विकास दुबे अटक व मृत्यू

Submitted by अश्विनीमामी on 8 July, 2020 - 02:36

विकास दुबे, भीतिदायक गुन्हेगार, ह्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहेत व २.५ लाख रुपयांचे सरकारी इनाम पण अटकेसाठी जाहीर झाले आहे. मागील आठवड्यात बिक्रू खेड्यामध्ये( उत्तर प्रदेश) पोलिसांची एक पार्टी ह्यास पकडायला गेली होती पण विकास दुबे ह्याला आधीच खबर मिळाल्या मुळे त्याने व्यवस्थित प्लॅन करून( छपरावर मारेकरी वाट बघत उभे करून!!!) आलेल्या पोलीस पार्टीतील सिनीअर ऑफिसर श्री. मिश्रा ह्यांच्यासकट आठ लोकांचे शिरकाण केले व पोबारा केला. आलेल्या पोलिसांसमोर एक जेसीबी उभा करून ठेवला होता. ह्याच्या घरावरून त्याच जेसीबीने नांगर फिरवून ते आता जमीनदोस्त केले आहे. व एस युव्ही गाड्यांची तोड फोड करून ठेवली आहे संतापलेल्या पोलिसांनी; व त्याचे शेजारी , घरी काम करणारे लोक ह्यांना अटक झाली आहे.

ह्याचा संरक्षण प्रमुख अमर दुबे ह्याची पण आज घडीला गोळी घालून हत्या झाली आहे. ह्याचे मागील आठवड्यातच लग्न झाले होते व ते विकासनेच करवून दिले होते. विकास बाईबाजी वगैरे मध्ये लक्ष घालत नाही त्याची एक बायको आहे व एक मुलगी जे लखनौ मध्ये होते व बिक्रू कांड घडण्या आधी त्याने बायकोला फोन करून त्यांची पळून जायची व्यवस्था करवली होती. ह्या बायको अन मुलगी दोघींची मनःस्थिती काय असेल. त्या अमर दुबेच्या नववधूचे काय?

जे पोलीस अधिकारी कांडात वारले त्यांनी पोलिसातच ह्या गुन्हेगाराला मदत करणारे हस्तक व फितूर लोक आहेत असे पत्र आपल्या बॉसला लिहीले होते. जे जालावर व्हायरल झाले आहे व त्यांच्या मुलीने पण दुजोरा दिला आहे की असे पत्र होते. पण पोलिसांत ह्याचे रेकोर्ड नाही.
विकास ह्यास तिथला लोकल गब्बर सिंगच म्हणतात व रहिवाशी घाबरून असतात. गावातील पाण्याचे हात पंप आटल्यावर त्यांच्या विहिरीचे
पाणी मागायला तो जनतेचा छळ करत असे. व अगदी गयावया करायला लावी. असे आजच्या पेपरात आहे. आता हा पळपुटा गुन्हेगार गाजियाबाद ( दिल्ली जवळ ) एका हॉटेलमध्ये दिसल्याचे सी सी टीव्ही रेकॉर्डिंग मिळाले आहे. तलाश जारी है! चौबे पूर पोलिस स्टेशन मधील पोलिस व अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या आहेत.

सर्व संदर्भ : एन डी टीव्ही न्यज व टाइम्स ऑफ इंडिया पेपर. डेव्हलपिंग स्टोरी.
==================================================================================

ही सर्व घटना शोलेच्या स्क्रिप्ट सारखी वाटली म्हणून माझा ह्या घटनेतील रस वाढला. कारवाई करायला गेलेले पोलीस पथक
अंतर्गत दगाफटक्यामुळे शहीद झाले हे आजिबात पटलेले नाही. विकास ह्यास अटक व्हावी व शिक्षा पण व्हावी ह्या साठी हा फॉलो अप बाफ.
उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर ही घटना हे एक भाष्य आहे , सद्य सरकारने आता त्याला एका आठवड्यात पकडण्याचा प्रण केला आहे. बघू, तो शरण येतो की काय होते ते....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपली न्याय व्यवस्था अत्यंत slow आहे.
परत परत एकदा व्यक्ती गुन्हे करत असेल तर तो व्यक्ती समाजासाठी अत्यंत घातक असतो .
त्याला समाजापासून कायम स्वरुपी वेगळा करणे समाजाच्या हिताचे आहे.
पण घडत काय आज अटक केली की उद्या अशा लोकांना जामीन मिळतो आणि परत परत ते गुन्हे करतात त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास राहत नाही त्या मुळेच एन्काऊंटर चे समर्थन सामान्य लोक करतात.
आणि त्या मध्ये काही चूक नाही.
पहिला गुन्हा कायद्याने सजा दुसरा तसाच गुन्हा एन्काऊंटर हेच सूत्र योग्य आहे.
नागपूर मध्ये किती तरी घटना घडल्या आहेत लोकांनी शेवटी कंटाळून गुन्हेगारांची हत्या केली आहे.
हे सर्व न्यायव्यवस्था कुचकामी ठरल्या मुळे आलेल्या नैराश्यातून घडले आहे.

