विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

8 पोलिस chya मारेकरी आलेला जामीन वर सुटला तर न्याय वयवस्थेचे धिंडवडे निघतील.
आणि राजकीय कारणाने पण ते सरकार ला परवडणार नाही.
पकडा गया तो चोर .
मग कोणी वाचवत नाही.

पळून जाण्याचा प्रयत्न करताना एन्काऊंटर करतील. सगळ्यांना तेच सोयीचे आहे. खरा न्याय मिळवून देण्यापेक्षा.
सोच या युट्यूब चॅनलवरचा हा व्हिडीओ पाहण्यासारखा आहे.
दुवा - https://youtu.be/0Bg26QgzyOg

अटक होत असताना विकास दुबेने ओरडून आपण कोण आहोत ते सांगितलं.
यांचं चित्रिकरणही केलं गेलं.
आपलं एन्काउंटर होऊ नये यासाठी हे केलं म्हणे.

आठ दिवसापूर्वी लग्न झालेल्या त्या मुलीला माहित नसेल का की तो काय काम करतो. मुलींना काही से नाही, अशा माणसाशी लग्न करणे प्रतिष्ठेचे वाटते, हा नाही तर दुसरा पण गुंडाशीच लग्न होणार यापैकी नक्की काय.

आठ पोलिसांचे बळी घेणारा विकास दुबे शेवटी प्राणाच्या भितीने पोलिसांना शरण आला. अटक स्टेज मॅनेज केली होती.

उ. प्र. / बिहार मधे सरकार कुणाचेही असले तरी कायदा आणि सुव्यावस्थेचे धिंदवडे निघालेले आहेत पण मुख्यमंत्री अजय सिंह बिष्ट यांनी निच्चांक गाठला आहे.

29 जून को खुशी नाम की लड़की से उसका विवाह हुआ था। मंडप विकास के घर में ही लगाया गया था। बताया जा रहा है कि पनकी रतनपुर निवासी खुशी का परिवार काफी गरीब था। अमर की करतूतों के बारे में जब उन्हें पता चला तो गरीबी का हवाला देते हुए शादी से इनकार कर दिया था। जब विकास को यह पता लगा तो उसने लड़की वालों को बिकरू बुलाया और विरोध के बावजूद जबरिया अपने घर में ही सात फेरे दिलवा दिए। शादी इतनी जल्दी में हुई कि कार्ड आदि की औपचारिकता भी नहीं हुई। परिवार के ही 20-25 लोगों को दावत दी गई और विकास ने दुल्हन विदा करवा ली। शादी का पूरा खर्च विकास ने ही किया था।

<< वातावरण निवळले की त्याला जामीन मिळेल. आणि लोक विसरून जातील >>

-------- तो पोहोचलेला आहे. आठ पोलिसांना जिवाने मारण्याचा क्रूरपणा त्याच्याकडे आहे.

चित्रपटांत दाखवल्या प्रमाणे त्याला तुरुंगामधून पळवले जाणार... आणि मग तो पोलिसांच्या सापळ्यांत अडकणार. एकंदर सर्व घटनाक्रमान उ. प्र. पोलिसांच्या विश्वासार्हते बद्दल आणि कार्यक्षमते बद्दल मोठेच प्रश्नचिन्ह निर्माण करते.

उ. प्र. / बिहार मधे सरकार कुणाचेही असले तरी कायदा आणि सुव्यावस्थेचे धिंदवडे निघालेले आहेत पण मुख्यमंत्री अजय सिंह बिष्ट यांनी निच्चांक गाठला आहे.
नवीन Submitted by उदय on 10 July, 2020 - 01:10
>>
हिंदुद्वेषामुळे किती तो आंधळेपणा आलेला आहे. रितसर हिंदुधर्माप्रमाणे आचरण करुन नियम पाळुन, जुने नाव जाऊन नवे नाव धारण केलेले आहे.
पण इथे मुळचे नावच वापरण्याचा अट्टहास.
मग महात्मा कोणत्या आधारावर वापरले जाते?
एकच तर्क/न्याय सगळीकडे का नाही?

ठार झाला का? छान! बरे झाले. अशा लोकांसाठी उगीच न्यायव्यवस्थेतील लोकांचा वेळ का वाया घालवावा?

धागा मात्र आता योग्य त्या नेहमीच्याच वळणावर जाईल.

त्याला जिवंत ठेवला असता तर किती तरी बड्या धेंडांना धोका होता. म्हणून मारला. त्याच्या अपराधांची शिक्षा म्हणून नव्हे.

