La Flor del amor - Blossom of love (भाग २)

Submitted by कविन on 20 July, 2020 - 04:40

भाग १
___________________________________________
भाग २ -

पुढले काही दिवस मुंबईच्या लाईफ लाईनची ओळख होण्यात आणि प्रभादेवीच्या ऑफीसमधे रुळण्याचा प्रयत्न करण्यात गेले.

जय सांभाळून घ्यायचा म्हणून सोपं झालं ॲडजस्ट होणं, तरी संध्याकाळी इतकी आंबून जायचे की वाट वाकडी करुन 'खळी' बघायला जायचाही उत्साह उरायचा नाही. जय माझा इथला सिनियर असला तरी एकदम कूल होता. जाईला फोटो दाखवला जयचा तर म्हणे त्या खळीवाल्यापेक्षा हा किल्लर आहे.
जाई काहीही म्हणो पण खळी ती खळी शेवटी. हम्म! पण हे ही खरय की खळी प्रकरण तसं लांबूनच ठिक होतं. डोळे शेकायला बेस्ट होतं. फार फार तर बाबाशी मारायच्या गार्डनगप्पा त्याच्याशी मारता आल्या असत्या. म्हणजे मैत्री होऊ शकली असती प्रयत्न केले मी तर. बाकी समोरुन सिग्नल मिळण्याची शक्यताही नव्हतीच. 

आज घरी आल्यावर पहिले दिसली गुलाबी आणि पिवळ्या गुलाबाची फुलं. जाईला विचारल तर म्हणे तुझ्या हॉटच्या नर्सरीत गेले होते आज दुपारी. 

खसकन स्वप्नातून ओढून बाहेर खऱ्या जगात आणावं तसं वाटलं. हा पॅटर्न ओळखीचा होता. तिच्या कॉलेजमधे रोझ डे असला की ही एव्हढी गुलाबाची फुलं घेऊन जाई घरी, यायची पिवळी, गुलाबी आणि लाल गुलाबाची फुलं. मी बरेचदा ऱोझ डेला दांडीच मारायचे आमच्या कॉलेजला, मला कायम मित्र मैत्रिणी कबूतर म्हणूनच ट्रिट करायचे, मिळायचा मलाही पिवळा गुलाबी गुलाब पण ज्याच्याकडून मिळावा अस वाटायचं त्याच्याकडून कधीच नाही मिळायचा. तिला मात्र सहज मिळून जायचा.

तोंडावर सपसप पाणी मारत मी मनातल्या विचारांनाही उडवून लावायचा प्रयत्न केला . मी कधीच जेलस नव्हते झाले यावरुन आणि यापुढेही नाहीच होता कामा जेलस. पण थोडसं वाईट तर वाटतच ना? ते नाही थांबवता येत ठरवूनही मला. तोंड पुसून बाहेर येत मी तिला म्हंटलं, "क्या बात है जाई, तुझ्या रोझ डे ची आठवण आली मला फुलं बघून. काय मग स्पेशल?"

यावर म्हणे, "स्पेशल कसलं आलय डोंबलाचं.
बॉसच्या बड्डेसाठी बुके घ्यायला मी आणि मोहना गार्डनियात गेलो, तेव्हा त्याने निघताना हे दिले कॉंप्लिमेंटरी."

"कॉंप्लिमेंटरी कोण देतं गुलाब? हॉट का ना दिल आ गया कुडी तेरे पे." मी कॉफी घेऊन बाल्कनीत तिच्या बाजूला येत म्हंटलं तर म्हणे, "यात काही मेसेज बिसेज लपला नाहीये येडू."

ती काहीही म्हणूदेत पण मला माहिती होतं हे असच असणार कारण नेहमी असच तर असतं. तिला पटत नसलं तरी ती दिसण्यात माझ्यापेक्षा खूप जास्त उजवी आहे आणि हे मला शाळेतही तिच्या फॅन फॉलोइंगने जाणवून दिल होतं कायम. मुलं माझ्याशी मैत्री करायची कारण त्यांना तिच्याशी ओळख करुन हवी असायची. पण मला कधीच तिचा हेवा वाटला नाही कारण ती माझी एंजल आहे. 

