La Flor del amor - Blossom of love (भाग ३)

Submitted by कविन on 21 July, 2020 - 01:39

भाग २
____________________________________________

भाग ३:-

दुसऱ्या दिवशी क्लाएंट मिटिंग त्यामानाने लवकर आटोपली. ऑफीसच्याच वॉशरुममधे मी पटकन कपडे बदलून जरा केस ठाकठीक केले. बटन टॉप कानातले बदलून मॅचिंग डेझी प्रेस्ड फ्लॉवरचे लोंबते कानातले आणि त्याला मॅचिंग पेंडंट घातलं. हिरव्या रंगाच्या कुर्त्यावर नाजूक ऑफ व्हाईट एंब्रॉयडरी आणि खाली ऑफ व्हाईट सिगारेट पॅन्टवर हे व्हाईट रंगाच्या डेझीचे कानातले कायमच खुलून दिसतात. मला हे कानातले या ग्रिन रंगाच्या ड्रेसवर तर विशेष आवडतात. ड्रेस आणि कानातल्यांची पुरेशी तारीफ करुन मी लायनरची बारीक रेघ ओढली आणि न्युड लिपस्टिक लावून पंधरा मिनिटात सगळा मेकओव्हर करुन बाहेर पडले. 

"वॉव! Looking beautiful. खरं सांग मैत्रिणीकडे जात्येस की डेटला जात्येस?"  जयने नाटकी आवेशात विचारलं.  जय माझा सिनियर असला आणि मी जस्ट ट्रेनी असले तरी तो माझा या ऑफीसमधला पहिला मित्र. थोडा फ्लर्टी आहे पण मनाने मोकळा आहे. प्युन स्टाफ ते रिटायरमेंट जवळ आलेला सिनियर आर्किटेक्ट यापैकी कोणालाही तो 'You are looking beautiful today' हे अत्यंत सहज ऐकवतो. 

माझ्या चेहऱ्यावरचा अविश्वास बघून तो म्हणे, " खरच सांगतोय. गर्लफ्रेंड शप्पथ."

त्याचा नाटकी आवेश बघून हसू आवरत म्हंटलं, "सोडतोस का मला तिच्या घरी? म्हणजे समोरासमोरच काय ते कळेल तुला" 

"नक्को जा तू तुझ्या वाटेने. तुला देतो ओला कॅब बूक करुन. नाहीतर माझी गर्लफ्रेंड ब्रेकअप करायची आणि विकेंड खराब जायचा माझा." लिफ्टमधून खाली येता येता त्याने उत्तर दिलं. 

आम्ही लिफ्ट मधून बाहेर पडलो आणि जाईचा फोन आला. मी निघाल्याचं ऐकल्यावर बाईसाहेबांचा जीव भांड्यात पडला. परत पाच मिनिटात फोन वाजला, ओला कॅबमध्ये बसता बसता कॉलर आयडी बघितला तर जाई कॉलिंग दिसलं. कारचं दार लावत खिडकीतून फोनची स्क्रिन फ्लॅश करत मी जयला म्हंटलच, "आमच्या बहिणाबाईंना गिफ्ट सिलेक्ट करायच म्हंटलं की पॅनिक ॲटॅक येतो. एरव्ही हे काम सरळ माझ्यावर ढकलून मोकळी होते ती"

"ती माझी जुडवा असणार. मलाही येतो पोटात गोळा, गिफ्ट निवडायच म्हंटलं की. आता बरं समजलं, मी पण आता तुलाच नेणार गिफ्ट घ्यायला जाताना. ऑल द बेस्ट टु यु. बाय", अस म्हणत तो त्याच्या बाईकवरुन गेला आणि कॅब ड्रायव्हरला पिन नंबर सांगून होईपर्यंत परत तिचा कॉल वाजला. फोन उचलून तिला बोलायची संधी न देताच म्हंटलं, "बेब्ज त्या हॉट चिप्सला सांग तो बरोबर निवडून देईल तुला बूके"

पलिकडून एक सेकंद शांतता आणि मग हस्की आवाज आला.. "हॅलो! प्रणव बोलतोय. जाईने कॉल लावून माझ्याकडे दिलाय."

आता हे वाक्य ऐकून माझा पुतळा झाला 

"ओह शीट" मी जीभ चावत पुटपुटले 

सॉरी?? पलिकडून विचारणा झाली.

