आहारात कोणकोणती कडधान्ये वापरता?

Submitted by मोहिनी१२३ on 15 August, 2020 - 08:14

आम्ही आहारात मूग,मटकी, बारीक चवळी(मोड आणून) आणि मसूर, राजमा, बारीक काळे वाटाणे(मोड न आणता) यांच्या उसळी घेतो.बाकी मोठी चवळी, हरभरा, वाटाणा,कुळीथ ही कडधान्यही सहज मिळतात.
अजून कोणती वेगळी कडधान्य आहेत जी आपण खाऊ शकतो आणि पुण्यात सहज मिळतात? धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults

राजमा कडक मिळतो

पण आमच्याकडे ओला राजमाही सोलून दाणे मिळतात , लगेच शिजतो, त्याचा रंग थोडा फिका असतो आणि मऊ असतो

छोले , शेंगदाणेही वापरता येतात

धन्यवाद मानव,जिद्दु.
तुर म्हणजे तुरडाळ हेच डोक्यात होते, बघते आता नक्की.
जिद्दु, वाल विसरलेच होते. हुलगे आणि कुळीथ वेगळे का?

सोयाबीन.
मेथी कडधान्यात मोडत नसावी. पण लोक मेथ्यांचीही उसळ करतात.

वाटाणे - काळे, हिरवे, सफेद
कडवे वाल (आणखी कोणते वाल असतात का माहीत नाही)

पूर्ण तूर विदर्भात तरी मिळते.
हिवाळ्यात तूरीच्या शेंगा मिळतात.
पुण्यात हे मिळते की नाही माहीत नाही.

मस्तच blackcat. आमच्याकडे राजमा कडक मिळतो. जवळजवळ १२ तास भिजवतो.शेंगदाणे आधीच खूप वापरतो पण ऊसळ छान लागेल त्याची.छोले-हो

धन्यवाद भरत. आम्ही सोयाबीन पीठ वापरतो. पण येस,ऊसळ पण करता येईल.हिरवे वाटाणे न् मेथ्या- आणायला पाहिजे.

जिद्दु-मखाणा ऊसळ/भाजी करतो कधीतरी.उडीद-येस
धन्यवाद सगळ्यांना.

काळा घेवडा मला वाटतं हा फक्त सातारकर च आवडीने खातात मला खूप आवडतो.
मटकी ला मोड आणून त्याची उसळ पण माझी आवडती आहे.

मूग सुद्धा मोड आणून.
उडीद ची हिरव्या मिरचीचा वापर करून बनवलेली पातळ भाजी त्याला आम्ही घुट म्हणतो .माझ्या आवडीचा.
आख्खा मसूर, चवळी ची उसळ,.
वाटण्याचे माझ्याशी वाकडे आहे मला बिलकुल आवडत नाहीत.
तूर डाळ आवडत नाही.
हरभरा,कबुली चना,राजमा( ब्राऊन रंगाचा घेवडा त्याला हिंदी मध्ये राजमा म्हणतात)
हे सर्व बिलकुल आवडत नाहीत.
आणि सोयाबीन Direct आहारात नसावे त्या मध्ये कोणते तरी घातक रसायन असते ते पुरुषांसाठी योग्य नाही आणि त्या मुळे सोयाबीन पासून तेल काढण्याची पद्धत बाकी तेलबिया पेक्षा खूप भिन्न आहे.

धन्यवाद Blackcat, Hemant33, कमला.
हो आज आमच्याकडे मटार उसळच होती. मला वाटतयं तुम्ही सोया चंक्स बद्दल बोलताय का?
काळा घेवडा म्हणजे काळा वाटाणा का?घुट बघितलं पाहिजे
हो कमला काही वेळा मोड आणून, काही वेळा मोड न आणता.
चवळी मोठी/बारीक अशी असते ना? का रंग पण वेगवेगळा असू शकतो?

काळा घेवडा म्हणजेच ब्लॅक बीन्स म्हणजेच काळ्या रंगाचा राजमा हा आकाराने लहान असतो ,आणि ह्याची डाळ बनवू शकतो.
चवळी चे खूप प्रकार आहे.
रंगा वरून तांबडी चवळी आणि सफेद चवळी.
आणि आकार वरून पण बारीक आणि जाड.
आणि मी
सोयाबीन च्या बिया विषयी बोलतोय.

