जय गिरिनारी - प्रवासवर्णन भाग १

Submitted by salgaonkar.anup on 14 June, 2020 - 03:13

" विश्वास " हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे  ईश्वरी शक्तींचा स्तोत  आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही. हे अस्थिर मन एखाद्या अनाहून उर्जेने स्थिर झालं तरच स्वतःचा शोध घेता येतो. आपल्याला आपल्या  आंतरमनाचा आवाज ऐकू येतो. स्थिर मनाने आपल्या भोवतालचं चांगल्या विचारांचं वर्तुळ निर्माण होत जातं. आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी, घटना आणि माणसं सतत आकर्षित होतात.
आपला महाराष्ट्र हा आपण संतांची भूमी म्हणून ओळखतो. याच महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे, मंदिरे आणि तीर्थ स्थळे आहेत जिथे एक अनामिक ऊर्जा भरून राहिली आहे, तिथे वास्तव्य करणाऱ्या महात्मा पुरुषांनी त्यांच्या तपोबलाने ते स्थान सिद्ध केले आहे. त्या स्थानाच्या दर्शनाने, यात्रेने मन स्थिर होते. आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. हे सदर लिखाण म्हणजे  मी माझ्या मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक केलेल्या एका धार्मिक यात्रेचा अनुभव आहे. हा फक्त अनुभव नाही तर हा स्वतःहून घेतलेला स्वा-नुभव आहे. जो प्रसाद म्हणून तुम्हा साऱ्यासोबत वाटताना मला आत्यंतिक समाधान लाभत आहे. 
नवी पिढी हि अनुकरणाने घडत असते. ती घडवण्याची जबाबदारी हि आपल्या साऱ्यांची आहे. सध्या तरुणांनी या धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळावे, जेणेकरून मन प्रसन्न राहील, अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणहून मिळतील, जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, स्वतःचा तसेच स्वतः सोबत इतरांचाही ऊत्कर्ष करता येईल. हे लिखाण तुमच्या मनात नक्कीच धार्मिक स्थळांबद्दल ओढ निर्माण करेल. हे लेख वाचून जर तुम्ही गिरनार स्थानाला एकदा भेट देण्याचा विचार केलात, तर ते यश नक्कीच तुमच्यावरच्या ईश्वरी कृपेचं असेल.
शुभं भवतु, कल्याणमस्तु.....
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः
श्री. गुरु दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्री क्षेत्र गिरनार…..!!!
स्थान: गिरनार पर्वत, तलेठी, जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य)
श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान म्हणून गिरनारची ख्याती पसरली आहे. श्री स्वामी समर्थ मठ, दादर, मुंबई येथे साधारण २-३ वर्षांपूर्वी गिरनार यात्रा अनुभव या विषयावर एक व्याख्यान होते. कधी एकदा व्याख्यान ऐकतो असं झालं होतं. ते ऐकण्याचा योगही जुळून आला. सादर करणारे गृहस्थ गिरनारला १०८ वेळा जाऊन आले होते. अतिशय सुंदर आणि उत्कंटावर्धक अनुभव कथन ऐकून मनात एकदातरी गिरनारला जाऊन यावे असे वाटले. उत्कट भाव जागृत झाले. तात्काळ स्वामींना बसल्याजागीच विनंती केली, पण माझी इच्छा उत्कट असण्यापेक्षा दत्त प्रभूंची इच्छा असेल तर बोलावणे येते असे कळले. मी इच्छा प्रकट करून ती पूर्ण करून घेण्याचा भार स्वामींवर टाकला आणि निश्चिंत झालो. मी प्रयत्नपूर्वक खूप टूर आणि ट्रॅव्हल शोधले. सध्या नावाजलेले कोणतेही टूर आणि ट्रॅव्हलतेथे जात नाहीत. कारण गिरनार ही काही टूर किंवा ट्रिप नाही. ती एक यात्रा आहे. जी आपल्याला स्वतःला माणूस म्हणून शोधायला मदत करते. या यात्रेत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही शक्ती पणाला लागतात. प्रवाशांच्या बाबतीत कोणताही धोका या खाजगी नावाजलेल्या कंपन्या पत्करत नाहीत. नफा-तोट्याची गणितं या अशा यात्रा आयोजित करुन जुळून येत नाहीत. म्हणून या अशा धार्मिक यात्रा आयोजित करण्यापेक्षा त्या घडवून आणणाऱ्या फार थोड्या सामाजिक संस्था आहेत. ज्या हे काम निरपेक्ष, अविरत करत असतात.
माझ्या बाबतीत गिरनार यात्रेचा योग हा ऑक्टोबर २०१९ मध्ये जुळून आला. ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हि धार्मिक आणि अध्यात्मिक यात्रा ईश्वरी कृपेने आणि स्वामींच्या आशिर्वादाने घडून आली. ईझी टूर हि एक ट्रॅव्हल कंपनी आहे, पुण्याची आहे, ती हे काम सेवाभाव म्हणून माफक दारात करते. मी फोन करून थोडी चौकशी केली, खुप छान माहीती मिळाली, तारखा कळल्या आणि तत्पर नोदंणी केली. आठवड्याभरातच यात्रा होती, हि कोगागिरी पौणिमा निमित्त आयोजित यात्रा होती. चंद्राला जशी ओढ पूर्णत्वाची तशीच मला दत्त दर्शनाची.
माझा हा यात्रा प्रवास कसा सुरु झाला?, सुरवतीलाच दत्त दर्शन कसं झालं?, सहकारी वर्ग कसा होता? ही सगळी कथा सांगणार आहे….. पण पुढील भागात….. जय गिरनारी
लिंक पहा
https://shabdbramh.wordpress.com/2020/06/20/girnartwo/#more-302