मी कसबसं वेळ निभावून नेत जाईने
कोणते बुके शॉर्टलिस्ट केलेत विचारलं, त्यावर 'यल्लो & व्हाईट रोजेस', 'ग्रीन बटन मम & व्हाईट डेलीज', 'ब्ल्यू ऑर्किड्स' आणखीही असे अजून चार पाच पर्याय सांगितले त्याने. 

मला अशी नुसती नावं ऐकून निवड करता येत नव्हती. एकतर मी मगाशी स्वत: खड्डा खणून त्यात पडले होते. त्याबद्दलही मनात स्वत:लाच टपल्या मारत होते आणि दुसरं म्हणजे त्याचा आवाज बऱ्याच दिवसांनी ऐकत होते. त्यामुळे कानावर नुसते शब्द पडत होते पण मन त्याला फोन पलीकडे बोलताना इमॅजीन करण्यात गुंतलं होतं.

शेवटी मी सरळ सांगून टाकलं की, "तुला जे आवडेल ते दे. मला असं नुसतं ऐकून नाही निवडता येतेय."

Ok. No problem तो म्हणाला 

Good. Thanks मी रिलॅक्स होत म्हंटल

Wait. व्हिडीओ कॉल करु का?

ऑ? त्याच्या या प्रश्नाने सटपटून फक्त ऑ हा एकच शब्द निघाला घशातून.

"म्हणजे कॉलवर दाखवतो सगळे बुके" त्याने एकदम सहज म्हंटलं.

ह्म्म 

Its ok. नसेल चालणार तर ..

"नाही. ह्म्म … नो प्रॉब्लेम" मी अजूनही हे हवय पण आणि नकोय पण या द्विधा मनस्थितीत होते. म्हणजे व्हिडीओ कॉल आवडला तर असताच पण मग अस समोर बघत बोलायचा आत्मविश्वास कुठून आणला असता मी हे न कळून नकोच ती एंबॅरेसिंग अवस्था असं वाटत होतं. इतकं सगळं डोक्यात धावत असूनही तोंडातून मात्र 'ह्म्म, ओके, नो प्रॉब्लेम' असे प्रतिसाद बाहेर पडत होते.

"Ok good. मग मी व्हिडिओ कॉल लावतो आधी हा नंबर सेव्ह करतो.", त्याने अस बोलून फोन कटही केला आणि मी बंद स्क्रिनकडे बघत बसले पुन्हा फोन वाजायची मनातून वाट बघत.

पुढल्या दोन मिनिटात अननोन नंबरवरुन व्हिडीओ कॉल आला. धडधडतच मी कॉल उचलला. समोर त्याचा क्यूट चेहरा, तो सुद्धा इतक्या जवळ!
यावेळी खळी बरोबरच त्याच्या ओठांनी, हलक्या वाढलेल्या दाढीने आणि कपाळावरच्या उभ्या आठीने माझ्या हार्मोन्सचा झोका पार वर जाऊन आला. मोबाईल स्क्रिन ऐवजी प्रत्यक्ष इतक्या जवळ तो आला तर मी या झोक्याला थांबवू शकेन का?अशी शंका आली मनात. 

हॅलो! how are you? त्याच्या प्रश्नाने मला वास्तवात आणलं 

I am good. मी उत्तर दिलं. उत्तर देतानाही मी मगाशी त्याला चुकून त्याच्याच तोंडावर  हॉट चिप्स म्हंटलं हे आठवून लाजून लाल व्हायला झालं.

nice to see you again. 

बोलताना त्याच्या चेहऱ्यावरचा दिसणारा उत्साह आणि आनंद माझा भास होता की  सत्य माहिती नाही. 

आम्ही दोघांनी मिळून 'व्हाईट डेझी आणि ग्रीन बटन मम फुलांचा लंबगोल वाज मधला बुके फायनल केला.'

"व्हाईट डेजी कायमच हिरव्या रंगासोबत खुलून दिसतात just the way your earrings looks" त्याच्या वाक्याचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचेपर्यंत त्याने "Adios. Hasta la vista" म्हणत फोन ठेवूनही दिला.

फोन कट झाल्यावर रुट मॅप बघितला तर मला पोहोचायला अजून अर्धा-पाऊण तास तरी नक्की होता.  सगळी खरेदी आटपून जाईने आत्ता जरी टॅक्सी केली तरी ती माझ्या आधी पोहोचेल तिथे. कानात वायरलेस ब्ल्युटूथ हेडफोन घालून माझ्या प्ले लिस्टमधली गाणी लावून डोळे मिटून त्याचे विचार बाजूला सारुन रिलॅक्स व्हायचा प्रयत्न केला. जेमतेम दोन गाणी ऐकून झाली. 