मी पहिलीत तिच्या शाळेत तिच्या वर्गात दाखल झाले. पण पहिली एक दोन वर्ष मी इतकी बुजरी होते कि ममाला म्हणजे मा'ला माझी खूप काळजी वाटायची. मी सिनिअर केजीत असताना डॅड गेला. तो गेला म्हणजे आता कधीच येणार नाही हे देखील नीट कळलं नव्हतं आधी.
डॅड असताना मी कायम डॅडच्या अवतीभोवती असायचे आणि त्याच्या अपघातानंतर म्हणे मी एकदम गप्प गप्प झाले असं 'मा' सांगायची. जाई पहिली मैत्रिण माझी. तिच्यामुळे मी परत नॉर्मल झाले आणि तिच्यामुळेच मला बाबा मिळाला.
तिची आई डिलिव्हरीच्यावेळी कॉंप्लिकेशन्स होऊन गेली. आईबरोबरच जुळ्या बाळांपैकी एक बाळही गेलं आणि मग घरात राहिले जाई आणि बाबा. मी जाईच्या घरी खेळायला गेले तरी तिच्यापेक्षा जास्त मी बाबासोबत गार्डनमध्ये रमायचे आणि जाई आजीच्या घरी खेळायला आली की बाहेर भातुकली खेळायच्या ऐवजी 'मा' बरोबर किचनच्या ओट्यावर बसून भातुकली खेळायला लावायची. ममाला 'मा' म्हणायची सुरुवात तिनेच केली. तिच्यामुळे मला नुसती एक मैत्रिण नाही तर पूर्ण फॅमिली मिळाली.
त्यामुळे ती माझ्यापेक्षा सुंदर आहे, उंच आहे, माझ्यासारखी इंट्रोव्हर्ट नाही, मुलं माझ्याशी मैत्री तिच्याशी ओळख व्हायला करतात असल्या कुठल्याही चिटूरपुटूर कारणांनी मला तिचा कधीही हेवा वाटत नाही आणि वाटणारही नाही. बहुतेक मगाशी जे वाईट वाटलं त्याचं गिल्ट येऊन हे सगळं मागचं मनात झरझर दाटून आलं असावं.

"ओय्य ड्रिमगर्ल! कुठे हरवलीस?" जाईने माझ्या चेहऱ्यापुढे टिचकी वाजवत विचारलं 

"मला वाटतय तो तुला लाईन देतोय" मी माझ्या विचारांतून बाहेर येत तिला म्हंटलं

"चल बे चंपू." माझ्या डोक्यावर हलकेच टपली मारत तिने ऐकवलं

"अगं खरच. ही फूलं बघ ना. अस कोण देतं कॉंप्लिमेंट्ऱी उगाचच. गेल्यावेळी तू गुलाबावरुन त्याची खेचली होतीस ना" माझी थिअरी चुकीची निघाली तर भारी वाटलं असतं पण ते तसं नाही होणार या आजवरच्या अनुभवावरुन मी माझं मत तिला ऐकवलं.

"क्कायतरी येडपट डॉट्स जोडू नकोस उगाच. इतका महाग बुके घेतला त्याच्याकडून म्हणून पाच सहा फुलं दिली त्याने आपली. त्यातलही एक पिंक रोज मोहना घेऊन गेली तिच्या ड्रेसला मॅचिंग होतं म्हणून." कॉफीचा घोट घेत ती म्हणाली.

"सायु तुला सांगते एक पर्पल रोज होतं त्याच्याकडे." ती पुढे म्हणाली.

"पर्पल? म्हणजे लाईट पर्पल लवेंडर रंगाचं?" मी विचारलं.

"हो मॅडम. पुढच तर ऐका. तर मी त्याला म्हंटलं, इतकी सगळी फूलं कॉंप्लिमेंटरी देण्यापेक्षा ते पर्पल रोज दे मला एकच, माझ्या ड्रेसला मॅचिंग आहे. तर म्हणे 'that is not meant for you'. त्याऐवजी एक गुलाबी रंगाचं जास्त घे."

"He is too mad sayu, I am telling you." कॉफीचा कप माझ्या हातात देत ती म्हणाली 

जाईच्या या रिप्लायने तर माझ्या काळजाचा ठोकाच चुकवला. मन मे लड्डू फुटा वाली फिलिंग्ज. माझ्या मगाशी मांडलेल्या थिअरीला क्रॅक पाडायचं काम या वाक्याने केलं.

"Its ok जायडे. थोड क्रेझी असणं चांगलं असतं." मी गिरकी घेत आत जात तिला उत्तर दिलं. ती आता gone mad अस पुटपूटली असणार खात्रीने. पण तिला काय माहिती त्या एका वाक्यात काय जादू होती ते. 

"Yellow rose represents friendship, pink represents gratitude and admiration but purple one is special because it represents love at first sight." रोझ डे वरुन घरात गप्पा आणि किश्श्यांना उधाण आलं होतं तेव्हा बाबाने सांगितल होतं हे. 

आजची रात्र खरोखर स्विट ड्रीम्सचीजाणार होती. उद्या वाट वाकडी करुन बघायला हरकत नाही असं मी मनाशी पक्क केलं.

झोपायच्या आधी फोन चार्जिंगला लावावा म्हणून उठले तर जाई म्हणे, "सायुss उद्या रुहीने संध्याकाळी घरी बोलावलय नवीन घराची पार्टी द्यायला लक्षात आहे ना तुझ्या?"