"जरा क्रियेटीव्ह नवीन काही पद्धतीने दुबेला गपगार करतील असे वाटले पण फारच टिपिकल घिसी मेथड वापरली गेली"---> अभ्या दादा, स्कॉर्पिओ उडवली की आता काय कानपूर मध्ये लॅंम्बबोर्गिनी उडवायला हवी होती का हा! हा! हा!

फास्ट अ‍ॅन्ड फ्युरीअस: कानपूर व्हर्जन

जो मारला तो खरंच दुबे होता का?
त्याचा शोध राहुल जी आणि त्यांचे अतिशय talented gupt her ghetil.
लवकरच जगातील अनेक आश्चर्य ऐकायला मिळतील.

कानपुर ते उज्जैन सातशे किमी अंतर आहे,बिस्टच्या राज्यातुन तो तिकडे गेलाच कसा? कसला योगी आणि कसलं त्याचे सरकार.
सब गोलमाल..

भागने की कोशिश में सीने में गोली लगी।

रिवर्स में भाग रहा होगा...

Proud

भागने की कोशिश में सीने में गोली लगी।

रिवर्स में भाग रहा होगा...>>> सावरखेड एक गाव मधले टकले गुंड उलटे पळतात तसा तो पण पळाला असेल.

लोक आनंद महिद्राला विचारताहेत की तुमची वाहनं इतकी बेभरवशाची कशी?

आज अर्णंव गोस्वामी आपल्या शोमध्ये काय बोलेल? द नेशन वॉन्ट्स टु क्नो
https://twitter.com/abhijeet_dipke/status/1281510619695349760

आता नेशन एकाच प्रसंग कडे नजर लावून बसले आहे.
मेणबत्ती मोर्चा डावे,पुरोगामी,मानवता वादी कधी काढत आहेत आणि कशी गुन्हेगाराच्या हक्काची पायमल्ली केली ह्यावर आपले उच्च विचार व्यक्त करत आहेत.

काही टीव्ही चॅनेल्स आणि वर्तमानपत्रांत विकास दुबेचा उल्लेख अनेकदा विकास यादव असा झालेला आहे. डोक्यात काही समीकरणं घट्ट बसलेली आहेत म्हणून हे चुकून होतंय की जाणीवपूर्वक

उत्तर प्रदेश पोलीस त्यांच्या वाहनांची फिटनेस चेक आणि मेंटेन करत नाहीत का? अशा गंभीर वेळी वाहन कसं काय उलटलं?

काही दिवसांपूर्वी उप्र पोलिसांनी आपण वाहनांच्या फिटनेसबद्दल किती आग्रही आहोत हे दाखवून दिलं होतं.

आता त्या टीममध्ये पोलिस म्हणताहेत समोर गुरांचा कळप आल्याने जीप उलटली. सकाळी सहाच्या आसपास गुरांचा कळप हमरस्त्यावर.

एन्काउंटर खुनाच्या पंधरा मिनिटे आधीच या ताफ्याच्या मागे जाणार्‍या पत्रकारांना अडवलं होतं.

गुन्हेगार ला शिक्षा मिळाली हे महत्त्वाचे बाकी प्रश्न गौण.
त्या प्रश्नांना काही किंमत द्यायची बिलकुल गरज नाही.

ज्या माणसाला फार माहीत असते , त्याला एक तर भरपूर बिदागी देऊन खासदार वगैरे करावे लागते.

नैतर मग एनकाउंटर तरी करावे लागते.

------
भोपाळच्या खासदार हल्ली दिसत नाहीत फारश्या

गुन्हेगार चे हक्क राखण्यासाठी किती तरी निरपराध लोकांना त्रास सहन करावा लागतो.
इथे कायद्यात एवढ्या पळवाटा आहेत की त्या वर आता पर्यंत लोक का विश्वास ठेवत होती ह्याचे च नवल वाटत.
कायदा गाढव आहे.अशी म्हण आहे.