काळ्या घेवड्याला आम्ही काळे पोलीस म्हणतो. आणि एक वाघ्या घेवडा पण असतो. तुफान चविष्ट उसळ असते ह्याची. चांगला भिजला आणि शिजला पाहिजे फक्त. गोडा मसाला, तिखट, मिठ, गूळ आणि लसणीची फोडणी बास. फार नखरे नाहीत ह्याचे. थोडे घेवडे डावानेच घोटून उसळ दाटसर करायची. गोडसर चवीची असते ही उसळ.

धन्यवाद sonalisl, मेधावि.
मस्त additions ,टिप्स आणि पाककृती.
मध्ये एका ठिकाणी ऐकले होते की भारतात जवळजवळ १०००० कडधान्यं मिळतात.

पोलिस किंवा काळा घेवडा पुण्यात सुद्धा आठवडी बाजारात मिळायचा./मिळेल.
माझा परचंड भयंकर आवडता प्रकार. Happy

पोलिस किंवा काळा घेवडा पुण्यात सुद्धा आठवडी बाजारात मिळायचा./मिळेल

तुम्ही वाईकर आहात म्हणजे नक्कीच काळा घेवड्य च्या प्रेमात असणार.
पण लागतो खूप चविष्ट.

पावटे आणि वाल वायले.

हे दोन्ही वेगळे प्रकार आहेत.
मी पावटा सुकवलेल्या असतो त्याला च वाल समजतो होतो.

<<<काळा घेवडा म्हणजेच ब्लॅक बीन्स म्हणजेच काळ्या रंगाचा राजमा हा आकाराने लहान असतो>>> याला आम्ही काळे दिडगे म्हणतो. आमच्या गावाकडे तसेच बेळगावात खूप आवडीने खातात. आम्ही गावी गेलो की नक्की आणतो.

बाकी आम्ही कडधान्य जास्त खात नाही. क्वचित कधीतरी काळे वाटाणे, काळे अन लाल चणे, काबुली चणे खातो. वाल किंवा सोले सिझनला बनतात, मसूर आमटी आवडते तेव्हढी बनते वारंवार.

काळ्या वाटण्याचं अन काळ्या दिडग्याचे कढण मात्र अतिशय आवडीचे. कटाची आमटी किंवा मटण रस्सा सुद्धा फिका पडतो अशी चव असते

डबल बी?>> हे तेच का ज्याचा आकार रुपयाच्या नाण्याइतका मोठा असतो. गोल, चपट. थोडं पिठुळ लागतं खाताना. चवीला देखील इतर कडधाण्यात अधिक उजवं असावं. बहुतेक मावळात आमटी खाल्लेली आठवते. इतर कुठे मिळते का ते देखील ठाऊक नाही.

फिल्मी >> हो तेच. फार मोठं असतं आकारनी.
पांढऱ्या रंगाचं असतं.
आमच्या मेस मध्ये करायचे डबल बीची उसळ.
मला तर त्याचा आकार पाहून घेरी यायची बाकी होती.
आणि पाहून कससंच झालं.
इतरांना आवडतं असेलही मला वाटलं ते सांगितलं.
इकडे भाजी बाजारात एक दोनदा दिसलेलं.
भा जी वाल्या काकांना विचारलं हे डबल बी आहे का तर हो म्हणाले.

ओह, मोठे वाल,
फणसाच्या बिया घालून छान होते की ह्याची भाजी. बेळगावात करतात ही, खूप असते विकायला

आज वालाची उसळ अनेक वर्षांनी आम्ही सगळ्यांनी खाल्ली. मस्त वाटलं. धन्यवाद सर्वांना. मुलाला (आणि आम्हाला पण) सर्व काही खाण्याची सवय लावायची आहे म्हणून हा सारा खटाटोप. अजून येऊद्या मंडळी कडधान्यं.

पटेल ब्रदर्स आहे का पुण्यात. मिक्स कडधान्ये एकत्र मस्त असतात त्यांची. तशी एकत्र उसळ महिन्यातून एकदा तरी करते मी. तीन प्रकारचे वाटाणे, तीन प्रकारचे हरबरे छोल्यासहीत, दोन प्रकारच्या चवळी, मुग,मसूर, मटकी, पावटे, राजमा हे आठवतायेत ठळक. अजून असतील काही पण इतके प्रकार असतातच.

कळण म्हणजे कढण पण मस्त होतं याचं.

डबल बी म्हणजे नक्की लिमा बीन्स का? थोडी वेगळी वाटते चव. आणि दिसायलाही पुण्यात मिळायच्या त्या डबलबी अजून मोठ्या आणि छान लाल पंढर्‍या मिक्स रंगाच्या असायच्या. आई डबलबी ची भाजी करते, डबलबी भात पण मस्त होतो. म्हणजे खिचडीच, फार काही फॅन्सी नाही.