शनिवारी बोलावलय अगं, मी परत बेडवर आडवं होत उत्तर दिलं 

मॅडम उद्याच आहे शनिवार

हे ऐकल्यावर मी तंद्रीतून खाडकन बाहेर येऊन कॅलेंडर चेक केलं. पण आता एक गडबड झाली होती. मी क्लाएंट विझीटकरता असिस्ट करायच कबूल करुन बसले होते. आणि नेमकी पोस्ट लंच विझिट होती. खरतर माझा विकली ऑफ असला तरी क्लाएन्टला त्यादिवशी वेळ होता आणि ट्रेनीने शिकण्याची कुठलीच संधी सोडायची नाही हा मंत्र असल्याने जावं तर लागणारच होतं आणि सुट्टी असली तरी आधी ऑफीसमधे पेपरवर्क करुन मगच एकत्र जायच ठरवल होतं. तसा फार काही प्रॉब्लेम नव्हता. क्लाएंटच ऑफीस बॅंड्रा कुर्ला कॉंप्लेक्समधे होतं. मला फारशी आयडीया नसली तरी जयच्या मदतीने ओला उबेर करुन मी परस्पर तिच्या घरी पोहोचू शकणार होते. पण या गडबडीत तिच्यासाठी गिफ्ट आणि खाऊ काहीच घ्यायला वेळ काढण मला जमणार नव्हतं.  

हे समजल्यावर जाई पण थोडी विचारात पडली. तिच्या प्लॅननुसार घरातून थोडं लवकर निघून तिच्यासाठी छोटसं गिफ्ट आणि खाऊ घेऊन जायच होतं. "खाऊ एकवेळ मॅनेज करेन पण गिफ्टच काय करायच? हे गिफ्ट निवडण वगैरे कायम तुझ्या खात्यात ठेवते मी. मला फार काही सूचत नाही आणि आता ऑनलाईन ऑर्डर करायलाही वेळ नाही. काय करुया?" तिचा प्रश्न ऐकून मी ही आठवायला लागले काय घेता येईल आणि मी हॉलमधून बेडरुमच्या टेबलवर आणून ठेवलेल्या फुलांकडे लक्ष जाऊन मला एकदम उत्तर मिळालं 

तू गार्डनियात जाऊन एखाद रोप घे. माझ्या या वाक्यावर जाई म्हणे, "नको नको रोप नको. ती अजिबात काळजी घेत नाही झाडांची. तिच्या १८ व्या वाढदिवसाला तू ॲमेझॉनवरुन शोधून तिला कॅलेथेलियाच रोप भेट दिलं होतस आणि एक सुंदर 'फोटो  कोलाज फ्रेम' दिली होतीस"

"हो आठवतय ना. इतकी का शोधाशोध करतेस? तिला असल्या एक्झॉटिक गिफ्टचं काही अप्रूप नाही. घेऊन टाकू आर्चीसमधून काहीतरी ऑन द वे अस म्हणाली होतीस तू. आणि एकदम करेक्ट ॲनालिसीस होतं तुझं." मी म्हंटल.

Do you know Jaee! Calathea symbolises a new beginning and the expression 'to turn over a new leaf'.  

पण तिने जराही काळजी नाही घेतली त्याची. जस्ट मरु दिलं त्याला. त्यामुळे आता रोप नकोच. जाईने डिक्लेअर केलं 

"Its ok. She is not a garden person. पण फ्रेम अजून जपून ठेवलेय तिने, बघितलीस ना त्यादिवशी व्हिडीओ कॉलमधे? तिच्या इथल्या घरात कॉर्नर टेबलवर आहे बेडच्या बाजूला?"

"हो हे मात्र खरय. पण तरीही झाड हा पर्याय बाद हा सायु."

"ओके मॅम No more mudering of plants. पण फूलं तर चालतील ना?. तू गार्डनियात जा आणि छानसा बुके घे आणि कॉर्नरच्या स्विट कॉर्नरवरुन जमल तर मिठाई घे. नाही जमल तुला तर सांग मी मिठाई घेते येता येता.प्लीज!!" मी तिला मस्का मारत म्हंटलं.
गिफ्ट काय घ्यायच यावर विचार करायला लागणार नाही म्हणून तिनेही ते पटकन मान्य केलं. 

खरतर हे गिफ्ट मला जाऊन आणायला आवडलं असतं. काही नाही तर 'मिस्टर हॉटची' झलक तरी दिसली असती. आता वाट वाकडी करायचं काम अजून एक दिवसाने पुढे गेलं. 

"गूड नाईट" दिवा बंद करत जाई म्हणाली

"स्वीट ड्रिम्स" म्हणत मी पण पांघरूण ओढून घेतलं. 

क्रमशः

भाग ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद ॲंजेलिका, मामी, कुसुमिता, प्रि तम, अवल, जाई, सामो, धनुडी, केदार, जुई, मोहिनी आणि मनीम्याऊ Happy