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे खरंच विचित्र आहे.
तुम्ही सरळ हेडरमध्ये डॅश करून टाकत जा ना, 'लेख ब्लॉगवर' म्हणजे कुणीही धागा उघडणार नाही.
मोठ्या अपेक्षेने धागा उघडला, आणि हे असं.

पुढच्या वेळी ब्लॉग वरचाच कंटेंट कॉपी पेस्ट करून इथेही टाका आणि लेखाखाली ब्लॉग पोस्ट लिंक टाका.
एकदा तुमच्यात वाचकांना रस निर्माण झाला की लोक पर्सनल ब्लॉग वाचायला आपोआप येतीलच.
लिहिताना फक्त स्वतःच्या ब्लॉगवर लिहून लिंक चिकटवण्यापुरते इथे नवा धागा काढणे हे किंचित स्वार्थी वाटते(अर्थात ते तसे नसुही शकते, माझे फिलिंग फक्त)

//

[जय गिरिनारी – भाग १]

” विश्वास ” हा आंतरमनाचा पाय आहे. शब्द जितका सोपा आहे, अनुभव घ्यायला तितकाच कठीण. याच विश्वासावर आपण अशक्यही शक्य करू शकतो. आजकाल देवावरचा आणि स्वतःवरचा विश्वास कुठेतरी कमी झाला आहे असे जाणवते. देव हा दगडात नसून ती एक अदृश्य मंगल शक्ती आहे, उर्जा आहे, जी चराचरात विद्यमान आहे. आपल्या भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथे ईश्वरी शक्तींचा स्तोत आहे आणि तो अखंड प्रवाहीत आहे. या शक्तीचा म्हणजेच दिव्यत्वाचा प्रत्यक्ष प्रत्यय या अशा ठिकाणी जाऊनच घेता येतो. मन हे निसर्गतः चंचल आहे. ते एकाचवेळी दश दिशा फिरत असते. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर ते कधीही स्थिर होत नाही. हे अस्थिर मन एखाद्या अनाहून उर्जेने स्थिर झालं तरच स्वतःचा शोध घेता येतो. आपल्याला आपल्या आंतरमनाचा आवाज ऐकू येतो. स्थिर मनाने आपल्या भोवतालचं चांगल्या विचारांचं वर्तुळ निर्माण होत जातं. आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी, घटना आणि माणसं सतत आकर्षित होतात.
आपला महाराष्ट्र हा आपण संतांची भूमी म्हणून ओळखतो. याच महाराष्ट्रात अशी अनेक ठिकाणे, मंदिरे आणि तीर्थ स्थळे आहेत जिथे एक अनामिक ऊर्जा भरून राहिली आहे, तिथे वास्तव्य करणाऱ्या महात्मा पुरुषांनी त्यांच्या तपोबलाने ते स्थान सिद्ध केले आहे. त्या स्थानाच्या दर्शनाने, यात्रेने मन स्थिर होते. आपल्याला खूप सकारात्मक ऊर्जा मिळते. हे सदर लिखाण म्हणजे मी माझ्या मनाला स्थिर आणि शांत करण्यासाठी प्रयत्नपूर्वक केलेल्या एका धार्मिक यात्रेचा अनुभव आहे. हा फक्त अनुभव नाही तर हा स्वतःहून घेतलेला स्वा-नुभव आहे. जो प्रसाद म्हणून तुम्हा साऱ्यासोबत वाटताना मला आत्यंतिक समाधान लाभत आहे.
नवी पिढी हि अनुकरणाने घडत असते. ती घडवण्याची जबाबदारी हि आपल्या साऱ्यांची आहे. सध्या तरुणांनी या धार्मिक आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळावे, जेणेकरून मन प्रसन्न राहील, अनेक प्रश्नांची उत्तरे ही आपणहून मिळतील, जगात विश्वशांती प्रस्थापित होईल, स्वतःचा तसेच स्वतः सोबत इतरांचाही ऊत्कर्ष करता येईल. हे लिखाण तुमच्या मनात नक्कीच धार्मिक स्थळांबद्दल ओढ निर्माण करेल. हे लेख वाचून जर तुम्ही गिरनार स्थानाला एकदा भेट देण्याचा विचार केलात, तर ते यश नक्कीच तुमच्यावरच्या ईश्वरी कृपेचं असेल.
शुभं भवतु, कल्याणमस्तु…..