Double B
काय आहे हे माहीत माहीत नाही
. पण नव नवीन माहिती मिळत आहे .
छान माहिती मिळत आहे.

पटेल ब्रदर्स आहे का पुण्यात. मिक्स कडधान्ये एकत्र मस्त असतात त्यांची>>> नेहमीच्या किराणा मालाच्या दुकानात हवी तेव्हढी कडधान्ये मिसळून भाव करून मिळेल ना.

<<<पटेल ब्रदर्स आहे का पुण्यात. मिक्स कडधान्ये एकत्र मस्त असतात त्यांची>>> dmart मध्ये पण मिळतात की मिक्स कडधान्ये. मम्मी रात्रभर भिजवून मिक्सर मध्ये वाटून आप्पे , डोसे किंवा भज्या करते कारण त्यांच्या उसळी की भाज्या आम्ही खात नाहीत

डी मार्ट थोडं लांब आहेना त्यामुळे डोक्यात नाही आलं, सटीसहामाशी कधीतरी कपडे खरेदीसाठी जातो तिथे. आता कधी गेले तर बघेन मिक्स कडधान्य तिथेही.

वर कढण बद्दल लिहिलंय. त्याची थोडक्यात रेसिपी लिहा ना कोणीतरी pls. माझ्या मावशीकडे असताना एकदा सर्दी झाली असता तिने हे केलं होतं आणि अहो आश्चर्यम, सर्दी गायब दुसऱ्या दिवशी. त्यादिवशी या नादात तिला पाकृ विचारायची राहिली. फार मस्त लागतं हे चवीला याच पावसाळ्याच्या दिवसांत करतात.

आमच्याकडे मूग, मटकी, कुळीथ मोड काढून, राजमा, मसूर, सफेद चवळी, लाल चवळी, कडवे वाल, लिमा बीन्स, नेव्ही बीन्स, आख्खी तूर..वापरतो.. लिमा बीन्सला ३ ऐवजी २ शिट्ट्या करायच्या .. नाहीतर पिठूळ लागते..

शेंगदाणा (भुईमुग), ह्याचे दोन प्रकार होते.
एक उपट्या आणि एक पसऱ्या.
Upatya प्रकारचे भुईमाग चे पीक तीन महिन्यात यायचे आणि त्या शेंगदाण्याचा रंग गडद लाल असायचा त्याचा मुख्यत्वे उपयोग तेल काढण्यासाठी केला जायचं त्या शेंगदाण्या मध्ये तेलाचे प्रमाण जास्त असायचे.
दुसरा pasrya भुईमुग ह्याला जपानी भुईमुग सुद्धा म्हणत असतं.
त्याचे झाड जमिनी मध्ये पसरत असे आणि शेंगांचे प्रमाण सुद्धा जास्त असायचे.
ते पीक येण्यासाठी 4 ते 5 महिने लागायचे.
हे शेंगदाणे चा वापर मुख्यतवेकरून खाण्यासाठी केला जातो.

आम्ही मोड न काढताच शिजवतो > कमला, मूग , मसूर, चवळी न भिजवता डायरेक्ट शिजवते मी , पण मटकी पण अशी होते का? मोड न आणता चांगली लागते का

हुलगे आणि कुळीथ वेगळे का? >>>
एकच. Happy
काळे पोलिस >>> मेधावि, तुम्ही वाईच्या का?
विक्रम सिंह >>>
काळे पोलिस माझेही फेवरेट.

मटकी पण अशी होते का? मोड न आणता चांगली लागते का

नवीन Submitted by रावी~~आमच्या भागात मंगळागौरीला मटकीची उसळ, मोदक,खिचडी असा पारंपरिक बेत असतो.आम्ही आज मटकीची उसळ केली.पण माझी मंगळागौर नव्हती Wink Light 1
तर, आमच्याकडे मोड न आणता करतो आम्ही. ( भिजवली होती, लवकर शिजावी म्हणून भिजवत असतील)चांगली लागते. प्रत्येकाची पद्धत, आवड वेगवेगळी.
रच्याकने , माझ्या हॉस्टेलमधे दररोज उसळी करत म्हणून मला फार आवडत नाहीत पण आमच्या भागात जास्त भाज्या मिळत नाहीत म्हणून उसळी कराव्या लागतात.

Pages