वाचनात आलेली एक पोस्ट
प्रकरण सरळ नाही हे कोपराने शेंबूड पुसणारा पोरगाही सांगेल

>>>>

विकास दुबेने जे केले, त्यासाठी त्याचे एन्काऊन्टर होणारच होते.
घटना फक्त यूपीच्या एका गावा/तालुक्या/जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली असती, तर कदाचित नेहमीप्रमाणे (दुबेच्याच म्हणण्याप्रमाणे) एखाद्या नेत्याने फोन करून त्याला सोडवलेही असते.
पण यावेळी प्रकरण हाताबाहेर गेले होते, संपूर्ण देशाचे लक्ष वेधले गेले होते.
त्यामुळे अपेक्षेप्रमाणे त्याचे एन्काऊन्टर झालेसुद्धा.
त्याबद्दल कोणाचीही तक्रार नाही.
अशा आतंकवाद्यांचा अंत असाच व्हायला पाहिजे.
नाहीतर आपली एकूणच सगळी 'व्यवस्था' त्याला भविष्यात आपला कायदा मंत्री/गृहमंत्री/मुख्यमंत्री वगैरे... अगदी काहीही बनवू शकते.
एवढी जबरदस्त ताकद आहे आपल्या सिस्टिममध्ये!

पण त्याच्या एन्काऊन्टरमुळे आता काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतील.
उदा.
१५०+ केसेस नावावर असूनही तो उजळ माथ्याने बाहेर कसा फिरत होता?
त्याच्या भाजपा-सपा-बसपा वगैरे पक्षांसोबतच्या संबंधांचे कित्येक पुरावे अनेक वर्षांपासून पब्लिक डोमेनमध्ये आहेत.
अनेक वेळा तर त्याने स्वतः कॅमेर्‍यापुढे ही माहिती दिली आहे.
२०१७ ला STF च्या चौकशीत त्याने भाजपा नेते-आमदारांचे नावंही घेतली होती, की हे लोक मला कसे सोडवतात.
तेव्हाच काही अ‍ॅक्शन का नाही घेण्यात आली?
युपीच्या मोस्ट वांटेड यादीमध्ये त्याचे नाव नेहमी का वगळण्यात आले?
सगळी राज्यं लॉकडाऊन असतानाही आणि पोलिसांची जबरदस्त चेकिंग सुरू असतानाही तो उत्तर प्रदेशमधून हरियाणा आणि हरियाणामधून मध्य प्रदेशात ६-७ दिवस मनमोकळा कसा फिरू शकला?
दुबे ज्या दिवशी महाकाल मंदिरात सापडला, त्याच्या आदल्याच रात्री त्या मंदिरात उज्जैनच्या कलेक्टरची आणि एसपीची मिटिंग झाल्याच्या बातम्या आहेत. हा योगायोग आहे का?
आणि त्याच दिवशी महाकाल पोलीस स्टेशनमध्ये काही पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या.
हाही योगायोग असू शकेल का?
२०१७ मध्ये युपी निवडणुकांच्या वेळी जी व्यक्ती कानपूरची प्रभारी म्हणून काम बघत होती, तीच व्यक्ती सध्या उज्जैनची प्रभारी आहे आणि राज्याची गृहमंत्री आहे.
हाही एक योगायोगच असेल का?
मेलेल्या ८ पोलिसांमध्ये एक होते डीएसपी देवेंद्र मिश्रा.
यांनी ४ महिन्यांपूर्वीच SSP ला पत्र लिहून सांगितले होते, की काही पोलिसांचेच दुबेशी संगनमत आहे आणि दुबे भविष्यात मोठा कांड करू शकतो.
त्या SSP ने तेव्हाच यावर काही कारवाई का केली नाही.
आणि तेव्हाचे ते SSP आत्ता अगदी दोन दिवसांपूर्वीपर्यंत त्याच STF मध्ये DIG पदावर होते, जी STF दुबेच्या प्रकरणांची चौकशी करत आहे. (त्यांची बदली आता दुसरीकडे करण्यात आली आहे.)
हाही फक्त एक योगायोगच असू शकतो का?
सपा-बसपा-भाजपातल्या आणि अजूनही ज्या ज्या लोकांचे/पोलिसांचे कनेक्शन दुबेसोबत होते, ज्यांनी ज्यांनी त्याला आजवर मोठे केले आणि कायद्यापासून वाचवले, त्या लोकांवर आता तरी काही कारवाई करण्यात येईल का?
की सगळ्या केसेस आता ऑटोमॅटिकली बंद होतील?

असे अनेक अनुत्तरित प्रश्न आता कायमस्वरूपी अनुत्तरितच राहतील.
शिवाय हेही विसरून चालणार नाही, की दुबे फक्त एक छोटासा प्यादा होता.
असे शेकडो आहेत युपीमध्ये, जे पकडले गेले नाहीत आणि पकडले जाणारही नाहीत!
ते तिकडे त्यांचा बिझनस सुरळीत चालू ठेवतील, आणि त्यांचे पालनपोषण करणार्‍यांचे इकडे आपण गुणगान गात राहू.