गुरु ब्रम्हा गुरु विष्णू गुरुः देवो महेश्वरा
गुरु शाक्षात परब्रम्हा तस्मै श्री गुरुवे नमः
श्री. गुरु दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्री क्षेत्र गिरनार…..!!!
स्थान: गिरनार पर्वत, तलेठी, जुनागड जिल्हा सौराष्ट्र (गुजराथ राज्य)
श्री दत्तमहाराजांचे अक्षय निवास स्थान म्हणून गिरनारची ख्याती पसरली आहे. श्री स्वामी समर्थ मठ, दादर, मुंबई येथे साधारण २-३ वर्षांपूर्वी गिरनार यात्रा अनुभव या विषयावर एक व्याख्यान होते. कधी एकदा व्याख्यान ऐकतो असं झालं होतं. ते ऐकण्याचा योगही जुळून आला. सादर करणारे गृहस्थ गिरनारला १०८ वेळा जाऊन आले होते. अतिशय सुंदर आणि उत्कंटावर्धक अनुभव कथन ऐकून मनात एकदातरी गिरनारला जाऊन यावे असे वाटले. उत्कट भाव जागृत झाले. तात्काळ स्वामींना बसल्याजागीच विनंती केली, पण माझी इच्छा उत्कट असण्यापेक्षा दत्त प्रभूंची इच्छा असेल तर बोलावणे येते असे कळले. मी इच्छा प्रकट करून ती पूर्ण करून घेण्याचा भार स्वामींवर टाकला आणि निश्चिंत झालो. मी प्रयत्नपूर्वक खूप टूर आणि ट्रॅव्हल शोधले. सध्या नावाजलेले कोणतेही टूर आणि ट्रॅव्हलतेथे जात नाहीत. कारण गिरनार ही काही टूर किंवा ट्रिप नाही. ती एक यात्रा आहे. जी आपल्याला स्वतःला माणूस म्हणून शोधायला मदत करते. या यात्रेत शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही शक्ती पणाला लागतात. प्रवाशांच्या बाबतीत कोणताही धोका या खाजगी नावाजलेल्या कंपन्या पत्करत नाहीत. नफा-तोट्याची गणितं या अशा यात्रा आयोजित करुन जुळून येत नाहीत. म्हणून या अशा धार्मिक यात्रा आयोजित करण्यापेक्षा त्या घडवून आणणाऱ्या फार थोड्या सामाजिक संस्था आहेत. ज्या हे काम निरपेक्ष, अविरत करत असतात.
माझ्या बाबतीत गिरनार यात्रेचा योग हा ऑक्टोबर २०१९ मध्ये जुळून आला. ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत हि धार्मिक आणि अध्यात्मिक यात्रा ईश्वरी कृपेने आणि स्वामींच्या आशिर्वादाने घडून आली. ईझी टूर हि एक ट्रॅव्हल कंपनी आहे, पुण्याची आहे, ती हे काम सेवाभाव म्हणून माफक दारात करते. मी फोन करून थोडी चौकशी केली, खुप छान माहीती मिळाली, तारखा कळल्या आणि तत्पर नोदंणी केली. आठवड्याभरातच यात्रा होती, हि कोगागिरी पौणिमा निमित्त आयोजित यात्रा होती. चंद्राला जशी ओढ पूर्णत्वाची तशीच मला दत्त दर्शनाची.