आता यंदा कर्तव्य आहे सिनेमातलं गाणं सुरु होतं. 

"कधी दूर दूर, कधी तू समोर,
मन हरवते आज का" 

या ओळी वाजत असताना माझ्या बंद डोळ्यापुढेही हॉर्मोन्सचा झोका उंच नेणारा चेहरा येत होता. इतके इररेझिस्टेबल ओठ .. उफ्फ कल्पनेनेही ओठ थरथरले माझे. गाल लाल झाले आणि इतक्यात व्हॉट्स ॲपवर त्याचेच मेसेजेस फ्लॅश झाले. 

हाय! कारमधे असशील ना अजून? दमल्येस? hope I'm not disturbing your peace

मनात म्हंटल you have already disturbed my peace. But I am loving it.

पण प्रत्यक्षात रिप्लाय देताना मी फक्त not at all म्हणत एक स्मायली दिली पाठवून 

उद्या येऊ शकशील नर्सरीत?

??

नर्सरीचा हाफ इअरली बड्डे आहे

U r  kidding right?

yess actually. I think I am not a good lier त्याने विंक स्मायली देत मान्य केलं 

Ok Actually मी इकेबानाच वर्कशॉप केलं होतं गेल्या आठवड्यात. आज मी ट्रायल म्हणून काही रचना केल्या. मला तुला त्या दाखवायच्या होत्या.

तू फ्लर्ट करतोयस?

मेसेज सेंड केल्यावर एक क्षण मूर्खपणा केल्यासारखे वाटले. म्हणजे कुठल्या धुनकीत मेसेज केला मी देवजाणे. मनात असं बोलत असते मी त्याच्याशी एरव्ही पण प्रत्यक्षात ततपप होत असताना डायरेक्ट असा मेसेज टाईप करुन? जरा जास्तच वेडेपणा करायला लागलय मन अस वाटून गेलं पण खरं सांगायचं तर प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा हे अस लिहून टाकणं जास्त सोपं वाटत होत मला. मधेच आत्मविश्वास तर मधेच पोटात पाकपूक अस विचित्र कॉंबिनेशन का होतं त्याच्याशी बोलताना कळत नव्हतं मलाच. "घे ग थोडी ढील, हो रिलॅक्स" मन म्हणालं आणि बुद्धीने ऐकायचं ठरवलं.

नाssही त्याचा लगेच रिप्लाय आला.

ओके. मग जाईसाठी माझ्याकडे मस्का मारतोयस 

What? अस का करेन पण? ती तुझ्यापेक्षा जास्त वेळा भेटलेय मला. आणि आम्ही ऑलरेडी फ्रेंडझोनमधे आहोत. 

ह्म्म 

मला वाटलं तुला इकेबाना आवडेल बघायला. सुंदर कलाकृती सोबत त्यात एक फिलॉसॉफीपण असते म्हणून.

Sorry. 

Dont' be 

No really. I am sry. जाईशी ओळख वाढवायला मुलं माझ्याशी मैत्री करतात,आजवरचा हाच अनुभव आहे माझा.

oh! मग आता मी जाईशी मैत्री केली ते बर झाल म्हणजे तुझ्याशी ओळख वाढवता येईल

ऑ ??

just kidding. पण येत्येस ना उद्या? सकाळी येशील? १० वाजेपर्यंत? मी उत्तम कॉफी करतो अस सगळे म्हणतात.

ओके. Done. जाईला वेळ जमेल का विचारते एकदा आणि सांगते 

तिला पण घेऊन येणार आहेस? जोडीला ग्रंपी स्मायली टाकून त्याने विचारल्यावर मी पण विचारुन घेतलं लगेच .. "नको आणू म्हणतोस?"

माझी भिती वाटत असेल तर नो प्रॉब्लेम. ये घेऊन तुझा बॉडीगार्ड ;) 

शट अप. Lol भेटू उद्या. चांगली कॉफी मिस करु नये म्हणतात 

बाय 

बाय 

दहाच्या आधी आलीस तरी चालेल 

ओके बाय. उद्या भेटू. दोनवेळा जाईचा कॉल कट केला मी. आता भडकतील मॅडम 

ओके बाय take care. hasta mañana"

त्यालाही "si claro" असा रिप्लाय देऊन मी व्हॉट्स ॲप बंद केलं 

व्हॉट्स ॲप चॅट विंडो बंद केली तरी अजून धडधडत होतं 'इतकं कसं काय मॅनेज केलं मी बोलायचं हे आठवून.'