पुन्हा एकदा कायद्याचा पराभव. न्यायालायीन प्रक्रियेला फाट्यावर मारणे.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या अब्रूची झालेली लक्तरे याने शिवून येणार नाहीत, त्याला आग लागेल.

और एक राज खुलनेसे पहले हमेशा के लिये दफन हो गया!

आठ पोलिसांची हत्या करण्याइतपत निर्ढावलेला हा गुंड, पोलिसांनीच दिलेली टीप, त्याचे राजकीय लागेबांधे, पोलीस कनेक्शन, सगळं काही एका एन्काऊंटर सोबत दाबल्या जाणार.. साहजिक आहे, तो जिवंत राहिला असता तर कदाचित अजय बिष्ट सहित अनेकांना गोत्यात आणलं असतं.. असो, जय योगीराज!

Uttar Pradesh gangster Vikas Dubey was allegedly shot dead Friday morning as he was being brought to Kanpur from Madhya Pradesh’s Ujjain. While being transported, one of the cars in the police convoy overturned. The police allegedly fired at Dubey after he attempted to snatch a weapon and flee the scene.

हे खरं नाही हे सगळ्यांना माहीत आहे. पण की फर्क पैंदा है!

जरा क्रियेटीव्ह नवीन काही पद्धतीने दुबेला गपगार करतील असे वाटले पण फारच टिपिकल घिसी मेथड वापरली गेली.

नवीन Submitted by भरत. on 10 July, 2020 - 08:41 >> +५६''
अवघ्या काही महिन्याच्या वास्तव्यात यूपीमधील समाज-राजकारण- प्रशासनात भिनलेला जातीयवाद आणि तेथील बेबंदशाही अनुभवलेली आहे. आपल्याकडील राजकारणी जसे सहकार वगैरे चळवळीतून मोठे होतात तसे तिकडे जातीवाद- सरंजामशाही आणि हाताखाली त्या भागातील बाहुबली ही राजकारणासाठी आवश्यक असतात. कानपूरचा एक दुबे गेला तरी असे दहा दुबे त्याची जागा घेण्यास तयार असतील. अजून सुदैवाने आपल्या राज्यात तशी परिस्थती नाही पण मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यात असे बरेच बाहुबली आहेत. midc च्या बहुतेक उद्योगांना स्थानिक गुंडांना हप्ते द्यावे लागतात. ज्यांतील बहुतेकांना ठाकरे-पवारांनी पोसलय. जाऊद्या हाकानाका. अजय बिश्तजी यांचे अभिनन्दन.

विकास दुबेचा साथीदार प्रभात मिश्रा याला घेऊन जाणारी पोलिसांची व्हॅनही बंद पडली. मौके का फायदा उठा सकते है म्हणत त्याने पोलि सांकडचे शस्त्र हिसकावुन घेतलं, गोळ्या झाडल्या , पळून जाऊ लागला. मारला गेला.

कालची बातमी.
Police van broke down while Prabhat Mishra was being brought to Kanpur. He took advantage of the situation,snatched pistol from policeman,fired at our men&tried to escape.Our personnel retaliated, during which Prabhat got killed.Several policemen injured in incident:ADG Kanpur

शहामृग.....वाळु........
क्रिप्या सोतावर ओढवुन घेवु नये ही लंब्र इनंती हाये.

गुंड लोकांसाठी हाच न्याय योग्य आहे.
एन्काऊंटर.
त्या शिवाय समाजाला लागलेली ही कीड नष्ट होणार नाही.
मुंबई मध्ये एन्काऊंटर चा धडाका लावला तेव्हा Gangwar nasht jhale.
.
Court cha vel gunda sathi vaya घालवायची गरज नाही.

भरत
का मराठी चे वावडे आहे काय.
जिथे गरज नाही तिथे पण इंग्रजी.

मी कालच रणबिरचा सिंबा चित्रपट बघितला...

पोलिसांना शरण आलेला गुन्हेगार पळून जाणार हे शक्य नाही. त्याने ८ पोलिसांना मारले, आणि पोलिसांनी याला मारले... सर्व प्रकार धक्कादायक आहे Sad

अजय सिंह बिष्ट अभिनंदन... सर्वच काही गाडल्या गेले आणि अनेक राजकारणी गुन्हेगारांचे गुपित गुपितच राहिले..

