आहारात कोणकोणती कडधान्ये वापरता?

Submitted by मोहिनी१२३ on 15 August, 2020 - 08:14

आम्ही आहारात मूग,मटकी, बारीक चवळी(मोड आणून) आणि मसूर, राजमा, बारीक काळे वाटाणे(मोड न आणता) यांच्या उसळी घेतो.बाकी मोठी चवळी, हरभरा, वाटाणा,कुळीथ ही कडधान्यही सहज मिळतात.
अजून कोणती वेगळी कडधान्य आहेत जी आपण खाऊ शकतो आणि पुण्यात सहज मिळतात? धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

बिरड्या/कडवे वाल नाही का आवडत कुणाला? मला फार आवडते त्याची उसळ.. पुण्यात कडधान्य विकण्यार्‍या काकू कडे कधीकधी मिळायचे..घरी त्याला मोड आणणे पेशन्सचे काम आहे..

मोड आलेल्या मिश्र कडधान्याची उसळ एकदा बायकोने डब्यात नेली होती ती बघून तिच्या एका पंजाबी कलीग ने विचारले, ये धागे तुम कैसे लाते हो?

पंजाब्यांमध्ये कडधान्याला मोड आणत नाहीत का??

कडवे वाल नाही का आवडत कुणाला? >>> करतो क्वचित आम्ही पण पावटे जास्त आवडतात, पुर्वी माहेरी गावचे यायचे, छान गोडसर असायचे. कडवे किंवा पावटे भिजवले की एक दिवस उसळ त्याची आणि थोडे त्यातले बाजूला काढून मोड आल्यावर दुसऱ्या दिवशी डाळींब्यांची आमटी करायची हे साधारण ठरलेलं असतं माझ्याकडे.

उसळ कुठलीही केली तरी कळण करते. फक्त जेव्हा काही उसळी जशा मसूर किंवा काळे वाटाणे हे वाटण आणि गरम मसाला घालून करते तेव्हा कळण नाही काढत.

कुठलीही उसळ करताना चांगले भिजलेलं कडधान्ये असलं की चालते, मोड यायलाच हवेत असं काही नाही आमच्याकडे. मोड आलेल्या कडधान्यांची परतून चटपटीत उसळ छान लागते.

मिक्स कडधान्यांची खिचडी पण मस्त होते तसेच, डाळिंब्यांचाही मसालेभात छान होतो.

कडवे किंवा पावटे भिजवले की एक दिवस उसळ त्याची आणि थोडे त्यातले बाजूला काढून मोड आल्यावर दुसऱ्या दिवशी डाळींब्यांची आमटी करायची हे साधारण ठरलेलं असतं माझ्याकडे............सेम हियर! अगदी वालभा त ही.. मूग,मटकी, चणे (ऐच्छीक), वाल हे aamchyakade मोड आणवून खातात.म सुरालाही मोड आणून त्याचे मसाल्याचे छान लागते.

हो देवकीताई, कढण म्हणजे ज्या पाण्यात कडधान्ये शिजवतो, त्या पाण्याला थोडासा मसाला घालून मस्त झणझणीत फोडणी देऊन केलेली आमटी . नुसती प्यायला जास्त छान लागते. पण या सोबत खायला भात मात्र इंद्रायणीच लागतो, मी त्याला गिलका भात म्हणते. बाकी कुठलाही तांदूळ त्यात एकजीव होत नाही मग खायला मजा येत नाही.

मस्त लेख आहे भरत. धन्यवाद लिंक दिल्याबद्दल! त्यांची ही लेखमाला आहे का?
माझ्याकडे त्यांचं 'स्वयंपाकघरातील विज्ञान' हे पुस्तक आहे. तेही मस्त आहे.

मस्त आहेत की डबल बीन्स >>> हो ना, छान दिसतात की. या चवीला पण छान लागतात. मी थोड्या बॉइल करून सॅलड मध्ये घालते. एखाद वेळेस खोबरं आलं लसूण कोथिंबीर असा ओला मसाला ग्राइंड करून करी पण केली होती, ती ही अतिशय टेस्टी झाली होती. पण बाजारात डबल बीन्स फार दिसत नाहीत.

गोव्याकडे फजांव आणि अळसांदे /हळसांदे/ अळसान्ने या नावाची कडधान्ये असतात.
उत्तर कन्नड आणि कारवारच्या बाजूला मोड आलेल्या मुगाचे मुग्गागाठी नावाचे पळीवाढे तोंडीलावणे केले जाते. कुठल्याही नैवेद्याच्या जेवणात हे बहुतेक असतेच. पण जेव्हा बाराव्या/तेराव्याचे जेवण असते तेव्हा मुगागाठी करताना मुगाला मोड आणीत नाहीत.

Pages