"आता आधी जाईला कॉल करायचा" बुद्धीने मनाला आठवण केली त्यावर "कल्पनेच्या वारुला सोडायचय उद्याच्या भेटीवर नंतर" अशी मनानेही एक टिपण्णी जोडून दिली. रुट मॅपनेही डेस्टिनेशन जवळ आल्याची पुष्टी केली.

क्रमशः

भाग ४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कथा
९० च्या दशकातील इंडी पॉप गाण्याचे व्हिडीओ कसे असायचे तसा सेट आहे. फ्रेश लूक

जाई. +१
(चांगल्या अर्थाने) जुन्या काळातलं वातावरण आठवतंय.

धन्यवाद जुई, जाई, केदार, वावे, सहेली Happy

कोरोना पार्श्वभूमीवर बऱ्याच निगेटिव्ह पॉझिटिव्ह बातम्या धडकून मन अस्वस्थ अशांत ते परत जरा नॉर्मल अस झोका घ्यायला लागलं होतं. मन गुंतवायला ही कथा लिहायला घेतली. गोडाचा ओव्हरडोस झाला तरी चालेल पण डार्क निगेटिव्ह टाळण्यासाठी लिहायच ठरवल्यामुळे मनाला त्यादिशेने कामाला जुंपलं. माझ्यापुरते तरी मेडिटेशनसारखे हे वर्क झाले. म्हणजे कथा म्हणून काय उतरलय ते मेडीटेशन नव्हे तर ती लिहीतानची प्रोसेस हे मेडीटेशन. त्यांची नावे ठरवणे, स्वभाव ठरवणे (ठरवणे म्हणण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून ऐकणे) त्यांच्या रहाण्याची वावरण्याची जागा मॅप काढून ट्रेस करुन येणे गार्डनिंग साईट्स आणि ब्लॉग वाचणे, या सगळ्यात बाकी विचार फिकट झाले म्हणून माझ्यापुरते मेडीटेशनचे काम केले अस मी मानते आणि इतकी मोठी क्रमशः कथा लिहायच स्वत:ला दिलेलं चॅलेंजही त्यानिमित्ताने पूर्ण झालं हा बोनस म्हणता येईल.

पुन्हा एकदा धन्यवाद, कथा वाचून प्रतिसाद देऊन हुरूप वाढवताय त्याबद्दल Happy

कवीन, क अर्धा करून वी ला जोडला तर क्विन! छान लिहिलं आहेस. नोत्र दाम वरून सेंत शापेल ला जाताना मार्शे ओ फ्लर मध्ये मी जायची पॅरिस मध्ये असताना. त्या दिवसांची आठवण आली. ते तुझं टायटल आहे ते "ला फ्लर द अामर" असे असायला हवे. la fleur d'amour. मिशेल पेपे चं गाणं आहे फ्लर द अामर. हे नुसतं सजेशन, कंपलशन नाही..! बाकी तुझ्या लिखाणाला फुलांचा सुगंध येतो, मस्त!

धन्यवाद एविता. बरोबर आहे तुझं. la, un वगैरे आर्टिकल्स वापरणं गरजेचेच आहे भाषेच्या नियमानुसार

पण तू सुचवले आहेस ते फ्रेंच आहे. मला स्पॅनिश अपेक्षित आहे. तरी flor de amor ऐवजी la flor del amor असायला हवे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद Happy

Kiti sunder lihites... Super ... Ata na kamat laksh nahi lagnar ... Sarkh chek krt basaych ala ka next part....

सुरेख सुरेख,
सगळंच किती छान आहे. या गोष्टी चा फ्लो, तिच्या सभोवतालच्या गोष्टी, एखादा पिक्चर, छान पिक्चर बघतेय, खरं म्हणजे सिरीयल बघतेय कारण पुढच्या भागाची उत्सुकता. एविताने म्हटल्याप्रमाणे सुगंधी लिखाण

कुठल्यातरी भागात एक रिप्लाय होता की नंतर काय बदल केला कळत नाही. त्याकरता जस्ट नोंदवते - एखाद दोन स्पॅनिश शब्द टाकायचे राहील्याची चुटपूट लागली होती. तेच फक्तं ॲड केले आहेत.