महाराष्ट्रातील पट्ट्यात असे बरेच बाहुबली आहेत. midc च्या बहुतेक उद्योगांना स्थानिक गुंडांना हप्ते द्यावे लागतात. ज्यांतील बहुतेकांना ठाकरे-पवारांनी पोसलय. जाऊद्या हाकानाका. अजय बिश्तजी यांचे अभिनन्दन

आपल्या महाराष्ट्रात पण गुंड आहेत अगदी सराईत पण जातीचा आहे म्हणून
समाज त्या गुंडाची बाजू कधीच घेत नाही.
यूपी,बिहार ही जातीयवाद रग रगत भरलेली राज्य आहेत
गुंडाला जातीचा पाठिंबा मिळतो.
आणि ह्याला उच्च जाती चे नेते आणि दलित नेते दोन्ही जबाबदार आहेत

उदय
ला काय धक्कादायक वाटतंय .
गुन्हेगारांना कोणतेच अधिकार देण्याची गरज नाही.
अगदी स्वतःची बाजू मांडण्याचं अधिकार पण देण्याची गरज नाही.
उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस ह्यांचे अभिनंदन.

<< ला काय धक्कादायक वाटतंय . >>

------- धक्कादायक यासाठी का पोलिसांनी त्याला बनावट चकमकीत "मारले".... पोलिसांनी त्याला व्यावस्थित रितीने सापळ्यात पकडले, पळवले आणि मारले. आता अपघात, गाडी बंद पडणे आणि तो पळून जात होता या रचलेल्या कथा आहेत. याला खून म्हणतात. त्याने आठ पोलिसांना मारले ते कृत्य खूप वाईट. पण तो गुंडच होता...

दुबे गुन्हेगार होता, आणि त्याच्या वर कायद्याने कारवाई होणे अपेक्षित होते. पोलिसांचे काम गुन्हेगारांना अटक करणे, चौकशी पुरावे गोळा करणे, गोळा केलेले पुरावे कोर्टात सादर करुन त्याला कठोर शिक्षा मिळवून देणे हे आहे. या सर्व प्रकाराला कायद्याचे राज्य म्हणतात. पोलिसांचे काम कायदा आणि सुव्यावस्थेचे राज्य निर्माण करणे हे आहे. गुन्हेगारांना शिक्षा करण्यासाठी न्यायालये आहेत, ते काम पोलिसांचे नाही आहे. आता दुबे मारल्या गेल्यामुळे त्याला पोलिस खात्यामधून कोण कोण मदत करत होते किंवा त्याचे कुठल्या नेत्यांशी संबंध होते हे पण कळणार नाही. अनेक गुन्हे झाकल्या जाणार आहेत मग व्यावस्था सुधारणार कशी ?

दुबे बद्दल कितीही प्रचंड राग आला तरी त्याची पोलिसांनी केलेली हत्या समर्थनीय नाही. या सर्व हत्यासत्रांचा (अर्थात गुन्हेगारांच्या) सामान्यांना आनंदच होतो आहे हे अत्यंत धक्कादायक आहे.

Priti Gandhi - प्रीति गांधी
@MrsGandhi
·
9h
Vikas Dubey's arrest & custody will give many a politicians & bureaucrats sleepless nights from now onwards.

Knowing how the present Uttam Pradesh govt operates, the entire nexus will be unearthed after he begins singing like a parrot. बात निकली है तो फिर दूर तलक जाएगी!

लिहिणार्‍या बाई National Incharge of Social Media - BJP Mahila Morcha - World's largest political party! आहेत

आता उ प्र मधले ते सगळे नेते आणि नोकरशहा (+ पोलिस अधिकारी ) शांतपणे झोपू शकतील. पोपट मारला गेला. बात दूर तक जाने से पहले खत्म हो गयी

<< गुन्हेगारांना कोणतेच अधिकार देण्याची गरज नाही.
अगदी स्वतःची बाजू मांडण्याचं अधिकार पण देण्याची गरज नाही. >>
------- गुन्हेगार हा खरोखरच " गुन्हेगार " आहे हे कोण आणि कसे ठरवणार? कोर्टाच्या बाहेर गुन्हेगार ठरवून पोलिस परस्पर मारत असतील तर हे अराजकी राज्य आहे.

<< उत्तर प्रदेश सरकार आणि पोलिस ह्यांचे अभिनंदन. >>
------- अभिनंदन कशासाठी ?
आठ पोलिसांना मारण्याची घटना घडते... किती निर्ढावले पणा ? मारले गेलेले पोलिस अधिकारी परत येणार आहेत का ? पोलिस धाड टाकायला येत आहे अशी टिप दुबेला कुणी दिली ? त्याला कुणी मदत केली होती हे दुबे याच्या व्यातिरिक्त कुणाला माहित असणार आहे ?

दुबेंची हत्या केल्यामुळे अनेक प्रश्न कायमचे अनुत्तरित रहातात....

Pages