>>हाही फक्त एक योगायोगच असू शकतो का?<<
नाहि, असं काहि घडलं नसतं तर तो योगायोग समजला गेला असता. दुबेला ट्रायलला सामोरं करुन त्याचे सगळे लागेबांधे बाहेर काढले असते तर तो योगायोग ठरला असता...

<< >>हाही फक्त एक योगायोगच असू शकतो का?<<
नाहि, असं काहि घडलं नसतं तर तो योगायोग समजला गेला असता. दुबेला ट्रायलला सामोरं करुन त्याचे सगळे लागेबांधे बाहेर काढले असते तर तो योगायोग ठरला असता... >>

------- तर तो योगी योग ठरला असता....

असे अटक करून कोणाची नावे बाहेर येतात का? छोटा राजन ला पकडला कुठे काय झाले...>>>>

जाऊ द्या हो, मेल्या म्हशीला पन्नास लिटर दुध....

अगदी पाताळ लोक. खेड्यातला इन्स्पेक्टर महत्प्रयासाने जेलमधे टाकलेल्या अट्टल गुन्हेगारांची सगळी माहिती मजबूत पुरावे जमा करतो, आणि त्याला वरून फोन येतो की बाबा तू कशाला हे सर्व करतो आहेस? आम्ही आधीच मीडियासमोर जाहीर केलंय की हे सगळे अतिरेकी आहेत आणि पाकिस्तानातून आपल्या देशात अस्थिरता माजवण्यास आले आहेत!
अर्थात ही वेब सिरीज अनेकांनी पाहिलेलीच आहे,आणि इथे उल्लेख आहेतच, पण निर्ढावलेली व्यवस्था काहीही करू शकते, होत्याचं नव्हतंसुद्धा, हे अगदी मनाला भिडलं होतं त्या सिरीजमध्ये.
म्हणून पुन्हा लिहावंसं वाटलं.

दुबे ला जिवंत ठेवून काय फरक पडला असता.
त्याला जिवंत पकडून सुद्धा बाकी नेते मंडळी ची चोकशी केली गेली नसती.
कसाब ला जिवंत पकडुन त्याचे भारतातील आणि पाकिस्तान मधील पाठीराखे जगासमोर आले का.
तेच दुबे बाबत झाले असते,atak keli asti tar dube cha dube ji jhala asta.
भारतात गुन्हेगार निवडून येवून सत्ताधारी होण्याचे प्रमाण प्रचंड आहे.
आपल्या सिस्टम मधला हा सर्वात मोठा दुर्गुण आहे गुन्हेगार पण सत्ताधारी बनतात.
लोकशाही च हा सर्वात वाईट परिणाम आहे.
कमीत कमी एक गुन्हेगार तरी संपला कायमच हेच मोठे यश आहे एन्काऊंटर चे.

काही लोक इथे खर्‍या गुन्हेगारांना पाठीशी घालायला इतके उतावीळ का असावेत?

नेहमीची डोक्यावर पडलेली भक्त मंडळी इथेसुद्धा नसलेल्या अकलेचे प्रदर्शन मांडायला आलेली पाहून बरं वाटलं.. शंका होती की आपला निर्बुद्धपणा ह्या लोकांनी सोडला की काय, पण हुश्श.. तसे काहीही झालेले नाही.

दुबेच्या हत्येचे समर्थन करणाऱ्या लोकांना काही प्रश्न:
१. अटक करायला गेलेले आठ पोलीस कुणामुळे मारले गेले? (आता मूर्खासारखे दुबे म्हणू नका, मीच उत्तर देतो.. )ते आठ पोलीस मारल्या गेले कारण दुबेला पोलीस स्टेशन मधूनच टीप मिळाली होती. टीप कुणी दिली? ह्या प्रश्नाचे उत्तर दुबे सोबत कायम अनुत्तरित राहील. उद्या तेच खबरी दुसऱ्या गुंडांना अशीच टीप देतील, आणि असेच पोलीस मारल्या जातील. कळलं का आता दुबे जिवंत का हवा होता?

२. दुबेचे अजय बिष्ट सहित अनेक राजकारण्यासोबत घरोब्याचे संबंध होते, किंवा राजकारण्यांनीच त्याला गुंड बनवलं आणि पोसला सुद्धा.. (ह्याचे पुरावे मागू नका, नेहमी पडता तसे आताही तोंडावर पडाल google केलं तरी पुरे) हे राजकारणी कोण होते जे आजवर त्याला वाचवत होते हा देखील प्रश्न अनुत्तरित राहील.

३. दुबे ही म्हैस मेली असली तरी ती किती दूध देत होती हे सांगायचं झालं तर बिकरू आणि आसपासच्या भागात झालेल्या निवडणुका, त्यांचे निकाल याबद्दल थोडं वाचा.. आणि मग सांगा, किती लिटर दुध?

Pages