विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुस्लिम अतिरेक्यांना भारतात काही ठराविक राजकीय पक्ष ,विचारवंत,सामाजिक संस्था उघड पाठिंबा देतात आणि कारवाई होवून देत नाही
मानवता वादी मेणबत्या घेवून नाटक चालू करतात ते फुकट नक्कीच करत नसतील.
कधी झालीय का त्यांच्या वर कारवाई.
मोदी नी च funding कुठून होते हे शोधायला suravst केल्यावर अनेक एनजीओ गायब झाले आहेत.

या प्रकरणात जर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री दोषी असतील तर त्यांनाही अतिशय कडक शासन व्हावे.
आणी हे घडुन यावे यासाठी माबो वरील अभाविदु(चुजा)कसं ने मन लावुन जोमाने प्रयत्न करावेत.

विकास दुबे पडद्यामागे राहिला असता तर काही वर्षांनी तो उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आणि त्यानंतर देशाचा गृहमंत्री होऊ शकला असता.

एन्काऊंटर झाला आहे.
सर्व प्रश्न सुटले आहेत.
पुन्हा कायदा सुव्यवस्था स्थापन झाली आहे.
आता कोणाची पोलिसांवर हल्ला करण्याची हिम्मत होणार नाही.
आता गुंड पोलिसांना खूप घाबरतील

.....असे किती जणांना वाटते?

गुंड पोलिस ना घाबरत नाहीत कारण आपली न्यायव्यवस्था,राजकीय लागेबांधे लोकशाही चा side effect,manvata vadi nataki संघटना ह्या सर्व जो पर्यंत अस्तित्वात आहेत तो पर्यंत गुंड पोलिस ना घाबरणार नाहीत.
पोलिस च्या हातात हत्यार दिले आहे पण ते वापरायची परवानगी नाही.
हत्यार वापरायची खुली परवानगी ध्या.
एक पण गुंड शिल्लक राहणार नाही.
गुंड बघायचं असेल तर कब्रस्ता न मधील कबर दाखवावी लागेल.

भारतात किती कच्चे कैदी आहेत.
अतिशय किरकोळ गुन्ह्यात अटक झालेले पण गरिबी मुळे वकील नाही त्या मुळे जामीन नाही म्हणून किती तर वर्ष तुरुंगात कुजत पडतात
त्यांचे गुन्हे दोन चार महिने तुरुंग वासाचे असतील तर ते दहा दहा वर्ष तुरुंगात असतात.
हे कोणाचे अपयश आहे.
त्यांची बाजू ना कोणी एनजीओ घेत ना पुरोगामी घेत , ना ढोंगी मानवतावादी घेत, ना कोर्ट घेत, ना मीडिया .
पण गुंड ,अतिरेकी ह्यांची बाजू घेण्यासाठी सर्व मध्ये चढाओढ लागते.

सन २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार, उत्तर प्रदेश सरकारला विकास दुबेच्या एन्काउंटरची चौकशी करावी लागणार आहे. दरम्यान, गुन्हे नोंदणी अहवालानुसार, योगी सरकार सत्तेत आल्यानंतर विकास दुबे हा ११९वा आरोपी आहे, ज्याचा एन्काउंटर करण्यात आला आहे. इंडियन एक्प्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.

सत्ता ही तिला राबविणाऱ्या माणसाला किंवा व्यवस्थेला भ्रष्ट करते आणि सर्वंकष सत्ता ही सर्वंकषपणे भ्रष्ट करते हे घिसेपिटे वचन प्रत्येक वेळी आठवते.

कसाबला जिवंत पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी जिवाचे रान केले होते.
आपल्या देशात दणादण एन्काऊंटर्स होऊ लागतात तेव्हा बहुतेक वेळा उच्चपदस्थानातल्यांच्या भानगडी लपवून गाडून टाकण्यासाठी त्या केलेल्या असतात असे खुशाल समजावे. कारण ही गुन्हेगारी सत्तेच्या सावलीत वाढून सत्तेला सावली पुरवीत असते.

उच्चपदस्थानातल्यांच्या भानगडी लपवून गाडून टाकण्यासाठी त्या केलेल्या असतात असे खुशाल समजावे. कारण ही गुन्हेगारी सत्तेच्या सावलीत वाढून सत्तेला सावली पुरवीत असते.

हे खरेच आहे .
वरून पाठिंबा असल्या शिवाय गुन्हेगार बस्तान बसवू च शकत नाहीत.
ह्या मध्ये सर्व आले कोणी वेगळा नाही.
पण एन्काऊंटर मध्ये गुंड मला की जनता खुश होते कारण त्या गुंड मुळे सामान्य लोक त्रास सहन करत असतात,स्त्रिया त्रस्त असतात,कमजोर वर्ग त्रस्त असतो.
ह्या सर्वांना बाकी लिंक शी काही संबंध नसतो.
गुंड मेला की त्याची बाजू घेणारे एक प्रकारे गुंडगिरी वाढण्यास जबाबदार असतात.
लिंक चा बहाणा बनवून.

अजय सिंह बिष्ट अभिनंदन... सर्वच काही गाडल्या गेले आणि अनेक राजकारणी गुन्हेगारांचे गुपित गुपितच राहिले.>>> एक बेजबाबदार व पुरावा नसलेले विधान. योगी आदित्यनाथानी पोलिसांना असे संगितले असेल तर पुरावा रविश कुमार व लोकसत्ता वगैरे भाजपद्वेषीकडे द्यावा किंवा सरळ कोर्टाकडे द्यावा.

