विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरं आहे लोकांना अक्कल च नाही !
बाटला हाऊस चक मक नंतर दुःखाने रात्र भर झोप न आलेल्या गांधी म्यादम ने पालघर हत्याकांड मध्ये साधू मारले गेले त्या घटनेत शब्द तरी काढला होता का ?
त्याच प्रमाणे वाड्रा बाई नी दुबे चकमक नंतर लगेच योगी ला टार्गेट केले , पण पालघर घटनेत कशी चुप्पी साधली होती ?
साधूंच्या ऐवजी जर पाद्री , इमाम मारले गेले असते तर या दोघी गप्प बसल्या असत्या का ?
याचा अर्थ यांना भगवा रंगा बाबत आंधळे पणा आहे का ?

मुख्य अडचण हीच आहे हो आपण असल्या गोष्टी विसरतो !

दुबे हिंदू असून एका पण हिंदू नी तो मारल्या गेल्याचे दुःख व्यक्त केले नाही.
पण अफजल,कसाब,आणि असे किती तरी मारले गेले की काही समाज दुःखात dubun जातो.आणि त्यांच्या बरोबर आपले नेहमीचे

काही मूर्खांना काळा आणि पांढरा हे दोनच रंग दिसतात का? मोदी सरकार विरोधात बोललं तर तुम्ही काँग्रेसी, नक्षली किंवा देशद्रोही!
एन्काऊंटर विरुद्ध बोललं की तुम्ही गुंडांना सपोर्ट करता? खरंच देशाची येणारी पिढी एवढ्या पोकळ विचारांची असेल तर कठीणच आहे..
>>>>>
Submitted by अजिंक्यराव पाटील on 12 July, 2020 - 15:09
>>>>>>>

अगदी खरं आहे.

मुद्दाम तुम्हाला एका गटात टाकले जाते,म्हणजे त्यांच्या सोयीनुसार पुढे चर्चा होते.

<< हो येणारीच म्हणावं.. इतके बालिश वादविवाद तेच करू शकतात.. >>

----- येणारी पिढी असे म्हणण्यापेक्षा असे विचार करणारी पिढी आज अस्तित्वात आहे... आणि मायबोलीवर त्याचे धागोधागी प्रत्यंतर दिसते.

सर्व थरातून सरकारच्या नाकर्तेपणावर टिका होते आहे.... दुबेला मोठे करण्यात सर्वांचाच हात भार आहे, तर कळायला काय हरकत होती ?

मारुन किती अपराध्यांचे अपराध झाकल्या गेले आहेत हे अजयकुमार बिष्ट यांनाच माहित असणार. ज्या पोलिसाने " स्वरक्षणार्थ " पळणार्‍या दुबेच्या छातीमधे ३ गोळ्या डागल्या असतील त्या घटनेचे रेकॉर्डिंग पण केले असेल.... पुढे कामाला येतात असे रेकॉर्डस. भविष्यात या घटनेतल्या पोलिसांना आणि अधिकार्‍यांना ब्लॅकमेल केले जाणार... आणि चौकशीच्या ससेमिर्‍यापासून रोज वाचण्यासाठी अजुन काही अधिक (सिलेक्टिव हत्याकांड) करायला भाग पाडले जाईल. गुजराथमधे अनेक हत्याकांडात विविध पोलिस अधिकारी (बंजारा, पांडे हे तर केवळ काही नावे आहेत... एकेकाळी घट्ट मैत्री होती) चौकशीच्या जाळ्यात अडकले होतेच. पंतप्रधान पदावर विराजमान होण्यासाठी हमखास यशाचा गुजराथ पॅटर्न अजयकुमार बिष्ट यांच्या डोळ्यासमोर तरळत आहे.

शेवटी... दुबे गुन्हेगार होता आणि न्यायालयिन मार्गाने त्याला कठोर शिक्षा मिळणे अपेक्षित होते. किचकट न्यायालयिन प्रक्रिया अवलंबण्यापेक्षा, पोलिसांनी त्याला बनावट चकमकीत झटपट मारणे आणि त्या मारण्याचे समर्थन करणारा मोठा वर्ग असणे हे लोकशाहीसाठी घातक आहे. देश अलगद पणे फॅसिस्ट शक्तींच्या विळख्यात गुरफटला जातो आहे....

<< पुढे काय >>

---- न्यायालयिन लढाई लढणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे, वेळ वाया घालवणे आहे हे पटवण्यासाठी IT सेल त्यांचा बहुमोल वेळ सत्कारणी लावत आहे...

मग अचानक राजस्थानचे टास्क मिळाले.... त्या अगोदरचे महाराष्ट्राचे मिळालेले टास्क आहेच (मि येणार... मी येणार... मी येणार... रोज पहाटे राज्यपालांना फोन करुन विचारत आहे.... मी आज येतो म्हणून).

गुजरात दंगल प्रकरणात मोदी शहा ह्याचेही असेच झाले असते तर देशाचा वेळ वाचला असता का ?>>>>

भरपूर....

राहुल, प्रियांका, तिची मुले... राज्यकारभार हाकायला समर्थ युवराज तयार होत होते, राजमाता सुखाने निवृत्तीची स्वप्ने पाहायला उत्सुक होत्या. लोकशाही निवांतपणे आगेकूच करणार होती... पण....

२०१८ मध्ये उ प्र त बुलंदशहर इथे सुबोध कुमार सिंग या पोलिस अधिकार्‍याची कथित गोरक्षकांच्या जमावाकडून हत्या झाली होती. आरोपी जामिना वर बाहेर आले तेव्हा त्यांचं भारत माता की जय, वंदे मातरम , जय श्रीराम अशा घोषणा देऊन स्वागत केलं गेलं.
मुख्य आरोपी शिखर अग्रवाल याचा नुकताच भाजप पदाधिकार्‍याच्या हस्ते सत्कार केला गेला. मोदी-योगीच्या योजना लोकांपर्यंत पोचवणार्‍या (!) संस्थेचा तो सचिव आहे.. हा शिखर अग्रवाल स्थानिक भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी होता.
आरोपींना जामीन मिळाला तेव्हा सुबोध कुमार सिंग यांच्या पत्नी भयभीत झाल्या होत्या. आता त्या म्हणतात, तुम्ही दुसरा विकास दुबे जन्माला घालत आहात.

<< आता त्या म्हणतात, तुम्ही दुसरा विकास दुबे जन्माला घालत आहात. >>
----- अनेक विकास दुबे अगोदरच आहेत. आपल्याला माहित नाही एव्हढेच. विकास दुबे ने ८ पोलिसांना मारले नसते तर त्याचे नावही आपल्याला माहित पडले नसते...

उत्तर प्रदेशात एका हिंदू कुटुंबातील 5 सदस्यांना मारून टाकले, अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला, त्यांचे अवयवही कापले. ही बातमी पूर्णपणे दाबली. (आशा घटना उत्तर प्रदेशात रोज घडतात म्हणून त्यांना काही विशेष वाटत नाही).
हिंदू भाजपला मते देऊन पूर्णपणे फसले याचे वाईट वाटते: उत्तर प्रदेशात भाजपचे 80 पैकी 73 खाजदर, 400 पैकी 300+ आमदार, पंतप्रधानांची, संरक्षण मंत्र्याची, स्मृती इराणीची लोकसभा सीट तेथून, मेनका गांधी, उमा भारती ई तेथूनच असूनही हिंदूंवर सर्वात जास्त अत्याचार तेथेच होतात आणि ते लपवले जातात.
*तरीही म्हणायचे योगी आदित्यनाथ खूप कट्टर हिंदुवादी आहेत.*

Pages