माझा हा यात्रा प्रवास कसा सुरु झाला?, सुरवतीलाच दत्त दर्शन कसं झालं?, सहकारी वर्गाची कसा होता? ही सगळी कथा सांगणार आहे….. पण पुढील भागात….. जय गिरनारी//
आणलं उचलून.
फोटो राहिले.

पुढच्या वेळी ब्लॉग वरचाच कंटेंट कॉपी पेस्ट करून इथेही टाका आणि लेखाखाली ब्लॉग पोस्ट लिंक टाका.
एकदा तुमच्यात वाचकांना रस निर्माण झाला की लोक पर्सनल ब्लॉग वाचायला आपोआप येतीलच. >>> +१

चांगली सुरूवात आहे. वाचूच पुढे पण इथे पोस्ट करून पाहिजे तर लिन्कही द्या.

जय गिरिनारी हे मायबोलीवारचं माझं शेवटचं लिखाण आहे. या पुढे मायबोलीवर लिहीण्याची इच्छाच उरली नाही. इथे अनेक क्रीटीसायझर आहेत. प्रतिक्रिया अनेकदा वाईटच असतात. मी फक्त लींक दिली त्यावर अनेक सजेशन्स आले. SRD यांनी माझा मजकूर मला न विचारता Copy Pest केला त्यावर कुणीच काहीच बोललं नाही. त्या खाली " आणलं उचलून" असं लिहीलयं. कुणाला विचारुन आणलं???? याचं उत्तर द्या. मी लिंक बद्दलची माझी चूक मान्य करुन सुद्धा. क्षमा मागून सुद्धा हा गैरप्रकार तुम्ही केलाय. थोडे दिवस थांबून कुणी यावर काही बोलतयं का हा विचार करत होतो. कुणीच काही बोलेना. अशानेच अशा या व्यक्ती सोकावतात आणि लेखकांना लिखाणापेक्षा यांचाच जाच जास्त होतो. लेखकाचा असा मजकूर विनापरवानगी टाकणं ....हे अत्यंत चूकिचे आहे. मायबोलीवर पूर्वीसारखा वाचकवर्ग आता उरलाच नाही. ह्या अशा काही अविचारी कृत्यांमूळे चांगले चांगले लेखकही मायबोलीने गमावले आहेत. एखाद्या लेखकाचा कंटेंड असा वापरणं हा त्या लेखकाचा अपमानच आहे. लेखकाचे लिखाणहक्क यामुळे अबाधित राहतील का?
माझी Admin यांना विनंती आहे की, त्यांनी माझ्या प्रोफाईलसकट सगळं लिखाण मायबोलीवरुन तात्काळ काढून टाकावं. किंवा ते कसं काढावं या बद्दल मला मार्गदर्शन करावं.
धन्यवाद

