सोपे तरीही हेल्दी :-)

Submitted by sneha1 on 9 August, 2020 - 16:48

मला साध्या सोप्या, पटकन होणार्‍या तरीही हेल्दी शाकाहारी रेसिपी सुचवा ना प्लीज. कार्ब, प्रोटीन आणि व्हेजी असे सगळे ग्रूप पण असतील अशा. अंडे चालेल कधीतरी.

उदाहरण म्हणून :
१) साग चना आणि पोळ्या. फ्रोझन स्पिनाच आणि कॅन्ड छोले वापरून पटकन होईल.
२)मोड आलेल्या मटकीची उसळ, व्हीट ब्रेड आणि कांदा टोमॅटो को. मि.
३)दाल पराठा, एखादी सुकी भाजी आणि रायता किंवा दही.
४) व्हेज फ्राईड राईस आणि एग फ्राय किंवा टोफू

मेनू जमवून ठेवले की काय करायचे हा प्रश्न पण सुटेल आणि तोच तोच पणा राहणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. सोबा नूड्ल्स - हव्या त्या भाज्या, टोफू इ घालून करायच्या. भरपूर रेसिपी आहेत यूट्यूबवर
२. पेसरट्टू - हिरव्या मूगाचे डोसे.
३. सँडविच - भरपूर प्रकारे करता येतं. http://300sandwiches.com/recipes/lunch/ काही व्हेजिटेरियन सॅंडविचेस आहेत इथे.
४. हे ढकल ते ढकल थालीपीठ... (रेसिपी ठराविक नाही पण नखभर उरलेलं वरण्/भाज्या असलं काय काय घालून केलेलं थालीपीठ. पारंपारिक थालीपीठापेक्षा हे चविष्ट लागते Wink )
५. ठेपला. तरला दलालच्या वेबसाईटवरचे जमतात.
६. लसणाची फोडणी असलेली उकड (उकडपेंडी) - जेवायला दिली तरी चालते मला. Happy

धन्यवाद सीमंतिनी.

मनीम्याऊ, तो धागा आहे ग माझ्याजवळ. पण ह्यावेळी कार्ब, प्रोटीन आणि व्हेजी असे सोपे मेनू कॉम्बिनेशन बघते आहे जरा. वरती हे लिहायला विसरली आणि आता टाकता येत नाही.

स्नेहा मी लिहिल्या आहेत , या तिन्ही सोप्या व शाकाहारी आहेत जमल्यास बघं.
https://www.maayboli.com/node/75104
या पास्त्यात पालक घालू शकतेस बारीक चिरलेला.

बघितले अस्मिता. छान आहेत तिन्ही.
हमखास पाकसिद्धी म्हणजे जयश्री देशपांड्यांचे पुस्तक ना? छान आहे. मी पण वापरते.

दुधीचा डोसा, सोपा आणि हेल्दी.
तासभर तांदूळ भिजवून वाटायचे, वाटतानाच दुधीच्या फोडी, हिरवी मिरची,जीरे घालायचे. छान मऊ डोसे होतात.

मी बनवलेले प्रमाण सांगते,
(200ml cup size)
1 कप raw rice,
1 कप dili rice/ boiled rice,
1litr बाटलीच्या आकाराचा दुधी,
ग्राईंड करताना लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची जे आवडत असेल ते, जीरे, सौंफ, 3-4 पाकळ्या लसूण,जरासं आलं घालायचं.

इडली सांबार
बिसी बेळे भात
एक उकडलेले अंडे + चीझ सॅण्डविच, एक चटणी आणि भाज्या सँडविच
भरपूर भाज्या घालून हांडवो ,
ब्लॅक बीन सूप + व्हेजी केसाडिया किंवा टाको
कॅन छोले / व्हाइट बीन आणि इतर भाज्या घालून टॉमेटो सॉस आणि पास्ता
व्हेज लसान्या
लेट्यूस्,टोमेटो , सॉटेड मश्रूम घालून ब्लॅक बीन बर्गर / बीयाँड बर्गर
सॅलड आणि क्ग भुर्जी + पाव
मजादरा (mujadara) आणि त्झाझिकी सॅलड ( अरेबिक बीन्स + राइस )
स्पॅनिश पटेटो ऑमलेट - torta espanola
फलाफल , पिटा आणि सॅलड
भरपूर कॅप्सिकम घालून व्हेजीटेरियन मापो टोफू आणि भात

केजन स्टाइल रेड बीन्स आणि राइस

खिचडी आणि सार. बरोबर काकडी-टोमेटॉच्या चकत्या
दाल-पकवान आणि बरोबर ताक आणि कोशिंबीर
दुधी/पालक्/कोबी अशा कोणत्याही भाजीचे मुटके करून ठेवायचे. तिळाच्या फोडणीत परतून खिचडी प्रकाराबरोबर किंवा तुकडे करून, भातात घालून पुलाव टाईप किंवा ग्रेवीत घालून पोळी/पराठ्याबरोबर

भाजीचा कीस, हळद, हिंग, मीठ, तिखट, तीळ, कोथिंबीर, आणि ज्वारी, बाजरी, राजगिरा, शिंगाडा, नाचणी, बेसन अशी हवी ती पिठं, एक किंवा जास्त घालून, पीठ भिजवा. त्याचे लांबट रोल वळा किंवा छोटे छोटे गोळे करा. वाफवा.
हवे तसे वापरा.

हे मुटके..फ्रिज मध्ये १ आठवडे राहतात.. अळूवडी रोल वाफवून ठेवतात.. तसेच..
मुटके म्हणजे थोडा फार फरकाने मुठीयाच असतो..