योगी आदित्यनाथ कशाला आपणहून असे म्हणतील? त्यांना चौकशीसाठी किंवा बयान देण्यासाठी बोलावले जाणार आहे का किंवा गेले आहे का ? "पूछ ताछ" साठी ?

<<गुंड मेला की त्याची बाजू घेणारे एक प्रकारे गुंडगिरी वाढण्यास जबाबदार असतात
गुंड मेला की त्याची बाजू घेणारे एक प्रकारे गुंडगिरी वाढण्यास जबाबदार असतात>>

------ मस्त लॉजिक आहे.
तो गुंड होताच पण परस्पर शिक्षा देण्याचे काम पोलिसांचे नक्कीच नाही. अजय बिष्ट यांच्या कुचकामी सरकारची तसेच आधीच्या सर्व सरकारांची अनेक पापे झाकल्या गेली आहेत.

जे संबंधित प्रभववशिल व्यक्ती असतील त्या दुबे ला अटक केली असती तरी स्वतःचा प्रभाव वापरून काहीच चोकशी होवून दिली नसती.
ही तर खरी समस्या आहे.
पोलिस वर दबाव तर आलाच असता त्याच बरोबर पोलिस मधील च व्यक्ती नी त्याला मदत केली असती.
ह्या सर्व समस्या आपल्या देशात आहेत.
किती तरी गुन्हे करून गुन्हेगार समाजात मोकळे फिरत आहेत .
हे आपण बघतच आहे.
न्यायव्यवस्था वर विश्वास आहे पण तिथं पर्यंत योग्य पुरावे पोचवत नाहीत.
सामान्य लोक हताश होतात मग कधी झुरळ पण न मारणारा व्यक्ती खूना सारखे गंभीर गुन्हे करतो अन्याय सहन न झाल्यामुळे.
एन्काऊंटर मध्ये एक तरी गुन्हेगार संपत असेल तर खूप समाधान वाटते समाजाला.
आणि त्या मध्ये त्यांची काही चूक नाही

पान 3 वरचा
>>>>>>तिकडे त्यांचा बिझनस सुरळीत चालू ठेवतील, आणि त्यांचे पालनपोषण करणार्‍यांचे इकडे आपण गुणगान गात राहू.

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 July, 2020 - 03:>>>
हा प्रतिसाद आवडला आहे,

म्हणजे अगदी भरत नि लिहिला आहे वाटावे इतका लॉजिकल लिहिला आहे,

संबंधित प्रभववशिल व्यक्ती असतील त्या दुबे ला अटक केली असती तरी स्वतःचा प्रभाव वापरून काहीच चोकशी होवून दिली नसती.

अरेरे

म्हणजे योगी मोदी बिन कामी आहेत म्हणायचे

काल तर विकास च्या अबला गरीब बायको ने म्हणे मीडिया ला झापले !
तुमच्या मुळेच विकास मारला गेला असा आरोप करून वेळ पडली तर शस्त्र हातात घेईन असे नॉर्थ इंडियन संस्कृती ला शोभेल असे बोलली .

एकंदरीत थोर समाजसेवक विकास ला चकमकीत मारले या वरून पोलिसांना आणि योगी ला पिंजऱ्यात उभे करणारे
' गुंडा लिव्ह म्याटर ' चळवळ चालू करतील असे वाटते .

अवांतरः
योगी महाराजांच मुळ नाव लिहिणार्‍यांना सोनीया गांधींच मुळ नाव लिहिलं की कसं वाटेल?

एन्काउंटर होण हा नवा ट्रेंड होउ घातलाय. मागे हैद्राबादच्यावेळीही असेच झालेले, आताही तेच. ही सिस्टीम भयानक आहे.

विकास गुंड होता तो ज्या पद्घतीने मारला गेला ती पद्धत योग्य च आहे.
कशी गळे काढायची गरज नाही.
फक्त यूपी मध्ये bjp ची सत्ता आहे म्हणून येथील काँग्रेसी भाट गळे काढत आहेत.
पण गुंड मेला ते योग्य च झाले हे म्हणत नाहीत.

सोनियाचा मूळ नाव लिहा, त्यात काय वाईट आहे?

भाजपे पाकिस्तानातून गोर गरीब कामगार हिंदू बायकांना ( आणि पुरुषांना ) नागरिकत्व देणार आहेत म्हणे, किती आणल्या ?

चीन चे समर्थन करून थकले
पाकिस्तान चे समर्थन करून थकले
गुंडाची बाजू घेवून झाली.
अगदी अफजल पासून जी गुजरात महिला अतिरेकी मारली गेली त्याचे पण दुःख करून झाले.

विकास गुंड होता तो ज्या पद्घतीने मारला गेला ती पद्धत योग्य च आहे.
>> ती पद्धत योग्य नाहीच, कोणीही कितीही बोललं ओरडलं तरी, सत्य बदलत नाहि. कठुआमधल्या लोकांच एन्काऊंटर केलं गेलं असत तर निर्दोष लोकं मेली असती, अन कसाब जिवंत प्कडला गेला नस्ता तर सुनील परमार नावानं आपण त्यला ओळखत बस्लो अस्तो.

सोनियाचा मूळ नाव लिहा, त्यात काय वाईट आहे?
>>
रीतसर लग्न झालेल्यांच मुळ नाव लिहीणे तेवढेच वाइट आहे, जेवढ रीतसर सन्यास घेतलेल्यांच.

अन ह्याब्दल सोशल मीडीयावर स्वतहच नाव लपवुन दुसर्‍यानावान लिहिणार्‍यांनी कशाला सल्ला देत बसाव Wink

Pages