ओह
लिहीत राहा.वाचक तुमच्या वाईटावर टपलेले नाहीत हो.पण जिथे तुम्ही(किंवा मी किंवा कोणीही) महत्व मिळण्याची अपेक्षा करता तेथे त्या ठिकाणाला तुम्ही काय व्हॅल्यू एडिशन करता हे महत्वाचे.
आता याचा दुसरा भाग टाका बरं.आम्हाला वाचायचंय पुढे तुम्ही कशी कशी यात्रा केली ते.मस्त फोटो पण येउद्यात.
(मी प्रतिसादात मजकूर पाहिला तेव्हा नाव न वाचता तुम्हीच तो मूळ लेख एडिट करायची मर्यादा गेली म्हणून प्रतिसादात टाकलंय असं वाटलं. आता मागे जाऊन नाव पाहिलं.)

>>> SRD यांनी माझा मजकूर मला न विचारता Copy Pest केला त्यावर कुणीच काहीच बोललं नाही. त्या खाली " आणलं उचलून" असं लिहीलयं. कुणाला विचारुन आणलं???? याचं उत्तर द्या.>>>

चूक वाटली तर सॉरी.

इथे प्रसिद्ध करण्यासाठी लिंक दिलीत आणि तिथेही पब्लिकसाठीच आहे तो इथे आणला म्हणजे उचलेगिरी झाली का?
इथे लेखच नसता लिंक दिलेला आणि दुसऱ्या कोणत्यातरी लेखात प्रतिसादात टाकले असते तर समजू शकतो.

बाकी मी इथे प्रतिसादात दिल्याने मला काही शाबासक्या मिळण्याची अपेक्षा नव्हती.

लेख चांगला आहे हो. मी तुमच्या ओरिजिनल लिंक वर जाऊन वाचला. तुम्ही लिहा. आम्ही वाचू.
आता याचा दुसरा भाग टाका बरं.आम्हाला वाचायचंय पुढे तुम्ही कशी कशी यात्रा केली ते.मस्त फोटो पण येउद्यात....+१

Srd यांच्यावरच टीका केल्याचे आश्चर्य वाटले - त्यांनी तुम्हाला मदत करण्याच्या उद्देशाने ते इथे कॉपी केले असेच एक वाचक म्हणून मला वाटले. जेव्हा लोक ब्लॉग ची लिन्क देतात तेव्हा तेथील लिखाण कधीकधी फॉर्मॅट मुळे इथे कॉपी करणे अवघड असते. त्याकरता त्यांनी मदत केली. उलट मला वाटले तुम्हीही ते मूळ लेखात द्याल.

<लेखकाचा असा मजकूर विनापरवानगी टाकणं ....हे अत्यंत चूकिचे आहे. मायबोलीवर पूर्वीसारखा वाचकवर्ग आता उरलाच नाही. ह्या अशा काही अविचारी कृत्यांमूळे चांगले चांगले लेखकही मायबोलीने गमावले आहेत. एखाद्या लेखकाचा कंटेंड असा वापरणं हा त्या लेखकाचा अपमानच आहे. लेखकाचे लिखाणहक्क यामुळे अबाधित राहतील का?>

तुम्ही आधी या धाग्याच्या मजकुरात फक्त तुमच्या ब्लॉगची लिंक दिली होती का? मायबोलीच्या वाचकांनी त्या लिंकवरून मायबोलीबाहेर जाऊन तुमचं लेखन वाचावं एवढ्यासाठी नवा धागा काढलात का? म्हणजे तुम्ही मायबोलीवर तुमच्या ब्लॉगची फुकट जाहिरात केलीत का?