऑफ हिम! अरे खाडे काय, पुढे तो केलबची बरोबरी करेल. मार्क माय वर्ड्स.

>>डिशँबोने मारलेला ४१७ यार्डचा टी शॉट <<
अरे त्या ड्राइवने तर अगदि खळबळ माजवली. खरं पहाता हि कॅरिड ओवर अबौट ३००+ यार्डस ओवर द वॉटर; पण तो होल डॉग लेग राइट असल्याने डिशँबोचा ड्राइव जिथे लँड झाला ते डिस्टंस फेअर्वेच्या दृष्टिकोनातुन ४१७ होतं. डिशँबो टूक ए शॉर्ट कट (हाय्पाटिनस). इट वाज स्टिल अ‍ॅन इन्क्रेडिबल ड्राइव. नो गट्स, नो ग्लोरी हि म्हण प्रुव करणारा...

बेव्ह्सच्या बाबतीत सहमत. आय थिंक दे गॉट देर मोजो बॅक. ब्रेव्हची बुलपेन ९०ज इतकि इलस्ट्र्स नसली तरी प्रॉमिसिंग आहे. २-१ ने आघाडिवर आहोत, माझा अंदाज ब्रेव्हज ५-२ ने वर्ल्ड सिरीज जिंकतील...

राज, तो डिशँबोचा शॉट तसा होता काय! मला वाटल की कन्व्हेन्शनल डिस्टंस प्रमाणे ४१७ यार्ड्सचा शॉट होता. २० वर्षापुर्वी टायगरचे ३०० च्या वरचे टी शॉट बघुन मास्टर्सने त्यांचा कोर्सच बदलुन टाकला होता( टायगरप्रुफ करण्यासाठी) . मला वाटले डिशँबो जर असे ४०० चे टी शॉट मारायला लागला तर मास्टर्स परत एकदा त्यांचा कोर्स बदलतात की काय Happy

आदित्यने कॉन्फरंस फायनलमधे अंडर २४ च नाही तर अंडर २३ (२२.४४) सेकंड्सचे टाइमींग अचिव्ह केले.

इथे एका गोष्टीचे स्पष्टीकरण देणे जरुरीचे आहे. विरधवल खाडेचे मी वर दिलेले ५० मिटर्सचे टाइमींग हे लाँग कोर्सचे आहे.( आणी मिटर्सचे आहे) आदित्य हायस्कुल मधे ५० यार्ड्स शॉर्ट कोर्समधे स्विम करतो, म्हणजे ते ५० यार्ड्स सलग नसतात, म्हणजे पुल २५यार्ड्सचाच असतो. ५० यार्ड्स पोहण्यासाठी ते प्रत्येकी जाउन येउन २५ यार्ड्स ते पोहतात.(अमेरिकेत सगळेच हायस्कुल स्विमर्स ५० यार्ड्स शॉर्ट कोर्समधेच स्विम करतात.) त्यामुळे अर्थातच ५० यार्ड्स शॉर्ट कोर्सचे टायमींग ५० मिटर्स लाँग कोर्सच्या टायमींगपेक्षा नेहमीच बरेच फास्ट असते.

केलबची बरोबरी ही खुप दुरची गोष्ट आहे. ( केलब चे ५० यार्ड्स शॉर्ट कोर्सचे टाइमिंग आहे १७.६३ सेकंड्स! आता बोल!)

पण तरीही कॉन्फरंस फायनलमधल्या २२.४४ सेकंड्स ह्या जोरावर ही ऑटोमॅटीकली क्वालीफाइड फॉर द स्टेट चँपिअनशिप. ३ दिवसांपुर्वी स्टेट चँपिअनशिपमधे त्याने २२.११ सेकंड्सचे टाइमिंग केले पण तरीही तो ओव्हरऑल स्टेटमधे ११ वा आला. पण हे त्याचे फ्रेशमन यिअरच आहे. स्टेट रँकींग इंप्रुव्ह करायला त्याच्याकडे अजुन ३.५ वर्षे आहेत Happy

तो १०० यार्ड्स ब्रेस्टस्ट्रोकमधेही स्टेट चँपिअनशिपसाठी क्वालिफाय झाला होता. त्यात त्याचे १. ०१.१७ ( वन मिनिट १.१७ सेकंड्स) चे टाइमिंग झाले व त्यात तो १७वा आला. टॉप १६ सगळे सिनिअर आणी ज्युनिअरच होते.

असो. वर्ल्ड सिरीज जिंकल्याबद्दल अभिनंदन! Happy

फुटबॉल फॉलो कर आहेस का? आमचा महोम्स व आमचे चिफ्स अगदीच सुमार व अनकॅरक्टरीस्टिकलीखेळत आहेत. महोम्स बेसुमार चुका करत आहे. मला नाही वटत चिफ्स विल मेक प्लेऑफ्स धिस यिअर! Sad

अरे बाबा, यापेक्षा डेवस्टेटिंग न्युज म्हणजे - टायगर बेल्ड आउट ऑफ २०२२ मास्टर्स. क्लबहाउसेस कॅन बी रिबिल्ट, बट धिस इज लाइक नॉट विटनेसिंग हिस्टरी बिइंग मेड...

Pages